स्तोत्र
दावीदचं गीत. संचालकासाठी सूचना. हे गीत तंतुवाद्यांसोबत गायलं जावं.
४ हे माझ्या नीतिमान देवा,+ मी हाक मारीन तेव्हा मला ओ दे.
संकटातून सुटण्याचा मार्ग मला दाखव.*
माझ्यावर कृपा कर आणि माझी प्रार्थना ऐक.
२ अहो लोकांनो, तुम्ही कुठपर्यंत गौरवाऐवजी माझा अपमान करत राहाल?
तुम्ही कुठवर निरर्थक गोष्टींवर प्रेम कराल आणि बनावट गोष्टींच्या मागे लागाल? (सेला )
३ यहोवा आपल्या एकनिष्ठ सेवकावर विशेष कृपा करेल* हे लक्षात ठेवा;
मी यहोवाला हाक मारीन तेव्हा तो माझं ऐकेल.
४ तुम्हाला राग आला, तरी पाप करू नका.+
बिछान्यावर पडल्यापडल्या आपल्या मनाशी विचार करा आणि शांत राहा. (सेला )
६ कित्येक लोक म्हणतात, “आम्हाला चांगले दिवस कोण दाखवेल?”
हे यहोवा, तुझ्या चेहऱ्याचा प्रकाश आमच्यावर चमकू दे.+
७ ज्यांच्याकडे धान्याची आणि नव्या द्राक्षारसाची रेलचेल आहे,
त्यांच्यापेक्षा जास्त आनंद तू माझ्या मनाला दिला आहेस.