वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • लेवीय १४
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

लेवीय रूपरेषा

      • कुष्ठरोगापासून शुद्धीकरण (१-३२)

      • संसर्ग झालेल्या घरांचं शुद्धीकरण (३३-५७)

लेवीय १४:२

समासातील संदर्भ

  • +लेवी १३:२; मत्त ८:४; मार्क १:४४; लूक ५:१४; १७:१४

लेवीय १४:४

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +लेवी १४:४९-५३; गण १९:६, ९; स्तो ५१:७

लेवीय १४:७

समासातील संदर्भ

  • +लेवी १६:२२

लेवीय १४:१०

तळटीपा

  • *

    तीन दशांश एफा म्हणजे ६.६ ली. अति. ख१४ पाहा.

  • *

    एक लोग म्हणजे ०.३१ ली. अति. ख१४ पाहा.

समासातील संदर्भ

  • +लेवी ४:३२
  • +लेवी २:१
  • +मार्क १:४४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. २५

    टेहळणी बुरूज,

    २/१/१९८८, पृ. ९

लेवीय १४:११

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. २५

    टेहळणी बुरूज,

    २/१/१९८८, पृ. ९

लेवीय १४:१२

समासातील संदर्भ

  • +लेवी ६:६
  • +लेवी १४:२१, २४

लेवीय १४:१३

समासातील संदर्भ

  • +लेवी १:१०, ११; ४:३, ४
  • +लेवी २:३; ७:७; १कर ९:१३; १०:१८
  • +लेवी ६:२५

लेवीय १४:१५

समासातील संदर्भ

  • +लेवी १४:१०

लेवीय १४:१८

समासातील संदर्भ

  • +लेवी ६:७; १यो १:७; २:१, २

लेवीय १४:१९

समासातील संदर्भ

  • +लेवी ५:६

लेवीय १४:२०

समासातील संदर्भ

  • +लेवी २:१; १४:१०; गण १५:४
  • +मत्त ८:४
  • +लेवी १४:९; मार्क १:४४; लूक ५:१४; १७:१४

लेवीय १४:२१

तळटीपा

  • *

    एक दशांश एफा म्हणजे २.२ ली. अति. ख१४ पाहा.

लेवीय १४:२२

समासातील संदर्भ

  • +लेवी १:१४; ५:७; १२:८

लेवीय १४:२३

समासातील संदर्भ

  • +लेवी १५:१३, १४
  • +लेवी १४:१०, ११

लेवीय १४:२४

समासातील संदर्भ

  • +लेवी ६:६
  • +लेवी १४:१२

लेवीय १४:२५

समासातील संदर्भ

  • +लेवी १४:१४

लेवीय १४:२६

समासातील संदर्भ

  • +लेवी १४:१५-१८

लेवीय १४:३०

समासातील संदर्भ

  • +लेवी १२:८; १४:२२

लेवीय १४:३१

समासातील संदर्भ

  • +लेवी ५:७
  • +लेवी १४:२०

लेवीय १४:३४

समासातील संदर्भ

  • +उत्प १७:८; गण ३५:१०
  • +अनु ७:१२, १५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सावध राहा!,

    ४/२००६, पृ. १३

लेवीय १४:३८

समासातील संदर्भ

  • +लेवी १३:४, ५०; गण १२:१५

लेवीय १४:४४

समासातील संदर्भ

  • +लेवी १३:५१

लेवीय १४:४५

समासातील संदर्भ

  • +लेवी १४:४१

लेवीय १४:४६

समासातील संदर्भ

  • +लेवी १४:३८
  • +लेवी ११:२३-२५; १५:८; १७:१५; २२:४-६

लेवीय १४:४९

समासातील संदर्भ

  • +लेवी १४:३, ४; गण १९:६, ७

लेवीय १४:५१

समासातील संदर्भ

  • +लेवी १४:६, ७

लेवीय १४:५४

समासातील संदर्भ

  • +लेवी १३:३०

लेवीय १४:५५

समासातील संदर्भ

  • +लेवी १३:४७
  • +लेवी १४:३४

लेवीय १४:५६

समासातील संदर्भ

  • +लेवी १३:२

लेवीय १४:५७

समासातील संदर्भ

  • +लेवी १०:१०; यहे ४४:२३
  • +अनु २४:८

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

लेवी. १४:२लेवी १३:२; मत्त ८:४; मार्क १:४४; लूक ५:१४; १७:१४
लेवी. १४:४लेवी १४:४९-५३; गण १९:६, ९; स्तो ५१:७
लेवी. १४:७लेवी १६:२२
लेवी. १४:१०लेवी ४:३२
लेवी. १४:१०लेवी २:१
लेवी. १४:१०मार्क १:४४
लेवी. १४:१२लेवी ६:६
लेवी. १४:१२लेवी १४:२१, २४
लेवी. १४:१३लेवी १:१०, ११; ४:३, ४
लेवी. १४:१३लेवी २:३; ७:७; १कर ९:१३; १०:१८
लेवी. १४:१३लेवी ६:२५
लेवी. १४:१५लेवी १४:१०
लेवी. १४:१८लेवी ६:७; १यो १:७; २:१, २
लेवी. १४:१९लेवी ५:६
लेवी. १४:२०लेवी २:१; १४:१०; गण १५:४
लेवी. १४:२०मत्त ८:४
लेवी. १४:२०लेवी १४:९; मार्क १:४४; लूक ५:१४; १७:१४
लेवी. १४:२२लेवी १:१४; ५:७; १२:८
लेवी. १४:२३लेवी १५:१३, १४
लेवी. १४:२३लेवी १४:१०, ११
लेवी. १४:२४लेवी ६:६
लेवी. १४:२४लेवी १४:१२
लेवी. १४:२५लेवी १४:१४
लेवी. १४:२६लेवी १४:१५-१८
लेवी. १४:३०लेवी १२:८; १४:२२
लेवी. १४:३१लेवी ५:७
लेवी. १४:३१लेवी १४:२०
लेवी. १४:३४उत्प १७:८; गण ३५:१०
लेवी. १४:३४अनु ७:१२, १५
लेवी. १४:३८लेवी १३:४, ५०; गण १२:१५
लेवी. १४:४४लेवी १३:५१
लेवी. १४:४५लेवी १४:४१
लेवी. १४:४६लेवी १४:३८
लेवी. १४:४६लेवी ११:२३-२५; १५:८; १७:१५; २२:४-६
लेवी. १४:४९लेवी १४:३, ४; गण १९:६, ७
लेवी. १४:५१लेवी १४:६, ७
लेवी. १४:५४लेवी १३:३०
लेवी. १४:५५लेवी १३:४७
लेवी. १४:५५लेवी १४:३४
लेवी. १४:५६लेवी १३:२
लेवी. १४:५७लेवी १०:१०; यहे ४४:२३
लेवी. १४:५७अनु २४:८
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
  • २७
  • २८
  • २९
  • ३०
  • ३१
  • ३२
  • ३३
  • ३४
  • ३५
  • ३६
  • ३७
  • ३८
  • ३९
  • ४०
  • ४१
  • ४२
  • ४३
  • ४४
  • ४५
  • ४६
  • ४७
  • ४८
  • ४९
  • ५०
  • ५१
  • ५२
  • ५३
  • ५४
  • ५५
  • ५६
  • ५७
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
लेवीय १४:१-५७

लेवीय

१४ यहोवा मोशेला पुढे म्हणाला: २ “कुष्ठरोग्याला शुद्ध ठरवण्याच्या दिवशी ज्या गोष्टी केल्या जाव्यात त्यांबद्दल हा नियम आहे. त्याला याजकाकडे आणावं.+ ३ याजकाने छावणीबाहेर जाऊन त्याला तपासावं. जर त्याचा कुष्ठरोग बरा झाला असेल, ४ तर याजकाने त्याच्या शुद्धीकरणासाठी त्याला दोन शुद्ध जिवंत पक्षी, देवदाराचं लाकूड, गडद लाल रंगाचं सूत आणि एजोबची* फांदी आणण्याची आज्ञा द्यावी.+ ५ मग मातीच्या भांड्यात झऱ्‍याचं ताजं पाणी घेऊन, त्यांपैकी एका पक्ष्याला त्यावर मारण्याची याजकाने आज्ञा द्यावी. ६ यानंतर याजकाने दुसरा जिवंत पक्षी, तसंच देवदाराचं लाकूड, गडद लाल रंगाचं सूत आणि एजोबची फांदी घ्यावी आणि झऱ्‍याच्या ताज्या पाण्यावर मारलेल्या पक्ष्याच्या रक्‍तात हे सर्व बुडवावं. ७ मग त्याने ते रक्‍त, कुष्ठरोगापासून ज्याचं शुद्धीकरण करायचं आहे त्याच्यावर सात वेळा शिंपडावं आणि त्याला शुद्ध घोषित करावं. यानंतर त्याने जिवंत पक्ष्याला रानात सोडून द्यावं.+

८ शुद्धीकरणासाठी आलेल्या माणसाने आपले कपडे धुवावेत, सर्व केस काढावेत आणि अंघोळ करावी म्हणजे तो शुद्ध होईल. त्यानंतर तो छावणीमध्ये येऊ शकतो, पण त्याने सात दिवस आपल्या तंबूबाहेर राहावं. ९ मग सातव्या दिवशी त्याने आपल्या डोक्यावरचे, दाढीचे आणि भुवयांचे सगळे केस काढावेत. यानंतर त्याने आपले कपडे धुवावेत आणि अंघोळ करावी, म्हणजे तो शुद्ध होईल.

१० मग आठव्या दिवशी त्याने कोणताही दोष नसलेले दोन मेंढे, तसंच कोणताही दोष नसलेली एक वर्षाची मेंढी,+ अन्‍नार्पण म्हणून तेलात मिसळलेलं तीन दशांश एफा* चांगलं पीठ+ आणि एक लोग* मापाइतकं तेल आणावं.+ ११ जो याजक शुद्धीकरणासाठी आलेल्या माणसाला शुद्ध घोषित करेल, त्याने त्याला भेटमंडपाच्या प्रवेशाजवळ त्याच्या अर्पणांसोबत यहोवासमोर आणावं. १२ याजक त्यांतला एक मेंढा दोषार्पण+ म्हणून, लोगभर मापाइतक्या तेलासोबत देईल. तो ते यहोवासमोर ओवाळण्याचं अर्पण म्हणून ओवाळेल.+ १३ मग पापार्पणाचे आणि होमार्पणाचे पशू जिथे कापले जातात, तिथे एका पवित्र ठिकाणी त्याने तो मेंढा कापावा.+ कारण पापार्पणासारखंच दोषार्पणही याजकाचं आहे.+ ते परमपवित्र आहे.+

१४ यानंतर याजकाने दोषार्पणाचं काही रक्‍त घेऊन, ते शुद्धीकरणासाठी आलेल्या माणसाच्या उजव्या कानाच्या पाळीला, तसंच त्याच्या उजव्या हाताच्या अंगठ्याला आणि उजव्या पायाच्या अंगठ्याला लावावं. १५ मग याजकाने एक लोगभर तेलातून काही तेल+ आपल्या डाव्या तळहातावर ओतावं. १६ त्यानंतर याजकाने आपल्या उजव्या हाताचं बोट, डाव्या तळहातावरच्या तेलात बुडवून थोडं तेल यहोवासमोर सात वेळा शिंपडावं. १७ मग याजकाने आपल्या तळहातावरच्या उरलेल्या तेलातलं काही तेल, शुद्धीकरणासाठी आलेल्या माणसाच्या उजव्या कानाच्या पाळीवर, तसंच त्याच्या उजव्या हाताच्या अंगठ्यावर आणि उजव्या पायाच्या अंगठ्यावर लावलेल्या दोषार्पणाच्या रक्‍तावर लावावं. १८ यानंतर याजकाने आपल्या तळहातावरचं उरलेलं तेल, शुद्धीकरणासाठी आलेल्या माणसाच्या डोक्याला लावावं आणि यहोवासमोर त्याच्यासाठी प्रायश्‍चित्त करावं.+

१९ मग याजकाने पापार्पण द्यावं+ आणि शुद्धीकरणासाठी आलेल्या माणसाकरता प्रायश्‍चित्त करावं. यानंतर त्याने होमार्पणासाठी असलेला पशू कापावा. २० मग याजकाने वेदीवर होमार्पण आणि अन्‍नार्पण+ द्यावं. अशा प्रकारे याजक त्या माणसासाठी प्रायश्‍चित्त करेल+ आणि तो शुद्ध होईल.+

२१ पण, जर तो गरीब असेल आणि त्याची ऐपत नसेल, तर त्याने आपल्या प्रायश्‍चित्तासाठी दोषार्पणाचा एक मेंढा ओवाळण्याचं अर्पण म्हणून आणावा. तसंच अन्‍नार्पणासाठी, तेलात मिसळलेलं एक दशांश एफा* चांगलं पीठ, लोगभर मापाइतकं तेल, २२ दोन पारवे किंवा कबुतराची दोन पिल्लं त्याच्या ऐपतीप्रमाणे आणावीत. त्यातलं एक पापार्पणासाठी, तर दुसरं होमार्पणासाठी असेल.+ २३ आठव्या दिवशी,+ स्वतःला शुद्ध ठरवण्यासाठी त्याने ही अर्पणं भेटमंडपाच्या प्रवेशाजवळ यहोवासमोर याजकाकडे आणून द्यावीत.+

२४ याजकाने दोषार्पणाचा मेंढा+ आणि लोगभर मापाइतकं तेल घेऊन ते यहोवासमोर ओवाळण्याचं अर्पण म्हणून ओवाळावं.+ २५ मग त्याने दोषार्पणाचा मेंढा कापावा. त्यानंतर याजकाने दोषार्पणातलं काही रक्‍त घेऊन, ते शुद्धीकरणासाठी आलेल्या माणसाच्या उजव्या कानाच्या पाळीला, तसंच त्याच्या उजव्या हाताच्या अंगठ्याला आणि उजव्या पायाच्या अंगठ्याला लावावं.+ २६ याजकाने काही तेल आपल्या डाव्या तळहातावर ओतावं.+ २७ त्यानंतर याजकाने आपल्या उजव्या हाताच्या बोटाने, डाव्या तळहातावरचं काही तेल यहोवासमोर सात वेळा शिंपडावं. २८ मग याजकाने आपल्या तळहातावरचं काही तेल, शुद्धीकरणासाठी आलेल्या माणसाच्या उजव्या कानाच्या पाळीवर, तसंच त्याच्या उजव्या हाताच्या अंगठ्यावर आणि उजव्या पायाच्या अंगठ्यावर, जिथे दोषार्पणाचं रक्‍त लावलं होतं तिथेच लावावं. २९ यानंतर शुद्धीकरणासाठी आलेल्या माणसाकरता यहोवासमोर प्रायश्‍चित्त करण्यासाठी, याजकाने आपल्या तळहातावरचं उरलेलं तेल त्याच्या डोक्याला लावावं.

३० त्या माणसाने आपल्या ऐपतीप्रमाणे+ आणलेल्या पारव्यांपैकी किंवा कबुतराच्या पिल्लांपैकी एक पक्षी याजकाने अर्पण करावा. ३१ त्याच्या ऐपतीप्रमाणे आणलेल्या पक्ष्यांपैकी एक पापार्पण म्हणून, तर दुसरा होमार्पण म्हणून+ त्याने अन्‍नार्पणासोबत द्यावा. अशा प्रकारे, याजक शुद्धीकरणासाठी आलेल्या माणसाकरता यहोवासमोर प्रायश्‍चित्त करेल.+

३२ ज्याला कुष्ठरोग झाला होता, पण स्वतःला शुद्ध ठरवण्यासाठी लागणाऱ्‍या गोष्टी आणण्याची ज्याची ऐपत नाही, त्याच्याबद्दल हा नियम आहे.”

३३ मोशे आणि अहरोन यांना यहोवा पुढे म्हणाला: ३४ “मी तुम्हाला वारसा म्हणून देत असलेल्या कनान देशात तुम्ही पोहोचल्यावर,+ त्या देशातल्या एखाद्या घराला जर मी कुष्ठरोग होऊ दिला,+ ३५ तर घराच्या मालकाने याजकाकडे येऊन असं सांगावं, ‘माझ्या घरावर रोगाची लक्षणं दिसत आहेत.’ ३६ घरातल्या सर्व वस्तूंना याजकाने अशुद्ध घोषित करू नये म्हणून, घराची तपासणी करायला येण्याआधी त्याने घरातल्या सर्व वस्तू बाहेर काढण्याची आज्ञा द्यावी. मग तो घराची पाहणी करायला येईल. ३७ त्याने संसर्ग झालेला भाग तपासून पाहावा. जर भिंतींवर हिरवट-पिवळे किंवा लालसर चट्टे पडले असतील आणि जर ते भिंतीत खोलवर गेल्यासारखे दिसत असतील, ३८ तर याजकाने बाहेर, घराच्या दाराजवळ जावं आणि सात दिवसांसाठी ते घर बंद करून ठेवावं.+

३९ सात दिवसांनंतर याजकाने पुन्हा येऊन घराची पाहणी करावी. जर रोगाची लक्षणं घराच्या भिंतींवर पसरली असतील, ४० तर याजकाने रोग लागलेले दगड काढून ते शहराबाहेर एका अशुद्ध ठिकाणी फेकून देण्याची आज्ञा द्यावी. ४१ मग त्याने घराच्या भिंती आतून चांगल्या प्रकारे घासून काढण्याची आज्ञा द्यावी आणि निघालेला सर्व चुना शहराबाहेर एका अशुद्ध ठिकाणी फेकला जावा. ४२ त्यानंतर जे दगड काढण्यात आले, त्यांच्याजागी नवीन चुना वापरून दुसरे दगड बसवले जावेत.

४३ पण जर दगड काढल्यानंतर आणि घर घासून नवीन चुना लावल्यानंतर, रोगाची लक्षणं पुन्हा दिसू लागली, ४४ तर याजक पुन्हा आत जाऊन घराची पाहणी करेल. जर रोग घरात पसरला असेल, तर त्या घराला घातक कुष्ठरोग+ झाला आहे. ते घर अशुद्ध आहे. ४५ ते घर पाडून टाकलं जावं. त्याचे दगड, लाकडी खांब आणि घराचा सर्व चुना शहराबाहेर एका अशुद्ध ठिकाणी फेकून दिला जावा.+ ४६ पण ते घर बंद करून ठेवलं असताना जर त्यात कोणी गेला,+ तर तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध असेल.+ ४७ जो कोणी त्या घरात झोपेल किंवा जेवेल त्याने आपले कपडे धुवावेत.

४८ पण जर नवीन चुना लावल्यावर, रोगाची लक्षणं घराच्या भिंतींवर पसरली नसल्याचं याजकाला दिसून आलं, तर याजकाने घराला शुद्ध घोषित करावं, कारण रोग बरा झाला आहे. ४९ घराचं शुद्धीकरण करण्यासाठी त्याने दोन पक्षी, देवदाराचं लाकूड, गडद लाल रंगाचं सूत आणि एजोबची फांदी घ्यावी.+ ५० मग त्याने मातीच्या भांड्यात झऱ्‍याचं ताजं पाणी घेऊन, त्यावर एका पक्ष्याला मारावं. ५१ यानंतर त्याने देवदाराचं लाकूड, एजोबची फांदी, गडद लाल रंगाचं सूत आणि जिवंत पक्षी घ्यावा आणि झऱ्‍याच्या ताज्या पाण्यावर मारलेल्या पक्ष्याच्या रक्‍तात हे सर्व बुडवावं. मग त्याने ते रक्‍त घराच्या दिशेला सात वेळा शिंपडावं.+ ५२ पक्ष्याचं रक्‍त, झऱ्‍याचं ताजं पाणी, जिवंत पक्षी, देवदाराचं लाकूड, एजोबची फांदी आणि गडद लाल रंगाचं सूत यांनी त्याने त्या घराचं शुद्धीकरण करावं. ५३ मग त्याने जिवंत पक्ष्याला शहराबाहेर रानात सोडून द्यावं. अशा प्रकारे त्याने घरासाठी प्रायश्‍चित्त करावं, म्हणजे ते घर शुद्ध होईल.

५४ हा नियम कोणत्याही प्रकारचा कुष्ठरोग, डोक्यावर किंवा दाढीला होणारा संसर्ग,+ ५५ वस्त्राला+ किंवा घराला+ होणारा कुष्ठरोग, ५६ तसंच सूज, खपल्या आणि चट्टे यांबद्दल आहे.+ ५७ एखादी गोष्ट केव्हा शुद्ध आणि केव्हा अशुद्ध असते, हे ठरवण्याबद्दल हा नियम आहे.+ हा कुष्ठरोगाबद्दल नियम आहे.”+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा