यशया
लोक यहोवाचं वैभव पाहतील,
त्यांना त्याचं ऐश्वर्य दिसेल.
४ जे घाबऱ्या मनाचे आहेत त्यांना म्हणा:
“हिंमत धरा! घाबरू नका!
पाहा! तुमचा देव तुमच्या शत्रूंवर सूड उगवायला येईल,
तो त्यांचा बदला घ्यायला येईल.+
तो येईल आणि तुम्हाला वाचवेल.”+
ओसाड प्रदेशात पाण्याचे प्रवाह उफाळून बाहेर येतील,
आणि वाळवंटात झरे फुटतील.
अशुद्ध असलेला कोणीही त्यावरून जाणार नाही.+
जो त्या मार्गानुसार चालतो, त्याच्यासाठीच तो असेल;
मूर्ख त्यावरून जाणार नाही.
९ तिथे सिंह असणार नाही,
कोणताही हिंस्र पशू त्यावर येणार नाही.
त्यांच्यापैकी कोणीही तिथे दिसणार नाही;+
किंमत देऊन ज्यांना सोडवण्यात आलं आहे, फक्त तेच त्यावरून चालतील.+
सर्वकाळ टिकणारा आनंद त्यांच्या डोक्यावरचा मुकुट होईल.+
ते आनंदाने आणि हर्षाने भरून जातील,
शोक आणि दुःख त्यांच्यापासून दूर पळून जाईल.+