यशया
४० तुमचा देव म्हणतो: “सांत्वन करा! माझ्या लोकांचं सांत्वन करा!+
२ यरुशलेमशी प्रेमाने बोला,
तिला सांगा, तिचे कष्टाचे दिवस संपले आहेत,
तिच्या अपराधांची किंमत दिली गेली आहे.+
तिच्या सर्व पापांबद्दल तिला यहोवाकडून पूर्ण* दंड मिळालाय.”+
३ ओसाड रानात घोषणा करणाऱ्या एकाचा आवाज ऐकू येत आहे:
वाळवंटातून जाणारा+ महामार्ग आपल्या देवासाठी तयार करा.+
४ प्रत्येक दरी भरून काढा,
आणि प्रत्येक डोंगर व टेकडी सपाट करा.
ओबडधोबड जमीन एकसारखी करा,
आणि खडबडीत जमीन मैदानासारखी करा.+
६ ऐक! कोणीतरी म्हणत आहे: “घोषणा कर!”
त्यावर दुसऱ्याने विचारलं: “काय घोषणा करू?”
“सर्व मानव हे हिरव्या गवतासारखे आहेत.
त्यांचं एकनिष्ठ प्रेम हे रानातल्या फुलासारखं आहे.+
खरंच, माणूस हा हिरव्या गवतासारखाच आहे.
यरुशलेमसाठी आनंदाचा संदेश घेऊन येणारी स्त्री,
तू घाबरू नकोस, मोठ्याने बोल!
यहूदाच्या शहरांमध्ये अशी घोषणा कर: “पाहा तुमचा देव!”+
पाहा! त्याचं प्रतिफळ त्याच्याजवळ आहे,
आणि जी मजुरी तो देतो ती त्याच्यासमोर आहे.+
११ तो मेंढपाळाप्रमाणे आपल्या कळपाची काळजी घेईल.+
आपल्या हातांनी तो कोकरांना गोळा करेल;
तो त्यांना उचलून आपल्या कुशीत घेईल.
दूध पाजणाऱ्या मेंढ्यांनाही तो सांभाळून नेईल.+
१२ समुद्रातलं पाणी आपल्या ओंजळीत कोणी मोजलं आहे का?+
आकाशाचं मोजमाप आपल्या हाताच्या वितेने* कोणी घेतलं आहे का?
पृथ्वीची धूळ मापाने कोणी मापली आहे का?+
डोंगरांचं वजन काट्यावर कोणी केलं आहे का?
किंवा टेकड्यांना तराजूत कोणी तोललं आहे का?
१३ कोणी यहोवाच्या पवित्र शक्तीचं मोजमाप घेतलं आहे का?*
त्याचा सल्लागार बनून कोणी त्याला सल्ला देऊ शकतं का?+
१४ समजबुद्धी मिळवायला त्याने कोणाशी सल्लामसलत केली?
न्यायाचा मार्ग त्याला कोण शिकवतं?
त्याला ज्ञान कोण देतं?
किंवा खरी समज काय हे त्याला कोण दाखवतं?+
१५ पाहा! त्याच्यासमोर सगळी राष्ट्रं बादलीमधल्या पाण्याच्या एका थेंबासारखी आहेत,
त्याच्या नजरेत ती तराजूवरच्या धुळीच्या कणांसारखी आहेत.+
पाहा! तो बेटं धुळीच्या कणांसारखी सहज उचलतो.
१६ त्याच्या वेदीवर जाळण्यासाठी लबानोनमधल्या सगळ्या झाडांची लाकडंसुद्धा पुरणार नाहीत,
आणि होमार्पणं देण्यासाठी तिथल्या जंगलातले प्राणीही कमी पडतील.
१७ त्याच्यासमोर सगळी राष्ट्रं अशी आहेत, जणू काय ती अस्तित्वातच नाहीत;+
त्याच्या दृष्टीने ती काहीच नाहीत; ती कवडीमोल आहेत.+
१८ तुम्ही देवाची तुलना कोणाशी कराल?+
त्याचं स्वरूप कोणासारखं आहे असं म्हणाल?+
१९ मूर्ती बनवणारा ओतीव मूर्ती बनवतो,
धातूकाम करणारा तिला सोन्याने मढवतो,+
आणि चांदीच्या साखळ्यांनी तिला सजवतो.
२० किंवा कोणी अर्पण देण्यासाठी न कुजणारं झाड निवडतो.+
मग स्थिर उभी राहील अशी मूर्ती बनवण्यासाठी,+
तो कुशल कारागीर शोधतो.
२१ तुम्हाला माहीत नाही का?
तुम्ही कधी ऐकलं नाही का?
तुम्हाला सुरुवातीपासूनच सांगण्यात आलं नाही का?
पृथ्वीचा पाया घालण्यात आला तेव्हापासून असलेल्या पुराव्यांवरून तुम्हाला समजलं नाही का?+
तो मऊ कापडासारखं आकाश पसरवतो,
तंबू उभारण्यासाठी कापड ताणतात, तसं तो आकाश ताणतो.+
२३ तो मोठमोठ्या अधिकाऱ्यांना खाली पाडतो,
पृथ्वीवरच्या न्यायाधीशांना* तो शून्यवत करतो.
२४ ते नुकत्याच लावलेल्या रोपांप्रमाणे आहेत;
ती जमिनीत लावली न लावली,
त्यांनी जमिनीत मूळ धरलं न धरलं,
तोच ती फुंकरेने उडतात आणि वाळून जातात,
वारा त्यांना भुशाप्रमाणे दूर वाहून नेतो.+
२५ “तुम्ही कोणाशी माझी बरोबरी कराल? माझ्यासारखा कोण आहे?” असं पवित्र देव म्हणतो.
२६ “आपले डोळे वर करा आणि आकाशाकडे बघा.
या सगळ्या ताऱ्यांना कोणी बनवलं?+
जो त्यांच्या सैन्याची मोजणी करून त्यांचं नेतृत्व करतो;
त्यांच्यातल्या प्रत्येकाला जो नावाने बोलावतो,+ त्यानेच त्यांना बनवलं आहे.
त्याच्या प्रचंड आणि अफाट शक्तीमुळे, त्याच्या विस्मयकारक ताकदीमुळे,+
त्यांच्यातला एकही गैरहजर राहत नाही.
२७ हे याकोब तू असं का म्हणतोस,
हे इस्राएल तू असं का बोलतोस,
की ‘माझा मार्ग यहोवापासून लपलेला आहे,
आणि देवाकडून मला न्याय मिळत नाही’?+
२८ तुला माहीत नाही का? तू कधी ऐकलं नाहीस का?
पृथ्वीवरचं सगळं काही निर्माण करणारा यहोवा हाच सर्वकाळाचा देव आहे.+
तो कधीही थकत नाही किंवा दमत नाही.+
त्याची बुद्धी* समजण्याच्या पलीकडे आहे.+
३० तरुण मुलं थकतील आणि दमून जातील,
तरुण माणसं अडखळून पडतील,
३१ पण यहोवाची आशा धरणाऱ्यांना नव्याने शक्ती मिळेल.
ते गरुडांसारखे पंख पसरून उंच भरारी घेतील.+
ते धावतील, तरी दमणार नाहीत,
ते चालतील, तरी थकणार नाहीत.”+