इब्री लोकांना पत्र
९ पहिल्या करारात पवित्र सेवेबद्दल नियम आणि पृथ्वीवर उपासनेचा एक मंडपही होता.+ २ या मंडपाचा जो पहिला भाग तयार करण्यात आला होता, त्यात एक दीपवृक्ष,*+ मेज आणि अर्पणाच्या भाकरी* ठेवलेल्या होत्या.+ या भागाला पवित्र स्थान म्हटलं आहे.+ ३ पण, दुसऱ्या पडद्याच्या पलीकडे+ परमपवित्र स्थान म्हटलेला भाग होता.+ ४ इथे धूप जाळण्याचं सोन्याचं पात्र+ आणि पूर्णपणे सोन्याने मढवलेली कराराची पेटी होती;+ आणि त्यात मान्ना+ ठेवलेलं एक सोन्याचं पात्र,+ कळ्या आलेली अहरोनची काठी+ आणि कराराच्या पाट्या+ होत्या. ५ तसंच, पेटीच्या प्रायश्चित्ताच्या झाकणावर* पाखर घालणारे वैभवशाली करूब होते.+ अर्थात, या गोष्टींबद्दल सविस्तर सांगण्याची ही वेळ नाही.
६ अशा रितीने या सर्व गोष्टी तयार झाल्यावर, याजक नियमितपणे मंडपाच्या पहिल्या भागात पवित्र सेवा करण्यासाठी जाऊ लागले.+ ७ पण, दुसऱ्या भागात मात्र महायाजक एकटाच वर्षातून एकदा जायचा.+ पण, रक्ताशिवाय तो आत जात नव्हता.+ हे रक्त तो स्वतःसाठी+ आणि लोकांनी+ नकळत केलेल्या पापांसाठी अर्पण करायला जायचा. ८ अशा रितीने, पवित्र शक्ती* अगदी स्पष्टपणे दाखवून देते, की पहिला मंडप* उभा असेपर्यंत परमपवित्र स्थानात* जाण्याचा मार्ग प्रकट करण्यात आला नव्हता.+ ९ हा मंडप सध्याच्या काळासाठी एक उदाहरण आहे+ आणि या व्यवस्थेप्रमाणे अर्पणं आणि बलिदानं वाहिली जातात.+ पण, ही अर्पणं आणि बलिदानं पवित्र सेवा करणाऱ्या माणसाचा विवेक पूर्णपणे शुद्ध करू शकत नाहीत.+ १० ती फक्त खाण्यापिण्याबद्दल आणि शुद्धीकरणाच्या विधींबद्दल* आहेत.+ शारीरिक गोष्टींबद्दल असलेले हे नियम,+ सर्व गोष्टी व्यवस्थित करण्याच्या ठरवलेल्या काळापर्यंत लावून देण्यात आले होते.
११ पण, ख्रिस्त हा आधीच घडून गेलेल्या चांगल्या गोष्टींचा महायाजक या नात्याने आला, तेव्हा तो आणखी श्रेष्ठ आणि आणखी परिपूर्ण अशा मंडपात गेला. हा मंडप हातांनी बांधलेला नाही, म्हणजे निर्माण केलेल्या गोष्टींपैकी नाही. १२ बकऱ्यांचं किंवा वासरांचं* रक्त नाही, तर स्वतःचं रक्त+ घेऊन ख्रिस्त एकदाच परमपवित्र स्थानात गेला आणि त्याने आपल्या सर्वांसाठी सर्वकाळाची सुटका मिळवली.*+ १३ कारण, बकऱ्यांच्या आणि वासरांच्या रक्तामुळे,+ तसंच कालवडीची* राख शिंपडल्यामुळे अशुद्ध झालेल्यांचं शरीर देवाच्या नजरेत शुद्ध होतं;+ १४ तर मग, ज्याने सर्वकाळाच्या पवित्र शक्तीद्वारे स्वतःला एका निष्कलंक बलिदानाच्या रूपात देवाला अर्पण केलं, त्या ख्रिस्ताचं रक्त आपल्याला किती जास्त शुद्ध करू शकतं!+ आपल्याला जिवंत देवाची पवित्र सेवा करता यावी,+ म्हणून त्याचं रक्त आपल्या विवेकाला निर्जीव कार्यांपासून शुद्ध करतं.+
१५ म्हणूनच, तो एका नवीन कराराचा मध्यस्थ आहे.+ हे यासाठी, की ज्यांना बोलावण्यात आलं आहे, त्यांना सर्वकाळाच्या वारशाचं अभिवचन मिळावं.+ पहिल्या कराराच्या अधीन असताना केलेल्या पापांपासून ज्याने त्यांची खंडणी देऊन सुटका केली, त्याच्या मृत्यूमुळे हे सर्व शक्य झालं.+ १६ कारण, जिथे करार आहे, तिथे करार करणाऱ्या माणसाचा मृत्यू होणं आवश्यक आहे. १७ कारण, मृत्यू झाल्यावरच करार अंमलात येतो; करार करणारा माणूस जिवंत असेपर्यंत तो अंमलात येत नाही. १८ त्याचप्रमाणे, पहिला करारसुद्धा रक्ताशिवाय अंमलात आला नाही. १९ कारण नियमशास्त्रातली प्रत्येक आज्ञा सांगितल्यावर मोशेने पाणी, गडद लाल रंगाची लोकर आणि एजोब* झुडूप यांसोबत वासरांचं आणि बकऱ्यांचं रक्त घेऊन ते पुस्तकावर* आणि सर्व लोकांवर शिंपडलं, २० आणि म्हटलं: “देवाने तुम्हाला जो करार पाळायला सांगितला त्या कराराचं हे रक्त आहे.”+ २१ तसंच, मंडपावर आणि पवित्र सेवेच्या* सर्व भांड्यांवरही त्याने ते रक्त शिंपडलं.+ २२ हो, नियमशास्त्राप्रमाणे जवळजवळ सर्व वस्तू रक्ताने शुद्ध होतात;+ आणि रक्त ओतल्याशिवाय पापांची क्षमा मिळणं शक्य नाही.+
२३ त्यामुळे, स्वर्गातल्या गोष्टींच्या प्रतिकांचं+ अशा प्रकारे शुद्धीकरण होणं आवश्यक होतं.+ पण, स्वर्गातल्या गोष्टींसाठी याहून श्रेष्ठ बलिदानांची गरज आहे. २४ कारण ख्रिस्त, खऱ्या गोष्टींचं फक्त प्रतिरूप असलेल्या+ ठिकाणी, म्हणजे हातांनी बनवलेल्या परमपवित्र स्थानात नाही,+ तर प्रत्यक्ष स्वर्गात गेला+ आणि त्यामुळे आता तो आपल्यासाठी देवासमोर* उभा राहतो.+ २५ महायाजक जसा दरवर्षी,+ स्वतःचं नाही, तर प्राण्यांचं रक्त घेऊन परमपवित्र स्थानात जातो, तसा तो वारंवार स्वतःला अर्पण करण्यासाठी गेला नाही. २६ कारण तसं असतं, तर जगाच्या स्थापनेपासून त्याला वारंवार दुःख सोसावं लागलं असतं. पण आता, स्वतःचं बलिदान देऊन पाप नाहीसं करण्यासाठी त्याने जगाच्या व्यवस्थांच्या* शेवटी एकदाच सर्वकाळासाठी स्वतःला प्रकट केलं आहे.+ २७ ज्याप्रमाणे, माणसांचं एकदाच मरणं आणि त्यानंतर न्याय होणं ठरलेलं असतं, २८ त्याचप्रमाणे पुष्कळ लोकांच्या पापांचा भार वाहून नेण्यासाठी ख्रिस्ताला सर्वकाळासाठी एकदाच अर्पण करण्यात आलं.+ तो दुसऱ्यांदा, पाप नाहीसं करण्यासाठी येणार नाही,* तर त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्यांचं तारण करण्यासाठी येईल.+