वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • यिर्मया १९
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

यिर्मया रूपरेषा

      • यिर्मयाला मातीचं मडकं फोडायला सांगितलं जातं (१-१५)

        • बआलसाठी मुलांचा बळी (५)

यिर्मया १९:१

समासातील संदर्भ

  • +यिर्म १८:२

यिर्मया १९:२

समासातील संदर्भ

  • +यहो १५:८, १२; २इत २८:१, ३; यिर्म ७:३१

यिर्मया १९:३

तळटीपा

  • *

    शब्दशः “त्याचे कान भणभणतील.”

यिर्मया १९:४

समासातील संदर्भ

  • +२रा २२:१६, १७; यश ६५:११
  • +२इत ३३:१, ४
  • +२रा २१:१६; यश ५९:७; यिर्म २:३४; विल ४:१३; मत्त २३:३४, ३५

यिर्मया १९:५

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +२इत २८:१, ३; ३३:१, ६; यश ५७:५
  • +लेवी १८:२१; यिर्म ७:३१; ३२:३५

यिर्मया १९:६

समासातील संदर्भ

  • +यिर्म ७:३२

यिर्मया १९:७

समासातील संदर्भ

  • +अनु २८:२५, २६; स्तो ७९:२; यिर्म ७:३३; १६:४

यिर्मया १९:८

समासातील संदर्भ

  • +१रा ९:८; यिर्म १८:१६; विल २:१५

यिर्मया १९:९

समासातील संदर्भ

  • +लेवी २६:२९; अनु २८:५३; विल २:२०; ४:१०; यहे ५:१०

यिर्मया १९:११

समासातील संदर्भ

  • +यिर्म ७:३२

यिर्मया १९:१३

समासातील संदर्भ

  • +स्तो ७९:१
  • +यिर्म ८:१, २; सफ १:४, ५
  • +यिर्म ७:१८; ३२:२९

यिर्मया १९:१५

समासातील संदर्भ

  • +नहे ९:१७, २९; जख ७:१२

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

यिर्म. १९:१यिर्म १८:२
यिर्म. १९:२यहो १५:८, १२; २इत २८:१, ३; यिर्म ७:३१
यिर्म. १९:४२रा २२:१६, १७; यश ६५:११
यिर्म. १९:४२इत ३३:१, ४
यिर्म. १९:४२रा २१:१६; यश ५९:७; यिर्म २:३४; विल ४:१३; मत्त २३:३४, ३५
यिर्म. १९:५२इत २८:१, ३; ३३:१, ६; यश ५७:५
यिर्म. १९:५लेवी १८:२१; यिर्म ७:३१; ३२:३५
यिर्म. १९:६यिर्म ७:३२
यिर्म. १९:७अनु २८:२५, २६; स्तो ७९:२; यिर्म ७:३३; १६:४
यिर्म. १९:८१रा ९:८; यिर्म १८:१६; विल २:१५
यिर्म. १९:९लेवी २६:२९; अनु २८:५३; विल २:२०; ४:१०; यहे ५:१०
यिर्म. १९:११यिर्म ७:३२
यिर्म. १९:१३स्तो ७९:१
यिर्म. १९:१३यिर्म ८:१, २; सफ १:४, ५
यिर्म. १९:१३यिर्म ७:१८; ३२:२९
यिर्म. १९:१५नहे ९:१७, २९; जख ७:१२
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
यिर्मया १९:१-१५

यिर्मया

१९ यहोवा असं म्हणाला: “जा, आणि कुंभाराकडून एक मातीचं मडकं विकत घे.+ मग लोकांच्या काही प्रमुखांना आणि याजकांच्या काही प्रमुखांना आपल्यासोबत घे. २ आणि ‘खापर दरवाजाच्या’ प्रवेशाजवळ असलेल्या ‘हिन्‍नोमच्या वंशजांच्या खोऱ्‍यात’+ जा. मी सांगीन तो संदेश तिथे जाहीर कर. ३ तू असं म्हण: ‘यहूदाच्या राजांनो आणि यरुशलेमच्या रहिवाशांनो! यहोवाचा संदेश ऐका. इस्राएलचा देव, सैन्यांचा देव यहोवा असं म्हणतो:

“मी लवकरच या जागेवर एक संकट आणणार आहे. आणि जो कोणी त्याबद्दल ऐकेल त्याला धक्का बसेल.* ४ कारण त्यांनी मला सोडून दिलंय.+ आणि त्यांनी या जागेची अशी अवस्था केली आहे, की आता ती ओळखताही येत नाही.+ त्यांना, त्यांच्या वाडवडिलांना किंवा यहूदाच्या राजांनाही माहीत नसलेल्या परक्या दैवतांसाठी ते या ठिकाणी बलिदानं देत आहेत. आणि त्यांनी ही जागा निर्दोष लोकांच्या रक्‍ताने भरून टाकली आहे.+ ५ त्यांनी बआलसाठी उच्च स्थानं* बांधली आहेत. आणि तिथे त्याच्यासाठी होमार्पण म्हणून ते आपल्या मुलांचा अग्नीत होम करत आहेत.+ पण, असं काही करायची मी त्यांना कधी आज्ञा दिली नव्हती किंवा त्याबद्दल मी कधी बोललो नव्हतो; असला विचारसुद्धा माझ्या मनात कधी आला नव्हता.”’+

६ ‘“म्हणून पाहा! असे दिवस येत आहेत, जेव्हा या ठिकाणाला ‘तोफेत’ किंवा ‘हिन्‍नोमच्या वंशजांचं खोरं’ असं म्हटलं जाणार नाही, तर ‘कत्तलीचं खोरं’ म्हटलं जाईल,”+ असं यहोवा म्हणतो. ७ “या ठिकाणी मी यहूदाच्या आणि यरुशलेमच्या सगळ्या योजना उधळून टाकीन. मी त्यांना शत्रूंच्या तलवारीला बळी पाडीन आणि त्यांच्या जिवावर उठलेल्या लोकांच्या हवाली करीन. मी त्यांची प्रेतं आकाशातल्या पक्ष्यांना आणि जमिनीवरच्या प्राण्यांना अन्‍न म्हणून देईन.+ ८ मी या शहराची अशी अवस्था करीन, की ती बघून लोकांना दहशत बसेल आणि ते शिट्टी वाजवून त्याची थट्टा करतील. तिथून येणारा-जाणारा प्रत्येक जण त्या शहराकडे चकित होऊन पाहील आणि शहरावर आलेल्या सर्व पीडांमुळे थट्टेने शिट्टी वाजवेल.+ ९ मी त्यांना त्यांच्याच मुलाबाळांचं मांस खायला लावीन. कारण त्यांचे शत्रू आणि त्यांच्या जिवावर उठलेले लोक त्यांना वेढा घालतील आणि त्यांची कोंडी करतील. त्या वेळी त्यांची परिस्थिती इतकी वाईट होईल, की त्यांच्यातला प्रत्येक जण आपल्याच सोबत्याचं मांस खाईल.”’+

१० मग तुझ्यासोबत आलेल्या माणसांसमोर ते मातीचं मडकं फोडून टाक, ११ आणि त्यांना असं सांग, ‘सैन्यांचा देव यहोवा म्हणतो: “कुंभाराचं मडकं फोडल्यावर ते पुन्हा कधी जोडता येत नाही, तसं मी या लोकांना आणि या शहराला फोडून टाकीन. पुरायला जागा उरणार नाही इतकी प्रेतं ते तोफेतमध्ये पुरतील.”’+

१२ यहोवा म्हणतो, ‘या शहराची आणि इथल्या लोकांची अवस्था तोफेतसारखी व्हावी म्हणून मी असं करीन. १३ यरुशलेममधली घरं आणि यहूदाच्या राजांची घरं तोफेतसारखीच अशुद्ध होतील;+ ज्या घरांच्या छतांवर त्यांनी आकाशाच्या सैन्यांसाठी बलिदानं दिली+ आणि इतर दैवतांसाठी पेयार्पणं ओतली,+ ती सगळी घरं तोफेतसारखीच अशुद्ध होतील.’”

१४ मग यिर्मया तोफेतहून, म्हणजे यहोवाने त्याला भविष्यवाणी करायला पाठवलं होतं तिथून परत आला. आणि यहोवाच्या मंदिराच्या अंगणात जाऊन उभा राहिला. तो सगळ्या लोकांना म्हणाला: १५ “इस्राएलचा देव, सैन्यांचा देव यहोवा असं म्हणतो: ‘पाहा! मी सांगितलं होतं त्याप्रमाणे मी या शहरावर आणि त्याच्या सगळ्या नगरांवर संकट आणतोय. कारण हे लोक हट्टीपणे वागलेत, आणि माझ्या आज्ञा पाळायला त्यांनी नकार दिलाय.’”+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा