स्तोत्र
१०५ यहोवाचे आभार माना,+ त्याचं नाव घेऊन त्याला प्रार्थना करा,
राष्ट्रा-राष्ट्रांतल्या लोकांना त्याच्या कार्यांबद्दल सांगा!+
३ त्याच्या पवित्र नावाचा अभिमानाने गौरव करा.+
यहोवाचा शोध घेणाऱ्यांचं मन हर्षित होवो.+
४ यहोवाचा आणि त्याच्या सामर्थ्याचा शोध घ्या.+
आपले डोळे सतत त्याच्याकडे लावा.
५ त्याने केलेली अद्भुत कार्यं आठवा,
त्याचे चमत्कार आणि त्याने जाहीर केलेले न्याय-निर्णय आठवा.+
६ त्याचा सेवक अब्राहाम याच्या वंशजांनो,+
याकोबच्या मुलांनो, त्याच्या निवडलेल्या लोकांनो, तुम्ही ते आठवा.+
७ तो आपला देव यहोवा आहे.+
त्याचे न्याय-निर्णय संपूर्ण पृथ्वीसाठी आहेत.*+
१० त्याने ती शपथ, याकोबसाठी एक नियम म्हणून
आणि इस्राएलसाठी कायमचा करार म्हणून स्थापन केली.
१२ त्या वेळी त्यांची संख्या कमी होती,+
हो, ते संख्येने अगदीच कमी होते आणि विदेशी म्हणून त्या देशात राहत होते.+
१३ ते एका राज्यातून दुसऱ्या राज्यात,
एका राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्रात भटकत राहिले.+
१४ त्याने कोणत्याही माणसाला त्यांच्यावर जुलूम करू दिला नाही,+
उलट त्यांच्यासाठी त्याने राजांना फटकारलं.+
१७ त्याने त्यांच्यापुढे एका माणसाला, योसेफला पाठवलं;
त्याला गुलाम म्हणून विकण्यात आलं.+
१९ यहोवाचे शब्द खरे ठरेपर्यंत,+
त्याच्या वचनांनी त्याला शुद्ध केलं.
२० राजाने त्याची सुटका करायला माणसं पाठवली,+
लोकांच्या शासकाने त्याला मुक्त केलं.
२१ त्याने त्याला आपल्या घराण्याचा मालक
आणि आपल्या सगळ्या संपत्तीवर अधिकारी म्हणून नेमलं.+
२२ त्याने त्याला आपल्या अधिकाऱ्यांशी मनाप्रमाणे वागण्याचा;
आणि आपल्या वडीलजनांना बुद्धी शिकवण्याचा अधिकार दिला.+
२३ मग इस्राएल इजिप्तला आला;+
हामच्या देशात याकोब विदेशी म्हणून राहिला.
२५ त्याने शत्रूंची मनं बदलू दिली;
त्यांना आपल्या लोकांचा द्वेष करू दिला
आणि आपल्या सेवकांविरुद्ध कटकारस्थानं करू दिली.+
२९ त्याने त्यांच्या पाण्याचं रक्त केलं
आणि त्यातले मासे मारून टाकले.+
३० त्यांचा देश बेडकांनी भरून गेला,+
राजाच्या महालातही बेडकं शिरली.
३१ त्याने गोमाश्यांना त्यांच्यावर हल्ला करण्याचा आदेश दिला
आणि त्यांच्या सगळ्या प्रदेशांत चिलटं पाठवली.+
३३ त्याने त्यांचे द्राक्षवेल आणि अंजिराची झाडं नष्ट केली
आणि त्यांच्या प्रदेशातल्या झाडांचा नाश केला.
३४ टोळांनी हल्ला करावा असा त्याने आदेश दिला,
तेव्हा असंख्य टोळ आले.+
३५ त्यांनी देशातली सगळी झाडंझुडपं
आणि जमिनीचं पीक फस्त केलं.
३६ मग त्यांच्या देशातल्या प्रत्येक प्रथम जन्मलेल्या,
त्यांच्या पुरुषत्वाच्या पहिल्या फळाला त्याने मारून टाकलं.+
३७ त्याने आपल्या लोकांना सोनंचांदी घेऊन बाहेर आणलं;+
त्याच्या वंशांपैकी कोणीही अडखळलं नाही.
४२ कारण त्याने आपला सेवक, अब्राहाम याला दिलेलं पवित्र वचन आठवणीत ठेवलं.+
४३ त्यामुळे त्याने आपल्या लोकांना जयजयकार करत बाहेर आणलं,+
त्याने आपल्या निवडलेल्या लोकांना जल्लोष करत बाहेर आणलं.
४५ त्याच्या लोकांनी त्याचे आदेश आणि कायदे पाळावेत,+
म्हणून त्याने असं केलं.
याहची स्तुती करा!*