वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • यिर्मया १३
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

यिर्मया रूपरेषा

      • खराब झालेला पट्टा (१-११)

      • द्राक्षारसाची मडकी फोडली जातील (१२-१४)

      • कधीही न सुधरणाऱ्‍या यहूदाचा बंदिवास (१५-२७)

        • ‘कूशी माणसं आपल्या त्वचेचा रंग बदलू शकतात का?’ (२३)

यिर्मया १३:१

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

यिर्मया १३:९

समासातील संदर्भ

  • +लेवी २६:१९; सफ ३:११

यिर्मया १३:१०

समासातील संदर्भ

  • +२इत ३६:१५, १६
  • +यिर्म ६:२८

यिर्मया १३:११

समासातील संदर्भ

  • +निर्ग १९:५; अनु २६:१८; स्तो १३५:४
  • +यिर्म ३३:९
  • +यिर्म ६:१७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सभा पुस्तिकेसाठी संदर्भ, ३/२०१७, पृ. ३

यिर्मया १३:१२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सावध राहा!,

    १०/२०१५, पृ. ७

यिर्मया १३:१३

समासातील संदर्भ

  • +यश २९:९; ५१:१७; यिर्म २५:२७

यिर्मया १३:१४

समासातील संदर्भ

  • +यिर्म ६:२१; यहे ५:१०
  • +यहे ७:४; २४:१४

यिर्मया १३:१६

समासातील संदर्भ

  • +यश ५९:९

यिर्मया १३:१७

समासातील संदर्भ

  • +स्तो १००:३
  • +यिर्म ९:१

यिर्मया १३:१८

समासातील संदर्भ

  • +२रा २४:१२; यिर्म २२:२४, २६

यिर्मया १३:१९

तळटीपा

  • *

    किंवा “त्यांना वेढा घालण्यात आला आहे.”

समासातील संदर्भ

  • +अनु २८:६४

यिर्मया १३:२०

समासातील संदर्भ

  • +यिर्म ६:२२
  • +यहे ३४:८

यिर्मया १३:२१

समासातील संदर्भ

  • +यश ३९:१, २
  • +यिर्म ६:२४; मीख ४:९

यिर्मया १३:२२

समासातील संदर्भ

  • +यिर्म ५:१९; १६:१०, ११
  • +यहे १६:३७

यिर्मया १३:२३

तळटीपा

  • *

    किंवा “इथियोपियाची.”

समासातील संदर्भ

  • +नीत २७:२२

यिर्मया १३:२४

समासातील संदर्भ

  • +लेवी २६:३३; अनु २८:६४

यिर्मया १३:२५

समासातील संदर्भ

  • +यिर्म २:३२
  • +अनु ३२:३७, ३८; यश २८:१५; यिर्म १०:१४

यिर्मया १३:२६

समासातील संदर्भ

  • +विल १:८; यहे १६:३७; २३:२९

यिर्मया १३:२७

समासातील संदर्भ

  • +यिर्म २:२०; यहे १६:१५
  • +यश ६५:७; यहे ६:१३
  • +यहे २४:१३

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

यिर्म. १३:९लेवी २६:१९; सफ ३:११
यिर्म. १३:१०२इत ३६:१५, १६
यिर्म. १३:१०यिर्म ६:२८
यिर्म. १३:११निर्ग १९:५; अनु २६:१८; स्तो १३५:४
यिर्म. १३:११यिर्म ३३:९
यिर्म. १३:११यिर्म ६:१७
यिर्म. १३:१३यश २९:९; ५१:१७; यिर्म २५:२७
यिर्म. १३:१४यिर्म ६:२१; यहे ५:१०
यिर्म. १३:१४यहे ७:४; २४:१४
यिर्म. १३:१६यश ५९:९
यिर्म. १३:१७स्तो १००:३
यिर्म. १३:१७यिर्म ९:१
यिर्म. १३:१८२रा २४:१२; यिर्म २२:२४, २६
यिर्म. १३:१९अनु २८:६४
यिर्म. १३:२०यिर्म ६:२२
यिर्म. १३:२०यहे ३४:८
यिर्म. १३:२१यश ३९:१, २
यिर्म. १३:२१यिर्म ६:२४; मीख ४:९
यिर्म. १३:२२यिर्म ५:१९; १६:१०, ११
यिर्म. १३:२२यहे १६:३७
यिर्म. १३:२३नीत २७:२२
यिर्म. १३:२४लेवी २६:३३; अनु २८:६४
यिर्म. १३:२५यिर्म २:३२
यिर्म. १३:२५अनु ३२:३७, ३८; यश २८:१५; यिर्म १०:१४
यिर्म. १३:२६विल १:८; यहे १६:३७; २३:२९
यिर्म. १३:२७यिर्म २:२०; यहे १६:१५
यिर्म. १३:२७यश ६५:७; यहे ६:१३
यिर्म. १३:२७यहे २४:१३
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
  • २७
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
यिर्मया १३:१-२७

यिर्मया

१३ यहोवाने मला असं सांगितलं: “जा आणि स्वतःसाठी मलमलीचा* एक पट्टा विकत घे आणि तो कंबरेला बांध. पण त्याला पाणी लागू देऊ नकोस.” २ म्हणून, यहोवाने सांगितल्याप्रमाणे मी एक पट्टा विकत घेतला आणि तो कंबरेला बांधला. ३ मग दुसऱ्‍यांदा मला यहोवाचा असा संदेश मिळाला: ४ “तू जो पट्टा विकत घेतलाय आणि कंबरेला बांधलाय, तो घेऊन फरात नदीकडे जा. तिथे तो एका खडकाच्या कपारीत लपवून ठेव.” ५ तेव्हा यहोवाने मला आज्ञा दिल्याप्रमाणे मी फरात नदीकडे गेलो आणि तो पट्टा तिथे लपवून ठेवला.

६ मग बऱ्‍याच दिवसांनंतर यहोवाने मला सांगितलं: “ऊठ आणि फरात नदीकडे जा, आणि मी तुला जो पट्टा तिथे लपवायला सांगितला होता तो परत घे.” ७ म्हणून मी फरात नदीकडे गेलो आणि जिथे तो पट्टा लपवला होता, तिथून तो खोदून बाहेर काढला. मी बघितलं तर तो पट्टा पूर्णपणे खराब झाला होता; तो वापरण्याच्या लायकीचा राहिला नव्हता.

८ त्यानंतर मला यहोवाकडून असा संदेश मिळाला: ९ “यहोवा असं म्हणतो, ‘अगदी याचप्रमाणे मी यहूदाचा गर्व आणि यरुशलेमचा अहंकार मोडून टाकीन.+ १० हे दुष्ट लोक माझ्या आज्ञा पाळत नाहीत,+ ते हट्टी आहेत आणि आपल्या मनाला येईल तसं वागतात.+ ते इतर देवांच्या नादी लागलेत. ते त्यांची सेवा करतात आणि त्यांच्या पाया पडतात. म्हणून या दुष्ट लोकांची अवस्था या पट्ट्यासारखीच होईल; ते कुठल्याच कामाचे राहणार नाहीत.’ ११ यहोवा म्हणतो, ‘पट्टा जसा माणसाच्या कंबरेला बांधून ठेवतात, तसं मी इस्राएलच्या आणि यहूदाच्या संपूर्ण घराण्याला माझ्याशी बांधून ठेवलं. ते माझे लोक व्हावेत,+ तसंच त्यांनी माझं नाव,+ माझी स्तुती आणि माझी शोभा बनावं म्हणून मी असं केलं. पण त्यांनी काही माझं ऐकलं नाही.’+

१२ तू त्यांना असाही संदेश दे, ‘इस्राएलचा देव यहोवा म्हणतो: “प्रत्येक मोठं मडकं द्राक्षारसाने भरलेलं असावं.”’ पण ते तुला म्हणतील, ‘प्रत्येक मोठं मडकं द्राक्षारसाने भरलेलं असावं, हे आम्हाला आधीपासूनच माहीत नाही का?’ १३ तेव्हा तू त्यांना सांग, ‘यहोवा म्हणतो: “मी या देशातल्या सगळ्या लोकांना, दावीदच्या राजासनावर बसलेल्या राजांना, याजकांना, संदेष्ट्यांना आणि यरुशलेमच्या सगळ्या रहिवाशांना नशा येईपर्यंत दारू पाजत राहीन.+ १४ मी त्यांना एकमेकांवर आदळीन; बापाला आणि मुलाला एकमेकांवर आदळीन.+ मी त्यांच्यावर कोणतीही दयामाया करणार नाही किंवा त्यांच्याबद्दल मला काही वाईटही वाटणार नाही. त्यांचा नाश करण्यापासून मला कुठलीही गोष्ट थांबवू शकणार नाही.” असं यहोवा म्हणतो.’ +

१५ ऐका आणि लक्ष द्या.

अहंकाराने वागू नका, कारण यहोवा हे बोलला आहे.

१६ तुमचा देव यहोवा याचा गौरव करा;

त्याने अंधार पाडण्याच्या आत,

आणि संध्याकाळी तुमचे पाय डोंगरांवर अडखळण्याच्या आत त्याचा गौरव करा.

तुम्ही उजेडाची आशा धराल,

पण तो दाट काळोख पाडेल;

तो प्रकाशाला दाट अंधकार बनवेल.+

१७ आणि जर तुम्ही ऐकलं नाही,

तर तुमच्या गर्विष्ठपणामुळे मी एकांतात जाऊन रडेन.

यहोवाच्या कळपाला बंदी बनवून नेल्यामुळे,+

मी आसवे गाळीन आणि माझ्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहतील.+

१८ राजाला आणि राजमातेला सांगा,+ की त्यांनी राजासनावरून उतरून खाली बसावं.

कारण त्यांच्या डोक्यावरचा सुंदर मुकुट पडणार आहे.

१९ दक्षिणेकडची शहरं बंद करण्यात आली आहेत;* ती उघडायला कोणीही नाही.

यहूदाच्या सगळ्या लोकांना बंदिवासात नेण्यात आलं आहे; यहूदा पूर्णपणे बंदिवासात गेला आहे.+

२० आपली नजर वर कर आणि उत्तरेकडून जे येत आहेत त्यांच्याकडे बघ.+

तुला दिलेला कळप आणि तुझी सुंदर मेंढरं कुठे आहेत?+

२१ तू सुरुवातीपासून ज्यांच्यासोबत मैत्रीचे संबंध जोडलेस,

त्यांच्याकडूनच तुला शिक्षा मिळाल्यावर तू काय म्हणशील?+

स्त्रीला प्रसूतीच्या वेदना होतात, तशाच भयंकर वेदना तुला होणार नाहीत का?+

२२ आणि तू तुझ्या मनात म्हणशील, ‘माझ्यासोबत या सगळ्या गोष्टी का घडल्या?’+

तेव्हा लक्षात ठेव, की तुझ्या घोर अपराधांमुळेच हे घडलंय,

आणि त्यामुळेच तुझा झगा काढून टाकण्यात आलाय,+

आणि तुझ्या टाचांना भयंकर वेदना होत आहेत.

२३ कूशी* माणसं आपल्या त्वचेचा रंग, किंवा चित्ते आपल्या अंगावरचे ठिपके बदलू शकतात का?+

ते जर बदलू शकले, तरच वाईट कामं करण्यात पटाईत असलेले तुम्ही लोक चांगली कामं करू शकता.

२४ वाळवंटातला वारा जसं सुकलेलं गवत विखरून टाकतो, तसं मी तुम्हाला विखरून टाकीन.”+

२५ यहोवा म्हणतो: “हाच तुझा वाटा आणि मी तुला मापून दिलेला तुझा हिस्सा आहे.

कारण तू मला विसरून गेलीस+ आणि खोट्या गोष्टींवर भरवसा ठेवलास.+

२६ म्हणून मी तुझा झगा उचलून तुझ्या तोंडावर टाकीन,

आणि तुझी लाज सगळ्यांना दिसून येईल;+

२७ तुझी व्यभिचाराची कामं,+

घोड्यांसारखं तुझं वासनेने खिंकाळणं,

वेश्‍येसारखं तुझं निर्लज्ज वागणं,

सगळ्यांना दिसून येईल.

हे यरुशलेम, तुझा धिक्कार असो!

तू टेकड्यांवर आणि मैदानांत करत असलेली सगळी घृणास्पद कामं मी पाहिली आहेत.+

तू कधीपर्यंत अशीच अशुद्ध अवस्थेत राहशील?”+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा