आमोस
तुम्ही दीनदुबळ्यांना लुबाडणाऱ्या+ आणि गोरगरिबांना चिरडणाऱ्या स्त्रिया आहात,
तुम्ही आपल्या नवऱ्यांना* म्हणता, ‘आम्हाला प्यायला मद्य आणून द्या!’
२ सर्वोच्च प्रभू यहोवा याने आपल्या पवित्रतेची शपथ घेतली आहे,
‘“पाहा! असे दिवस येत आहेत, जेव्हा तो तुम्हाला कसायाच्या आकड्यांनी
आणि तुमच्यापैकी उरलेल्यांना मासे पकडण्याच्या गळांनी उचलेल.
३ तुमच्यापैकी प्रत्येक जण भिंतीतल्या खिंडारांतून* सरळ बाहेर पडेल;
तुम्हाला हर्मोनमध्ये फेकून दिलं जाईल,” असं यहोवा म्हणतो.’
५ आभाराचं अर्पण म्हणून खमीर घातलेली भाकर जाळा;+
स्वेच्छेने आणलेल्या अर्पणांची मोठ्याने घोषणा करा!
कारण हे इस्राएली लोकांनो, तुम्हाला हेच करायला आवडतं,’ असं सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो.
६ ‘मी तुमच्या सगळ्या शहरांत तुमची उपासमार केली*
आणि तुमच्या सर्व घरांत भाकरीचा तुटवडा पाडला;+
पण तरीही तुम्ही माझ्याकडे परत आला नाहीत,’+ असं यहोवा म्हणतो.
७ ‘मी कापणीच्या आधी तीन महिने पाऊस थांबवून ठेवला;+
मी एका शहरावर पाऊस पाडला, तर दुसऱ्यावर पाडला नाही.
शेताच्या एका भागावर पाऊस पडायचा,
तर दुसरा भाग, पाऊस न पडल्यामुळे कोरडाच राहायचा.
८ दोनतीन शहरांतले लोक पाणी प्यायला एकाच शहरात लटपटत जायचे,+
पण त्यांची तहान भागायची नाही;
तरीही, तुम्ही माझ्याकडे परत आला नाहीत,’+ असं यहोवा म्हणतो.
९ मी तुम्हाला उष्ण वारा आणि कीड यांनी पीडित केलं.+
तुम्ही भरपूर बागा आणि द्राक्षमळे लावलेत,
पण टोळ तुमच्या अंजिराच्या आणि जैतुनाच्या झाडांचा फडशा पाडायचे;*+
पण तरीही तुम्ही माझ्याकडे परत आला नाहीत,’+ असं यहोवा म्हणतो.
१० ‘इजिप्तवर आली होती, तशी पीडा* मी तुमच्यावर आणली.+
मी तलवारीने तुमच्या तरुणांना ठार मारलं+ आणि तुमचे घोडे लुटून नेले.+
तुमच्या छावण्यांमध्ये प्रेतांचा दुर्गंध पसरला;+
पण तरीही तुम्ही माझ्याकडे परत आला नाहीत,’ असं यहोवा म्हणतो.
११ मी जसा सदोम आणि गमोरा यांचा नाश केला होता,+
तसाच मी तुमच्या देशाचाही नाश केला.
आणि तुम्ही आगीतून ओढून काढलेल्या ओंडक्यासारखे होता;
पण तरीही तुम्ही माझ्याकडे परत आला नाहीत,’+ असं यहोवा म्हणतो.
१२ म्हणून हे इस्राएल, मी तुझ्यासोबत असंच करीन,
मी तुला अशाच प्रकारे शिक्षा देईन,
हे इस्राएल, तुझ्या देवासमोर यायला तयार हो!