वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • १ थेस्सलनीकाकर ३
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

१ थेस्सलनीकाकर रूपरेषा

      • अथेन्समध्ये असताना पौलला वाटणारी काळजी (१-५)

      • तीमथ्यने दिलेली सांत्वनदायक बातमी (६-१०)

      • थेस्सलनीकाकरांसाठी प्रार्थना (११-१३)

१ थेस्सलनीकाकर ३:१

समासातील संदर्भ

  • +प्रेका १७:१५

१ थेस्सलनीकाकर ३:२

तळटीपा

  • *

    किंवा “तुम्हाला विश्‍वासात मजबूत करावं.”

  • *

    किंवा कदाचित, “देवाचा सहकारी.”

समासातील संदर्भ

  • +प्रेका १६:१, २; रोम १६:२१; १कर १६:१०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१५/२००९, पृ. १४

    ४/१/१९८७, पृ. १६-१७

१ थेस्सलनीकाकर ३:३

तळटीपा

  • *

    शब्दशः “बहकू.”

  • *

    किंवा “या गोष्टी आपल्यासाठी ठरलेल्या आहेत.”

समासातील संदर्भ

  • +प्रेका १४:२२; १कर ४:९; १पेत्र २:२१

१ थेस्सलनीकाकर ३:४

समासातील संदर्भ

  • +१थेस २:१४

१ थेस्सलनीकाकर ३:५

समासातील संदर्भ

  • +१थेस ३:२
  • +मत्त ४:३; २कर ११:३

१ थेस्सलनीकाकर ३:६

समासातील संदर्भ

  • +प्रेका १८:५

१ थेस्सलनीकाकर ३:७

तळटीपा

  • *

    शब्दशः “गरजेत.”

समासातील संदर्भ

  • +२थेस १:४

१ थेस्सलनीकाकर ३:८

तळटीपा

  • *

    शब्दशः “आम्ही जगतो.”

१ थेस्सलनीकाकर ३:१०

समासातील संदर्भ

  • +२थेस १:३

१ थेस्सलनीकाकर ३:१२

समासातील संदर्भ

  • +१थेस ४:९; २थेस १:३

१ थेस्सलनीकाकर ३:१३

समासातील संदर्भ

  • +१थेस २:१९; ५:२३; २थेस २:१, २
  • +१कर १:८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ४/१/१९८७, पृ. १७

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

१ थेस्सलनी. ३:१प्रेका १७:१५
१ थेस्सलनी. ३:२प्रेका १६:१, २; रोम १६:२१; १कर १६:१०
१ थेस्सलनी. ३:३प्रेका १४:२२; १कर ४:९; १पेत्र २:२१
१ थेस्सलनी. ३:४१थेस २:१४
१ थेस्सलनी. ३:५१थेस ३:२
१ थेस्सलनी. ३:५मत्त ४:३; २कर ११:३
१ थेस्सलनी. ३:६प्रेका १८:५
१ थेस्सलनी. ३:७२थेस १:४
१ थेस्सलनी. ३:१०२थेस १:३
१ थेस्सलनी. ३:१२१थेस ४:९; २थेस १:३
१ थेस्सलनी. ३:१३१थेस २:१९; ५:२३; २थेस २:१, २
१ थेस्सलनी. ३:१३१कर १:८
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र यात वाचा
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
१ थेस्सलनीकाकर ३:१-१३

थेस्सलनीकाकर यांना पहिलं पत्र

३ त्यामुळे जेव्हा आमच्याने आणखी राहावलं नाही, तेव्हा आम्ही एकटेच अथेन्समध्ये+ राहणं योग्य आहे असं ठरवलं; २ आणि तुम्हाला विश्‍वासात स्थिर करावं* आणि सांत्वन द्यावं, म्हणून आम्ही आमचा भाऊ आणि ख्रिस्ताबद्दलचा आनंदाचा संदेश घोषित करणारा देवाचा सेवक* तीमथ्य,+ याला तुमच्याकडे पाठवलं. ३ हे यासाठी, की या संकटांमुळे तुमच्यापैकी कोणाचाही विश्‍वास डळमळू* नये. या गोष्टी आपल्याला सोसाव्याच लागतील* हे तुम्हाला स्वतःलाही माहीत आहे.+ ४ कारण, आपल्याला संकटं सोसावी लागतील हे तुमच्यासोबत असताना आम्ही तुम्हाला आधीच सांगत होतो आणि अगदी तसंच घडलं हे तुम्हाला माहीत आहे.+ ५ त्यामुळे, मला राहावलंच नाही तेव्हा तुमच्या विश्‍वासूपणाबद्दल जाणून घेण्यासाठी मी तीमथ्यला पाठवलं.+ कारण आम्हाला अशी भीती वाटली, की कदाचित मोहात पाडणाऱ्‍याने+ तुम्हाला मोहात पाडलं असेल आणि तुमच्यासाठी केलेले आमचे परिश्रम वाया गेले असतील.

६ पण इतक्यातच तीमथ्य तुमच्याकडून परत आला आहे+ आणि त्याने आम्हाला तुमच्या विश्‍वासूपणाबद्दल आणि प्रेमाबद्दल चांगली बातमी दिली आहे. म्हणजे, हेच की तुम्ही अजूनही आमची प्रेमाने आठवण काढत असता, आणि जसं आम्ही तुम्हाला पाहायला उत्सुक आहोत, तसंच तुम्हीही आम्हाला पाहायला उत्सुक आहात. ७ म्हणून बांधवांनो, आमच्या सगळ्या दुःखात* आणि संकटातही आम्हाला तुमच्यामुळे आणि तुम्ही दाखवत असलेल्या विश्‍वासूपणामुळे सांत्वन मिळालं आहे.+ ८ कारण तुम्ही प्रभूमध्ये स्थिर उभे आहात हे कळल्यामुळे आम्हाला नवीन उमेद मिळाली आहे.* ९ तुमच्यामुळे आम्हाला देवासमोर मनापासून जो आनंद झाला आहे, त्याबद्दल आम्ही त्याचे आभार कसे व्यक्‍त करावेत? १० आम्ही रात्रंदिवस अगदी प्रामाणिकपणे देवाला याचना करतो, की तुम्हाला प्रत्यक्ष पाहणं आणि तुमच्या विश्‍वासात जी काही कमी असेल ती भरून काढणं आम्हाला शक्य व्हावं.+

११ आता स्वतः देव आणि पिता याने आणि आपल्या प्रभू येशूने तुमच्याकडे यायचा मार्ग आमच्यासाठी मोकळा करावा. १२ शिवाय, आम्ही प्रभूला अशीही विनंती करतो, की आम्हाला तुमच्यासाठी वाटत असलेल्या प्रेमाप्रमाणेच, तुम्हाला एकमेकांबद्दल आणि सर्वांबद्दल वाटणारं प्रेम वाढावं आणि ओसंडून वाहावं.+ १३ हे यासाठी, की प्रभू येशू त्याच्या सगळ्या पवित्र जनांसोबत उपस्थित होईल, तेव्हा+ त्याने आपला देव आणि पिता याच्यासमोर तुमची मनं स्थिर करावीत आणि तुम्हाला पवित्र आणि निर्दोष ठरवावं.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा