यशया
६५ “ज्यांनी कधी मला विचारलं नाही, त्यांना मी भेटलो;
ज्यांनी मला कधी शोधलं नाही, त्यांना मी सापडलो.+
ज्या राष्ट्राने कधी माझं नाव घेऊन मला हाक मारली नाही,
त्यांना मी म्हणालो, ‘मी इथे आहे!’+
२ मी दिवसभर या हट्टी लोकांसमोर आपले हात पसरले;+
वाईट मार्गांवर चालणाऱ्या+ आणि मनाला येईल तसं वागणाऱ्या+ या लोकांपुढे मी माझे हात पसरले;
३ ते आपल्या बागांमध्ये अर्पणं देऊन+ आणि विटांवर बलिदानांचं हवन करून,
सतत माझ्या तोंडावर माझा अपमान करतात.+
५ ते म्हणतात, ‘तिथेच थांब; जवळ येऊ नकोस,
मी तुझ्यापेक्षा जास्त पवित्र आहे.’*
हे लोक माझ्या नाकात धुरासारखे आहेत; दिवसभर जळत राहणाऱ्या आगीसारखे आहेत.
६ पाहा! या सगळ्या गोष्टी माझ्यासमोर लिहिलेल्या आहेत;
मी गप्प बसणार नाही.
मी त्यांची परतफेड करीन,+
त्यांच्या कामांचा पूर्ण मोबदला मी त्यांना देईन.”
७ यहोवा म्हणतो, “मी त्यांच्या आणि त्यांच्या वाडवडिलांच्या अपराधांचा+ पूर्ण मोबदला त्यांना देईन.
त्यांनी डोंगरांवर बलिदानांचं हवन केलं,
आणि टेकड्यांवर माझा अपमान केला,+
म्हणून सगळ्यात आधी मी त्यांना त्यांची पूर्ण मजुरी मोजून देईन.”
८ यहोवा म्हणतो:
“द्राक्षांच्या घडात जेव्हा नवीन द्राक्षारस देणारी फळं दिसतात,
तेव्हा लोक म्हणतात, ‘तो द्राक्षांचा घड फेकून देऊ नका, कारण त्यात काही चांगली द्राक्षंही आहेत,’
मी माझ्या सेवकांच्या बाबतीतही तसंच करीन.
मी त्या सगळ्यांचाच नाश करणार नाही.+
९ मी याकोबमधून एक संतती* उत्पन्न करीन,
माझ्या डोंगरांसाठी मी यहूदामधून एक वारसदार उत्पन्न करीन;+
माझे निवडलेले लोक देशाचा ताबा घेतील,
आणि माझे सेवक तिथे राहतील.+
१० माझा शोध करणाऱ्या लोकांकरता,
शारोन+ हे त्यांच्या मेंढरांसाठी कुरण बनेल,
आणि अखोरचं खोरं*+ त्यांच्या गुराढोरांसाठी विसावा घ्यायचं ठिकाण होईल.
११ पण तुम्ही यहोवाला सोडून देणाऱ्या लोकांपैकी आहात,+
तुम्ही माझा पवित्र डोंगर विसरून जाणाऱ्या लोकांपैकी आहात.+
तुम्ही भाग्य दैवतासाठी मेज तयार करता,
आणि नशीबाच्या दैवतासाठी प्याल्यांत द्राक्षारस ओतता.
कारण मी तुम्हाला बोलावलं, पण तुम्ही उत्तर दिलं नाही,
मी तुमच्याशी बोललो, पण तुम्ही माझं ऐकलं नाही;+
माझ्या नजरेत जे वाईट, तेच तुम्ही करत राहिला,
आणि मला जे आवडत नाही, तेच तुम्ही निवडलं.”+
१३ म्हणून सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो:
“पाहा! माझे सेवक पोटभर खातील, पण तुम्ही उपाशीच राहाल.+
पाहा! माझे सेवक आपली तहान भागवतील,+ पण तुम्ही तहानलेलेच राहाल.
पाहा! माझे सेवक आनंद साजरा करतील,+ पण तुम्ही मात्र लज्जित व्हाल.+
१४ पाहा! माझ्या सेवकांचं मन आनंदी असल्यामुळे ते मोठ्याने जयघोष करतील.
पण तुमचं मन दुःखी असल्यामुळे,
तुम्ही मोठ्याने रडाल आणि निराशेमुळे आक्रोश कराल.
१५ तुम्ही असं नाव कमवाल, की माझे निवडलेले लोक ते शाप द्यायला वापरतील.
सर्वोच्च प्रभू यहोवा तुमच्यापैकी प्रत्येकाला ठार मारेल,
पण आपल्या सेवकांना तो दुसऱ्या नावाने हाक मारेल.+
१६ म्हणून पृथ्वीवरचा जो कोणी आशीर्वाद मिळवण्याचा प्रयत्न करेल,
त्याला खऱ्या* देवाकडून आशीर्वाद मिळेल.
कारण पूर्वीचं दुःख आठवणीत राहणार नाही,
ते माझ्या नजरेआड केलं जाईल.+
१७ कारण पाहा! मी नवीन आकाश आणि नवीन पृथ्वी बनवतोय;+
जुन्या गोष्टी कोणालाही आठवणार नाहीत,
आणि पुन्हा कधीच त्या कोणाच्या मनात येणार नाहीत.+
१८ म्हणून मी आता जे निर्माण करतोय, त्यामुळे जल्लोष करा आणि सर्वकाळ आनंदी राहा.
पाहा! मी यरुशलेमला आणि तिच्यातल्या लोकांना असं निर्माण करतोय, की
तिच्यामुळे लोक हर्ष करतील,
आणि तिच्या रहिवाशांमुळे लोक आनंदी होतील.+
१९ यरुशलेममुळे मला आनंद होईल आणि माझ्या लोकांमुळे मी हर्षित होईन;+
पुन्हा कधीच तिच्यात शोक करायचा किंवा रडायचा आवाज ऐकू येणार नाही.”+
२० “तिच्यात पुन्हा कधीच असं बाळ जन्माला येणार नाही, जे फक्त काही दिवस जगेल.
किंवा जो पूर्ण आयुष्य जगला नाही असा एकही वृद्ध माणूस तिच्यात नसेल.
एखादा माणूस शंभर वर्षं जगून मेला, तरी तो तरुणपणातच मेला असं म्हटलं जाईल.
आणि पाप करणारा माणूस शंभर वर्षांचा जरी असला, तरी शापामुळे तो मरेल.*
२२ त्यांनी बांधलेल्या घरांत दुसरे येऊन राहतील, असं कधीही होणार नाही.
आणि त्यांनी लावलेल्या द्राक्षमळ्यांचं फळ दुसरे खातील, असं कधीही होणार नाही.
कारण माझ्या लोकांचं आयुष्य झाडांच्या आयुष्याएवढं होईल,+
आणि माझे निवडलेले लोक जे काही काम करतील, त्यापासून त्यांना खूप आनंद मिळेल.
कारण ते आणि त्यांची मुलं यहोवाने आशीर्वादित केलेली संतती* असेल.+
२४ ते हाक मारायच्या आधीच मी त्यांना उत्तर देईन;
ते बोलत आहेत तोच मी त्यांचं ऐकेन.
माझ्या संपूर्ण पवित्र डोंगरावर ते कोणालाही त्रास देणार नाहीत किंवा कुठलंही नुकसान करणार नाहीत,”+ असं यहोवा म्हणतो.