स्तोत्र
दावीदचं गीत. संचालकासाठी.
२ प्रत्येक दिवशी त्यांचे शब्द खळखळत्या झऱ्यासारखे वाहतात;
प्रत्येक रात्री ते ज्ञान प्रकट करतात.
३ बोल नाहीत, शब्द नाहीत;
त्यांचा ध्वनीही ऐकू येत नाही.
देवाने आकाशात सूर्यासाठी तंबू उभारला आहे.
५ तो वरासारखा आपल्या शयनगृहातून* बाहेर पडतो;
शूरवीराप्रमाणे आपल्या मार्गावरून धावताना त्याला आनंद होतो.
६ तो आकाशाच्या एका टोकावर उगवतो,
आणि दुसऱ्या टोकापर्यंत प्रवास करतो;+
त्याच्या उष्णतेपासून काहीच लपू शकत नाही.
७ यहोवाचे नियम परिपूर्ण आहेत,+ ते नव्याने ताकद देतात.+
यहोवाच्या स्मरण-सूचना* भरवशालायक आहेत,+ त्या अनुभव नसलेल्यांना बुद्धिमान बनवतात.+
९ यहोवाचं भय+ शुद्ध आहे, ते सर्वकाळ टिकतं.
यहोवाचे निर्णय खरे आहेत, ते पूर्णपणे नीतिमान आहेत.+
१० ते सोन्यापेक्षा, भरपूर शुद्ध* सोन्यापेक्षाही मौल्यवान आहेत;+
आणि मधापेक्षा, पोळ्यातून झिरपणाऱ्या मधापेक्षाही गोड आहेत.+
१२ स्वतःच्या चुका कोणाला दिसतात?+
मी नकळत केलेल्या पापांपासून मला निर्दोष ठरव.
१४ हे यहोवा, तू माझा खडक+ आणि माझा सोडवणारा+ आहेस!
माझ्या तोंडातून निघणाऱ्या शब्दांमुळे आणि माझ्या मनातल्या विचारांमुळे तुला नेहमी आनंद होवो!+