उत्पत्ती
५ हा आदामच्या वंशावळीचा वृत्तान्त आहे. देवाने आदामला निर्माण केलं, त्या दिवशी त्याने त्याला आपल्यासारखं*+ बनवलं. २ त्याने त्यांना पुरुष आणि स्त्री असं निर्माण केलं.+ त्यांना निर्माण करण्यात आलं+ त्या दिवशी, देवाने त्यांना आशीर्वाद दिला आणि माणूस* असं नाव दिलं.
३ आदाम १३० वर्षांचा झाल्यावर त्याला त्याच्यासारखाच* एक मुलगा झाला आणि त्याने त्याचं नाव शेथ+ ठेवलं. ४ शेथच्या जन्मानंतर आदाम ८०० वर्षं जगला आणि त्याला आणखी मुलं आणि मुली झाल्या. ५ अशा रितीने आदाम ९३० वर्षं जगला; मग त्याचा मृत्यू झाला.+
६ शेथ १०५ वर्षांचा झाल्यावर त्याला अनोश+ झाला. ७ अनोशच्या जन्मानंतर शेथ ८०७ वर्षं जगला आणि त्याला आणखी मुलं आणि मुली झाल्या. ८ अशा रितीने शेथ ९१२ वर्षं जगला; मग त्याचा मृत्यू झाला.
९ अनोश ९० वर्षांचा झाल्यावर त्याला केनान झाला. १० केनानच्या जन्मानंतर अनोश ८१५ वर्षं जगला आणि त्याला आणखी मुलं आणि मुली झाल्या. ११ अशा रितीने अनोश ९०५ वर्षं जगला; मग त्याचा मृत्यू झाला.
१२ केनान ७० वर्षांचा झाल्यावर त्याला महललेल+ झाला. १३ महललेलच्या जन्मानंतर केनान ८४० वर्षं जगला आणि त्याला आणखी मुलं आणि मुली झाल्या. १४ अशा रितीने केनान ९१० वर्षं जगला; मग त्याचा मृत्यू झाला.
१५ महललेल ६५ वर्षांचा झाल्यावर त्याला यारेद+ झाला. १६ यारेदच्या जन्मानंतर महललेल ८३० वर्षं जगला आणि त्याला आणखी मुलं आणि मुली झाल्या. १७ अशा रितीने महललेल ८९५ वर्षं जगला; मग त्याचा मृत्यू झाला.
१८ यारेद १६२ वर्षांचा झाल्यावर त्याला हनोख+ झाला. १९ हनोखच्या जन्मानंतर यारेद ८०० वर्षं जगला आणि त्याला आणखी मुलं आणि मुली झाल्या. २० अशा रितीने यारेद ९६२ वर्षं जगला; मग त्याचा मृत्यू झाला.
२१ हनोख ६५ वर्षांचा झाल्यावर त्याला मथुशलह+ झाला. २२ मथुशलहच्या जन्मानंतर हनोख ३०० वर्षं खऱ्या देवासोबत* चालत राहिला. त्याला आणखी मुलं आणि मुली झाल्या. २३ अशा रितीने हनोख ३६५ वर्षं जगला. २४ हनोख खऱ्या देवासोबत चालत राहिला.+ मग तो नाहीसा झाला, कारण देवाने त्याला नेलं.+
२५ मथुशलह १८७ वर्षांचा झाल्यावर त्याला लामेख+ झाला. २६ लामेखच्या जन्मानंतर मथुशलह ७८२ वर्षं जगला आणि त्याला आणखी मुलं आणि मुली झाल्या. २७ अशा रितीने मथुशलह ९६९ वर्षं जगला; मग त्याचा मृत्यू झाला.
२८ लामेख १८२ वर्षांचा झाल्यावर त्याला एक मुलगा झाला. २९ त्याने त्याचं नाव नोहा*+ ठेवलं आणि तो म्हणाला: “यहोवाने जमिनीला शाप दिल्यामुळे आपल्याला जे मेहनतीचं काम आणि काबाडकष्ट करावे लागत आहेत,+ त्यांपासून हा आपल्याला सांत्वन* देईल.” ३० नोहाच्या जन्मानंतर लामेख ५९५ वर्षं जगला आणि त्याला आणखी मुलं आणि मुली झाल्या. ३१ अशा रितीने लामेख ७७७ वर्षं जगला; मग त्याचा मृत्यू झाला.
३२ नोहा ५०० वर्षांचा झाल्यावर, त्याला शेम,+ हाम+ आणि याफेथ+ झाले.