गणना
१८ मग यहोवा अहरोनला म्हणाला: “पवित्र ठिकाणाबद्दलचे नियम मोडले गेले,+ तर त्यासाठी तू, तुझी मुलं आणि तुझं कूळ जबाबदार असेल. तसंच, याजकपदाचे नियम मोडले गेले,+ तर तू आणि तुझी मुलं जबाबदार असतील. २ तू तुझ्या वाडवडिलांच्या वंशातल्या, म्हणजे लेवी वंशातल्या तुझ्या भावांना इथे आण, म्हणजे ते तुझ्यासोबत राहून, साक्षपेटीच्या मंडपासमोर+ तुझी आणि तुझ्या मुलांची सेवा करतील.+ ३ तू त्यांना नेमून दिलेली कामं आणि त्यासोबत मंडपातली सगळी कामंही ते करतील.+ पण, त्यांनी पवित्र ठिकाणाच्या भांड्यांजवळ आणि वेदीजवळ येऊ नये, नाहीतर ते आणि तुम्हीसुद्धा मराल.+ ४ ते तुमच्यासोबत राहून, भेटमंडपातल्या त्यांच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडतील आणि मंडपातली सगळी कामं करतील. पण अधिकार नसलेला कोणीही* तुमच्याजवळ येऊ नये.+ ५ तुम्ही पवित्र ठिकाणाबद्दलची+ आणि वेदीबद्दलची+ आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे, म्हणजे यापुढे इस्राएली लोकांवर माझा राग भडकणार नाही.+ ६ मी तुमच्या भावांना, म्हणजे लेव्यांना इस्राएली लोकांमधून तुमच्यासाठी भेट म्हणून घेतलं आहे.+ भेटमंडपाची कामं करण्यासाठी त्यांना यहोवाला देण्यात आलं आहे.+ ७ वेदीबद्दलच्या आणि पडद्याच्या* आतल्या सर्व कामांची जबाबदारी तुझी आणि तुझ्या मुलांची आहे+ आणि तुम्ही ही कामं करावीत.+ याजकपणाची ही सेवा मी तुम्हाला भेट म्हणून दिली आहे. अधिकार नसलेला कोणीही* उपासना मंडपाच्या जवळ आला तर त्याला ठार मारलं जावं.”+
८ यहोवा अहरोनला पुढे म्हणाला: “माझ्यासाठी जे दान दिलं जातं त्यावर मी तुला अधिकार देतो.+ इस्राएली लोक ज्या पवित्र गोष्टी दान म्हणून देतात, त्यांतला एक हिस्सा मी तुला आणि तुझ्या मुलांना कायमचा भाग म्हणून देत आहे.+ ९ अग्नीत जाळून केल्या जाणाऱ्या परमपवित्र अर्पणांपैकी पुढील गोष्टी तुझ्या असतील: त्यांनी दिलेलं प्रत्येक अर्पण, म्हणजे ते माझ्यासाठी आणतात ती त्यांची अन्नार्पणं,+ पापार्पणं+ आणि दोषार्पणं.+ या गोष्टी तुझ्यासाठी आणि तुझ्या मुलांसाठी परमपवित्र आहेत. १० तू या गोष्टी खूप पवित्र अशा एखाद्या ठिकाणी खाव्या.+ प्रत्येक पुरुषाने त्या खाव्या. त्या तुझ्यासाठी पवित्र आहेत.+ ११ याचप्रमाणे इस्राएली लोक ज्या भेटी देतात,+ तसंच त्यांची सर्व ओवाळण्याची अर्पणं+ तुझीच असतील. मी त्या गोष्टी तुला आणि तुझ्या मुलामुलींना कायमचा भाग म्हणून दिल्या आहेत.+ तुझ्या घरातला शुद्ध असलेला प्रत्येक जण त्या खाऊ शकतो.+
१२ ते यहोवासाठी देत असलेलं त्यांचं पहिलं पीक,+ म्हणजेच सर्वात चांगलं तेल, नवीन द्राक्षारस आणि धान्य, मी तुला देतो.+ १३ त्यांच्या शेतात उगवतं, त्यातलं जे पहिलं पीक ते यहोवासाठी आणतील, ते तुझं होईल.+ तुझ्या घरातला शुद्ध असलेला प्रत्येक जण ते खाऊ शकतो.
१४ इस्राएलमधली प्रत्येक समर्पित वस्तू* तुझी होईल.+
१५ ते यहोवासाठी अर्पण करतील त्या सजीवांपैकी प्रत्येक पहिला जन्मलेला+ तुझा होईल, मग तो माणूस असो किंवा प्राणी. पण माणसांच्या आणि अशुद्ध प्राण्यांच्या पहिल्या जन्मलेल्यांना तू सोडवून घे.+ १६ ते एक महिन्याचे किंवा त्यापेक्षा मोठे होतील, तेव्हा पवित्र ठिकाणाच्या ठरलेल्या शेकेलप्रमाणे,* त्यांची सोडवण्याची किंमत म्हणून ठरलेले चांदीचे पाच शेकेल*+ देऊन, तू त्यांना सोडवून घे. एक शेकेल म्हणजे २० गेरे.* १७ फक्त पहिला जन्मलेला बैल, कोकरू किंवा बकरा यांना तू सोडवू नकोस,+ कारण ते पवित्र आहेत. तू त्यांचं रक्त वेदीवर शिंपड+ आणि त्यांची चरबी अग्नीत जाळून अर्पण कर. त्याच्या सुवासाने यहोवाला आनंद होईल.*+ १८ त्यांचं मांस तुझं होईल. ओवाळण्याच्या अर्पणातल्या छातीच्या भागाप्रमाणे आणि उजव्या पायाप्रमाणे हेही तुझंच होईल.+ १९ इस्राएली लोक यहोवासाठी जी पवित्र दानं देतात,+ ती सर्व मी तुला आणि तुझ्या मुलामुलींना कायमचा भाग म्हणून देत आहे.+ हा यहोवामध्ये आणि तुझ्या व तुझ्या संततीमध्ये कायमचा मिठाचा करार* आहे.”
२० यहोवा अहरोनला पुढे म्हणाला: “इस्राएल देशात तुला वारसा मिळणार नाही आणि तिथल्या जमिनीत तुला वाटा मिळणार नाही.+ इस्राएली लोकांमध्ये मीच तुझा वारसा आणि वाटा आहे.+
२१ लेवीची मुलं भेटमंडपात जी सेवा करतात, तिचा मोबदला म्हणून मी त्यांना इस्राएलमधल्या उत्पन्नातला प्रत्येक दहावा भाग वारसा म्हणून दिला आहे.+ २२ यापुढे इस्राएली लोकांनी भेटमंडपाजवळ येण्याचं पाप करू नये, नाहीतर ते मरतील. २३ भेटमंडपातली कामं लेव्यांनीच करावीत आणि लोकांनी भेटमंडपाविरुद्ध केलेल्या अपराधांसाठी लेवी जबाबदार असतील.+ त्यांनी इस्राएली लोकांमध्ये जमिनीचा वाटा, वारसा म्हणून घेऊ नये.+ हा तुमच्यासाठी पिढ्या न् पिढ्या कायमचा नियम आहे. २४ कारण इस्राएली लोक यहोवासाठी जो दहावा भाग दान देतात, तो मी लेव्यांना वारसा म्हणून दिला आहे. म्हणून, ‘त्यांनी इस्राएली लोकांमध्ये जमिनीचा वाटा, वारसा म्हणून घेऊ नये,’+ असं मी म्हणालो आहे.”
२५ मग यहोवा मोशेला म्हणाला: २६ “लेव्यांना सांग, ‘तुम्हाला इस्राएली लोकांकडून दहावा भाग मिळेल. हा भाग मी तुम्हाला त्यांच्याकडून तुमचा वारसा म्हणून दिला आहे.+ त्या दहाव्या भागातला दहावा भाग तुम्ही यहोवासाठी दान म्हणून द्यावा.+ २७ हा भाग तुम्ही तुमच्या धान्यातून, द्राक्षारसातून किंवा तेलातून दिलेलं दान म्हणून समजलं जाईल. २८ अशा रितीने, इस्राएली लोकांकडून मिळणाऱ्या सर्व दहाव्या भागांतून तुम्हीही यहोवासाठी दान द्यावं. यहोवासाठी हे दान तुम्ही अहरोन याजकाकडे द्यावं. २९ तुम्हाला मिळालेल्या सर्वात चांगल्या भेटींमधून,+ तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची दानं यहोवासाठी पवित्र म्हणून द्यावीत.’
३० लेव्यांना असं सांग, ‘जेव्हा तुम्ही त्या भेटींमधल्या सर्वात चांगल्या गोष्टी दान म्हणून द्याल, तेव्हा जे उरेल ते तुमच्यासाठी असेल. ते तुमच्यासाठी तुमच्या खळ्यातल्या* धान्यासारखं आणि तुमच्या उत्पन्नातल्या द्राक्षारसासारखं किंवा तेलासारखं असेल. ३१ तुम्ही आणि तुमच्या घराण्यातले लोक तो उरलेला भाग कोणत्याही ठिकाणी खाऊ शकता, कारण भेटमंडपातल्या सेवेबद्दल तुमचा मोबदला म्हणून तो तुम्हाला देण्यात आला आहे.+ ३२ तुम्ही त्या दहाव्या भागातून सर्वात चांगल्या गोष्टी दान म्हणून देत राहा, म्हणजे तुम्ही पापी ठरणार नाही. तुम्ही इस्राएली लोकांच्या पवित्र गोष्टींचा अनादर करू नका, नाहीतर तुम्ही मराल.’”+