वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • प्रेषितांची कार्यं २५
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

प्रेषितांची कार्यं रूपरेषा

      • फेस्तसमोर पौलची चौकशी (१-१२)

        • “मी कैसराकडे न्याय मागतो!” (११)

      • फेस्त अग्रिप्पाचा सल्ला घेतो (१३-२२)

      • पौल अग्रिप्पासमोर (२३-२७)

प्रेषितांची कार्यं २५:१

समासातील संदर्भ

  • +प्रेका २४:२७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १९६

प्रेषितांची कार्यं २५:२

समासातील संदर्भ

  • +प्रेका २४:१

प्रेषितांची कार्यं २५:३

समासातील संदर्भ

  • +प्रेका २३:२०, २१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १९६

प्रेषितांची कार्यं २५:५

समासातील संदर्भ

  • +प्रेका २५:१६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १९६

प्रेषितांची कार्यं २५:६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १९७-१९८

प्रेषितांची कार्यं २५:७

समासातील संदर्भ

  • +मत्त ५:११; लूक २३:१, २; प्रेका २४:५

प्रेषितांची कार्यं २५:८

समासातील संदर्भ

  • +प्रेका २४:११, १२

प्रेषितांची कार्यं २५:९

समासातील संदर्भ

  • +प्रेका २४:२७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १९७-१९८

    टेहळणी बुरूज,

    १२/१५/२००१, पृ. २३-२४

प्रेषितांची कार्यं २५:१०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १९८

    टेहळणी बुरूज,

    १२/१५/२००१, पृ. २३-२४

प्रेषितांची कार्यं २५:११

समासातील संदर्भ

  • +प्रेका २३:२६, २९
  • +प्रेका २८:१७-१९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ९/२०१६, पृ. १५-१६

    टेहळणी बुरूज,

    ५/१५/२००८, पृ. ३२

    १२/१५/२००१, पृ. २३-२४

    ६/१५/१९९७, पृ. ३०-३१

    ६/१/१९९१, पृ. १०-११

    २/१/१९९१, पृ. १५

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १९८

प्रेषितांची कार्यं २५:१२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १९८

प्रेषितांची कार्यं २५:१३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १९८, २०१

    टेहळणी बुरूज,

    २/१/१९९१, पृ. १५

प्रेषितांची कार्यं २५:१५

समासातील संदर्भ

  • +प्रेका २५:२, ३

प्रेषितांची कार्यं २५:१६

समासातील संदर्भ

  • +प्रेका २५:५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१५/२००१, पृ. २३

प्रेषितांची कार्यं २५:१८

समासातील संदर्भ

  • +प्रेका २५:७

प्रेषितांची कार्यं २५:१९

तळटीपा

  • *

    किंवा “त्यांच्या धर्मावरून.”

समासातील संदर्भ

  • +प्रेका १८:१४, १५; २३:२६, २९
  • +प्रेका २२:६-८

प्रेषितांची कार्यं २५:२०

समासातील संदर्भ

  • +प्रेका २५:९

प्रेषितांची कार्यं २५:२१

तळटीपा

  • *

    किंवा “ऑगस्टस.” कैसर निरो याची पदवी. तो ऑक्टॅवियन याच्यापासून चौथा सम्राट होता. पहिल्यांदा ही पदवी ऑक्टॅवियन याच्यासाठी वापरण्यात आली.

समासातील संदर्भ

  • +प्रेका २५:११, १२

प्रेषितांची कार्यं २५:२२

समासातील संदर्भ

  • +प्रेका ९:१५

प्रेषितांची कार्यं २५:२३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ९/१/१९९८, पृ. ३०

प्रेषितांची कार्यं २५:२४

समासातील संदर्भ

  • +प्रेका २२:२२

प्रेषितांची कार्यं २५:२५

समासातील संदर्भ

  • +प्रेका २३:२६, २९

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

प्रे. कार्यं २५:१प्रेका २४:२७
प्रे. कार्यं २५:२प्रेका २४:१
प्रे. कार्यं २५:३प्रेका २३:२०, २१
प्रे. कार्यं २५:५प्रेका २५:१६
प्रे. कार्यं २५:७मत्त ५:११; लूक २३:१, २; प्रेका २४:५
प्रे. कार्यं २५:८प्रेका २४:११, १२
प्रे. कार्यं २५:९प्रेका २४:२७
प्रे. कार्यं २५:११प्रेका २३:२६, २९
प्रे. कार्यं २५:११प्रेका २८:१७-१९
प्रे. कार्यं २५:१५प्रेका २५:२, ३
प्रे. कार्यं २५:१६प्रेका २५:५
प्रे. कार्यं २५:१८प्रेका २५:७
प्रे. कार्यं २५:१९प्रेका १८:१४, १५; २३:२६, २९
प्रे. कार्यं २५:१९प्रेका २२:६-८
प्रे. कार्यं २५:२०प्रेका २५:९
प्रे. कार्यं २५:२१प्रेका २५:११, १२
प्रे. कार्यं २५:२२प्रेका ९:१५
प्रे. कार्यं २५:२४प्रेका २२:२२
प्रे. कार्यं २५:२५प्रेका २३:२६, २९
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र यात वाचा
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
  • २७
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
प्रेषितांची कार्यं २५:१-२७

प्रेषितांची कार्यं

२५ त्यामुळे, त्या प्रांतात येऊन कारभार हाती घेतल्यावर, तीन दिवसांनी फेस्त+ कैसरीयाहून वर यरुशलेमला गेला. २ तेव्हा मुख्य याजकांनी आणि यहुद्यांमधल्या प्रमुख माणसांनी पौलविरुद्ध त्याच्याजवळ तक्रार केली.+ आणि ते फेस्तकडे अशी मागणी करू लागले, की ३ त्याने त्यांच्या विनंतीवरून पौलला यरुशलेमला पाठवून द्यावं. पण खरंतर, रस्त्यातच त्याच्यावर हल्ला करून त्याला ठार मारायचा त्यांचा कट होता.+ ४ पण फेस्तने त्यांना सांगितलं, की पौलला कैसरीयातच ठेवण्यात येईल आणि तो स्वतः लवकरच तिथे जात आहे. ५ मग तो म्हणाला, “जर त्या माणसाने खरंच काही अपराध केला असेल, तर तुमच्यातल्या अधिकाऱ्‍यांनी माझ्यासोबत येऊन त्याच्यावर तसा आरोप करावा.”+

६ मग, आठदहा दिवस त्यांच्यासोबत राहिल्यानंतर तो खाली कैसरीयाला गेला. दुसऱ्‍या दिवशी तो न्यायासनावर बसला आणि पौलला आपल्यासमोर आणायचा त्याने हुकूम दिला. ७ पौल आल्यावर, यरुशलेमहून आलेले यहुदी त्याच्याभोवती उभे राहून त्याच्यावर बरेच गंभीर आरोप लावू लागले. पण हे आरोप ते सिद्ध करू शकले नाहीत.+

८ तेव्हा पौल आपली बाजू मांडत म्हणाला: “मी यहुद्यांच्या नियमशास्त्राविरुद्ध, मंदिराविरुद्ध किंवा कैसराविरुद्ध कोणतंही पाप केलं नाही.”+ ९ यहुद्यांची मर्जी मिळवण्याच्या उद्देशाने फेस्त+ पौलला म्हणाला: “यरुशलेमला जाऊन या सगळ्या गोष्टींबद्दल माझ्यासमोर तुझा न्याय व्हावा अशी तुझी इच्छा आहे का?” १० पण पौल त्याला म्हणाला: “मी कैसराच्या न्यायासनासमोर उभा आहे आणि इथेच माझा न्याय झाला पाहिजे. मी यहुद्यांचं काहीच वाईट केलं नाही आणि ही गोष्ट तुम्हालाही चांगली माहीत आहे. ११ मी खरंच अपराधी असेन आणि मृत्युदंड मिळण्यासारखा काही अपराध केला असेल,+ तर मी मरायला तयार आहे. पण या माणसांनी माझ्यावर लावलेले आरोप जर खरे नसतील, तर फक्‍त त्यांना खूश करण्यासाठी मला त्यांच्या हवाली करायचा कोणत्याही माणसाला अधिकार नाही. मी कैसराकडे न्याय मागतो!”+ १२ मग जमलेल्या सल्लागारांशी बोलून फेस्त म्हणाला: “तू कैसराकडे न्याय मागितला आहेस, म्हणून तू कैसराकडे जाशील.”

१३ मग काही दिवसांनंतर अग्रिप्पा राजा आणि बर्णीका, फेस्तची भेट घ्यायला कैसरीयात आले. १४ ते तिथे बरेच दिवस राहणार असल्यामुळे फेस्तने पौलचा खटला राजासमोर मांडला. तो म्हणाला:

“फेलिक्सने कैदेत ठेवलेला एक माणूस इथे आहे. १५ मी यरुशलेममध्ये असताना मुख्य याजकांनी आणि यहुद्यांच्या वडिलांनी त्याच्याविरुद्ध तक्रार करून+ त्याला मृत्युदंड द्यायची मागणी केली. १६ पण मी त्यांना सांगितलं, की एखाद्या माणसाला, त्याच्यावर आरोप करणाऱ्‍यांच्या समोर येऊन आपली बाजू मांडायची संधी दिल्याशिवाय, फक्‍त त्यांना खूश करण्यासाठी त्यांच्या हवाली करणं ही रोमी लोकांची पद्धत नाही.+ १७ त्यामुळे ते इथे आल्यावर मी जास्त वेळ न घालवता, दुसऱ्‍याच दिवशी न्यायासनावर बसलो आणि त्या माणसाला माझ्यासमोर आणायचा हुकूम दिला. १८ त्याच्यावर आरोप करणारे उभे राहिले, तेव्हा मला वाटलं होतं तशा कोणत्याही वाईट गोष्टींचा आरोप त्यांनी त्याच्यावर लावला नाही.+ १९ फक्‍त त्यांच्या देवाच्या उपासनेवरून* आणि येशू नावाच्या कोणा माणसावरून त्यांच्यात मतभेद होते.+ कारण तो मेला असूनही जिवंत असल्याचा दावा पौल करत होता.+ २० हा वाद कसा सोडवावा हे मला समजत नव्हतं. म्हणून मी त्याला विचारलं, की यरुशलेमला जाऊन या गोष्टींबद्दल तुझा न्याय केला जावा अशी तुझी इच्छा आहे का?+ २१ पण कैसराचा* निर्णय होईपर्यंत आपल्याला कैदेत ठेवावं अशी पौलने मागणी केल्यामुळे,+ कैसराकडे पाठवेपर्यंत त्याला तिथेच ठेवायचा मी हुकूम दिला.”

२२ तेव्हा अग्रिप्पा फेस्तला म्हणाला: “मला स्वतः त्या माणसाकडून ऐकायची इच्छा आहे.”+ तो त्याला म्हणाला: “तुम्हाला उद्या त्याचं म्हणणं ऐकायला मिळेल.” २३ त्यामुळे दुसऱ्‍या दिवशी अग्रिप्पा आणि बर्णीका मोठ्या थाटामाटात आले. सेनापती तसंच शहरातल्या बऱ्‍याच प्रतिष्ठित माणसांसोबत त्यांनी दरबारात प्रवेश केला. मग फेस्तने हुकूम दिल्याप्रमाणे पौलला आत आणण्यात आलं. २४ तेव्हा फेस्त म्हणाला: “हे राजा अग्रिप्पा आणि इथे उपस्थित असलेल्या सगळ्या लोकांनो, पाहा हा माणूस तुमच्यासमोर उभा आहे. याच माणसाबद्दल यरुशलेमच्या आणि इथल्या सगळ्या यहुद्यांनी माझ्याकडे ओरडून अशी विनंती केली, की ‘त्याला ठार मारा, तो जगायच्या लायकीचा नाही.’+ २५ पण मला दिसून आलं, की मृत्युदंड देण्यासारखं त्याने काहीच केलेलं नाही.+ त्यामुळे या माणसाने कैसराकडे न्याय मागण्याची विनंती केली, तेव्हा मी त्याला तिथे पाठवायचं ठरवलं. २६ पण त्याच्याबद्दल कैसराला निश्‍चित असं काहीच लिहिण्यासारखं माझ्याजवळ नाही. त्यामुळे मी याला तुम्हा सगळ्यांसमोर, आणि खासकरून राजा अग्रिप्पा, तुमच्यासमोर आणलं. म्हणजे त्याची न्यायचौकशी झाल्यावर मी त्याच्याबद्दल काहीतरी लिहू शकेन. २७ कारण एखाद्या कैद्यावरचे आरोप न सांगता त्याला पाठवणं मला योग्य वाटत नाही.”

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा