१५ कारण देवाची पवित्र शक्ती आपल्याला दास करत नाही. तसंच, ती आपल्या मनात भीतीही निर्माण करत नाही. उलट, पवित्र शक्तीद्वारे आपल्याला मुलं म्हणून दत्तक घेतलं जातं. आणि याच पवित्र शक्तीद्वारे आपल्याला “अब्बा,* बापा!” अशी हाक मारायची प्रेरणा मिळते.+
२९ कारण ज्यांच्याबद्दल त्याने सुरुवातीलाच विचार केला होता, त्यांना त्याने आपल्या मुलासारखंच असण्यासाठी पूर्वीपासून नेमलं होतं.+ हे यासाठी, की त्याचा मुलगा पुष्कळ भावांमध्ये+ प्रथमपुत्र+ असावा.
२३ इतकंच नाही, तर प्रथम फळ म्हणजे पवित्र शक्ती मिळालेले आपणसुद्धा मनातल्या मनात कण्हतो.+ पण त्याच वेळी, आपण देवाची मुलं म्हणून दत्तक घेतलं जाण्याची+ आणि खंडणीद्वारे आपल्या शरीरांतून सुटका मिळण्याची आतुरतेने वाट पाहत आहोत.