स्तोत्र
१०४ माझ्या जिवा, यहोवाची स्तुती कर.+
हे यहोवा माझ्या देवा, तू खूप महान आहेस.+
तू ऐश्वर्याचं* आणि वैभवाचं वस्त्र घातलं आहेस.+
३ तो आपल्या माडीवरच्या खोल्यांच्या तुळया* आकाशातल्या पाण्यात बसवतो,+
तो ढगांच्या रथावर स्वार होऊन,+
वाऱ्याच्या पंखांवरून जातो.+
६ तू तिच्यावर खोल पाण्याचं वस्त्र पांघरलंस.+
पर्वत जलाशयांनी झाकलेले होते.
७ तू धमकावलंस तेव्हा जलाशय पळून गेले;+
तुझ्या गर्जनेने ते घाबरून पळून गेले.
८ तू त्यांच्यासाठी ठरवलेल्या ठिकाणी ते गेले.
पर्वत वर आले+ आणि दऱ्या खोल गेल्या.
९ तू जलाशयांना मर्यादा घालून दिलीस.
त्यांनी ती पार करू नये आणि पृथ्वीला पुन्हा झाकू नये,+
म्हणून तू असं केलंस.
१० तो दऱ्यांमधून झरे वाहायला लावतो;
ते पर्वतांच्या मधून वाहतात.
११ ते रानातल्या सर्व जंगली प्राण्यांना पाणी पुरवतात;
रानगाढवं त्यांतलं पाणी पिऊन आपली तहान भागवतात.
१२ आकाशातले पक्षी त्यांच्या जवळपास घरटी बांधतात;
ते दाट वृक्षांमध्ये किलबिल करतात.
१३ तो आपल्या माडीवरच्या खोल्यांमधून पर्वतांना पाणी देतो.+
तुझ्या कार्यांच्या फळाने पृथ्वी तृप्त होते.+
त्यामुळे त्यांना जमिनीतून अन्न मिळतं;
१५ मनाला आनंद देणारा द्राक्षारस,+
चेहऱ्यावर चमक आणणारं तेल
आणि माणसाच्या हृदयाचं पोषण करणारी भाकर मिळते.+
१६ यहोवाच्या वृक्षांना, त्याने लावलेल्या लबानोनच्या देवदारांना
भरपूर पाणी मिळतं.
१७ त्यांच्यावर पक्षी आपली घरटी बांधतात.
करकोच्याचं+ घर गंधसरूच्या झाडांत असतं.
१९ ऋतू ठरवण्यासाठी त्याने चंद्र बनवला;
कधी मावळायचं, हे सूर्याला चांगलं माहीत असतं.+
२० तू अंधार करतोस तेव्हा रात्र होते+
आणि रानातले सर्व जंगली प्राणी इकडे तिकडे फिरतात.
२२ जेव्हा सूर्य उगवतो,
तेव्हा ते आपल्या गुहेत जाऊन पडून राहतात.
२३ माणूस आपल्या कामाला जातो,
तो संध्याकाळपर्यंत कष्ट करतो.
२४ हे यहोवा, तू किती अद्भुत गोष्टी निर्माण केल्या आहेत!+
त्या सर्व तू बुद्धीने निर्माण केल्या आहेत.+
तू बनवलेल्या गोष्टींनी ही पृथ्वी भरलेली आहे.
२५ समुद्र किती मोठा, किती अफाट आहे!
त्यात लहानमोठे असंख्य जीव राहतात.+
२७ तू त्यांना वेळच्या वेळी अन्न देशील,
म्हणून ते सर्व तुझी वाट पाहतात.+
२८ तू दिलेलं अन्न ते गोळा करतात.+
तू आपली मूठ उघडतोस, तेव्हा ते चांगल्या गोष्टींनी तृप्त होतात.+
२९ तू आपलं तोंड फिरवतोस, तेव्हा ते अस्वस्थ होतात.
तू त्यांचा श्वास काढून घेतोस, तेव्हा ते मरून जातात आणि मातीला मिळतात.+
३१ यहोवाचा गौरव सर्वकाळ टिकेल.
यहोवा त्याच्या कार्यांमुळे आनंद करेल.+
३४ माझ्या मनातले विचार त्याला आनंद देवोत.*
मी यहोवामुळे हर्ष करीन.
३५ पापी लोक पृथ्वीवरून नाहीसे होतील
आणि दुष्टांचं अस्तित्व राहणार नाही.+
माझ्या जिवा, यहोवाची स्तुती कर. याहची स्तुती कर!*