३१ शिमोन, शिमोन, पाहा! सैतानाने तुम्हा सगळ्यांना गव्हासारखं पाखडण्याची मागणी केली आहे.+३२ पण तुझा विश्वास खचू नये म्हणून मी तुझ्यासाठी याचना केली आहे.+ आणि तू पश्चात्ताप करून परत आल्यावर आपल्या बांधवांचा विश्वास दृढ कर.”+
९ तर मग, देवाची भक्ती करत जीवन जगणाऱ्या लोकांची परीक्षेतून सुटका कशी करावी+ आणि अनीतिमान लोकांना, न्यायाच्या दिवशी नाश करण्यासाठी कसं राखून ठेवावं हे यहोवाला* माहीत आहे.+