यिर्मया
१० हे इस्राएलच्या घराण्यातल्या लोकांनो! तुमच्याविरुद्ध यहोवाने काय संदेश दिला आहे तो ऐका. २ यहोवा म्हणतो:
“राष्ट्रांतल्या लोकांचे रितीरिवाज शिकू नका,+
आणि आकाशातली चिन्हं पाहून राष्ट्रं जशी घाबरून जातात, तसं तुम्ही घाबरून जाऊ नका.+
३ कारण राष्ट्रांतल्या लोकांचे रितीरिवाज व्यर्थ* आहेत.
कारागीर जंगलातून झाड कापून आणतो,
आणि आपलं हत्यार वापरून त्यापासून मूर्ती तयार करतो.+
४ त्या मूर्तीला सोन्या-चांदीने सजवलं जातं,+
आणि ती स्थिर उभी राहावी, म्हणून तिला हातोड्याने खिळे ठोकून पक्कं बसवलं जातं.+
५ मूर्ती तर काकडीच्या शेतातल्या बुजगावण्यांसारख्या* आहेत. त्या बोलू शकत नाहीत;+
त्यांना उचलून न्यावं लागतं, कारण त्या चालू शकत नाहीत.+
तुम्ही त्यांना घाबरू नका. कारण त्या कोणाचं नुकसान करू शकत नाहीत,
किंवा कोणाचं भलंही करू शकत नाहीत.”+
६ हे यहोवा, तुझ्यासारखा दुसरा कोणीही नाही.+
तू गौरवशाली आहेस, आणि तुझं नाव महान व शक्तिशाली आहे.
७ हे सर्व राष्ट्रांच्या राजा!+ असा कोण आहे जो तुला घाबरणार नाही? कारण तुझी भीती बाळगणं योग्यच आहे;
राष्ट्रांतल्या सर्व बुद्धिमान लोकांमध्ये आणि त्यांच्या सगळ्या राज्यांमध्ये,
तुझ्यासारखा दुसरा कोणीच नाही.+
८ ते सगळे निर्बुद्ध आणि मूर्ख आहेत.+
लाकडी मूर्तीकडून मिळणाऱ्या सूचना व्यर्थ* आहेत.+
९ तार्शीशवरून+ आणलेले चांदीचे पत्रे आणि उफाजवरून आणलेलं सोनं,
या धातूकाम करणाऱ्या कारागिरांनी बनवलेल्या गोष्टी आहेत.
मूर्तींचे कपडे निळ्या धाग्यापासून आणि जांभळ्या लोकरीपासून बनवले आहेत.
त्या मूर्ती कुशल कारागिरांच्या हातांनी बनवलेल्या आहेत.
१० पण, यहोवा हाच खरा देव आहे.
तो जिवंत देव+ आणि सर्वकाळचा राजा आहे.+
त्याच्या क्रोधाने पृथ्वी हादरेल,+
आणि त्याच्या रागापुढे कोणतंही राष्ट्र टिकू शकणार नाही.
११ * तुम्ही त्यांना असं सांगा:
“ज्या देवांनी आकाश आणि पृथ्वी बनवली नाही,
ते पृथ्वीवरून आणि आकाशाखालून नाहीसे होतील.”+
१२ त्यानेच आपल्या शक्तीने पृथ्वी बनवली,
आपल्या बुद्धीने सुपीक जमीन बनवली.+
आणि त्यानेच आपल्या समजशक्तीने आकाश पसरवलं.+
१३ त्याचा आवाज ऐकून आकाशातल्या पाण्याचा मोठा गडगडाट होतो.+
आपल्या कोठारांतून तो वाऱ्याला बाहेर आणतो.+
१४ प्रत्येक जण मूर्खपणे आणि ज्ञान नसल्यासारखं वागतोय.
धातूकाम करणारा प्रत्येक माणूस आपण बनवलेल्या कोरीव मूर्तींमुळे लज्जित होईल;+
कारण त्याच्या ओतीव मूर्ती खोट्या आहेत,
१५ त्या शून्यवत* आहेत. त्या थट्टा करण्याच्या लायकीच्या आहेत.+
त्यांचा हिशोब घेण्याचा दिवस येईल, तेव्हा त्या नष्ट होतील.
१६ पण याकोबचा देव* त्यांच्यासारखा नाही.
कारण तो सर्वकाही निर्माण करणारा आहे,
आणि इस्राएल त्याच्या वारशाची काठी आहे.+
सैन्यांचा देव यहोवा असं त्याचं नाव आहे.+
१७ हे वेढ्यात सापडलेली स्त्री!
जमिनीवरून आपलं गाठोडं उचल.
१८ कारण यहोवा असं म्हणतो:
“या देशातल्या लोकांना मी या वेळी गोफणीतून भिरकावून देईन.+
मी त्यांच्यावर संकट आणीन.”
१९ हाय हाय! मला किती मोठी जखम झाली आहे!*+
ती बरी होऊ शकत नाही.
आणि मी म्हणाले: “ही जखम माझ्या वाट्याला आली आहे आणि मी ती सोसलीच पाहिजे.
२० माझा तंबू उद्ध्वस्त झालाय,
आणि माझ्या तंबूचे दोर कापून टाकण्यात आलेत.+
माझी मुलं मला सोडून गेलीत; ती माझ्यासोबत नाहीत.+
माझा तंबू उभा करायला आणि त्याचं कापड ताणायला कोणीही उरलं नाही.
२२ ऐका! बातमी ऐका! शत्रू येत आहे!
उत्तरेकडून सैन्यांच्या पावलांचा मोठा आवाज येत आहे.+
तो यहूदाच्या शहरांना ओसाड करायला आणि त्यांना कोल्ह्यांच्या राहण्याचं ठिकाण बनवायला येत आहे.+
२३ हे यहोवा! मला हे चांगलं माहीत आहे, की मनुष्य आपला मार्ग ठरवू शकत नाही.
त्याला तर आपली पावलंही नीट टाकता येत नाहीत.+
२४ हे यहोवा, न्याय करून माझी चूक सुधार.
पण रागाने नको,+ नाहीतर मी नष्ट होऊन जाईन.+
२५ तुझ्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या राष्ट्रांवर
आणि तुझ्या नावाचा आदर न करणाऱ्या घराण्यांवर, आपल्या क्रोधाचा वर्षाव कर.+
कारण त्यांनी याकोबला गिळून टाकलं आहे;+
हो, त्याचा पूर्णपणे नाश होईपर्यंत त्यांनी त्याला गिळून टाकलं आहे.+
आणि त्यांनी त्याचा देश उद्ध्वस्त केला आहे.+