वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • जखऱ्‍या ८
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

जखऱ्‍या रूपरेषा

      • यहोवा सीयोनमध्ये खरेपणा आणि शांती आणतो (१-२३)

        • यरुशलेम “खरेपणाचं शहर” (३)

        • “एकमेकांसोबत खरं बोला” (१६)

        • उपासाचे दिवस सणाचे दिवस होतील (१८, १९)

        • ‘चला आपण यहोवाची सेवा करू’ (२१)

        • दहा माणसं एका यहुदी माणसाच्या झग्याचा काठ घट्ट धरतील (२३)

जखऱ्‍या ८:२

समासातील संदर्भ

  • +योए २:१८; जख १:१४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    नवे जग भाषांतर, पृ. २५५१-२५५२

    टेहळणी बुरूज,

    १/१/१९९६, पृ. १०-११

जखऱ्‍या ८:३

तळटीपा

  • *

    किंवा “विश्‍वासूपणाचं.”

समासातील संदर्भ

  • +जख १:१६
  • +यश १२:६; योए ३:१७; जख २:११; ८:८
  • +यश १:२६; ६०:१४; यिर्म ३३:१६
  • +यश २:२; ११:९; ६६:२०; यिर्म ३१:२३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१/२००७, पृ. १४

    १/१/१९९६, पृ. १०-११

जखऱ्‍या ८:४

समासातील संदर्भ

  • +यश ६५:२०; यिर्म ३०:१०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१/१९९६, पृ. ११-१६

जखऱ्‍या ८:५

समासातील संदर्भ

  • +यिर्म ३०:१९; ३१:४, २७; जख २:४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१/१९९६, पृ. ११, १६

जखऱ्‍या ८:६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१/१९९६, पृ. १६-१७

जखऱ्‍या ८:७

समासातील संदर्भ

  • +स्तो १०७:२, ३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१/१९९६, पृ. १७

जखऱ्‍या ८:८

तळटीपा

  • *

    किंवा “विश्‍वासाने.”

समासातील संदर्भ

  • +यिर्म ३:१७; योए ३:२०; आम ९:१४
  • +लेवी २६:१२; यिर्म ३०:२२; यहे ११:२०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१/१९९६, पृ. १७

जखऱ्‍या ८:९

तळटीपा

  • *

    किंवा “आपले हात बळकट करा.”

समासातील संदर्भ

  • +एज ५:१
  • +यश ३५:४; हाग २:४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१/१९९६, पृ. १८-१९

जखऱ्‍या ८:१०

समासातील संदर्भ

  • +हाग १:६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१/१९९६, पृ. १८-१९

जखऱ्‍या ८:११

समासातील संदर्भ

  • +हाग २:१९

जखऱ्‍या ८:१२

समासातील संदर्भ

  • +लेवी २६:४; अनु २८:४; यश ३०:२३
  • +यश ३५:१०; ६१:७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१/२००६, पृ. १३-१४

    १/१/१९९६, पृ. १९-२०

जखऱ्‍या ८:१३

तळटीपा

  • *

    किंवा “आपले हात बळकट करा.”

समासातील संदर्भ

  • +अनु २८:३७; यिर्म ४२:१८
  • +उत्प २२:१८; यश १९:२४, २५
  • +यश ४१:१०
  • +यश ३५:४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१/१९९६, पृ. १९

जखऱ्‍या ८:१४

तळटीपा

  • *

    किंवा “त्याचा मला पस्तावा झाला नव्हता.”

समासातील संदर्भ

  • +यिर्म ४:२८; यहे २४:१४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१/१९९६, पृ. २०

जखऱ्‍या ८:१५

समासातील संदर्भ

  • +यिर्म ३१:२८; ३२:४२
  • +यश ४३:१; सफ ३:१६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१/१९९६, पृ. २०

जखऱ्‍या ८:१६

समासातील संदर्भ

  • +लेवी १९:११; नीत १२:१९; इफि ४:२५
  • +जख ७:९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ३६

    टेहळणी बुरूज,

    १/१/१९९६, पृ. २०

जखऱ्‍या ८:१७

समासातील संदर्भ

  • +जख ७:१०
  • +जख ५:४
  • +नीत ६:१६-१९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१/१९९६, पृ. २०

जखऱ्‍या ८:१९

समासातील संदर्भ

  • +२रा २५:२५; यिर्म ५२:४, ६, ७, १२-१४; जख ७:५
  • +यश ३५:१०; यिर्म ३१:१२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१/१९९६, पृ. २०-२१

जखऱ्‍या ८:२०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१/१९९६, पृ. २१-२२

जखऱ्‍या ८:२१

समासातील संदर्भ

  • +यिर्म ५०:४, ५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१/१९९६, पृ. २१-२२

जखऱ्‍या ८:२२

समासातील संदर्भ

  • +स्तो २२:२७; यश २:२, ३; ११:१०; ५५:५; ६०:३; होशे १:१०; मीख ४:२; हाग २:७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१/१९९६, पृ. २१-२२

जखऱ्‍या ८:२३

समासातील संदर्भ

  • +जख २:११; प्रक ७:९; १४:६
  • +निर्ग १२:३७, ३८
  • +यश ४५:१४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १/२०२२, पृ. २२

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १/२०२०, पृ. २६

    शुद्ध उपासना, पृ. ११९, १३४-१३५

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १/२०१६, पृ. २२-२३

    टेहळणी बुरूज,

    ११/१५/२०१४, पृ. २७

    २/१५/२००९, पृ. २७

    १२/१/२००५, पृ. २३-२४

    ७/१/२००५, पृ. २४

    ७/१/२००४, पृ. ११-१२

    १/१/१९९६, पृ. २२

    ३/१/१९८८, पृ. १८, २०

    प्रकटीकरण कळस, पृ. ६०-६१

    उपासनेतील ऐक्य, पृ. ११६

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

जख. ८:२योए २:१८; जख १:१४
जख. ८:३जख १:१६
जख. ८:३यश १२:६; योए ३:१७; जख २:११; ८:८
जख. ८:३यश १:२६; ६०:१४; यिर्म ३३:१६
जख. ८:३यश २:२; ११:९; ६६:२०; यिर्म ३१:२३
जख. ८:४यश ६५:२०; यिर्म ३०:१०
जख. ८:५यिर्म ३०:१९; ३१:४, २७; जख २:४
जख. ८:७स्तो १०७:२, ३
जख. ८:८यिर्म ३:१७; योए ३:२०; आम ९:१४
जख. ८:८लेवी २६:१२; यिर्म ३०:२२; यहे ११:२०
जख. ८:९एज ५:१
जख. ८:९यश ३५:४; हाग २:४
जख. ८:१०हाग १:६
जख. ८:११हाग २:१९
जख. ८:१२लेवी २६:४; अनु २८:४; यश ३०:२३
जख. ८:१२यश ३५:१०; ६१:७
जख. ८:१३अनु २८:३७; यिर्म ४२:१८
जख. ८:१३उत्प २२:१८; यश १९:२४, २५
जख. ८:१३यश ४१:१०
जख. ८:१३यश ३५:४
जख. ८:१४यिर्म ४:२८; यहे २४:१४
जख. ८:१५यिर्म ३१:२८; ३२:४२
जख. ८:१५यश ४३:१; सफ ३:१६
जख. ८:१६लेवी १९:११; नीत १२:१९; इफि ४:२५
जख. ८:१६जख ७:९
जख. ८:१७जख ७:१०
जख. ८:१७जख ५:४
जख. ८:१७नीत ६:१६-१९
जख. ८:१९२रा २५:२५; यिर्म ५२:४, ६, ७, १२-१४; जख ७:५
जख. ८:१९यश ३५:१०; यिर्म ३१:१२
जख. ८:२१यिर्म ५०:४, ५
जख. ८:२२स्तो २२:२७; यश २:२, ३; ११:१०; ५५:५; ६०:३; होशे १:१०; मीख ४:२; हाग २:७
जख. ८:२३जख २:११; प्रक ७:९; १४:६
जख. ८:२३निर्ग १२:३७, ३८
जख. ८:२३यश ४५:१४
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
जखऱ्‍या ८:१-२३

जखऱ्‍या

८ सैन्यांचा देव यहोवा याच्याकडून मला पुन्हा एकदा असा संदेश मिळाला: २ “सैन्यांचा देव यहोवा असं म्हणतो, ‘मी मोठ्या आवेशाने सीयोनचा बचाव करीन,+ आणि क्रोधित होऊन मी तिचं रक्षण करीन.’”

३ “यहोवा म्हणतो: ‘मी सीयोनकडे परत येईन+ आणि यरुशलेममध्ये राहीन.+ यरुशलेम खरेपणाचं* शहर म्हणून ओळखलं जाईल,+ आणि सैन्यांचा देव यहोवा याच्या पर्वताला पवित्र पर्वत म्हटलं जाईल.’”+

४ “सैन्यांचा देव यहोवा म्हणतो, ‘यरुशलेमच्या चौकाचौकांत वृद्ध स्त्री-पुरुष पुन्हा बसतील. आपल्या आयुष्याची बरीच वर्षं जगल्यामुळे, ते हातात काठी घेऊन बसतील.+ ५ आणि शहरातले चौक तिथे खेळणाऱ्‍या मुला-मुलींनी गजबजून जातील.’”+

६ “सैन्यांचा देव यहोवा म्हणतो, ‘त्या दिवसांत, या लोकांपैकी उरलेल्यांना जरी ही गोष्ट अशक्य वाटली, तरी ती माझ्यासाठी अशक्य असेल का?’ असं सैन्यांचा देव यहोवा म्हणतो.”

७ “सैन्यांचा देव यहोवा म्हणतो, ‘मी माझ्या लोकांना पूर्वेकडच्या आणि पश्‍चिमेकडच्या राष्ट्रांतून सोडवून आणीन.+ ८ मी त्यांना यरुशलेममध्ये आणीन आणि ते तिथे वस्ती करतील.+ ते माझे लोक होतील आणि खरेपणाने* व नीतीने वागणारा मी त्यांचा देव होईन.’”+

९ “सैन्यांचा देव यहोवा म्हणतो, ‘संदेष्टे+ सांगत आहेत त्या गोष्टी ऐकणाऱ्‍या लोकांनो! तुम्ही हिंमत धरा!*+ या गोष्टी, सैन्यांचा देव यहोवा याच्या मंदिराचा पाया घालण्यात आला, त्या दिवशीही सांगण्यात आल्या होत्या. १० याआधी माणसांना किंवा जनावरांना त्यांच्या कामाची मजुरी दिली जात नव्हती.+ आणि शत्रूंमुळे प्रवास करणं धोकादायक झालं होतं. कारण मी सगळ्या माणसांना एकमेकांच्या विरुद्ध केलं होतं.’

११ ‘पण आता, मी पूर्वी जसा वागलो तसा या उरलेल्या लोकांसोबत वागणार नाही,’+ असं सैन्यांचा देव यहोवा म्हणतो. १२ ‘कारण शांतीचं बी पेरलं जाईल आणि द्राक्षवेल आपलं फळ देईल; पृथ्वी आपलं उत्पन्‍न देईल+ आणि आकाशातून दव पडेल. या सगळ्या गोष्टी मी उरलेल्या लोकांना वारसा म्हणून देईन.+ १३ हे यहूदाच्या आणि इस्राएलच्या घराण्या! राष्ट्रं तुमची नावं शाप देताना वापरायची.+ पण मी तुम्हाला वाचवीन आणि यापुढे ती राष्ट्रं तुमची नावं आशीर्वाद देताना वापरतील.+ तुम्ही घाबरू नका!+ हिंमत धरा!’*+

१४ कारण सैन्यांचा देव यहोवा म्हणतो, ‘“तुमच्या वाडवडिलांनी मला क्रोध आणल्यामुळे मी तुमच्यावर संकट आणण्याचा पक्का निश्‍चय केला होता, आणि त्या बाबतीत मी माझा विचारही बदलला नव्हता,”* असं सैन्यांचा देव यहोवा म्हणतो.+ १५ “तसंच, आता मी यरुशलेमसाठी आणि यहूदाच्या घराण्यासाठी चांगलं करण्याचा पक्का निश्‍चय केलाय.+ म्हणून तुम्ही घाबरू नका!”’+

१६ ‘तुम्ही या गोष्टी करा: एकमेकांसोबत खरं बोला+ आणि आपल्या शहराच्या दरवाजांत खरेपणाने न्याय करा; असा न्याय करा ज्यामुळे शांती निर्माण होईल.+ १७ आपल्या मनात एखाद्याचं वाईट करण्याचं कटकारस्थान रचू नका+ आणि खोट्या शपथेची आवड धरू नका.+ कारण या सगळ्या गोष्टींचा मला तिरस्कार आहे,’+ असं यहोवा म्हणतो.”

१८ सैन्यांचा देव यहोवा याच्याकडून मला पुन्हा असा संदेश मिळाला: १९ “सैन्यांचा देव यहोवा असं म्हणतो, ‘चौथ्या, पाचव्या, सातव्या आणि दहाव्या महिन्यांतले उपासांचे दिवस,+ यहूदाच्या घराण्यासाठी आनंदाचे आणि हर्षाचे दिवस होतील; ते आनंदोत्सवाने सण साजरा करण्याचे दिवस होतील.+ म्हणून खरेपणाची आणि शांतीची आवड धरा.’

२० सैन्यांचा देव यहोवा असं म्हणतो, ‘पुढे असं होईल, की राष्ट्रा-राष्ट्रांतले आणि पुष्कळ शहरांतले लोक येतील; २१ आणि एका शहरातले लोक दुसऱ्‍या शहरातल्या लोकांकडे जाऊन त्यांना म्हणतील: “चला, आपण लवकर जाऊ! आणि यहोवाकडून दयेची भीक मागू आणि सैन्यांचा देव यहोवा याची सेवा करू. आम्हीसुद्धा चाललोय.”+ २२ तेव्हा, मोठमोठी राष्ट्रं आणि राष्ट्रा-राष्ट्रांतले लोक यरुशलेममध्ये सैन्यांचा देव यहोवा याची सेवा करायला आणि यहोवाकडे दयेची भीक मागायला येतील.’+

२३ सैन्यांचा देव यहोवा असं म्हणतो, ‘त्या दिवसांत, वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्‍या सर्व राष्ट्रांमधून+ दहा माणसं एका यहुदी माणसाच्या झग्याचा काठ घट्ट धरतील आणि म्हणतील: “आम्हालाही तुमच्याबरोबर यायचंय.+ कारण आम्ही ऐकलंय, की देव तुमच्यासोबत आहे.”’”+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा