वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • शास्ते १६
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

शास्ते रूपरेषा

      • शमशोन गाझामध्ये जातो (१-३)

      • शमशोन आणि दलीला (४-२२)

      • शमशोनने घेतलेला बदला आणि त्याचा मृत्यू (२३-३१)

शास्ते १६:१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सभा पुस्तिकेसाठी संदर्भ,

    १/२०२२, पृ. २

शास्ते १६:३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१५/२००४, पृ. १५-१६

शास्ते १६:४

समासातील संदर्भ

  • +शास १६:१८

शास्ते १६:५

तळटीपा

  • *

    किंवा “त्याला लाडीगोडी लाव.”

समासातील संदर्भ

  • +शास १४:१५

शास्ते १६:७

तळटीपा

  • *

    किंवा “प्राण्यांच्या स्नायूंनी.”

शास्ते १६:९

समासातील संदर्भ

  • +शास १५:१४

शास्ते १६:१२

समासातील संदर्भ

  • +शास १६:९

शास्ते १६:१३

समासातील संदर्भ

  • +शास १६:७, ११

शास्ते १६:१५

समासातील संदर्भ

  • +शास १६:७, ११, १३
  • +शास १४:१६

शास्ते १६:१६

समासातील संदर्भ

  • +शास १४:१७

शास्ते १६:१७

तळटीपा

  • *

    शब्दशः “आईच्या गर्भापासून.”

समासातील संदर्भ

  • +गण ६:५; शास १३:५, ७

शास्ते १६:१८

समासातील संदर्भ

  • +शास १६:५

शास्ते १६:२०

समासातील संदर्भ

  • +शास १६:९, १२, १४

शास्ते १६:२२

समासातील संदर्भ

  • +शास १३:५

शास्ते १६:२३

समासातील संदर्भ

  • +१शमु ५:४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२००३, पृ. २५

शास्ते १६:२४

तळटीपा

  • *

    हे त्या मूर्तीला सूचित करतं असं दिसतं.

समासातील संदर्भ

  • +शास १५:४, ५
  • +शास १५:७, ८, १५, १६

शास्ते १६:२८

समासातील संदर्भ

  • +इब्री ११:३२
  • +शास १४:५, ६, १९; १५:१४
  • +शास १६:२१

शास्ते १६:३०

समासातील संदर्भ

  • +शास १६:२७
  • +शास १४:१९; १५:७, ८, १५, १६

शास्ते १६:३१

समासातील संदर्भ

  • +शास १३:२
  • +शास १३:८
  • +शास २:१६; १५:२०

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

शास्ते १६:४शास १६:१८
शास्ते १६:५शास १४:१५
शास्ते १६:९शास १५:१४
शास्ते १६:१२शास १६:९
शास्ते १६:१३शास १६:७, ११
शास्ते १६:१५शास १६:७, ११, १३
शास्ते १६:१५शास १४:१६
शास्ते १६:१६शास १४:१७
शास्ते १६:१७गण ६:५; शास १३:५, ७
शास्ते १६:१८शास १६:५
शास्ते १६:२०शास १६:९, १२, १४
शास्ते १६:२२शास १३:५
शास्ते १६:२३१शमु ५:४
शास्ते १६:२४शास १५:४, ५
शास्ते १६:२४शास १५:७, ८, १५, १६
शास्ते १६:२८इब्री ११:३२
शास्ते १६:२८शास १४:५, ६, १९; १५:१४
शास्ते १६:२८शास १६:२१
शास्ते १६:३०शास १६:२७
शास्ते १६:३०शास १४:१९; १५:७, ८, १५, १६
शास्ते १६:३१शास १३:२
शास्ते १६:३१शास १३:८
शास्ते १६:३१शास २:१६; १५:२०
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
  • २७
  • २८
  • २९
  • ३०
  • ३१
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
शास्ते १६:१-३१

शास्ते

१६ एकदा शमशोन गाझा इथे गेला. तिथे त्याला एक वेश्‍या दिसली आणि तो तिच्या घरी गेला. २ शमशोन आल्याची खबर गाझामधल्या लोकांना लागली. त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणाला घेरलं आणि शहराच्या दरवाजाजवळ ते संपूर्ण रात्र त्याची वाट पाहत लपून बसले. ‘दिवस उजाडताच आपण त्याला मारून टाकू,’ असा विचार करून ते रात्रभर तिथेच गुपचूप बसून राहिले.

३ पण शमशोन फक्‍त मध्यरात्रीपर्यंतच तिथे झोपून राहिला. मग उठून तो शहराच्या दरवाजाकडे गेला. त्याने ते दरवाजे, दोन्ही खांबांसकट आणि अडसरासकट उखडले. मग ते खांद्यांवर घेऊन तो हेब्रोनसमोर असलेल्या डोंगरमाथ्यावर गेला.

४ काही काळानंतर शमशोन, दलीला+ नावाच्या एका स्त्रीच्या प्रेमात पडला; ती सोरेक खोऱ्‍यात राहायची. ५ तेव्हा पलिष्टी लोकांचे प्रमुख तिच्याकडे आले आणि म्हणाले: “काहीतरी युक्‍ती कर*+ आणि त्याच्या या अफाट शक्‍तीचं रहस्य काय आहे ते शोधून काढ. त्याच्यावर आमचं कसं वर्चस्व होईल आणि त्याला कशाने बांधून ताब्यात ठेवता येईल याची माहिती काढ. त्या बदल्यात आम्ही प्रत्येक जण तुला १,१०० चांदीचे तुकडे देऊ.”

६ दलीला नंतर शमशोनला म्हणाली: “तुझ्यात खरंच खूप शक्‍ती आहे! मला सांग ना, तुझ्या या शक्‍तीचं गुपित काय? आणि तुला कशाने बांधून ताब्यात ठेवता येईल?” ७ शमशोन तिला म्हणाला: “मला जर कोणी धनुष्याच्या सात नव्या आणि न वाळलेल्या दोऱ्‍यांनी* बांधलं, तर माझी शक्‍ती जाईल आणि मी इतर माणसांसारखाच होईन.” ८ म्हणून पलिष्टी लोकांच्या प्रमुखांनी तिला धनुष्याच्या सात नव्याकोऱ्‍या आणि न वाळलेल्या दोऱ्‍या आणून दिल्या. तिने त्या दोऱ्‍यांनी शमशोनला बांधलं. ९ त्या वेळी आतल्या खोलीत काही पलिष्टी माणसं लपून बसली होती. दलीला शमशोनला म्हणाली: “शमशोन बघ, पलिष्टी आले!” हे ऐकताच, आगीची धग लागल्याने जवसाचा धागा जसा तटकन तुटतो, तशा धनुष्याच्या त्या दोऱ्‍या त्याने तोडून टाकल्या.+ आणि त्याच्या शक्‍तीचं रहस्य एक रहस्यच राहिलं.

१० मग दलीला शमशोनला म्हणाली: “तू माझ्याशी खोटं बोललास. फसवलंस तू मला. खरंखरं सांग ना तुला कशाने बांधता येईल?” ११ तेव्हा तो तिला म्हणाला: “जर कोणी कधीही न वापरलेल्या नव्या दोरखंडांनी मला बांधलं, तर माझी शक्‍ती जाईल आणि मी इतर माणसांसारखाच होईन.” १२ मग दलीलाने नवे दोरखंड आणून त्याला बांधलं आणि ती त्याला म्हणाली: “शमशोन बघ, पलिष्टी आले!” (यादरम्यान, आतल्या खोलीत काही पलिष्टी माणसं लपून बसली होती.) तेव्हा धागा तोडून टाकावा, तसं त्याने आपल्या हातांना बांधलेले दोरखंड तोडून टाकले.+

१३ नंतर दलीला शमशोनला म्हणाली: “तू परत खोटं बोललास. तू आतापर्यंत मला वेड्यात काढलंस.+ आता तरी सांग तुला कशाने बांधून ठेवता येईल?” त्यावर तो तिला म्हणाला: “तू जर माझ्या केसांच्या सात वेण्या हातमागाच्या उभ्या धाग्यांमध्ये विणल्या तर ते शक्य आहे.” १४ तेव्हा दलीलाने त्याच्या केसांच्या वेण्या गुंफल्या आणि त्या खुंटीने पक्क्या केल्या. मग ती त्याला म्हणाली: “शमशोन बघ, पलिष्टी आले!” तेव्हा तो झोपेतून जागा झाला आणि एका झटक्यात त्याने हातमागाचे धागे आणि खुंटी ओढून काढली.

१५ तेव्हा दलीला त्याला म्हणाली: “तू तीन वेळा मला फसवलंस, आणि तुझ्या या अफाट शक्‍तीचं गुपित मला सांगितलं नाहीस.+ तुझा जर माझ्यावर विश्‍वासच नाही, तर माझ्यावर प्रेम आहे असं कसं म्हणू शकतोस?”+ १६ तिच्या या रोजच्या कटकटीमुळे आणि हट्टामुळे शमशोनला जीव अगदी नकोसा झाला.+ १७ शेवटी त्याने तिला सगळं काही खरं सांगून टाकलं. तो तिला म्हणाला: “मी जन्मापासून* देवाचा नाझीर आहे. म्हणून आजपर्यंत माझ्या डोक्याला वस्तरा लागलेला नाही.+ माझे केस जर कापले, तर माझी शक्‍ती जाईल आणि मी इतर माणसांसारखाच होईन.”

१८ शमशोनने आपल्या मनातलं सगळं काही खरंखरं सांगितलं आहे हे पाहून, दलीलाने लगेच पलिष्टी लोकांच्या प्रमुखांना+ बोलावून घेतलं. ती म्हणाली: “या वेळी शमशोनने त्याचं खरं गुपित मला सांगितलंय, तेव्हा लवकर या.” म्हणून पलिष्टी लोकांचे प्रमुख पैसे घेऊन तिच्याकडे आले. १९ दलीलाने शमशोनला आपल्या मांडीवर झोपवलं, आणि एका माणसाला बोलावून त्याच्याकडून शमशोनच्या केसांच्या सात वेण्या कापून घेतल्या. त्यानंतर शमशोनची शक्‍ती निघून गेली आणि तिने त्याच्यावर ताबा मिळवला. २० मग ती म्हणाली: “शमशोन बघ, पलिष्टी आले!” तेव्हा तो झोपेतून जागा झाला आणि म्हणाला: “मी आधीसारखंच या वेळीसुद्धा स्वतःची सुटका करीन.”+ पण यहोवाने आपल्याला सोडलंय हे त्याला माहीत नव्हतं. २१ मग पलिष्टी लोकांनी त्याला पकडलं आणि त्याचे डोळे फोडले. त्यानंतर त्यांनी त्याला गाझामध्ये आणलं. तिथे त्यांनी त्याला तांब्याच्या दोन बेड्यांनी जखडून तुरुंगात टाकलं आणि धान्य दळायला लावलं. २२ पण मुंडण झाल्यावर शमशोनच्या डोक्यावरचे केस परत वाढू लागले.+

२३ नंतर, पलिष्टी लोकांचे प्रमुख त्यांच्या दागोन+ दैवतासाठी मोठा यज्ञ करायला आणि आनंदोत्सव करायला एकत्र आले. कारण ते म्हणत होते, की “आपल्या देवाने आपल्या शत्रूला, शमशोनला आपल्या हाती दिलंय!” २४ त्याला* पाहून ते आपल्या देवाची स्तुती करू लागले. ते म्हणाले: “ज्याने आमचा देश उद्ध्‌वस्त केला+ आणि आमच्या कितीतरी लोकांना मारलं,+ त्या शत्रूला आमच्या देवाने आमच्या हाती दिलंय!”

२५ ते सगळे खूप आनंदात होते. मग ते म्हणाले: “शमशोनला घेऊन या! म्हणजे तो आपली करमणूक करेल.” म्हणून त्यांनी शमशोनला त्यांची करमणूक करायला तुरुंगातून बाहेर आणलं, आणि त्याला खांबांच्या मधे उभं केलं. २६ मग ज्या मुलाने शमशोनचा हात धरला होता त्याला तो म्हणाला: “ज्या खांबांवर हे मंदिर आधारलेलं आहे ते खांब मला चाचपडू दे, म्हणजे मी त्यांचा आधार घेऊन उभा राहीन.” २७ (त्या वेळी मंदिर स्त्री-पुरुषांनी गच्च भरलेलं होतं. तिथे पलिष्टी लोकांचे सर्व प्रमुख होते. आणि त्याच्या छतावरून जवळजवळ ३,००० स्त्री-पुरुष शमशोनची गंमत पाहत होते.)

२८ मग शमशोन+ यहोवाचा धावा करून म्हणाला: “हे सर्वोच्च प्रभू यहोवा, माझी आठवण कर. हे देवा! एकदा, फक्‍त एकदाच मला शक्‍ती दे.+ म्हणजे कमीतकमी माझ्या एका डोळ्याबद्दल तरी मला पलिष्टी लोकांचा बदला घेता येईल.”+

२९ मग, ज्या मधल्या दोन खांबांवर मंदिर आधारलेलं होतं त्यांवर त्याने आपले हात टेकवले. त्याने आपला उजवा हात एका खांबावर आणि डावा हात दुसऱ्‍या खांबावर टेकवला. ३० नंतर शमशोन मोठ्याने देवाचा धावा करून म्हणाला: “या पलिष्टी लोकांबरोबर माझाही जीव जाऊ दे!” मग त्याने आपली सगळी शक्‍ती एकवटून ते खांब जोरात ढकलले. तेव्हा ते मंदिर तिथे जमलेल्या पलिष्टी लोकांवर आणि त्यांच्या प्रमुखांवर कोसळून पडलं.+ शमशोनने जिवंतपणी जितके लोक मारले, त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आपल्या मृत्यूच्या वेळी मारले.+

३१ त्यानंतर त्याचे भाऊ आणि त्याच्या वडिलांच्या घराण्यातले सगळे तिथे आले आणि त्याचा मृतदेह घेऊन गेले. त्यांनी त्याला सरा+ आणि अष्टावोलच्या मधे असलेल्या त्याच्या वडिलांच्या, मानोहाच्या+ कबरेत पुरलं. शमशोनने इस्राएलमध्ये २० वर्षं न्यायाधीश म्हणून काम केलं होतं.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा