मीखा
३ मी म्हणालो: “याकोबच्या प्रमुखांनो, कृपा करून ऐका!
आणि इस्राएलच्या घराण्याच्या शासकांनो, तुम्हीही ऐका!+
तुम्हाला न्यायाची जाणीव असायला नको का?
२ पण तुम्ही तर चांगल्याचा द्वेष करता+ आणि वाइटावर प्रेम करता;+
तुम्ही माझ्या लोकांची कातडी सोलून काढता आणि त्यांच्या हाडांवरच्या मांसाचे लचके तोडता.+
३ तुम्ही माझ्या लोकांचं मांस खाता+
आणि त्यांची कातडी सोलून काढता,
भांड्यात* शिजवण्यासाठी जसे मांसाचे तुकडे करतात,
तशी तुम्ही त्यांची हाडं तोडता आणि त्यांचे तुकडेतुकडे करता.+
४ त्या वेळी ते यहोवाला मदतीसाठी हाक मारतील,
पण तो त्यांना उत्तर देणार नाही.
५ यहोवाच्या लोकांना चुकीच्या मार्गावर जायला लावणारे संदेष्टे,+ दातांनी चावताना*+ शांतीची घोषणा करतात,+
पण ज्याच्याकडून त्यांना तोंडात घालायला काही मिळत नाही, त्याच्याविरुद्ध ते युद्धाची घोषणा करतात;*
अशा संदेष्ट्यांविरुद्ध तो म्हणतो:
६ ‘रात्र असल्याप्रमाणे तुम्ही काळोखात असाल;+ तुम्हाला दृष्टान्त दिसणार नाहीत;+
तुमच्यावर फक्त अंधार असेल, तुम्ही भविष्य सांगू शकणार नाही.
संदेष्ट्यांवर सूर्य मावळेल,
आणि त्यांच्यासाठी दिवसाढवळ्या काळोख होईल.+
त्या सर्वांना आपलं तोंड* झाकावं लागेल,
कारण देवाकडून त्यांना काहीही उत्तर मिळणार नाही.’”
८ पण मी तर याकोबला त्याच्या बंडाबद्दल आणि इस्राएलला त्याच्या पापाबद्दल सांगण्यासाठी,
यहोवाच्या पवित्र शक्तीच्या* सामर्थ्याने,
आणि न्यायाने व धैर्याने भरून गेलो आहे.
९ याकोबच्या घराण्याच्या प्रमुखांनो, कृपा करून हे ऐका!
आणि इस्राएलच्या घराण्याच्या शासकांनो, तुम्हीही ऐका!+
तुम्हाला न्यायाची घृणा वाटते आणि सरळ असलेल्या गोष्टींना तुम्ही वाकडं करता,+
१० तुम्ही रक्तपाताने सीयोन आणि अनीतीने यरुशलेम बांधता.+
आणि इतकं असूनही, यहोवावर भरवसा ठेवून* ते म्हणतात:
“आपल्यावर कोणतंच संकट येणार नाही.+
यहोवा आपल्यासोबत नाही का?”+