३ तो जैतुनांच्या डोंगरावर बसलेला असताना, शिष्य एकांतात त्याच्याजवळ येऊन म्हणाले: “आम्हाला सांग, या गोष्टी केव्हा होतील आणि तुझ्या उपस्थितीचं*+ आणि जगाच्या व्यवस्थेच्या समाप्तीचं* चिन्ह काय असेल?”+
४पण, प्रेरित वचन स्पष्टपणे सांगतं की भविष्यात अशी वेळ येईल, जेव्हा काही जण दिशाभूल करणाऱ्या प्रेरित संदेशांकडे+ आणि दुष्ट स्वर्गदूतांच्या* शिकवणींकडे लक्ष देऊन विश्वास सोडून देतील.
१७ पण, माझ्या प्रिय बांधवांनो, तुम्ही आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रेषितांनी पूर्वीच सांगून ठेवलेल्या गोष्टी* आठवा. १८ ते तुम्हाला सांगायचे: “शेवटल्या काळात, स्वतःच्या दुष्ट वासनांप्रमाणे चालणारी थट्टेखोर माणसं येतील.”+