वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • १ पेत्र ४
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

१ पेत्र रूपरेषा

      • ख्रिस्ताप्रमाणेच देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी जगा (१-६)

      • सर्व गोष्टींचा शेवट जवळ (७-११)

      • ख्रिस्ती म्हणून दुःख सोसणं (१२-१९)

१ पेत्र ४:१

तळटीपा

  • *

    किंवा “त्याच्यासारखाच निर्धार; निश्‍चय.”

समासातील संदर्भ

  • +फिलि २:८
  • +रोम ६:११; कल ३:५; १यो ३:६

१ पेत्र ४:२

समासातील संदर्भ

  • +२कर ५:१५
  • +गल २:२०; इफि ५:१७

१ पेत्र ४:३

तळटीपा

  • *

    ग्रीक, ॲसेल्गेया. शब्दार्थसूची पाहा.

  • *

    किंवा “रंगेल पार्ट्या.”

  • *

    किंवा “पिण्याच्या शर्यती लावणं.”

समासातील संदर्भ

  • +तीत ३:३
  • +रोम १३:१३; १कर ५:११; गल ५:१९, २१; इफि ४:१७-१९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ४४

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२००१, पृ. २८

    १२/१५/१९९६, पृ. २८

    ८/१/१९९६, पृ. १५

    ११/१/१९९२, पृ. २६-२७

    सावध राहा!,

    ७/८/१९९६, पृ. १०-११

१ पेत्र ४:४

समासातील संदर्भ

  • +१पेत्र ३:१६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सावध राहा!,

    ७/८/१९९९, पृ. २१

    टेहळणी बुरूज,

    १२/१५/१९९६, पृ. २८

१ पेत्र ४:५

समासातील संदर्भ

  • +प्रेका १०:४२; १७:३१; २ती ४:१; प्रक २०:१२

१ पेत्र ४:६

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +इफि २:१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१५/२००८, पृ. २१

१ पेत्र ४:७

तळटीपा

  • *

    शब्दशः “निरोगी मनाचे.”

  • *

    किंवा “सावध; जागे.”

समासातील संदर्भ

  • +रोम १२:३; १ती ३:२; तीत २:६
  • +कल ४:२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१५/२०१३, पृ. ३, ४-५

    ३/१५/२००९, पृ. १५-१६, १९

    ८/१५/१९९७, पृ. १७-२२

    ६/१/१९९३, पृ. १४-१५

    राज्य सेवा,

    २/२००३, पृ. १

१ पेत्र ४:८

समासातील संदर्भ

  • +कल ३:१४
  • +नीत १०:१२; १७:९; १कर १३:४, ७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    जागृत राहा!, पृ. २८-३०

    टेहळणी बुरूज,

    ४/१५/१९९९, पृ. २२

    १२/१/१९९७, पृ. १८

    उपासनेतील ऐक्य, पृ. १३२-१३३

१ पेत्र ४:९

समासातील संदर्भ

  • +२कर ९:७; इब्री १३:२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ३/२०१८, पृ. १४-१५

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १०/२०१७, पृ. ९-१०

    टेहळणी बुरूज,

    १०/१/१९९६, पृ. १९

१ पेत्र ४:१०

समासातील संदर्भ

  • +रोम १२:६-८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ७/२०१६, पृ. २२-२५

    टेहळणी बुरूज,

    १२/१५/२०१२, पृ. १०

    १/१५/२००९, पृ. १२-१४

    राज्य सेवा,

    ६/१९९८, पृ. ३

१ पेत्र ४:११

समासातील संदर्भ

  • +यश १२:२; इफि ३:२०
  • +१कर १०:३१

१ पेत्र ४:१२

समासातील संदर्भ

  • +१पेत्र ५:९

१ पेत्र ४:१३

समासातील संदर्भ

  • +रोम ८:१७; २कर ४:१०; २ती ३:१२
  • +प्रेका ५:४१; याक १:२
  • +१पेत्र १:७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अभ्यास लेख माहितीपत्रक—१९९४,

    पृ. ६०-६१

१ पेत्र ४:१४

तळटीपा

  • *

    किंवा “अपमान.”

समासातील संदर्भ

  • +याक १:१२; ५:११

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२०१४, पृ. ३२

१ पेत्र ४:१५

समासातील संदर्भ

  • +१ती ५:१३; १पेत्र २:२०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१५/१९९७, पृ. ३०-३१

१ पेत्र ४:१६

समासातील संदर्भ

  • +कल १:२४; इब्री १२:२

१ पेत्र ४:१७

समासातील संदर्भ

  • +इब्री ३:६
  • +१कर ११:३२
  • +२थेस १:७, ८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    शुद्ध उपासना, पृ. १०२-१०३

    प्रकटीकरण कळस, पृ. ३१-३२, २५९-२६०, २८४

    टेहळणी बुरूज,

    ३/१/२००४, पृ. १६

    ४/१/१९९६, पृ. १८

    १०/१५/१९९५, पृ. २२

१ पेत्र ४:१८

तळटीपा

  • *

    किंवा “वाचवलं जाणं.”

समासातील संदर्भ

  • +नीत ११:३१; मत्त ७:१३, १४

१ पेत्र ४:१९

समासातील संदर्भ

  • +२ती १:१२

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

१ पेत्र ४:१फिलि २:८
१ पेत्र ४:१रोम ६:११; कल ३:५; १यो ३:६
१ पेत्र ४:२२कर ५:१५
१ पेत्र ४:२गल २:२०; इफि ५:१७
१ पेत्र ४:३तीत ३:३
१ पेत्र ४:३रोम १३:१३; १कर ५:११; गल ५:१९, २१; इफि ४:१७-१९
१ पेत्र ४:४१पेत्र ३:१६
१ पेत्र ४:५प्रेका १०:४२; १७:३१; २ती ४:१; प्रक २०:१२
१ पेत्र ४:६इफि २:१
१ पेत्र ४:७रोम १२:३; १ती ३:२; तीत २:६
१ पेत्र ४:७कल ४:२
१ पेत्र ४:८कल ३:१४
१ पेत्र ४:८नीत १०:१२; १७:९; १कर १३:४, ७
१ पेत्र ४:९२कर ९:७; इब्री १३:२
१ पेत्र ४:१०रोम १२:६-८
१ पेत्र ४:११यश १२:२; इफि ३:२०
१ पेत्र ४:१११कर १०:३१
१ पेत्र ४:१२१पेत्र ५:९
१ पेत्र ४:१३रोम ८:१७; २कर ४:१०; २ती ३:१२
१ पेत्र ४:१३प्रेका ५:४१; याक १:२
१ पेत्र ४:१३१पेत्र १:७
१ पेत्र ४:१४याक १:१२; ५:११
१ पेत्र ४:१५१ती ५:१३; १पेत्र २:२०
१ पेत्र ४:१६कल १:२४; इब्री १२:२
१ पेत्र ४:१७इब्री ३:६
१ पेत्र ४:१७१कर ११:३२
१ पेत्र ४:१७२थेस १:७, ८
१ पेत्र ४:१८नीत ११:३१; मत्त ७:१३, १४
१ पेत्र ४:१९२ती १:१२
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र यात वाचा
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
१ पेत्र ४:१-१९

पेत्र याचं पहिलं पत्र

४ ख्रिस्ताने शरीरात दुःख सोसलं,+ त्यामुळे तुम्हीसुद्धा त्याच्यासारखीच मनोवृत्ती* ठेवायला तयार असा, कारण जो शरीरात दुःख सोसतो त्याने पाप करायचं सोडून दिलं आहे.+ २ हे यासाठी, की त्याने आपल्या उरलेल्या आयुष्यात माणसांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी नाही,+ तर देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी जगावं.+ ३ कारण जगाच्या लोकांच्या इच्छेप्रमाणे वागण्यात आतापर्यंत तुम्ही जो वेळ घालवला तो पुरे झाला.+ कारण तेव्हा तुम्ही निर्लज्ज वर्तन* करत होता, अनियंत्रित वासनांच्या आहारी गेला होता, तसंच प्रमाणाबाहेर पिणं, बेलगाम मौजमस्ती,* दारूबाजी* आणि घृणित मूर्तिपूजा यांसारख्या गोष्टी करत होता.+ ४ पण, आता तुम्ही त्यांच्यासोबत या अनैतिकतेच्या चिखलात लोळायचं सोडून दिलं असल्यामुळे, ते गोंधळात पडले आहेत आणि त्यामुळे ते तुमच्याबद्दल वाईट बोलतात.+ ५ पण या लोकांना, जो जिवंतांचा आणि मेलेल्यांचा न्याय करण्यासाठी तयार आहे, त्याला हिशोब द्यावा लागेल.+ ६ खरंतर याच कारणामुळे आनंदाचा संदेश मेलेल्यांनाही घोषित करण्यात आला.+ हे यासाठी, की जरी सर्व माणसांप्रमाणेच त्यांचाही न्याय करण्यात आला, तरी त्यांनी देवाच्या पवित्र शक्‍तीच्या* मार्गदर्शनाप्रमाणे जगावं.

७ पण सर्व गोष्टींचा शेवट जवळ आला आहे. म्हणून समंजस* असा+ आणि प्रार्थना करण्याच्या बाबतीत सतर्क* राहा.+ ८ पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकमेकांवर अगदी मनापासून प्रेम करा,+ कारण प्रेम पुष्कळ पापांना झाकून टाकतं.+ ९ कुरकुर न करता एकमेकांचा पाहुणचार करा.+ १० आपण वेगवेगळ्या मार्गांनी व्यक्‍त होणारी देवाची अपार कृपा मिळालेले कारभारी आहोत.+ त्यामुळे, चांगले कारभारी या नात्याने, प्रत्येकाला ज्या प्रमाणात दान मिळालं आहे, त्याप्रमाणे त्याने ते इतरांच्या सेवेसाठी उपयोगात आणावं. ११ जर कोणी बोलत असेल, तर त्याने देवाची वचनं बोलत असल्याप्रमाणे बोलावं; जर कोणी सेवा करत असेल, तर देव पुरवत असलेल्या सामर्थ्याने सेवा करत असल्याप्रमाणे त्याने ती करावी.+ यामुळे सर्व गोष्टींत येशू ख्रिस्ताद्वारे देवाचा गौरव होईल.+ गौरव आणि सामर्थ्य सदासर्वकाळ त्याचंच आहे. आमेन.

१२ प्रिय बांधवांनो, तुमच्यावर येत असलेल्या अग्निपरीक्षांचं आश्‍चर्य वाटू देऊ नका.+ तुमच्या बाबतीत काहीतरी विचित्र घडत आहे असा विचार करू नका. १३ उलट, तुम्हीसुद्धा ख्रिस्तासारखी दुःखं सहन करत आहात,+ म्हणून आनंद करा.+ यामुळे जेव्हा त्याचा गौरव प्रकट होईल, तेव्हाही तुम्ही खूप आनंदी व्हाल.+ १४ ख्रिस्ताच्या नावासाठी तुमची निंदा* होत असेल, तर तुम्ही सुखी आहात+ कारण देवाची गौरवशाली पवित्र शक्‍ती तुमच्यावर आहे.

१५ पण तुमच्यापैकी कोणालाही खुनी, चोर, अपराधी किंवा इतरांच्या कारभारांत लुडबुड करणारा म्हणून दुःख भोगावं लागू नये.+ १६ पण ख्रिस्ती म्हणून जर एखाद्याला दुःख सोसावं लागलं तर त्याला याबद्दल लाज वाटायचं कारण नाही.+ उलट, त्याने या नावाने ओळखलं जात असताना देवाचा गौरव करत राहावा. १७ देवाच्या घरापासून न्यायाची सुरुवात होण्याची ठरवलेली वेळ आली आहे.+ आणि जर त्याची सुरुवात आपल्यापासून होणार आहे,+ तर मग जे देवाबद्दलच्या आनंदाच्या संदेशाप्रमाणे चालत नाहीत, त्यांचं काय होईल?+ १८ “शिवाय, जर नीतिमानाचं तारण* मुश्‍कीलीने होत असेल तर मग जो अधार्मिक आणि पापी आहे, त्याचं काय होईल?”+ १९ म्हणूनच, देवाच्या इच्छेप्रमाणे दुःखं सोसणाऱ्‍यांनी स्वतःला विश्‍वासू निर्माणकर्त्याच्या हाती सोपवून द्यावं आणि चांगलं ते करत राहावं.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा