वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • प्रेषितांची कार्यं २४
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

प्रेषितांची कार्यं रूपरेषा

      • पौलविरुद्ध आरोप (१-९)

      • पौल फेलिक्ससमोर आपली बाजू मांडतो (१०-२१)

      • पौलचा खटला दोन वर्षांपर्यंत बंद (२२-२७)

प्रेषितांची कार्यं २४:१

तळटीपा

  • *

    किंवा “जाहीर वक्त्याला.”

समासातील संदर्भ

  • +प्रेका २३:२
  • +प्रेका २३:२६

प्रेषितांची कार्यं २४:२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १९२-१९३

प्रेषितांची कार्यं २४:३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १९२

प्रेषितांची कार्यं २४:५

तळटीपा

  • *

    किंवा “एक पीडा.” शब्दशः “साथीचा रोग.”

समासातील संदर्भ

  • +मत्त ५:११; प्रेका १६:२०, २१; १७:६, ७
  • +लूक २३:१, २
  • +मत्त २:२३; प्रेका २८:२२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १९२-१९३

    टेहळणी बुरूज,

    १२/१५/२००१, पृ. २२-२३

प्रेषितांची कार्यं २४:६

समासातील संदर्भ

  • +प्रेका २१:२७, २८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १९२-१९३

    टेहळणी बुरूज,

    १२/१५/२००१, पृ. २२-२३

प्रेषितांची कार्यं २४:७

तळटीपा

  • *

    अति. क३ पाहा.

प्रेषितांची कार्यं २४:१०

समासातील संदर्भ

  • +फिलि १:७

प्रेषितांची कार्यं २४:११

समासातील संदर्भ

  • +प्रेका २१:१७, २६

प्रेषितांची कार्यं २४:१४

समासातील संदर्भ

  • +निर्ग ३:१५; प्रेका ३:१३; २ती १:३
  • +प्रेका २८:२३; रोम ३:२१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२०००, पृ. १३

प्रेषितांची कार्यं २४:१५

तळटीपा

  • *

    किंवा “लोकांचं पुनरुत्थान होणार आहे.” शब्दार्थसूचीत “पुनरुत्थान” पाहा.

समासातील संदर्भ

  • +लूक २३:४३
  • +यश २६:१९; मत्त २२:३१, ३२; लूक १४:१३, १४; योह ५:२८, २९; ११:२५; इब्री ११:३५; प्रक २०:१२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ३०

    सावध राहा!,

    क्र. १ २०२१ पृ. १३

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १२/२०२०, पृ. ७

    ३/१५/२०१२, पृ. ११

    ७/१/२००६, पृ. ६

    ७/१५/२००१, पृ. ६

    ७/१५/२०००, पृ. १३

    ४/१/१९९९, पृ. १८

    ७/१/१९९८, पृ. २२

    २/१५/१९९५, पृ. ८-१२

    बायबलमधून शिकायला मिळतं, पृ. ७७-७९

    बायबल काय शिकवते, पृ. ७२-७३

    प्रकटीकरण कळस, पृ. २९७-२९८

    ज्ञान, पृ. १८५-१८६

    अनंतकाल जगू शकाल, पृ. १७०-१७२, १७९-१८०

प्रेषितांची कार्यं २४:१६

तळटीपा

  • *

    किंवा “निर्दोष.”

समासातील संदर्भ

  • +प्रेका २३:१; १कर ४:४; इब्री १३:१८

प्रेषितांची कार्यं २४:१७

समासातील संदर्भ

  • +२कर ८:४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १६९

प्रेषितांची कार्यं २४:१८

समासातील संदर्भ

  • +प्रेका २१:२४, २६

प्रेषितांची कार्यं २४:१९

समासातील संदर्भ

  • +प्रेका २५:१६

प्रेषितांची कार्यं २४:२०

तळटीपा

  • *

    म्हणजे, यहुदी उच्च न्यायालय. शब्दार्थसूची पाहा.

प्रेषितांची कार्यं २४:२१

समासातील संदर्भ

  • +प्रेका २३:६

प्रेषितांची कार्यं २४:२२

समासातील संदर्भ

  • +प्रेका ९:१, २; १९:९

प्रेषितांची कार्यं २४:२४

समासातील संदर्भ

  • +मत्त १०:१८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १९४-१९५

प्रेषितांची कार्यं २४:२५

समासातील संदर्भ

  • +प्रेका १७:३०, ३१; २कर ५:१०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १९४-१९५

    टेहळणी बुरूज,

    ८/१/१९९३, पृ. २५-२७

प्रेषितांची कार्यं २४:२६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१५/२००१, पृ. २३

प्रेषितांची कार्यं २४:२७

समासातील संदर्भ

  • +प्रेका २५:९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १९५

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

प्रे. कार्यं २४:१प्रेका २३:२
प्रे. कार्यं २४:१प्रेका २३:२६
प्रे. कार्यं २४:५मत्त ५:११; प्रेका १६:२०, २१; १७:६, ७
प्रे. कार्यं २४:५लूक २३:१, २
प्रे. कार्यं २४:५मत्त २:२३; प्रेका २८:२२
प्रे. कार्यं २४:६प्रेका २१:२७, २८
प्रे. कार्यं २४:१०फिलि १:७
प्रे. कार्यं २४:११प्रेका २१:१७, २६
प्रे. कार्यं २४:१४निर्ग ३:१५; प्रेका ३:१३; २ती १:३
प्रे. कार्यं २४:१४प्रेका २८:२३; रोम ३:२१
प्रे. कार्यं २४:१५लूक २३:४३
प्रे. कार्यं २४:१५यश २६:१९; मत्त २२:३१, ३२; लूक १४:१३, १४; योह ५:२८, २९; ११:२५; इब्री ११:३५; प्रक २०:१२
प्रे. कार्यं २४:१६प्रेका २३:१; १कर ४:४; इब्री १३:१८
प्रे. कार्यं २४:१७२कर ८:४
प्रे. कार्यं २४:१८प्रेका २१:२४, २६
प्रे. कार्यं २४:१९प्रेका २५:१६
प्रे. कार्यं २४:२१प्रेका २३:६
प्रे. कार्यं २४:२२प्रेका ९:१, २; १९:९
प्रे. कार्यं २४:२४मत्त १०:१८
प्रे. कार्यं २४:२५प्रेका १७:३०, ३१; २कर ५:१०
प्रे. कार्यं २४:२७प्रेका २५:९
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र यात वाचा
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
  • २७
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
प्रेषितांची कार्यं २४:१-२७

प्रेषितांची कार्यं

२४ पाच दिवसांनी, महायाजक हनन्या+ काही वडिलांना आणि तिर्तुल्ल नावाच्या एका वकिलाला* घेऊन आला. आणि त्यांनी पौलविरुद्ध आपले आरोप राज्यपालासमोर मांडले.+ २ तिर्तुल्ल याला इशारा करण्यात आला, तेव्हा तो पौलवर आरोप लावत म्हणाला:

“हे फेलिक्स महाराज! तुमच्यामुळे आम्हाला फार शांतता लाभली असून, तुमच्या दूरदृष्टीमुळेच या देशात बऱ्‍याच सुधारणा घडून येत आहेत. ३ ही गोष्ट आम्ही सगळ्या ठिकाणी नेहमीच मान्य करतो आणि त्याबद्दल आम्ही खूप आभारी आहोत. ४ आता तुमचा जास्त वेळ न घेता, मी तुम्हाला नम्रपणे इतकीच विनंती करतो, की कृपा करून आमची बाजू थोडक्यात ऐकून घ्या. ५ कारण हा माणूस खूप त्रासदायक* आहे+ आणि तो संपूर्ण जगातल्या सगळ्या यहुद्यांना बंड करायला चिथवतोय.+ शिवाय, तो नासरेथकरांच्या पंथाचा पुढारी आहे.+ ६ त्याने मंदिरही दूषित करायचा प्रयत्न केला, त्यामुळे आम्ही त्याला धरलं.+ ७ *—— ८ तुम्ही स्वतः त्याची चौकशी कराल, तेव्हा आम्ही त्याच्यावर लावत असलेले हे सगळे आरोप खरे असल्याचं तुम्हाला दिसून येईल.”

९ तेव्हा, यहुदी लोकसुद्धा त्याच्या विरोधात बोलू लागले आणि या सगळ्या गोष्टी खऱ्‍या आहेत असं ठामपणे म्हणू लागले. १० राज्यपालाने पौलला बोलण्याचा मानेने इशारा केला, तेव्हा तो म्हणाला:

“तुम्ही बऱ्‍याच वर्षांपासून या देशाचा न्याय करत आला आहात, हे माहीत असल्यामुळे मला तुमच्यासमोर आपली बाजू मांडताना आनंद होतोय.+ ११ मी यरुशलेमला उपासना करायला गेलो, या गोष्टीला १२ दिवसांपेक्षा जास्त दिवस झालेले नाहीत.+ या गोष्टीची तुम्ही स्वतः खातरी करू शकता. १२ आणि मंदिरात मी कोणाशी वाद घालत असल्याचं, किंवा सभास्थानांत किंवा संपूर्ण शहरात जमावाला भडकवत असल्याचं त्यांना दिसलं नाही. १३ शिवाय, या क्षणी ज्या गोष्टींचा ते माझ्यावर आरोप लावत आहेत, त्या गोष्टीही ते सिद्ध करू शकत नाहीत. १४ पण एक गोष्ट मी कबूल करतो. ती म्हणजे, ज्या मार्गाला ते पंथ असं म्हणतात, त्या मार्गाप्रमाणे मी माझ्या पूर्वजांच्या देवाची पवित्र सेवा करतो.+ तसंच, नियमशास्त्रात आणि संदेष्ट्यांच्या लिखाणांत लिहिलेल्या सगळ्या गोष्टींवर+ माझा विश्‍वास आहे. १५ शिवाय, नीतिमान आणि अनीतिमान+ अशा सगळ्या लोकांना मेलेल्यांतून उठवलं जाणार आहे,*+ अशी या लोकांप्रमाणेच मीसुद्धा देवाकडून आशा बाळगतो. १६ आणि यामुळे, मी नेहमी देवासमोर आणि माणसांसमोर माझा विवेक शुद्ध* ठेवायचा प्रयत्न करतो.+ १७ आता बऱ्‍याच वर्षांनंतर मी माझ्या देशातल्या लोकांना दान द्यायला+ आणि देवाला अर्पणं वाहायला आलो. १८ त्यांनी मला मंदिरात या गोष्टी करताना पाहिलं, तेव्हा मी आधीच विधीप्रमाणे शुद्धीकरण केलेलं होतं.+ माझ्यासोबत लोकांचा जमाव नव्हता किंवा मी कोणतीही खळबळ माजवत नव्हतो. पण आशिया प्रांतातून आलेले काही यहुदी तिथे होते. १९ खरंतर, त्यांना माझ्याविरुद्ध काही तक्रार असेल, तर त्यांनी इथे तुमच्यासमोर येऊन माझ्यावर दोष लावायला पाहिजे होता.+ २० किंवा इथे उपस्थित असलेल्या या माणसांनी सांगावं, की मी न्यायसभेपुढे* उभा असताना त्यांना माझ्यावर दोष लावण्यासारखं काय सापडलं? २१ काही दोष असेल, तर तो इतकाच की मी त्यांच्यामध्ये उभा राहून मोठ्याने म्हणालो: ‘मेलेल्यांच्या पुनरुत्थानावरून आज तुमच्यासमोर माझी न्यायचौकशी केली जात आहे!’ ”+

२२ पण फेलिक्सला प्रभूच्या मार्गाबद्दल चांगली माहिती असल्यामुळे+ त्याने त्यांना असं म्हणून टाळलं: “सेनापती लुसिया आल्यावर, मी तुमच्या प्रकरणाचा निकाल लावीन.” २३ मग त्याने सैन्याच्या अधिकाऱ्‍याला असा हुकूम दिला, की पौलला कैदेत ठेवावं, पण त्याला थोडीफार मोकळीक द्यावी आणि त्याच्या लोकांना त्याची सेवा करायची परवानगी द्यावी.

२४ काही दिवसांनी, फेलिक्स आपली बायको द्रुसिल्ला, जी यहुदी होती तिला घेऊन आला. त्याने पौलला बोलावून घेतलं आणि ख्रिस्त येशूवरच्या विश्‍वासाबद्दल त्याच्याकडून ऐकलं.+ २५ पण पौल नीतिमत्त्व, संयम आणि येणाऱ्‍या न्यायदंडाबद्दल बोलू लागला,+ तेव्हा फेलिक्स घाबरला आणि म्हणाला: “आता तू जा. वेळ मिळाला म्हणजे मी तुला परत बोलावून घेईन.” २६ पण त्याच वेळी, पौल आपल्याला पैसे देईल अशीही त्याला आशा होती. म्हणून तो त्याला वारंवार बोलावून घ्यायचा आणि त्याच्याशी बोलायचा. २७ अशा रितीने दोन वर्षं उलटून गेल्यावर पुर्क्य फेस्त फेलिक्सच्या जागी आला. पण फेलिक्सला यहुद्यांची मर्जी राखायची इच्छा असल्यामुळे+ त्याने पौलला कैदेतच ठेवलं.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा