वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • उत्पत्ती ३८
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

उत्पत्ती रूपरेषा

      • यहूदा आणि तामार (१-३०)

उत्पत्ती ३८:२

समासातील संदर्भ

  • +उत्प २४:२, ३; २८:१

उत्पत्ती ३८:३

समासातील संदर्भ

  • +गण २६:१९

उत्पत्ती ३८:५

समासातील संदर्भ

  • +यहो १९:२९, ३१

उत्पत्ती ३८:६

समासातील संदर्भ

  • +मत्त १:३

उत्पत्ती ३८:८

समासातील संदर्भ

  • +अनु २५:५, ६; मत्त २२:२४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    नवे जग भाषांतर, पृ. २५२३

उत्पत्ती ३८:९

समासातील संदर्भ

  • +रूथ ४:६
  • +अनु २५:७, ९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सभा पुस्तिकेसाठी संदर्भ, ५/२०२०, पृ. ४

    तरुण लोक विचारतात, पृ. २०१

उत्पत्ती ३८:१०

समासातील संदर्भ

  • +१इत २:३

उत्पत्ती ३८:११

समासातील संदर्भ

  • +गण २६:१९

उत्पत्ती ३८:१२

समासातील संदर्भ

  • +उत्प ३८:२
  • +उत्प ३८:१
  • +यहो १५:१०, १२; शास १४:१

उत्पत्ती ३८:१४

समासातील संदर्भ

  • +अनु २५:५

उत्पत्ती ३८:१५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२००४, पृ. ३०

उत्पत्ती ३८:१६

समासातील संदर्भ

  • +उत्प ३८:११

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२००४, पृ. ३०

उत्पत्ती ३८:१८

समासातील संदर्भ

  • +उत्प ४१:४२; १रा २१:८

उत्पत्ती ३८:२०

समासातील संदर्भ

  • +उत्प ३८:१

उत्पत्ती ३८:२१

तळटीपा

  • *

    किंवा “मंदिरातली वेश्‍या.” ही संज्ञा कदाचित कनानी देवतांच्या उपासनेशी संबंधित असलेली वेश्‍यावृत्ती करणाऱ्‍या व्यक्‍तीला सूचित करत असावी.

  • *

    किंवा “मंदिरातली वेश्‍या.” ही संज्ञा कदाचित कनानी देवतांच्या उपासनेशी संबंधित असलेली वेश्‍यावृत्ती करणाऱ्‍या व्यक्‍तीला सूचित करत असावी.

उत्पत्ती ३८:२२

तळटीपा

  • *

    किंवा “मंदिरातली वेश्‍या.” ही संज्ञा कदाचित कनानी देवतांच्या उपासनेशी संबंधित असलेली वेश्‍यावृत्ती करणाऱ्‍या व्यक्‍तीला सूचित करत असावी.

उत्पत्ती ३८:२४

समासातील संदर्भ

  • +लेवी २१:९

उत्पत्ती ३८:२५

समासातील संदर्भ

  • +उत्प ३८:१६, १८

उत्पत्ती ३८:२६

समासातील संदर्भ

  • +उत्प ३८:११; अनु २५:५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२००४, पृ. २९

उत्पत्ती ३८:२९

तळटीपा

  • *

    म्हणजे, “भेग,” कदाचित गर्भाशयमुखाला भेग पडण्याला हा शब्द सूचित करत असावा.

समासातील संदर्भ

  • +उत्प ४६:१२; रूथ ४:१२; १इत २:४; लूक ३:२३, ३३

उत्पत्ती ३८:३०

समासातील संदर्भ

  • +मत्त १:३

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

उत्प. ३८:२उत्प २४:२, ३; २८:१
उत्प. ३८:३गण २६:१९
उत्प. ३८:५यहो १९:२९, ३१
उत्प. ३८:६मत्त १:३
उत्प. ३८:८अनु २५:५, ६; मत्त २२:२४
उत्प. ३८:९रूथ ४:६
उत्प. ३८:९अनु २५:७, ९
उत्प. ३८:१०१इत २:३
उत्प. ३८:११गण २६:१९
उत्प. ३८:१२उत्प ३८:२
उत्प. ३८:१२उत्प ३८:१
उत्प. ३८:१२यहो १५:१०, १२; शास १४:१
उत्प. ३८:१४अनु २५:५
उत्प. ३८:१६उत्प ३८:११
उत्प. ३८:१८उत्प ४१:४२; १रा २१:८
उत्प. ३८:२०उत्प ३८:१
उत्प. ३८:२४लेवी २१:९
उत्प. ३८:२५उत्प ३८:१६, १८
उत्प. ३८:२६उत्प ३८:११; अनु २५:५
उत्प. ३८:२९उत्प ४६:१२; रूथ ४:१२; १इत २:४; लूक ३:२३, ३३
उत्प. ३८:३०मत्त १:३
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
  • २७
  • २८
  • २९
  • ३०
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
उत्पत्ती ३८:१-३०

उत्पत्ती

३८ त्या सुमारास, यहूदाने आपल्या भावांना सोडून, हीरा नावाचा एक अदुल्लामी माणूस जिथे राहायचा, त्या ठिकाणाजवळ आपला तंबू ठोकला. २ तिथे त्याने शूवा नावाच्या एका कनानी माणसाच्या मुलीला+ पाहिलं आणि त्याने लग्न करून तिच्याशी संबंध ठेवले. ३ तेव्हा ती गरोदर राहिली आणि तिला एक मुलगा झाला. त्याने त्याचं नाव एर+ ठेवलं. ४ मग ती पुन्हा गरोदर राहिली आणि तिला एक मुलगा झाला. तिने त्याचं नाव ओनान ठेवलं. ५ यानंतर तिला आणखी एक मुलगा झाला आणि तिने त्याचं नाव शेला ठेवलं. तो झाला तेव्हा यहूदा अकजीब+ इथे राहत होता.

६ काही काळाने, यहूदाने आपला मोठा मुलगा एर याचं तामार+ नावाच्या मुलीशी लग्न लावून दिलं. ७ पण यहूदाचा मोठा मुलगा एर हा यहोवाच्या नजरेत दुष्ट होता, त्यामुळे यहोवाने त्याला मारून टाकलं. ८ म्हणून यहूदा ओनानला म्हणाला: “आपल्या भावाचा वंश चालवण्यासाठी तू त्याच्या बायकोशी लग्न करून दिराचं कर्तव्य पूर्ण कर.”+ ९ पण होणारं मूल आपलं समजलं जाणार नाही हे ओनानला माहीत होतं.+ त्यामुळे जेव्हा तो आपल्या भावजयीशी संबंध ठेवायचा, तेव्हा तो आपलं वीर्य जमिनीवर पाडायचा. आपल्या भावाला संतती मिळू नये म्हणून तो असं करायचा.+ १० ओनानने केलेली ही गोष्ट यहोवाच्या नजरेत वाईट होती. म्हणून त्याने ओनानलाही मारून टाकलं.+ ११ आपला मुलगा शेला याचं तामारशी लग्न करून दिलं, तर तोही त्याच्या भावांसारखा मरून जाईल+ असा यहूदाने विचार केला. म्हणून तो आपली सून तामार हिला म्हणाला: “माझा मुलगा शेला वयात येईपर्यंत तू आपल्या वडिलांच्या घरी जाऊन विधवा म्हणून राहा.” तेव्हा, तामार आपल्या वडिलांच्या घरी जाऊन राहू लागली.

१२ काही काळ गेल्यावर, यहूदाची बायको, म्हणजेच शूवाची मुलगी+ मरण पावली. तिच्यासाठी शोक करण्याचा काळ संपल्यावर, यहूदा आपला मित्र अदुल्लामी हीरा+ याच्यासोबत तिम्ना+ इथे आपल्या मेंढरांची लोकर कातरणाऱ्‍यांकडे गेला. १३ तेव्हा कोणीतरी तामारला सांगितलं: “तुझा सासरा तिम्नाला त्याच्या मेंढरांची लोकर कातरायला जात आहे.” १४ हे ऐकताच तिने विधवेचे कपडे बदलून, अंगाभोवती शाल गुंडाळली आणि पदराने आपलं तोंड झाकलं. मग ती तिम्नाच्या मार्गावर असलेल्या एनाईम गावाच्या फाटकाजवळ जाऊन बसली. शेला वयात येऊनही आपल्या सासऱ्‍याने त्याच्याशी आपलं लग्न करून दिलेलं नाही,+ हे पाहून तिने असं केलं.

१५ तिने आपला चेहरा झाकला असल्यामुळे, तिला पाहताच ती एक वेश्‍या आहे असं यहूदाला वाटलं. १६ ती आपली सून आहे हे माहीत नसल्यामुळे, तो रस्त्याच्या कडेला तिच्याजवळ जाऊन म्हणाला: “मला तुझ्याशी संबंध ठेवू देशील का?”+ पण ती म्हणाली: “याच्या बदल्यात तुम्ही मला काय द्याल?” १७ यावर तो म्हणाला: “मी माझ्या कळपातलं एक बकरीचं पिल्लू तुझ्यासाठी पाठवून देईन.” पण ती म्हणाली: “ते पाठवेपर्यंत तुम्ही तारण म्हणून काय ठेवाल?” १८ तो म्हणाला: “तारण म्हणून तुला काय हवंय?” यावर ती म्हणाली: “तुमची मुद्रेची अंगठी,+ गोफ आणि तुमच्या हातात असलेली काठी मला द्या.” तेव्हा त्याने त्या वस्तू तिला दिल्या आणि तिच्याशी संबंध ठेवले आणि ती त्याच्यापासून गरोदर राहिली. १९ मग ती तिथून निघून गेली आणि तिने आपल्या अंगावरची शाल काढून पुन्हा विधवेचे कपडे घातले.

२० नंतर, तारण म्हणून त्या बाईजवळ दिलेल्या वस्तू परत आणण्यासाठी, यहूदाने आपल्या अदुल्लामी मित्राच्या+ हातून तिच्यासाठी बकरीचं एक पिल्लू पाठवलं. २१ त्याच्या मित्राने तिथल्या लोकांना विचारलं: “एनाईमच्या मार्गावर बसणारी ती वेश्‍या* कुठे आहे?” पण ते त्याला म्हणाले: “आमच्या इथे कधीच कोणी वेश्‍या* नव्हती.” २२ शेवटी तो यहूदाकडे परत येऊन म्हणाला: “मला ती सापडलीच नाही आणि तिथले लोक म्हणाले: ‘त्यांच्या इथे कधीच कोणी वेश्‍या* नव्हती.’” २३ यावर यहूदा म्हणाला: “मग त्या वस्तू तिच्याजवळच राहू दे, नाहीतर आपली बदनामी होईल. मी तर तुझ्या हाती हे बकरीचं पिल्लू पाठवलं होतं, पण ती तुला सापडलीच नाही.”

२४ पण साधारण तीन महिन्यांनी, कोणीतरी यहूदाला सांगितलं: “तुझी सून तामार वेश्‍या बनली आहे आणि आता गरोदर आहे.” तेव्हा यहूदा म्हणाला: “तिला बाहेर काढा आणि जाळून टाका.”+ २५ मग ते तिला घेऊन जाऊ लागले, तेव्हा तिने आपल्या सासऱ्‍याला असा निरोप पाठवला: “या वस्तू ज्या माणसाच्या आहेत, त्याच्यापासूनच मी गरोदर राहिले.” ती असंही म्हणाली: “ही मुद्रेची अंगठी, गोफ आणि काठी कोणाची आहे, ते जरा तपासून पाहा.”+ २६ त्या वस्तू पाहिल्यावर यहूदा म्हणाला: “ती माझ्यापेक्षा नीतिमान आहे, कारण मी माझा मुलगा शेला याचं लग्न तिच्याशी करून दिलं नाही.”+ यानंतर त्याने तिच्याशी पुन्हा कधीच संबंध ठेवले नाहीत.

२७ मूल होण्याच्या वेळी, तिच्या पोटात जुळी असल्याचं दिसून आलं. २८ प्रसूती होताना, आधी एका मुलाचा हात बाहेर आला. तेव्हा सुइणीने लगेच एक लाल दोरा घेऊन त्याच्या हाताला बांधला आणि म्हणाली: “आधी हा बाहेर आला.” २९ पण त्याने हात मागे घेताच त्याचा भाऊ बाहेर आला. तेव्हा ती सुईण म्हणाली: “तू तर भेग पाडून बाहेर आलास!” म्हणून त्याचं नाव पेरेस*+ ठेवण्यात आलं. ३० मग हाताला लाल दोरा बांधलेला त्याचा भाऊ बाहेर आला आणि त्याचं नाव जेरह+ ठेवण्यात आलं.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा