वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • २ इतिहास २९
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

२ इतिहास रूपरेषा

      • यहूदाचा राजा हिज्कीया (१, २)

      • हिज्कीयाने देशात केलेल्या सुधारणा (३-११)

      • मंदिराचं शुद्धीकरण (१२-१९)

      • मंदिरातल्या सेवा पुन्हा सुरू केल्या जातात (२०-३६)

२ इतिहास २९:१

समासातील संदर्भ

  • +यश १:१; होशे १:१; मत्त १:१०
  • +२रा १८:१, २

२ इतिहास २९:२

समासातील संदर्भ

  • +१रा १५:५; २रा १८:३
  • +२इत ३१:२०

२ इतिहास २९:३

समासातील संदर्भ

  • +१रा ६:३३, ३४; २इत २८:२४

२ इतिहास २९:५

समासातील संदर्भ

  • +१इत १५:११, १२
  • +२रा १८:४

२ इतिहास २९:६

समासातील संदर्भ

  • +२इत २८:२२, २३; यिर्म ४४:२१
  • +यिर्म २:२७; यहे ८:१६

२ इतिहास २९:७

समासातील संदर्भ

  • +१रा ६:३३, ३४
  • +लेवी २४:२
  • +निर्ग ३०:८
  • +निर्ग २९:३८

२ इतिहास २९:८

तळटीपा

  • *

    किंवा “शिट्टी वाजवतो.”

समासातील संदर्भ

  • +२इत २४:१८
  • +लेवी २६:३२; अनु २८:१५, २५

२ इतिहास २९:९

समासातील संदर्भ

  • +लेवी २६:१४, १७
  • +२इत २८:५-८

२ इतिहास २९:१०

समासातील संदर्भ

  • +२इत १५:१०-१३

२ इतिहास २९:११

तळटीपा

  • *

    किंवा “दुर्लक्ष करण्याची.”

  • *

    किंवा “धूर वर जाण्यासाठी बलिदानं जाळायला.”

समासातील संदर्भ

  • +गण ३:६; अनु १०:८
  • +१इत २३:१३

२ इतिहास २९:१२

समासातील संदर्भ

  • +गण ४:२, ३; १इत २३:१२
  • +१इत २३:२१
  • +१इत २३:७

२ इतिहास २९:१३

समासातील संदर्भ

  • +१इत १५:१६, १७; २५:१, २

२ इतिहास २९:१४

समासातील संदर्भ

  • +१इत २५:५
  • +१इत २५:१

२ इतिहास २९:१५

समासातील संदर्भ

  • +२इत २९:५

२ इतिहास २९:१६

समासातील संदर्भ

  • +१रा ६:३६
  • +२रा २३:४, ६; २इत १५:१६; योह १८:१

२ इतिहास २९:१७

समासातील संदर्भ

  • +१रा ६:३; १इत २८:११

२ इतिहास २९:१८

तळटीपा

  • *

    म्हणजे, अर्पणाची भाकर.

समासातील संदर्भ

  • +२इत ४:१
  • +१रा ७:४०
  • +१रा ७:४८

२ इतिहास २९:१९

समासातील संदर्भ

  • +२इत २८:१, २, २४
  • +२इत २९:५

२ इतिहास २९:२१

समासातील संदर्भ

  • +लेवी ४:३, १३, १४; गण १५:२२-२४

२ इतिहास २९:२२

समासातील संदर्भ

  • +लेवी ४:४
  • +लेवी ४:७, १८

२ इतिहास २९:२५

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +१इत २५:१, ६; २इत ९:११
  • +१इत २८:१२, १३; २इत ८:१२, १४
  • +२शमु २४:११, १२; १इत २९:२९
  • +२शमु ७:२; १२:१

२ इतिहास २९:२६

समासातील संदर्भ

  • +गण १०:८; १इत १५:२४

२ इतिहास २९:२७

समासातील संदर्भ

  • +लेवी १:३, ४

२ इतिहास २९:३०

समासातील संदर्भ

  • +२शमु २३:१
  • +१इत १६:७

२ इतिहास २९:३१

समासातील संदर्भ

  • +लेवी १:३

२ इतिहास २९:३२

समासातील संदर्भ

  • +१रा ३:४; ८:६३; १इत २९:२१, २२

२ इतिहास २९:३४

समासातील संदर्भ

  • +२इत ३०:२, ३
  • +गण ८:१९; २इत ३०:१७; ३५:१०, ११

२ इतिहास २९:३५

तळटीपा

  • *

    किंवा “मंदिरातल्या सेवेची तयारी करण्यात आली.”

समासातील संदर्भ

  • +२इत २९:३२
  • +लेवी ३:१, १४-१६
  • +गण १५:५

२ इतिहास २९:३६

समासातील संदर्भ

  • +२इत ३०:१२

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

२ इति. २९:१यश १:१; होशे १:१; मत्त १:१०
२ इति. २९:१२रा १८:१, २
२ इति. २९:२१रा १५:५; २रा १८:३
२ इति. २९:२२इत ३१:२०
२ इति. २९:३१रा ६:३३, ३४; २इत २८:२४
२ इति. २९:५१इत १५:११, १२
२ इति. २९:५२रा १८:४
२ इति. २९:६२इत २८:२२, २३; यिर्म ४४:२१
२ इति. २९:६यिर्म २:२७; यहे ८:१६
२ इति. २९:७१रा ६:३३, ३४
२ इति. २९:७लेवी २४:२
२ इति. २९:७निर्ग ३०:८
२ इति. २९:७निर्ग २९:३८
२ इति. २९:८२इत २४:१८
२ इति. २९:८लेवी २६:३२; अनु २८:१५, २५
२ इति. २९:९लेवी २६:१४, १७
२ इति. २९:९२इत २८:५-८
२ इति. २९:१०२इत १५:१०-१३
२ इति. २९:११गण ३:६; अनु १०:८
२ इति. २९:१११इत २३:१३
२ इति. २९:१२गण ४:२, ३; १इत २३:१२
२ इति. २९:१२१इत २३:२१
२ इति. २९:१२१इत २३:७
२ इति. २९:१३१इत १५:१६, १७; २५:१, २
२ इति. २९:१४१इत २५:५
२ इति. २९:१४१इत २५:१
२ इति. २९:१५२इत २९:५
२ इति. २९:१६१रा ६:३६
२ इति. २९:१६२रा २३:४, ६; २इत १५:१६; योह १८:१
२ इति. २९:१७१रा ६:३; १इत २८:११
२ इति. २९:१८२इत ४:१
२ इति. २९:१८१रा ७:४०
२ इति. २९:१८१रा ७:४८
२ इति. २९:१९२इत २८:१, २, २४
२ इति. २९:१९२इत २९:५
२ इति. २९:२१लेवी ४:३, १३, १४; गण १५:२२-२४
२ इति. २९:२२लेवी ४:४
२ इति. २९:२२लेवी ४:७, १८
२ इति. २९:२५१इत २५:१, ६; २इत ९:११
२ इति. २९:२५१इत २८:१२, १३; २इत ८:१२, १४
२ इति. २९:२५२शमु २४:११, १२; १इत २९:२९
२ इति. २९:२५२शमु ७:२; १२:१
२ इति. २९:२६गण १०:८; १इत १५:२४
२ इति. २९:२७लेवी १:३, ४
२ इति. २९:३०२शमु २३:१
२ इति. २९:३०१इत १६:७
२ इति. २९:३१लेवी १:३
२ इति. २९:३२१रा ३:४; ८:६३; १इत २९:२१, २२
२ इति. २९:३४२इत ३०:२, ३
२ इति. २९:३४गण ८:१९; २इत ३०:१७; ३५:१०, ११
२ इति. २९:३५२इत २९:३२
२ इति. २९:३५लेवी ३:१, १४-१६
२ इति. २९:३५गण १५:५
२ इति. २९:३६२इत ३०:१२
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
  • २७
  • २८
  • २९
  • ३०
  • ३१
  • ३२
  • ३३
  • ३४
  • ३५
  • ३६
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
२ इतिहास २९:१-३६

२ इतिहास

२९ हिज्कीया+ राजा बनला तेव्हा तो २५ वर्षांचा होता आणि त्याने २९ वर्षं यरुशलेममधून राज्य केलं. त्याच्या आईचं नाव अबीया असून ती जखऱ्‍याची मुलगी होती.+ २ आपला पूर्वज दावीद याच्याप्रमाणेच+ हिज्कीया यहोवाच्या नजरेत जे योग्य ते करत राहिला.+ ३ त्याने आपल्या शासनकाळाच्या पहिल्या वर्षाच्या पहिल्या महिन्यात, यहोवाच्या मंदिराचे दरवाजे उघडले आणि ते दुरुस्त केले.+ ४ मग त्याने याजकांना आणि लेव्यांना पूर्वेकडे असलेल्या चौकात जमा केलं. ५ तो त्यांना म्हणाला: “लेव्यांनो! मी काय म्हणतो ते ऐका. स्वतःला शुद्ध करा.+ मग तुमच्या पूर्वजांच्या देवाचं, यहोवाचं मंदिर शुद्ध करा, आणि पवित्र स्थानात ज्या काही अशुद्ध गोष्टी आहेत त्या काढून टाका.+ ६ आपले वाडवडील अविश्‍वासूपणे वागले. त्यांनी आपला देव यहोवा याच्या नजरेत जे वाईट ते केलं+ आणि त्याला सोडून दिलं. त्यांनी यहोवाच्या उपासना मंडपापासून आपलं तोंड फिरवलं आणि आपल्या देवाकडे पाठ फिरवली.+ ७ त्यांनी मंदिराच्या द्वारमंडपाचे दरवाजे बंद केले+ आणि तिथले दिवे विझवून टाकले.+ इतकंच नाही, तर त्यांनी इस्राएलच्या देवासाठी पवित्र स्थानात धूप जाळायचं+ आणि होमार्पण द्यायचंही बंद केलं.+ ८ म्हणून यहूदावर आणि यरुशलेमवर यहोवाचा राग भडकलाय.+ आणि त्याने त्यांच्यावर असं संकट आणलंय, की जो कोणी ते पाहतो किंवा त्याबद्दल ऐकतो त्याला दहशत बसते आणि तो चकित होऊन त्यांची थट्टा करतो.* आणि हे सगळं तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहतच आहात.+ ९ आपले वाडवडीलही यामुळे तलवारीने मेले.+ आणि आपल्या बायका, मुलं व मुली हे सगळे बंदिवासात गेले.+ १० म्हणून आता मला, इस्राएलचा देव यहोवा याच्याशी एक करार करायची मनापासून इच्छा आहे.+ म्हणजे मग आपल्यावर भडकलेला त्याचा राग शांत होईल. ११ माझ्या मुलांनो, ही काही हातावर हात ठेवून बसण्याची* वेळ नाही. कारण यहोवाने तुम्हाला त्याच्यासमोर उभं राहून त्याची सेवा करायला+ आणि त्याच्यासाठी बलिदानांचं हवन करायला* निवडलंय.”+

१२ तेव्हा जे लेवी कामासाठी पुढे आले ते हे: कहाथच्या घराण्यातून+ अमासयचा मुलगा महथ आणि अजऱ्‍याचा मुलगा योएल; मरारीच्या घराण्यातून+ अब्दीचा मुलगा कीश आणि यहल्ललेलचा मुलगा अजऱ्‍या; आणि गेर्षोनच्या घराण्यातून+ जिम्माचा मुलगा यवाह आणि यवाहचा मुलगा एदेन; १३ एलसाफानच्या मुलांपैकी शिम्री आणि यऊवेल; आसाफच्या+ मुलांपैकी जखऱ्‍या आणि मत्तन्याह; १४ हेमानच्या मुलांपैकी+ यहीएल व शिमी; आणि यदूथूनच्या+ मुलांपैकी शमाया आणि उज्जियेल. १५ मग या लेव्यांनी आपल्या भाऊबंदांना एकत्र जमवलं. आणि यहोवाने सांगितल्याप्रमाणे राजाने जी आज्ञा दिली होती, त्यानुसार स्वतःला पवित्र करून ते यहोवाचं मंदिर शुद्ध करायला आले.+ १६ त्यानंतर यहोवाचं मंदिर शुद्ध करण्यासाठी याजक मंदिरात गेले. यहोवाच्या मंदिरात त्यांना ज्या काही अशुद्ध वस्तू सापडल्या त्या सगळ्या त्यांनी यहोवाच्या मंदिराच्या अंगणात आणल्या.+ तिथून मग लेव्यांनी त्या उचलून बाहेर किद्रोन खोऱ्‍यात नेल्या.+ १७ अशा प्रकारे, त्यांनी पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी यहोवाचं मंदिर पवित्र करायचं काम सुरू केलं. आणि त्या महिन्याच्या आठव्या दिवशी ते मंदिराच्या द्वारमंडपापर्यंत आले.+ त्यांनी आणखी आठ दिवस यहोवाचं मंदिर पवित्र केलं, आणि पहिल्या महिन्याच्या १६ व्या दिवशी ते काम पूर्ण केलं.

१८ त्यानंतर ते हिज्कीया राजाकडे गेले आणि म्हणाले: “आम्ही यहोवाचं संपूर्ण मंदिर शुद्ध केलंय. आम्ही होमार्पणाची वेदी+ व त्याची सगळी भांडी+ आणि भाकरीची थप्पी* ठेवायचं मेज+ व त्याची सगळी भांडी शुद्ध केली आहेत. १९ आणि आहाज राजाने त्याच्या शासनकाळात देवाशी अविश्‍वासूपणे वागून जी सगळी भांडी बाजूला काढली होती,+ तीसुद्धा आम्ही तयार करून पवित्र केली आहेत.+ ती सर्व भांडी यहोवाच्या वेदीसमोर आहेत.”

२० मग हिज्कीया राजा सकाळी लवकर उठला आणि त्याने शहरातल्या सगळ्या अधिकाऱ्‍यांना एकत्र जमवलं. त्यानंतर ते सगळे यहोवाच्या मंदिरात गेले. २१ त्यांनी राज्यासाठी, मंदिरासाठी आणि यहूदासाठी पापार्पण म्हणून सात बैल, सात एडके, सात नर कोकरं आणि सात बकरे आणले.+ मग राजाने याजकांना, म्हणजे अहरोनच्या वंशजांना ते यहोवाच्या वेदीवर अर्पण करायला सांगितलं. २२ तेव्हा त्यांनी बैल कापले+ आणि याजकांनी त्यांचं रक्‍त घेऊन ते वेदीवर शिंपडलं.+ त्यानंतर त्यांनी एडके कापले आणि याजकांनी त्यांचं रक्‍त वेदीवर शिंपडलं. मग त्यांनी नर कोकरं कापली आणि याजकांनी त्यांचं रक्‍त वेदीवर शिंपडलं. २३ नंतर त्यांनी पापार्पणाचे बकरे राजापुढे आणि इस्राएलच्या मंडळीपुढे आणून त्यांच्यावर हात ठेवले. २४ मग याजकांनी बकरे कापले आणि ते पापार्पण म्हणून दिले. आणि संपूर्ण इस्राएलच्या प्रायश्‍चित्तासाठी त्यांनी त्यांचं रक्‍त वेदीवर शिंपडलं. कारण राजा म्हणाला होता, की होमार्पण आणि पापार्पण हे संपूर्ण इस्राएलसाठी देण्यात यावं.

२५ यादरम्यान हिज्कीयाने लेव्यांना झांजा, तंतुवाद्यं आणि वीणा* देऊन यहोवाच्या मंदिरात उभं केलं होतं.+ त्याने दावीद राजा,+ राजासाठी दृष्टान्त पाहणारा गाद+ आणि नाथान+ संदेष्टा यांनी लावून दिलेल्या व्यवस्थेनुसार त्यांना उभं केलं होतं. कारण यहोवानेच आपल्या संदेष्ट्यांद्वारे ही व्यवस्था लावून दिली होती. २६ अशा प्रकारे, लेवी हे दावीदने बनवलेली संगीत वाद्यं घेऊन उभे होते, तर याजक कर्णे घेऊन उभे होते.+

२७ मग हिज्कीयाने वेदीवर होमार्पण देण्याची आज्ञा केली.+ होमार्पण देण्याचं सुरू होताच यहोवासाठी गीत गायला सुरुवात झाली. आणि इस्राएलचा राजा दावीद याने बनवलेल्या वाद्यांच्या तालावर कर्णेही फुंकले जाऊ लागले. २८ आणि गीत गायलं जात असताना व कर्णे फुंकले जात असताना संपूर्ण मंडळीने नमन केलं. होमार्पण देऊन पूर्ण होईपर्यंत हे सगळं चालू राहिलं. २९ होमार्पण देऊन झाल्यावर, राजाने आणि त्याच्यासोबत असलेल्या सगळ्यांनी लगेच गुडघे टेकून नमन केलं. ३० मग हिज्कीयाने आणि सगळ्या अधिकाऱ्‍यांनी लेव्यांना दावीदची+ आणि दृष्टान्त पाहणाऱ्‍या आसाफची स्तोत्रं गाऊन यहोवाची स्तुती करायला सांगितलं.+ तेव्हा त्यांनी मोठ्या आनंदाने देवाची स्तुती केली आणि गुडघे टेकून त्याला नमन केलं.

३१ त्यानंतर हिज्कीया म्हणाला: “तुम्हाला यहोवासाठी वेगळं करण्यात आलंय, तर आता बलिदानं आणि आभार मानण्याची अर्पणं घेऊन यहोवाच्या मंदिरात या.” तेव्हा संपूर्ण मंडळी बलिदानं आणि आभार मानण्याची अर्पणं आणू लागली. आणि ज्या कोणाला मनापासून इच्छा झाली, त्या प्रत्येकाने होमार्पणं आणली.+ ३२ संपूर्ण मंडळीने यहोवासाठी जी होमार्पणं आणली, त्यांची संख्या ही: ७० बैल, १०० एडके आणि २०० नर कोकरं.+ ३३ तसंच पवित्र अर्पणांची संख्या ही: ६०० गुरंढोरं आणि ३,००० मेंढरं. ३४ पण होमार्पणांसाठी आणलेल्या सगळ्या प्राण्यांची कातडी काढायला पुरेसे याजक नव्हते. म्हणून काम संपेपर्यंत आणि इतर याजक स्वतःला शुद्ध करेपर्यंत+ त्यांच्या भावांनी, म्हणजे लेव्यांनी त्यांना मदत केली.+ कारण स्वतःला शुद्ध करण्याच्या बाबतीत याजकांपेक्षा लेवी जास्त काळजी घ्यायचे. ३५ याशिवाय आणखी बरीच होमार्पणं,+ तसंच शांती-अर्पणांची चरबी+ आणि होमार्पणांसोबत अर्पण केली जाणारी पेयार्पणंही दिली गेली.+ अशा रितीने, यहोवाच्या मंदिराची सेवा पुन्हा सुरू करण्यात आली.* ३६ खऱ्‍या देवाने लोकांसाठी जे काही केलं होतं,+ त्यामुळे हिज्कीयाने आणि सर्व लोकांनी आनंदोत्सव केला. कारण हे सगळं खूप लवकर घडून आलं होतं.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा