वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • प्रकटीकरण १८
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

प्रकटीकरण रूपरेषा

      • “मोठी बाबेल” पडते (१-८)

        • “तिच्यामधून बाहेर या!” (४)

      • बाबेल पडल्यामुळे शोक (९-१९)

      • बाबेल पडल्यामुळे स्वर्गात आनंद (२०)

      • बाबेलला एका दगडाप्रमाणे समुद्रात फेकून दिलं जाईल (२१-२४)

प्रकटीकरण १८:१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. २५९

प्रकटीकरण १८:२

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +यश २१:९; यिर्म ५१:८; प्रक १४:८
  • +यश १३:२१; यिर्म ५०:३९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ५८

    प्रकटीकरण कळस, पृ. २५९-२६१

    टेहळणी बुरूज,

    ६/१/१९८९, पृ. ३-५

    ५/१/१९८९, पृ. ९

प्रकटीकरण १८:३

तळटीपा

  • *

    ग्रीक, पोर्निया. शब्दार्थसूची पाहा.

  • *

    किंवा “क्रोधाचा.”

  • *

    किंवा “प्रवास करणारे व्यापारी.”

समासातील संदर्भ

  • +यिर्म ५१:७
  • +प्रक १७:१, २

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. २६१-२६३

    टेहळणी बुरूज,

    ४/१/१९८९, पृ. ४-५

प्रकटीकरण १८:४

समासातील संदर्भ

  • +यिर्म ५१:६, ४५; २कर ६:१७
  • +यश ४८:२०; ५२:११; यिर्म ५०:८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ १३

    टेहळणी बुरूज,

    ४/१/२००६, पृ. १४-१५

    १०/१/२००५, पृ. २४

    ४/१५/१९९९, पृ. २८-३०

    ५/१/१९८९, पृ. ७-९

    ४/१/१९८६, पृ. ८-९

    प्रकटीकरण कळस, पृ. २६४-२६६

प्रकटीकरण १८:५

तळटीपा

  • *

    किंवा “तिच्या अपराधांची.”

समासातील संदर्भ

  • +यिर्म ५१:९
  • +प्रक १६:१९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ १३

    प्रकटीकरण कळस, पृ. २६५-२६६

प्रकटीकरण १८:६

समासातील संदर्भ

  • +यिर्म ५०:२९; २थेस १:६
  • +स्तो १३७:८; यिर्म ५०:१५
  • +स्तो ७५:८
  • +प्रक १६:१९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. २६५-२६६

प्रकटीकरण १८:७

समासातील संदर्भ

  • +यश ४७:७-९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. २६५-२६६

प्रकटीकरण १८:८

तळटीपा

  • *

    अति. क५ पाहा.

समासातील संदर्भ

  • +लेवी २१:९
  • +यिर्म ५०:३४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ १३

    प्रकटीकरण कळस, पृ. २६५-२६६

    टेहळणी बुरूज,

    ७/१/१९८९, पृ. ६

प्रकटीकरण १८:९

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२००९, पृ. ५

    प्रकटीकरण कळस, पृ. २६७

प्रकटीकरण १८:१०

समासातील संदर्भ

  • +दान ४:३०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. २६७

प्रकटीकरण १८:११

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. २६७-२६८

प्रकटीकरण १८:१२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. २६७-२६८

प्रकटीकरण १८:१३

तळटीपा

  • *

    शब्दशः “हिंदुस्तानचा मसाला.”

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. २६७-२६८

प्रकटीकरण १८:१४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. २६७-२६८

प्रकटीकरण १८:१५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. २६८

प्रकटीकरण १८:१६

समासातील संदर्भ

  • +प्रक १७:४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. २६८

प्रकटीकरण १८:१७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. २६८-२६९

प्रकटीकरण १८:१९

समासातील संदर्भ

  • +यश ४७:११

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. २६८-२६९

प्रकटीकरण १८:२०

समासातील संदर्भ

  • +यिर्म ५१:४८
  • +प्रक १४:१२
  • +अनु ३२:४३; रोम १२:१९; प्रक ६:९, १०; १९:१, २

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. २६९

प्रकटीकरण १८:२१

समासातील संदर्भ

  • +यिर्म ५१:६३, ६४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ १३

    प्रकटीकरण कळस, पृ. २६९

प्रकटीकरण १८:२२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. २७०

प्रकटीकरण १८:२३

समासातील संदर्भ

  • +यश ४७:९; गल ५:१९, २०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. २७०

    टेहळणी बुरूज,

    ६/१/१९८९, पृ. ६-७

    ४/१/१९८९, पृ. ४

प्रकटीकरण १८:२४

समासातील संदर्भ

  • +प्रक ६:९, १०; १६:५, ६
  • +उत्प ९:६; यिर्म ५१:४९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ४/१/२००६, पृ. १४

    ९/१/१९९०, पृ. १९-२२

    ७/१/१९८९, पृ. ५

    ६/१/१९८९, पृ. ६

    ५/१/१९८९, पृ. २३

    ४/१/१९८९, पृ. ५, ८-९

    प्रकटीकरण कळस, पृ. २७०-२७१

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

प्रकटी. १८:२यश २१:९; यिर्म ५१:८; प्रक १४:८
प्रकटी. १८:२यश १३:२१; यिर्म ५०:३९
प्रकटी. १८:३यिर्म ५१:७
प्रकटी. १८:३प्रक १७:१, २
प्रकटी. १८:४यिर्म ५१:६, ४५; २कर ६:१७
प्रकटी. १८:४यश ४८:२०; ५२:११; यिर्म ५०:८
प्रकटी. १८:५यिर्म ५१:९
प्रकटी. १८:५प्रक १६:१९
प्रकटी. १८:६यिर्म ५०:२९; २थेस १:६
प्रकटी. १८:६स्तो १३७:८; यिर्म ५०:१५
प्रकटी. १८:६स्तो ७५:८
प्रकटी. १८:६प्रक १६:१९
प्रकटी. १८:७यश ४७:७-९
प्रकटी. १८:८लेवी २१:९
प्रकटी. १८:८यिर्म ५०:३४
प्रकटी. १८:१०दान ४:३०
प्रकटी. १८:१६प्रक १७:४
प्रकटी. १८:१९यश ४७:११
प्रकटी. १८:२०यिर्म ५१:४८
प्रकटी. १८:२०प्रक १४:१२
प्रकटी. १८:२०अनु ३२:४३; रोम १२:१९; प्रक ६:९, १०; १९:१, २
प्रकटी. १८:२१यिर्म ५१:६३, ६४
प्रकटी. १८:२३यश ४७:९; गल ५:१९, २०
प्रकटी. १८:२४प्रक ६:९, १०; १६:५, ६
प्रकटी. १८:२४उत्प ९:६; यिर्म ५१:४९
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र यात वाचा
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
प्रकटीकरण १८:१-२४

योहानला झालेलं प्रकटीकरण

१८ यानंतर, मला आणखी एक स्वर्गदूत स्वर्गातून उतरताना दिसला. त्याच्याकडे मोठा अधिकार होता आणि त्याच्या गौरवाच्या तेजाने पृथ्वी प्रकाशित झाली. २ तो मोठ्या आवाजात ओरडून म्हणाला: “ती पडली आहे! मोठी बाबेल पडली आहे!+ ती दुष्ट स्वर्गदूतांचं* निवासस्थान बनली आहे. तिथे दुष्ट स्वर्गदूत आणि अशुद्ध आणि घृणित पक्षी राहतात!+ ३ कारण, तिच्या अनैतिक लैंगिक कृत्यांच्या* वासनेचा* द्राक्षारस प्यायल्यामुळे सर्व राष्ट्रं तिला बळी पडली आहेत.+ पृथ्वीवरच्या राजांनी तिच्यासोबत अनैतिक लैंगिक कृत्यं केली+ आणि तिच्या निर्लज्ज ऐशआरामाच्या प्रभावामुळे पृथ्वीवरचे व्यापारी* श्रीमंत झाले.”

४ मग, स्वर्गातून आलेला आणखी एक आवाज मी ऐकला. तो म्हणाला: “माझ्या लोकांनो, तुम्ही तिच्या पापांचे भागीदार होऊ नये आणि तुमच्यावर तिच्या कोणत्याही पीडा येऊ नयेत म्हणून+ तिच्यामधून बाहेर या!+ ५ कारण तिच्या पापांची रास थेट आकाशापर्यंत पोहोचली आहे+ आणि देवाने तिच्या अन्यायी कृत्यांची* आठवण केली आहे.+ ६ तिने इतरांना जसं वागवलं, तसंच तिच्याशी वागा;+ हो, तिने जे काही केलं त्याच्या दुप्पट तिला द्या+ आणि तिने प्याल्यात+ जे मिसळलं, त्याच्या दुप्पट तिच्यासाठी मिसळा.+ ७ तिने जितकं स्वतःला गौरवलं आणि निर्लज्जपणे ऐशआराम केला, तितक्या यातना आणि दुःख तिला द्या. कारण ती मनातल्या मनात म्हणते: ‘मी तर राणीसारखी बसले आहे. मी काही विधवा नाही आणि माझ्या वाट्याला कधीही दुःख येणार नाही.’+ ८ म्हणून मरण, दुःख, दुष्काळ या सगळ्या पीडा एकाच दिवशी तिच्यावर येतील. तिला आगीत पूर्णपणे जाळून टाकलं जाईल,+ कारण ज्याने तिचा न्याय केला, तो यहोवा* देव सामर्थ्यशाली आहे.+

९ आणि पृथ्वीवरच्या ज्या राजांनी तिच्यासोबत अनैतिक लैंगिक कृत्यं* केली आणि जे तिच्यासोबत निर्लज्जपणे ऐशआरामात राहिले, ते जेव्हा तिच्या जळण्याचा धूर पाहतील, तेव्हा ते रडतील आणि दुःखाने छाती बडवून घेतील. १० तिच्या यातनेच्या भीतीने ते दूर उभे राहतात आणि म्हणतात: ‘अरेरे बाबेल नगरी! तू किती सामर्थ्यशाली महानगरी होतीस! किती वाईट झालं तुझ्यासोबत!+ कारण एका क्षणात तुझ्यावर न्यायदंड बजावण्यात आला!’

११ तसंच, पृथ्वीचे व्यापारीसुद्धा तिच्यासाठी रडतात आणि शोक करतात. कारण त्यांचा सगळा माल विकत घेणारा आता कोणीही नाही. १२ तो सगळा माल म्हणजे: सोनं, चांदी, मौल्यवान रत्नं, मोती, चांगल्या प्रतीचं मलमलीचं कापड, जांभळं कापड, रेशमी आणि लाल कापड; सुगंधी लाकडापासून बनवलेल्या वस्तू आणि हस्तिदंतापासून तयार केलेल्या निरनिराळ्या वस्तू; तसंच, मौल्यवान लाकूड, तांबं, लोखंड आणि संगमरवर यांपासून बनवलेली प्रत्येक वस्तू; १३ शिवाय दालचिनी, मसाले,* धूप, सुगंधी तेल, ऊद,* द्राक्षारस, जैतुनाचं तेल, चांगलं पीठ, गहू, गुरं, मेंढरं, घोडे, रथ, गुलाम आणि मानवी जीव. १४ ज्या उत्तम फळांची तुला आवड होती, ती आता तुझ्याजवळ नाहीत. सगळे स्वादिष्ट पदार्थ आणि चैनीच्या वस्तू तुझ्यापासून नाहीशा झाल्या आहेत. त्या पुन्हा कधीच तुला मिळणार नाहीत.

१५ या गोष्टी विकणारे आणि तिच्यामुळे श्रीमंत झालेले व्यापारी तिच्या यातनेच्या भीतीने दूर उभे राहून रडतील आणि शोक करतील. १६ ते म्हणतील: ‘अरेरे! चांगल्या प्रतीच्या मलमलीचे कपडे, जांभळे आणि लाल कपडे घातलेली आणि सोनं, चांदी, मौल्यवान रत्नं आणि मोती यांनी सजलेली महानगरी!+ किती वाईट झालं तुझ्यासोबत! १७ कारण एका क्षणात तुझी ही अमाप संपत्ती उद्ध्‌वस्त झाली!’

आणि जहाजाचा प्रत्येक चालक, प्रत्येक समुद्रप्रवासी, सर्व खलाशी आणि समुद्रावर उद्योगधंदा करून पोट भरणारे सर्व जण दूर उभे राहिले. १८ तिच्या जळण्याचा धूर पाहून ते आक्रोश करत म्हणाले: ‘या महानगरीसारखी कोणती नगरी आहे?’ १९ त्यांनी आपल्या डोक्यात धूळ घातली आणि आक्रोश करत, रडत आणि शोक करत ते म्हणाले: ‘अरेरे! या महानगरीचं किती वाईट झालं! समुद्रावर ज्यांची जहाजं होती ते सर्व तिच्या धनसंपत्तीमुळे श्रीमंत झाले होते! पण एकाच क्षणात ती उद्ध्‌वस्त झाली!’+

२० हे स्वर्गा,+ तसंच पवित्र जनांनो,+ प्रेषितांनो आणि संदेष्ट्यांनो तिच्याबद्दल आनंद साजरा करा. कारण, देवाने तुमच्यासाठी तिच्यावर आपला न्यायदंड बजावला आहे!”+

२१ आणि एका शक्‍तिशाली स्वर्गदूताने जात्याच्या मोठ्या तळीसारखा दगड उचलला आणि तो समुद्रात फेकून तो म्हणाला: “अशाच प्रकारे महानगरी बाबेलला एका झटक्यात फेकून दिलं जाईल आणि पुन्हा कधीच तिचा पत्ता लागणार नाही.+ २२ आणि वीणा वाजवणाऱ्‍या गायकांचा, संगीतकारांचा, बासरी वाजवणाऱ्‍यांचा आणि कर्णा वाजवणाऱ्‍यांचा आवाज पुन्हा कधीच तुझ्यात ऐकू येणार नाही. कोणताही कारागीर पुन्हा कधीच तुझ्यात सापडणार नाही; आणि जात्याचा आवाज पुन्हा कधीच तुझ्यात ऐकू येणार नाही. २३ दिव्याचा प्रकाश पुन्हा कधीच तुझ्यात चमकणार नाही, आणि वधूवरांचा आवाज पुन्हा कधीच तुझ्यात ऐकू येणार नाही. कारण, तुझे व्यापारी पृथ्वीवरचे प्रतिष्ठित लोक होते आणि तुझ्या भूतविद्येमुळे+ सर्व राष्ट्रांची फसवणूक झाली होती. २४ हो, तिच्यामध्ये संदेष्ट्यांचं, पवित्र जनांचं+ आणि पृथ्वीवर वध करण्यात आलेल्या सर्वांचं रक्‍त आढळलं.”+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा