२० तीमथ्य, जो ठेवा तुझ्या स्वाधीन करण्यात आला आहे तो जपून ठेव.+ आणि पवित्र गोष्टींचा अनादर करणाऱ्या पोकळ संभाषणांपासून आणि ज्याला “ज्ञान” असं खोटं नाव देण्यात आलं आहे, त्याच्या विरोधी मतांपासून दूर राहा.+
१४ देवासमोर त्यांना या गोष्टींची आठवण करून देत जा आणि शब्दांवरून भांडण न करण्याची सूचना देत राहा.* कारण त्याने काहीच फायदा होत नाही, उलट ऐकणाऱ्यांचं नुकसानच होतं.*