स्तोत्र
दावीदचं गीत.
२७ यहोवा माझा प्रकाश+ आणि माझं तारण आहे.
मला कोणाची भीती?+
यहोवा माझ्या जिवाचं आश्रयस्थान* आहे.+
मला कोणाचं भय?
२ माझं मांस खाण्यासाठी दुष्टांनी माझ्यावर हल्ला केला,+
पण माझे विरोधक आणि माझे शत्रू स्वतःच अडखळून पडले.
ते माझ्याशी युद्ध करायला आले,
तरीही मी भरवसा ठेवीन.
४ मी यहोवाकडे एकच विनंती केली आहे;
माझी एवढीच इच्छा आहे,
की मी आयुष्यभर यहोवाच्या घरात राहावं,+
म्हणजे मला यहोवाचा चांगुलपणा पाहता येईल
५ कारण संकटाच्या दिवशी तो मला आपल्या आश्रयात लपवेल;+
तो मला त्याच्या तंबूमध्ये, त्याच्या गुप्त ठिकाणी लपवेल;+
तो मला उंच खडकावर ठेवेल.+
६ मला घेरणाऱ्या शत्रूंवर, मी आता वर्चस्व मिळवलंय;
मी आनंदाने जल्लोष करत त्याच्या तंबूमध्ये बलिदानं अर्पण करीन;
मी यहोवाची स्तुती गाईन.*
९ माझ्यापासून तोंड फिरवू नकोस.*+
आपल्या या सेवकाला रागाने घालवून देऊ नकोस.
तू माझा सहायक आहेस;+
माझं तारण करणाऱ्या देवा, माझा त्याग करू नकोस, मला सोडू नकोस.
१२ मला माझ्या विरोधकांच्या हाती देऊ नकोस,+
कारण माझ्याविरुद्ध खोटे साक्षीदार उठले आहेत,+
ते माझा घात करण्याच्या धमक्या देतात.
हो, यहोवावर आशा ठेव.