१ इतिहास
१६ मग खऱ्या देवाच्या कराराच्या पेटीसाठी दावीदने जो तंबू उभा केला होता, त्यात त्यांनी कराराची पेटी आणून ठेवली;+ आणि खऱ्या देवासमोर त्यांनी होमार्पणं आणि शांती-अर्पणं वाहिली.+ २ होमार्पणं+ आणि शांती-अर्पणं वाहिल्यानंतर,+ दावीदने यहोवाच्या नावाने सर्व लोकांना आशीर्वाद दिला. ३ तसंच सर्व इस्राएली लोकांना, म्हणजे प्रत्येक स्त्री-पुरुषाला त्याने एकेक भाकर आणि खजुरांची व मनुकांची एकेक ढेप दिली. ४ मग त्याने काही लेव्यांना यहोवाच्या कराराच्या पेटीसमोर सेवा करायला+ आणि इस्राएलचा देव यहोवा याचा सन्मान करायला,* त्याचे आभार मानायला आणि त्याची स्तुती करायला नेमलं. ५ आसाफ+ हा त्यांच्यावर प्रमुख होता; तर जखऱ्या त्याच्या खालोखाल होता. ईयेल, शमीरामोथ, यहीएल, मतिथ्य, अलीयाब, बनाया, ओबेद-अदोम आणि ईयेल+ हे सगळे तंतुवाद्यं आणि वीणा वाजवायचे.+ आसाफ झांज वाजवायचा,+ ६ आणि याजक असलेले बनाया व यहजिएल हे खऱ्या देवाच्या कराराच्या पेटीसमोर नेहमी कर्णे फुंकायचे.
७ त्या दिवशी, आपण यहोवासाठी रचलेलं उपकारस्तुतीचं गीत दावीदने पहिल्यांदाच आसाफला+ आणि त्याच्या भाऊबंदांना गायला दिलं. ते गीत असं:
८ “यहोवाचे आभार माना,+ त्याचं नाव घेऊन त्याला प्रार्थना करा,
राष्ट्रा-राष्ट्रांतल्या लोकांना त्याच्या कार्यांबद्दल सांगा!+
१० त्याच्या पवित्र नावाचा अभिमानाने गौरव करा.+
यहोवाचा शोध घेणाऱ्यांचं मन आनंदित होवो.+
११ यहोवाचा आणि त्याच्या सामर्थ्याचा शोध करा.+
आपले डोळे सतत त्याच्याकडे लावा.+
१२ त्याने केलेल्या अद्भुत कार्यांची आठवण करा,+
त्याच्या चमत्कारांची आणि त्याने जाहीर केलेल्या न्याय-निर्णयांची* आठवण करा,
१३ त्याचा सेवक इस्राएल याच्या वंशजांनो,*+
याकोबच्या मुलांनो, त्याने निवडलेल्यांनो, त्यांची आठवण करा.+
१४ तो आपला देव यहोवा आहे.+
त्याचे न्याय-निर्णय संपूर्ण पृथ्वीवर लागू होतात.+
१५ त्याचा करार कायम आठवणीत ठेवा,
त्याने दिलेलं अभिवचन* हजारो पिढ्यांपर्यंत लक्षात ठेवा,+
१६ त्याने अब्राहामशी केलेल्या कराराची,+
आणि इसहाकला दिलेल्या शपथेची आठवण ठेवा,+
१७ त्याने ती शपथ याकोबसाठी एक नियम,+
आणि इस्राएलसाठी कायमचा करार म्हणून स्थापन केली,
१८ तो म्हणाला होता, ‘मी तुम्हाला कनान देश देईन,+
वारशाचा प्रदेश म्हणून मी तो तुम्हाला देईन.’+
१९ त्या वेळी तुमची संख्या कमी होती,
हो, तुम्ही संख्येने अगदीच कमी होता; देशात तुम्ही विदेशी म्हणून राहत होता.+
२० ते एका राज्यातून दुसऱ्या राज्यात,
एका राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्रात भटकत राहिले.+
२१ त्याने कोणत्याही माणसाला त्यांच्यावर जुलूम करू दिला नाही,+
उलट, त्यांच्यासाठी त्याने राजांना फटकारलं,+
२२ आणि म्हटलं, ‘माझ्या अभिषिक्त जनांना हात लावू नका,
आणि माझ्या संदेष्ट्यांना कसलाही त्रास देऊ नका.’+
२३ पृथ्वीवरच्या सर्व लोकांनो, यहोवासाठी गीत गा!
तो करत असलेल्या तारणाची दररोज घोषणा करा!+
२४ सर्व राष्ट्रांना त्याच्या गौरवाबद्दल सांगा,
सगळ्या लोकांना त्याच्या अद्भुत कार्यांबद्दल सांगा.
२५ कारण यहोवा महान आहे, तोच सर्वात जास्त स्तुतिपात्र आहे.
इतर सर्व देवांपेक्षा तोच जास्त विस्मयकारक आहे.+
२८ राष्ट्रा-राष्ट्रांतल्या कुटुंबांनो, यहोवाचा सन्मान करा!
यहोवाचा सन्मान करा, कारण तो गौरवशाली व सामर्थ्यशाली आहे.+
पवित्र वस्त्रं घालून* यहोवाला नमन करा.*+
३० पृथ्वीवरच्या सर्व लोकांनो, त्याच्यासमोर थरथर कापा!
पृथ्वी* कायमची स्थिर करण्यात आली आहे, ती हलवता येणार नाही.+
३२ समुद्र आणि त्यातलं सर्वकाही गर्जना करो;
माळरानं आणि त्यातलं सर्वकाही उत्सव करो.
३३ जंगलातली झाडंही यहोवापुढे मोठ्याने जल्लोष करोत,
कारण तो पृथ्वीचा न्याय करायला येत आहे.*
३५ असं म्हणा, ‘हे आमच्या उद्धार करणाऱ्या देवा, आम्हाला वाचव,+
आम्हाला एकत्र करून इतर राष्ट्रांपासून सोडव,
म्हणजे आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देऊ,+
आणि मोठ्या आनंदाने तुझी स्तुती करू.+
३६ इस्राएलच्या देवाची, यहोवाची सदासर्वकाळ* स्तुती होवो.’”
तेव्हा सर्व लोक म्हणाले: “आमेन!”* आणि त्यांनी यहोवाची स्तुती केली.
३७ मग दावीदने आसाफला+ आणि त्याच्या भाऊबंदांना, त्यांच्या रोजच्या कर्तव्याप्रमाणे+ यहोवाच्या कराराच्या पेटीसमोर नेहमी सेवा करता यावी म्हणून नेमलं.+ ३८ त्याने ओबेद-अदोम व त्याच्या ६८ भाऊबंदांना; आणि यदूथूनचा मुलगा ओबेद-अदोम व होसा यांना द्वारपाल म्हणून नेमलं. ३९ दावीदने सादोक+ याजकाला आणि त्याच्या सोबतच्या इतर याजकांना गिबोनच्या+ उच्च स्थानावर* असलेल्या यहोवाच्या उपासना मंडपासमोर सेवा करायला नेमलं. ४० त्याने होमार्पणाच्या वेदीवर नियमितपणे सकाळी व संध्याकाळी यहोवाला होमार्पणं देण्यासाठी त्यांना नेमलं. तसंच, यहोवाने आपल्या नियमशास्त्रात इस्राएली लोकांना ज्या सर्व गोष्टी करायची आज्ञा दिली होती, त्या करण्यासाठी त्याने त्यांना नेमलं.+ ४१ त्यांच्यासोबत, हेमान व यदूथून+ आणि काही खास निवडलेले लोकही यहोवाच्या नावाचा धन्यवाद करण्यासाठी होते;+ कारण “त्याचं एकनिष्ठ प्रेम कायम राहतं.”+ ४२ त्यांच्यासोबत हेमान+ आणि यदूथून हे खऱ्या देवाची स्तुती करण्यासाठी कर्णे, झांजा आणि इतर वाद्यं वाजवायचे; आणि यदूथूनची मुलं+ ही द्वारपाल होती. ४३ मग सगळे लोक आपापल्या घरी गेले, आणि दावीदही आपल्या कुटुंबातल्या लोकांना आशीर्वाद द्यायला घरी गेला.