-
इब्री लोकांना ६:४-६पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
४ कारण ज्यांना एकेकाळी ज्ञानाचा प्रकाश मिळाला होता;+ ज्यांनी स्वर्गीय मोफत दान चाखलं; जे पवित्र शक्तीचे* भागीदार झाले; ५ आणि ज्यांनी देवाचं उत्तम वचन आणि येणाऱ्या जगाच्या व्यवस्थेच्या* सामर्थ्यशाली गोष्टी चाखल्या, ६ पण तरीसुद्धा जे पडले,+ त्यांना परत आणून पश्चात्ताप करायला प्रवृत्त करणं अशक्य आहे. कारण, ते स्वतःच देवाच्या मुलाला पुन्हा वधस्तंभाला* खिळतात आणि सगळ्यांसमोर त्याला लज्जित करतात.+
-