आमोस
९ मला यहोवा वेदीच्या वरती दिसला+ आणि तो म्हणाला: “खांबांच्या माथ्यावर मार, म्हणजे त्यांचा पाया हलेल. त्यांची डोकी* कापून टाक, आणि मी त्यांच्यातल्या उरलेल्यांना तलवारीने मारून टाकीन. कोणालाही पळून जाता येणार नाही आणि कोणी प्रयत्न केला, तरी त्याला निसटून जाता येणार नाही.+
२ ते जरी कबर* खोदून तिच्यात लपून बसले,
तरी मी त्यांना आपल्या हाताने बाहेर काढीन;
ते आकाशात गेले,
तरी मी त्यांना तिथून खाली आणीन.
३ आणि जर ते कर्मेल पर्वतावर जाऊन लपले,
तर मी त्यांना तिथून शोधून काढीन.+
माझ्यापासून लपण्यासाठी ते समुद्राच्या तळाशी गेले,
तर तिथे मी सापाला त्यांना चावण्याची आज्ञा देईन.
४ जर त्यांच्या शत्रूंनी त्यांना बंदिवासात नेलं,
तर तिथे मी तलवारीला आज्ञा करीन आणि ती त्यांना मारून टाकेल;+
मी त्यांना आशीर्वाद देण्यासाठी नाही, तर संकटं आणण्यासाठी त्यांच्यावर आपली नजर रोखीन.+
५ कारण सर्वोच्च प्रभू, सैन्यांचा यहोवा याने हात लावताच देश* वितळेल,+
आणि त्याचे सर्व रहिवासी शोक करतील;+
सगळा देश, भरून वाहणाऱ्या नाईल नदीसारखा उसळेल,
आणि इजिप्तच्या नाईलसारखा पुन्हा ओसरेल.+
७ यहोवा म्हणतो, ‘इस्राएलच्या लोकांनो, तुम्ही माझ्यासाठी कूशी लोकांच्या वंशजांसारखे नाहीत का?
मी इस्राएलला इजिप्त देशातून बाहेर आणलं नाही का?+
मी पलिष्ट्यांना क्रेतमधून,+ आणि अरामी लोकांना कीरमधून बाहेर आणलं नाही का?’+
८ ‘पाहा! सर्वोच्च प्रभू यहोवा याची नजर या पापी राज्यावर आहे,
आणि तो पृथ्वीच्या पाठीवरून त्याचं नामोनिशाण मिटवून टाकेल.+
पण मी याकोबच्या घराण्याचा पूर्णपणे नाश करणार नाही,’+ असं यहोवा म्हणतो.
९ ‘कारण पाहा! मी अशी आज्ञा देतो,
चाळणीत धान्य चाळल्यावर
जसा एकही खडा जमिनीवर पडत नाही,
तसं इस्राएलच्या घराण्याला सर्व राष्ट्रांमध्ये चाळलं जावं.+
१० माझ्या लोकांतले पापी म्हणतात, “संकट आमच्या जवळ येणार नाही, ते आमच्यापर्यंत पोहोचणारही नाही,”
पण ते सर्व तलवारीने मरतील.’
११ ‘त्या दिवशी मी दावीदचा पडलेला तंबू* पुन्हा उभा करीन,+
मी खिंडारं दुरुस्त करीन,
त्याचे कोसळलेले भाग परत उभे करीन;
मी तो पूर्वीच्या दिवसांप्रमाणे पुन्हा बांधीन.+
१२ मग माझे लोक अदोमच्या उरलेल्यांचा,
आणि माझ्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या सर्व राष्ट्रांचा ताबा घेतील,’+ असं यहोवा म्हणतो. तोच हे सर्व घडवून आणेल.
१३ यहोवा म्हणतो, ‘पाहा! असे दिवस येत आहेत,
जेव्हा नांगरणारा, कापणी करणाऱ्याला;
आणि द्राक्षं तुडवणारा, बी पेरणाऱ्याला गाठेल.+
१४ मी माझ्या लोकांना, इस्राएली लोकांना गोळा करून बंदिवासातून परत आणीन,+
आणि ते त्यांची उजाड पडलेली शहरं पुन्हा बांधून त्यांत राहतील;+
ते द्राक्षमळे लावून त्यांचा द्राक्षारस पितील+
आणि बागा लावून त्यांची फळं खातील.’+
१५ ‘मी त्यांना त्यांच्या देशात रुजवीन,
आणि जो देश मी त्यांना दिलाय
त्यातून त्यांना पुन्हा कधीही उपटलं जाणार नाही,’+ असं तुमचा देव यहोवा म्हणतो.”