एज्रा
७ हे सर्व घडल्यावर, पर्शियाचा राजा अर्तहशश्त याच्या शासनकाळात+ एज्रा*+ बाबेलवरून परत आला. एज्रा सरायाचा+ मुलगा होता. सराया अजऱ्याचा, अजऱ्या हिल्कीयाचा,+ २ हिल्कीया शल्लूमचा, शल्लूम सादोकचा, सादोक अहीटूबचा, ३ अहीटूब अमऱ्याचा, अमऱ्या अजऱ्याचा,+ अजऱ्या मरायोथचा, ४ मरायोथ जरहयाहचा, जरहयाह उज्जीचा, उज्जी बुक्कीचा, ५ बुक्की अबीशूवाचा, अबीशूवा फिनहासचा,+ फिनहास एलाजारचा+ आणि एलाजार मुख्य याजक अहरोन+ याचा मुलगा होता. ६ हाच एज्रा बाबेलवरून परत आला. तो एक शास्त्री* होता आणि त्याला इस्राएलचा देव यहोवा याने दिलेल्या, मोशेच्या नियमशास्त्राचं चांगलं ज्ञान होतं.*+ त्याचा देव यहोवा त्याच्यासोबत असल्यामुळे,* त्याने मागितलेल्या सर्व गोष्टी राजाने त्याला दिल्या.
७ राजा अर्तहशश्त याच्या शासनकाळाच्या सातव्या वर्षी इस्राएली लोकांपैकी काही जण, तसंच याजक, लेवी,+ गायक,+ द्वारपाल+ आणि मंदिरातले सेवक*+ यरुशलेमला गेले. ८ आणि राजाच्या शासनकाळाच्या सातव्या वर्षाच्या पाचव्या महिन्यात, एज्रा यरुशलेमला आला. ९ पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी त्याने बाबेलवरून आपला प्रवास सुरू केला आणि पाचव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी तो यरुशलेमला पोहोचला, कारण त्याचा देव त्याच्यासोबत होता.+ १० यहोवाच्या नियमशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी, त्याप्रमाणे चालण्यासाठी+ आणि त्यातले नियम आणि न्याय-निर्णय इस्राएलमध्ये शिकवण्यासाठी+ त्याने आपलं मन तयार केलं होतं.*
११ एज्रा एक याजक आणि शास्त्री* होता. यहोवाने इस्राएलला दिलेल्या नियमांचं आणि आज्ञांचं त्याला चांगलं ज्ञान होतं.* अर्तहशश्त राजाने एज्राला दिलेल्या पत्राची ही प्रत आहे:
१२ * “स्वर्गाच्या देवाच्या नियमशास्त्राचा शास्त्री* आणि याजक असलेला एज्रा, याला राजांचा राजा अर्तहशश्त+ याच्याकडून: तुला शांती असो. १३ मी असं फर्मान काढलं आहे, की माझ्या राज्यातल्या सर्व इस्राएली लोकांपैकी, त्यांच्या याजकांपैकी आणि लेव्यांपैकी, ज्यांना तुझ्यासोबत यरुशलेमला जायची इच्छा आहे, त्यांनी तुझ्यासोबत जावं.+ १४ कारण तुझ्याकडे* असलेलं तुझ्या देवाचं नियमशास्त्र, यहूदामध्ये आणि यरुशलेममध्ये पाळलं जात आहे की नाही, याचा तपास करण्यासाठी राजा आणि त्याचे सात सल्लागार तुला तिथे पाठवत आहेत. १५ तसंच, यरुशलेममध्ये राहणाऱ्या इस्राएलच्या देवासाठी, राजाने आणि त्याच्या सल्लागारांनी स्वेच्छेने दिलेलं सोनंचांदी तिथे नेण्यासाठी; १६ शिवाय, बाबेलच्या संपूर्ण प्रांतातून तुला जे सोनंचांदी मिळेल,* त्यासोबतच लोक आणि याजक यरुशलेममधल्या आपल्या देवाच्या मंदिरासाठी स्वेच्छेने ज्या भेटी देतील,+ त्या सर्व तिथे नेण्यासाठी तुला पाठवलं जात आहे. १७ या पैशांनी तू लवकरात लवकर बैल,+ मेंढे,+ कोकरं;+ तसंच त्यांच्यासोबत दिल्या जाणाऱ्या अन्नार्पणांसाठी+ आणि त्यांच्या पेयार्पणांसाठी+ लागणाऱ्या गोष्टी विकत घे. आणि यरुशलेममधल्या तुझ्या देवाच्या मंदिरातल्या वेदीवर त्या अर्पण कर.
१८ आणि उरलेल्या सोन्याचांदीचा, तुझ्या देवाच्या इच्छेप्रमाणे, तुला आणि तुझ्या भावांना योग्य वाटेल तसा तू वापर कर. १९ तसंच, तुझ्या देवाच्या मंदिराच्या सेवेसाठी तुला देण्यात आलेली सर्व भांडी, तू यरुशलेममध्ये तुझ्या देवासमोर नेऊन ठेव.+ २० आणि तुझ्या देवाच्या मंदिरासाठी ज्या इतर गोष्टी तुला द्यायच्या असतील, त्या सर्व तू शाही खजिन्यातून दे.+
२१ मी, राजा अर्तहशश्त नदीपलीकडच्या* प्रदेशातल्या सर्व खजिनदारांना असा हुकूम देतो, की स्वर्गाच्या देवाच्या नियमशास्त्राचा शास्त्री,* याजक एज्रा+ तुमच्याकडे जे काही मागेल ते लगेच त्याला दिलं जावं. २२ त्याला १०० तालान्त* चांदी, १०० कोर* मापं गहू, १०० बथ* मापं द्राक्षारस,+ १०० बथ मापं तेल+ इथपर्यंत तो जे काही मागेल ते, आणि हवं तितकं मीठ+ दिलं जावं. २३ स्वर्गाच्या देवाने आपल्या मंदिरासाठी जे काही आदेश दिले आहेत, ते आवेशाने पाळले जावेत,+ म्हणजे राजाच्या संपूर्ण राज्यावर आणि त्याच्या मुलांवर देवाचा क्रोध भडकणार नाही.+ २४ आणि तुला अशीही सूचना देण्यात येते की याजक, लेवी, गायक, वादक,+ द्वारपाल, देवाच्या मंदिरातले सेवक*+ आणि कामगार यांच्यावर कोणताही कर, खंडणी+ किंवा जकात लादण्याची कोणालाही परवानगी नाही.
२५ आणि हे एज्रा, तुझ्या देवाकडून तुला मिळालेल्या बुद्धीने,* तू नदीपलीकडच्या प्रदेशातल्या लोकांचा, म्हणजे तुझ्या देवाचे नियम माहीत असलेल्या सर्वांचा न्याय करण्यासाठी, अधिकाऱ्यांची आणि न्यायाधीशांची नेमणूक कर. शिवाय, जर कोणाला अजूनही हे नियम माहीत नसतील, तर तू ते त्यांना शिकव.+ २६ जो कोणी तुझ्या देवाचं नियमशास्त्र आणि राजाचा कायदा पाळणार नाही, त्याला लगेच शिक्षा केली जावी, मग ती मृत्यूची, हद्दपारीची, दंडाची किंवा कैदेची अशी कोणतीही शिक्षा असो.”
२७ आपल्या वाडवडिलांचा देव यहोवा याची स्तुती असो! कारण त्यानेच यरुशलेममध्ये असलेलं यहोवाचं मंदिर सुंदर बनवण्याची इच्छा राजाच्या मनात घातली.+ २८ आणि देवाने मला एकनिष्ठ प्रेम दाखवल्यामुळेच राजाची, त्याच्या सल्लागारांची+ आणि त्याच्या सर्व मोठ्या अधिकाऱ्यांची माझ्यावर कृपा झाली.+ यहोवा माझ्यासोबत असल्यामुळे मला धैर्य मिळालं* आणि मी आपल्यासोबत नेण्यासाठी इस्राएलमधून मुख्य लोकांना एकत्र केलं.