वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • फिलेमोन
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

फिलेमोन रूपरेषा

    • नमस्कार (१-३)

    • फिलेमोनचं प्रेम आणि विश्‍वास (४-७)

    • पौल अनेसिमसाठी विनंती करतो (८-२२)

    • पत्राच्या शेवटी नमस्कार (२३-२५)

फिलेमोन १

समासातील संदर्भ

  • +इफि ४:१
  • +प्रेका १६:१, २; इब्री १३:२३

फिलेमोन २

समासातील संदर्भ

  • +कल ४:१७
  • +रोम १६:५; १कर १६:१९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१५/२००८, पृ. ३१

फिलेमोन ४

समासातील संदर्भ

  • +इफि १:१५, १६; १थेस १:२

फिलेमोन ५

तळटीपा

  • *

    किंवा “यांच्याबद्दल.”

फिलेमोन ७

तळटीपा

  • *

    शब्दशः “आतड्यांना,” मनातल्या गहिऱ्‍या भावनांना सूचित करतं.

फिलेमोन ९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१५/१९९९, पृ. २९

फिलेमोन १०

तळटीपा

  • *

    शब्दशः “बंधनांत.”

समासातील संदर्भ

  • +१कर ४:१५
  • +कल ४:९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१५/१९९८, पृ. ३०

फिलेमोन ११

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१५/२००८, पृ. ३१

    १/१५/१९९८, पृ. ३०

फिलेमोन १३

समासातील संदर्भ

  • +इफि ६:१९, २०; फिलि १:७

फिलेमोन १४

समासातील संदर्भ

  • +२कर ९:७

फिलेमोन १५

तळटीपा

  • *

    शब्दशः “तासभर.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१५/२००८, पृ. ३१

    ४/१/१९९१, पृ. ११

फिलेमोन १६

समासातील संदर्भ

  • +१कर ७:२२
  • +१ती ६:२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१५/२००८, पृ. ३१

    ४/१/१९९१, पृ. ११

फिलेमोन १७

तळटीपा

  • *

    शब्दशः “भागीदार.”

फिलेमोन १८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१५/१९९८, पृ. २९-३०

फिलेमोन २०

तळटीपा

  • *

    वचन ७ ची तळटीप पाहा.

फिलेमोन २१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१५/२००८, पृ. ३१

    १/१५/१९९८, पृ. ३१

फिलेमोन २२

तळटीपा

  • *

    किंवा “तुमच्यासाठी माझी सुटका होईल.”

समासातील संदर्भ

  • +फिलि २:२४

फिलेमोन २३

समासातील संदर्भ

  • +कल १:७; ४:१२, १३

फिलेमोन २४

समासातील संदर्भ

  • +प्रेका १९:२९; २७:२; कल ४:१०
  • +२ती ४:१०
  • +कल ४:१४

फिलेमोन २५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१५/२०१२, पृ. १२-१३

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

फिले. १इफि ४:१
फिले. १प्रेका १६:१, २; इब्री १३:२३
फिले. २कल ४:१७
फिले. २रोम १६:५; १कर १६:१९
फिले. ४इफि १:१५, १६; १थेस १:२
फिले. १०१कर ४:१५
फिले. १०कल ४:९
फिले. १३इफि ६:१९, २०; फिलि १:७
फिले. १४२कर ९:७
फिले. १६१ती ६:२
फिले. १६१कर ७:२२
फिले. २२फिलि २:२४
फिले. २३कल १:७; ४:१२, १३
फिले. २४प्रेका १९:२९; २७:२; कल ४:१०
फिले. २४२ती ४:१०
फिले. २४कल ४:१४
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र यात वाचा
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
फिलेमोन १-२५

फिलेमोन याला पत्र

१ ख्रिस्त येशूसाठी तुरुंगात कैदी असलेला पौल+ आणि आपला भाऊ तीमथ्य यांच्याकडून,+ आमचा प्रिय सहकारी फिलेमोन २ आणि आमची बहीण अफ्फिया, आमच्या सोबतचा सैनिक अर्खिप्प,+ तसंच तुझ्या घरात भेटणारी मंडळी+ या सगळ्यांना:

३ देव जो आपला पिता आणि येशू ख्रिस्त जो आपला प्रभू यांच्याकडून तुम्हा सर्वांना अपार कृपा आणि शांती मिळो.

४ माझ्या प्रार्थनांमध्ये मी जेव्हा जेव्हा तुझा उल्लेख करतो, तेव्हा तेव्हा मी माझ्या देवाचे उपकार मानतो.+ ५ कारण तुझ्या विश्‍वासाबद्दल, तसंच प्रभू येशू ख्रिस्त आणि सर्व पवित्र जन यांच्यासाठी* असलेल्या तुझ्या प्रेमाबद्दल, मला नेहमीच ऐकायला मिळतं. ६ तुझा आणि तुझ्या बांधवांचा जो विश्‍वास आहे, त्यामुळे ख्रिस्ताद्वारे आपल्याला मिळालेल्या सर्व आशीर्वादांची तुला जाणीव व्हावी, अशी मी प्रार्थना करतो. ७ कारण तू दाखवत असलेल्या प्रेमाबद्दल जेव्हा मी ऐकलं, तेव्हा मला खूप आनंद झाला आणि सांत्वन मिळालं. माझ्या भावा, तुझ्याद्वारे पवित्र जनांच्या मनाला* बळ मिळालं आहे.

८ याच कारणामुळे, मला ख्रिस्ताचा प्रेषित या नात्याने, तू योग्य ते करावं असा आदेश देण्याचा अधिकार आहे. ९ तरी मी तुला प्रेमाच्या आधारावर विनंती करायचं जास्त पसंत करीन. कारण मी, पौल, एक वडीलधारा माणूस आहे आणि आता तर ख्रिस्त येशूसाठी तुरुंगात कैदीही आहे. १० मी ज्याचा तुरुंगात* असताना विश्‍वासात वडील बनलो,+ त्या माझ्या लेकरासाठी, अनेसिमसाठी+ मी तुला विनंती करत आहे. ११ तो पूर्वी तुझ्यासाठी निरुपयोगी होता, पण आता तो तुझ्यासाठी आणि माझ्यासाठीही उपयोगी आहे. १२ मी त्याला, हो, माझ्या काळजाच्या तुकड्याला तुझ्याकडे परत पाठवत आहे.

१३ आनंदाच्या संदेशासाठी मला झालेल्या या कैदेदरम्यान, माझी सेवा करण्यासाठी तुझ्या जागी त्याला ठेवून घ्यायला खरंतर मला आवडलं असतं.+ १४ पण, मला तुझ्या परवानगीशिवाय काहीही करायची इच्छा नाही. कारण, हे चांगलं काम तू बळजबरीने नाही, तर तुझ्या स्वतःच्या इच्छेने करावं, असं मला वाटलं.+ १५ कदाचित यासाठीच तो काही काळ* तुझ्यापासून दुरावला असेल, की तो कायमचा तुला परत मिळावा; १६ यापुढे एक दास म्हणून नाही,+ तर दासापेक्षाही जास्त, एक प्रिय भाऊ म्हणून. माझ्यासाठी तर तो एक प्रिय भाऊ आहेच,+ पण माझ्यापेक्षाही तो तुझ्यासाठी आणखी जास्त प्रिय असा भाऊ आहे. कारण तो तुझा दासच नाही तर प्रभूच्या सेवेत तुझा सहकारीसुद्धा आहे. १७ तेव्हा, जर तू मला आपला मित्र* समजत असशील, तर जितक्या प्रेमाने तू माझं स्वागत केलं असतं, तितक्याच प्रेमाने त्याचंही स्वागत कर. १८ शिवाय, जर त्याने तुझं काही नुकसान केलं असेल, किंवा जर त्याच्यावर तुझं काही कर्ज असेल, तर ते माझ्या हिशोबात जोड. १९ मी, पौल, स्वतःच्या हाताने हे लिहीत आहे: मी त्याची परतफेड करीन. अर्थात, तू तर आपल्या जीवनासाठीही माझा ऋणी आहेस, हे वेगळं सांगायला नको. २० तेव्हा, माझ्या भावा, प्रभूच्या सेवेत माझी एवढी मदत कर. ख्रिस्ताचा शिष्य या नात्याने माझ्या मनाला* बळ दे.

२१ तू माझ्या सांगण्याप्रमाणे वागशील याची मला खातरी आहे, म्हणूनच मी तुला लिहीत आहे. कारण मी जे सांगितलं त्यापेक्षाही तू जास्त करशील हे मला माहीत आहे. २२ पण त्यासोबतच, माझ्या मुक्कामासाठी तयारी करून ठेव. कारण तुमच्या प्रार्थनांप्रमाणे मी तुमच्याकडे परत येईन* अशी आशा मी बाळगतो.+

२३ ख्रिस्तासोबत ऐक्यात असलेला माझा सोबतीचा कैदी एपफ्रास+ तुला नमस्कार सांगतो. २४ तसंच मार्क, अरिस्तार्ख,+ देमास+ आणि लूक+ हे माझे सहकारीसुद्धा तुला नमस्कार सांगतात.

२५ तू दाखवत असलेल्या चांगल्या वृत्तीमुळे, तुझ्यावर प्रभू येशू ख्रिस्ताची अपार कृपा असो.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा