वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • दानीएल २
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

दानीएल रूपरेषा

      • नबुखद्‌नेस्सर राजाला बेचैन करणारं स्वप्न पडतं (१-४)

      • कोणताही ज्ञानी माणूस स्वप्न सांगू शकत नाही (५-१३)

      • दानीएल मदतीसाठी देवाला प्रार्थना करतो (१४-१८)

      • रहस्य उलगडल्याबद्दल देवाची स्तुती (१९-२३)

      • दानीएल राजाला स्वप्न सांगतो (२४-३५)

      • राजाच्या स्वप्नाचा अर्थ (३६-४५)

        • राज्याचा दगड पुतळ्याचा चुराडा करेल (४४, ४५)

      • राजा दानीएलला सन्मानित करतो (४६-४९)

दानीएल २:१

समासातील संदर्भ

  • +दान ४:४, ५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ९/१/२००७, पृ. १९

दानीएल २:२

तळटीपा

  • *

    म्हणजे, शकुनविद्या आणि ज्योतिष यांमध्ये कुशल असलेल्यांचा एक गट.

समासातील संदर्भ

  • +दान ४:६, ७; ५:७, ८

दानीएल २:४

तळटीपा

  • *

    दान २:४ख ते ७:२८ हा भाग मुळात ॲरामेईक (अरामी) भाषेत लिहिला होता.

समासातील संदर्भ

  • +२रा १८:२६; एज ४:७; यश ३६:११

दानीएल २:५

तळटीपा

  • *

    किंवा कदाचित, “उकिरडे; विष्ठेच्या टेकड्या.”

दानीएल २:६

समासातील संदर्भ

  • +दान २:४८; ५:१६, २९

दानीएल २:१२

समासातील संदर्भ

  • +दान २:२४

दानीएल २:१५

समासातील संदर्भ

  • +दान २:९

दानीएल २:१६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१/१९८९, पृ. २२-२३

दानीएल २:१९

समासातील संदर्भ

  • +दान २:२८

दानीएल २:२०

तळटीपा

  • *

    किंवा “अनंतकाळापासून अनंतकाळापर्यंत.”

समासातील संदर्भ

  • +१इत २९:११; ईयो १२:१३; स्तो १४७:५; यिर्म ३२:१७-१९

दानीएल २:२१

समासातील संदर्भ

  • +प्रेका १:७
  • +१शमु २:७, ८; स्तो ७५:७; यिर्म २७:५; दान ४:१७
  • +नीत २:६; उप २:२६; याक १:५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ९/१५/१९९८, पृ. १२

दानीएल २:२२

समासातील संदर्भ

  • +यिर्म ३३:३; १कर २:१०
  • +स्तो १३९:१२; इब्री ४:१३
  • +स्तो ३६:९; ११२:४

दानीएल २:२३

समासातील संदर्भ

  • +दान १:१७; २:२८

दानीएल २:२४

समासातील संदर्भ

  • +दान २:१२, १४

दानीएल २:२५

समासातील संदर्भ

  • +दान १:३, ६

दानीएल २:२६

समासातील संदर्भ

  • +दान १:७
  • +उत्प ४१:१५

दानीएल २:२७

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +दान २:१०, ११

दानीएल २:२८

समासातील संदर्भ

  • +उत्प ४०:८; दान १:१७

दानीएल २:३०

समासातील संदर्भ

  • +दान २:४७

दानीएल २:३२

समासातील संदर्भ

  • +दान २:३७, ३८; ७:४
  • +दान ५:२८; ७:५; ८:३, २०
  • +दान २:३९; ७:६; ८:५, २१

दानीएल २:३३

समासातील संदर्भ

  • +दान ७:७, १९
  • +दान २:४०-४२

दानीएल २:३४

समासातील संदर्भ

  • +दान २:४४, ४५

दानीएल २:३५

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

दानीएल २:३७

समासातील संदर्भ

  • +यिर्म २८:१४; दान ५:१८

दानीएल २:३८

समासातील संदर्भ

  • +यिर्म २७:५-७
  • +दान २:३२; ४:२०-२२

दानीएल २:३९

समासातील संदर्भ

  • +यश ४५:१; यिर्म ५१:२८, २९; दान ५:२८
  • +दान ७:६; ८:५, २१; ११:३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ९/१/२००७, पृ. १९

दानीएल २:४०

समासातील संदर्भ

  • +दान २:३३; ७:१९, २३
  • +दान ७:७

दानीएल २:४१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१५/२०१२, पृ. १५-१६

दानीएल २:४२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१५/२०१२, पृ. १६, १९

दानीएल २:४३

तळटीपा

  • *

    किंवा “मानवांच्या वंशजांसोबत,” म्हणजे सामान्य लोक.

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१५/२०१२, पृ. १६, १९

दानीएल २:४४

समासातील संदर्भ

  • +उत्प ४९:१०; स्तो २:६; मत्त ६:१०; लूक २२:२९; योह १८:३६; प्रक ११:१५; २०:६
  • +२शमु ७:१३; यश ९:७; दान ७:१३, १४
  • +दान ४:१७; ७:२७
  • +स्तो २:७-९; ११०:५, ६; प्रक १९:१५
  • +दान ४:३४; लूक १:३१-३३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ३१

    बायबलमधून शिकायला मिळतं, पृ. ८७

    बायबल काय शिकवते, पृ. ८१

    टेहळणी बुरूज,

    ९/१५/२०१२, पृ. ७

    ८/१५/२०१२, पृ. ३०

    ६/१५/२०१२, पृ. १७

    १०/१५/२००१, पृ. ६

    जीवनाचा उद्देश, पृ. २६-२७

    काळजी वाहणारा देव, पृ. २२-२३

दानीएल २:४५

समासातील संदर्भ

  • +दान २:३४, ३५
  • +उत्प ४१:२८; दान २:२८

दानीएल २:४७

समासातील संदर्भ

  • +उत्प ४१:३९; दान १:१७; २:२८; ४:९

दानीएल २:४८

समासातील संदर्भ

  • +दान २:६; ५:१६, २९

दानीएल २:४९

समासातील संदर्भ

  • +दान १:७

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

दानी. २:१दान ४:४, ५
दानी. २:२दान ४:६, ७; ५:७, ८
दानी. २:४२रा १८:२६; एज ४:७; यश ३६:११
दानी. २:६दान २:४८; ५:१६, २९
दानी. २:१२दान २:२४
दानी. २:१५दान २:९
दानी. २:१९दान २:२८
दानी. २:२०१इत २९:११; ईयो १२:१३; स्तो १४७:५; यिर्म ३२:१७-१९
दानी. २:२१प्रेका १:७
दानी. २:२११शमु २:७, ८; स्तो ७५:७; यिर्म २७:५; दान ४:१७
दानी. २:२१नीत २:६; उप २:२६; याक १:५
दानी. २:२२यिर्म ३३:३; १कर २:१०
दानी. २:२२स्तो १३९:१२; इब्री ४:१३
दानी. २:२२स्तो ३६:९; ११२:४
दानी. २:२३दान १:१७; २:२८
दानी. २:२४दान २:१२, १४
दानी. २:२५दान १:३, ६
दानी. २:२६दान १:७
दानी. २:२६उत्प ४१:१५
दानी. २:२७दान २:१०, ११
दानी. २:२८उत्प ४०:८; दान १:१७
दानी. २:३०दान २:४७
दानी. २:३२दान २:३७, ३८; ७:४
दानी. २:३२दान ५:२८; ७:५; ८:३, २०
दानी. २:३२दान २:३९; ७:६; ८:५, २१
दानी. २:३३दान ७:७, १९
दानी. २:३३दान २:४०-४२
दानी. २:३४दान २:४४, ४५
दानी. २:३७यिर्म २८:१४; दान ५:१८
दानी. २:३८यिर्म २७:५-७
दानी. २:३८दान २:३२; ४:२०-२२
दानी. २:३९यश ४५:१; यिर्म ५१:२८, २९; दान ५:२८
दानी. २:३९दान ७:६; ८:५, २१; ११:३
दानी. २:४०दान २:३३; ७:१९, २३
दानी. २:४०दान ७:७
दानी. २:४४उत्प ४९:१०; स्तो २:६; मत्त ६:१०; लूक २२:२९; योह १८:३६; प्रक ११:१५; २०:६
दानी. २:४४२शमु ७:१३; यश ९:७; दान ७:१३, १४
दानी. २:४४दान ४:१७; ७:२७
दानी. २:४४स्तो २:७-९; ११०:५, ६; प्रक १९:१५
दानी. २:४४दान ४:३४; लूक १:३१-३३
दानी. २:४५दान २:३४, ३५
दानी. २:४५उत्प ४१:२८; दान २:२८
दानी. २:४७उत्प ४१:३९; दान १:१७; २:२८; ४:९
दानी. २:४८दान २:६; ५:१६, २९
दानी. २:४९दान १:७
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
  • २७
  • २८
  • २९
  • ३०
  • ३१
  • ३२
  • ३३
  • ३४
  • ३५
  • ३६
  • ३७
  • ३८
  • ३९
  • ४०
  • ४१
  • ४२
  • ४३
  • ४४
  • ४५
  • ४६
  • ४७
  • ४८
  • ४९
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
दानीएल २:१-४९

दानीएल

२ नबुखद्‌नेस्सर राजाला आपल्या शासनकाळाच्या दुसऱ्‍या वर्षात अनेक स्वप्नं पडली. त्या स्वप्नांमुळे तो इतका बेचैन झाला,+ की त्याची झोप उडाली. २ आपण कोणती स्वप्नं पाहिली ती सांगण्यासाठी राजाने जादूगारांना, मंत्रतंत्र करणाऱ्‍या पुजाऱ्‍यांना, शकुन पाहणाऱ्‍यांना आणि खास्दी माणसांना* बोलावून आणण्याची आज्ञा दिली. तेव्हा ते सर्व राजासमोर येऊन उभे राहिले.+ ३ राजा त्यांना म्हणाला: “मला एक स्वप्न पडलंय, आणि त्यामुळे माझं मन खूप अस्वस्थ झालंय. ते स्वप्न काय आहे हे मला जाणून घ्यायचंय.” ४ त्यावर खास्दी माणसं अरामी भाषेत*+ राजाला म्हणाली: “महाराज, युगानुयुग जिवंत राहा! तुमच्या या सेवकांना तुमचं स्वप्न सांगा, म्हणजे आम्ही तुम्हाला त्याचा अर्थ सांगू.”

५ तेव्हा, राजा त्या खास्दी माणसांना म्हणाला: “माझा निर्णय पक्का आहे: तुम्ही जर माझं स्वप्न आणि त्याचा अर्थ मला सांगितला नाही, तर तुमचे तुकडे-तुकडे केले जातील आणि तुमच्या घरादारांना सार्वजनिक शौचालय* बनवलं जाईल. ६ पण तुम्ही माझं स्वप्न आणि त्याचा अर्थ मला सांगितला, तर तुम्हाला माझ्याकडून बक्षिसं, इनाम आणि मोठा मानसन्मान मिळेल.+ तेव्हा आता माझं स्वप्न आणि त्याचा अर्थ मला सांगा.”

७ ते दुसऱ्‍यांदा राजाला म्हणाले: “राजाने आपल्या या सेवकांना आपलं स्वप्न सांगावं, म्हणजे आम्ही त्याचा अर्थ सांगू.”

८ त्यावर राजा म्हणाला: “मला माहीत आहे, तुम्ही जाणूनबुजून वेळ घालवण्याचा प्रयत्न करताय. कारण तुम्हाला कळून चुकलंय, की माझा निर्णय पक्का आहे. ९ तुम्ही जर मला माझं स्वप्न सांगितलं नाही, तर तुमच्या सगळ्यांसाठी एकच शिक्षा ठरलेली आहे. तुम्हाला असं वाटतंय, की माझं मन बदलेपर्यंत मला काहीतरी फसवं आणि खोटंनाटं सांगावं. आता माझं स्वप्न काय ते मला सांगा, म्हणजे मला कळेल की तुम्ही मला त्याचा अर्थही सांगू शकता.”

१० तेव्हा ती खास्दी माणसं राजाला म्हणाली: “राजाने जी मागणी केली आहे ती पृथ्वीवरचा एकही माणूस पूर्ण करू शकत नाही. आजपर्यंत कोणत्याही महान राजाने किंवा राज्यपालाने आपल्या जादूगारांकडून, मंत्रतंत्र करणाऱ्‍या पुजाऱ्‍यांकडून किंवा खास्दी माणसांकडून अशी मागणी केलेली नाही. ११ राजा जी मागणी करतोय ती पूर्ण करणं खूप कठीण आहे. देवांशिवाय दुसरा कोणीही ती पूर्ण करू शकत नाही, आणि देव तर नश्‍वर माणसांमध्ये राहत नाहीत.”

१२ हे ऐकून राजा क्रोधाने पेटून उठला. आणि त्याने बाबेलमधल्या सगळ्या ज्ञानी माणसांना मारून टाकण्याचा हुकूम दिला.+ १३ जेव्हा राजाचं हे फर्मान निघालं आणि सगळ्या ज्ञानी माणसांना मारून टाकलं जाणार होतं, तेव्हा ते दानीएलला आणि त्याच्या सोबत्यांनाही शोधू लागले.

१४ राजाच्या अंगरक्षकांचा प्रमुख अर्योक हा बाबेलच्या ज्ञानी माणसांना मारून टाकायला निघाला होता. त्या वेळी, दानीएल त्याच्याशी हुशारीने आणि समंजसपणे बोलला. १५ त्याने राजाच्या अधिकाऱ्‍याला, अर्योकला विचारलं: “राजाने इतका कठोर हुकूम का बरं दिला?” तेव्हा अर्योकने घडलेला सगळा प्रकार दानीएलला सांगितला.+ १६ म्हणून दानीएल राजाकडे गेला आणि राजाला स्वप्नाचा अर्थ सांगण्यासाठी त्याने त्याच्याकडून थोडा वेळ मागून घेतला.

१७ मग दानीएल आपल्या घरी गेला आणि त्याने हनन्या, मीशाएल आणि अजऱ्‍या या आपल्या सोबत्यांना सगळी हकिगत सांगितली. १८ स्वर्गाच्या देवाने आपल्यावर दया करावी आणि हे रहस्य आपल्याला उलगडून सांगावं, यासाठी दानीएलने त्यांना प्रार्थना करायला सांगितली. म्हणजे बाबेलमधल्या बाकीच्या ज्ञानी माणसांसोबत दानीएलला आणि त्याच्या सोबत्यांना मारून टाकलं जाणार नाही.

१९ मग रात्री एका दृष्टान्तात दानीएलला त्या रहस्याचा उलगडा झाला.+ तेव्हा त्याने स्वर्गाच्या देवाची स्तुती केली. २० तो म्हणाला:

“देवाच्या नावाची सर्वकाळ* स्तुती होवो,

कारण बुद्धी आणि सामर्थ्य फक्‍त त्याचंच आहे.+

२१ तो काळ आणि समय बदलतो,+

तो राजांना राजासनावर बसवतो आणि त्यांना राजासनावरून काढूनही टाकतो,+

तो सुज्ञांना बुद्धी आणि समंजसांना ज्ञान देतो.+

२२ तो गूढ आणि रहस्यमय गोष्टी प्रकट करतो,+

काळोखात काय आहे हे त्याला माहीत आहे,+

आणि प्रकाश त्याच्यासोबत वस्ती करतो.+

२३ हे माझ्या पूर्वजांच्या देवा, मी तुझे आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो,

कारण तू मला बुद्धी आणि सामर्थ्य दिलंस.

आम्ही तुझ्याकडे जे मागितलं, ते तू मला दिलंस;

राजाला चिंतित करणारी गोष्ट तू आम्हाला कळवलीस.”+

२४ मग बाबेलमधल्या ज्ञानी माणसांना मारून टाकायला राजाने ज्याला नेमलं होतं त्याच्याकडे, म्हणजे अर्योककडे दानीएल गेला+ आणि म्हणाला: “बाबेलमधल्या कोणत्याही ज्ञानी माणसाला मारून टाकू नकोस. मला राजाकडे घेऊन चल. स्वप्नाचा अर्थ मी राजाला सांगीन.”

२५ तेव्हा, अर्योक दानीएलला लगेच राजासमोर घेऊन गेला आणि राजाला म्हणाला: “यहूदातल्या बंदिवानांमध्ये मला एक माणूस सापडलाय.+ तो राजाला स्वप्नाचा अर्थ सांगू शकतो.” २६ त्यावर राजाने बेल्टशस्सर म्हटलेल्या दानीएलला विचारलं:+ “मी पाहिलेलं स्वप्न आणि त्याचा अर्थ तू खरंच मला सांगू शकतोस का?”+ २७ तेव्हा दानीएल राजाला म्हणाला: “राजाने जे रहस्य विचारलंय ते ज्ञानी पुरुष, जादूगार, ज्योतिषी* किंवा मंत्रतंत्र करणारे पुजारी यांच्यापैकी कोणीही सांगू शकत नाही.+ २८ पण स्वर्गात असा एक देव आहे जो रहस्यांचा उलगडा करू शकतो.+ आणि शेवटच्या काळात काय घडेल हे त्यानेच नबुखद्‌नेस्सर राजाला प्रकट केलंय. तुम्ही पाहिलेलं स्वप्न आणि तुम्ही बिछान्यावर पडलेले असताना पाहिलेले दृष्टान्त हे आहेत:

२९ हे राजा! तुम्ही आपल्या बिछान्यावर झोपला होता, तेव्हा येणाऱ्‍या काळात काय घडेल याबद्दल तुम्ही विचार करू लागलात. आणि रहस्यं प्रकट करणाऱ्‍याने पुढे काय घडणार आहे ते तुम्हाला कळवलंय. ३० माझ्याविषयी म्हणाल, तर मी काही इतर माणसांपेक्षा फार बुद्धिमान आहे म्हणून मला हे रहस्य प्रकट करण्यात आलंय असं नाही. तर तुम्हाला तुमच्या स्वप्नाचा अर्थ सांगावा, आणि तुम्ही मनात काय विचार करत होता ते तुम्हाला कळावं, म्हणून ते रहस्य मला प्रकट करण्यात आलंय.+

३१ हे राजा! तुम्हाला स्वप्नात एक अतिशय मोठा पुतळा दिसला. भव्य आणि तेजस्वी असलेला तो पुतळा तुमच्यासमोर उभा होता आणि त्याचं स्वरूप फार भयानक होतं. ३२ त्या पुतळ्याचं डोकं शुद्ध सोन्याचं,+ त्याची छाती आणि हात चांदीचे,+ त्याचं पोट आणि मांड्या तांब्याच्या,+ ३३ त्याचे पाय लोखंडाचे+ आणि त्याच्या पावलांचा काही भाग लोखंडाचा, तर काही भाग मातीचा होता.+ ३४ तुम्ही तो पुतळा पाहत होता, तेव्हा एक दगड कोणाचाही हात न लागता डोंगरातून निसटला, आणि पुतळ्याच्या लोखंडी व मातीच्या पावलांवर येऊन आदळला आणि त्याने त्यांचा चुराडा केला.+ ३५ तेव्हा लोखंड, माती, तांबं, चांदी आणि सोनं या सगळ्यांचा चुराडा झाला; ते उन्हाळ्याच्या दिवसांत खळ्यात* पडलेल्या धान्याच्या भुशासारखे झाले. वाऱ्‍याने ते उधळले गेले आणि त्यांचा लवलेशही उरला नाही. पण पुतळ्यावर आदळणारा तो दगड एक मोठा डोंगर बनला आणि त्याने संपूर्ण पृथ्वी व्यापून टाकली.

३६ राजाने पाहिलेलं स्वप्न हेच आहे. आता त्याचा अर्थ आम्ही तुम्हाला सांगतो. ३७ हे राजा, तुम्ही राजांचे राजे आहात! स्वर्गाच्या देवाने तुम्हाला राज्य,+ सामर्थ्य, ताकद आणि वैभव दिलंय. ३८ त्याने तुमच्या हाती मानवांना दिलंय; मग ते कुठेही राहत असोत. तसंच, त्याने रानातली जनावरं आणि आकाशातले पक्षीही तुमच्या हाती दिलेत; आणि या सर्वांवर त्याने तुम्हाला अधिकारी बनवलंय.+ त्या पुतळ्याचं सोन्याचं डोकं तुम्हीच आहात.+

३९ पण तुमच्यानंतर दुसरं एक राज्य येईल;+ ते तुमच्यापेक्षा कमी दर्जाचं असेल. मग आणखी एक राज्य, म्हणजे तिसरं राज्य येईल. ते तांब्याचं असेल आणि संपूर्ण पृथ्वीवर त्याची सत्ता असेल.+

४० मग जे चौथं राज्य येईल ते लोखंडासारखं मजबूत असेल.+ लोखंड जसं सगळ्या गोष्टींचा चुराडा करून त्यांचा भुगा-भुगा करून टाकतं; हो, लोखंड जसं सगळ्या गोष्टींचे तुकडे-तुकडे करून टाकतं, तसं ते राज्य त्याच्या आधीच्या सगळ्या राज्यांचा चुराडा करून त्यांचा पूर्णपणे नाश करेल.+

४१ आणि तुम्ही पाहिलंत, की पुतळ्याच्या पावलांचा काही भाग लोखंडाचा, तर काही भाग मातीचा होता. अगदी तसंच ते राज्य विभागलेलं असेल. पण जसं लोखंड मऊ मातीत मिसळलेलं तुम्ही पाहिलंत, तसंच त्या राज्यात लोखंडासारखी थोडीफार मजबुती असेल. ४२ आणि ज्याप्रमाणे पुतळ्याच्या पावलांच्या बोटांचा काही भाग लोखंडाचा आणि काही भाग मातीचा होता, तसंच ते राज्य थोडंफार मजबूत आणि थोडंफार कमजोर असेल. ४३ जसं लोखंड मऊ मातीत मिसळलेलं तुम्ही पाहिलंत, तसंच त्या राज्याचा मजबूत भाग लोकांसोबत* मिसळेल; पण जसं लोखंड आणि माती एकजीव होत नाहीत, तसंच ते एकजीव होणार नाहीत.

४४ त्या राजांच्या दिवसांत, स्वर्गाचा देव एक असं राज्य स्थापन करेल+ ज्याचा कधीही नाश होणार नाही.+ ते राज्य दुसऱ्‍या कोणाच्याही हाती जाणार नाही.+ तर ते या सगळ्या राज्यांचा चुराडा करून त्यांचा नाश करेल,+ आणि फक्‍त तेच कायम टिकेल.+ ४५ हे अगदी तसंच होईल जसं तुम्ही पाहिलं होतं. तुम्ही पाहिलं होतं, की एक दगड कोणाचाही हात न लागता डोंगरातून निसटला. आणि त्याने लोखंड, तांबं, माती, चांदी आणि सोनं या सगळ्यांचा चुराडा केला.+ हे राजा! भविष्यात काय घडेल हे महान देवाने तुम्हाला कळवलंय.+ हे स्वप्न खरं आहे आणि त्याचा अर्थ भरवशालायक आहे.”

४६ तेव्हा नबुखद्‌नेस्सर राजाने जमिनीवर पडून दानीएलला दंडवत घातला आणि त्याचा सन्मान केला. तसंच, दानीएलला भेटवस्तू देण्याची आणि त्याच्यासाठी धूप जाळण्याची आज्ञाही त्याने दिली. ४७ मग राजा दानीएलला म्हणाला: “खरंच, तुझा देव हा देवांचा देव आणि राजांचा प्रभू आहे. तुला हे रहस्य प्रकट करता आलं, कारण तुझा देव रहस्य प्रकट करणारा आहे.”+ ४८ नंतर राजाने दानीएलला उच्च पद आणि अनेक भेटवस्तू दिल्या. त्याने त्याला बाबेलच्या संपूर्ण प्रांताचा शासक+ आणि बाबेलच्या सर्व ज्ञानी माणसांवर मुख्य प्रशासकीय अधिकारी म्हणून नेमलं. ४९ दानीएलच्या विनंतीवरून राजाने शद्रख, मेशख आणि अबेद्‌नगो+ यांना बाबेलच्या प्रांताची व्यवस्था पाहण्यासाठी नेमलं. दानीएल मात्र राजदरबारात सेवा करत राहिला.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा