यशया
राष्ट्रांना त्याच्या अधीन करण्यासाठी,+
राजांच्या हातून सत्ता काढून घेण्यासाठी,
त्याच्यासमोर शहराची दारं उघडण्यासाठी,
आणि फाटकं खुली ठेवण्यासाठी,
मी यहोवाने त्याचा उजवा हात धरला आहे.+
मी त्याला असं म्हणतो:
आणि टेकड्या सपाट करीन.
तांब्याच्या दरवाजांचे मी तुकडे-तुकडे करीन,
आणि त्यांचे लोखंडी अडसर मोडून टाकीन.+
म्हणजे मी यहोवा आहे हे तुला कळेल;
तुला तुझ्या नावाने बोलावणारा मी इस्राएलचा देव आहे, हे तुला समजेल.+
४ माझा सेवक याकोब आणि माझा निवडलेला इस्राएल यांच्यासाठी,
मी तुला तुझ्या नावाने हाक मारतोय.
तू मला ओळखत नसलास, तरी मी तुझं नाव मोठं करतोय.
५ मी यहोवा आहे, आणि माझ्याशिवाय दुसरा कोणीही नाही.
मला सोडून दुसरा देव नाही.+
तू मला ओळखत नसलास, तरी मी तुला बळ देईन;
६ म्हणजे पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत सर्व लोकांना हे कळेल, की
माझ्याशिवाय दुसरा कोणीही नाही.+
मी यहोवा आहे, आणि मला सोडून दुसरा कोणी देव नाही.+
हे पृथ्वी, जागी हो आणि तारणाचं व नीतिमत्त्वाचं भरपूर फळ दे.+
मी, यहोवा यानेच हे निर्माण केलंय.”
९ जो आपल्या निर्माणकर्त्याशी वाद घालतो, त्याचा धिक्कार असो!
कारण तो जमिनीवर पडलेल्या खापरांमधला* फक्त एक लहानसा तुकडा आहे.
मातीचा गोळा आपल्याला घडवणाऱ्या कुंभाराला कधी विचारेल का: “हे तू काय बनवतोस?”+
किंवा बनवलेली वस्तू बनवणाऱ्याला कधी म्हणेल का: “तुला हातच नाहीत.”*
१० जो कोणी वडिलाला म्हणतो: “तू कोणाचा वडील बनला आहेस?”
आणि स्त्रीला विचारतो: “तू कोणाला जन्म देत आहेस?” त्याचा धिक्कार असो.
११ इस्राएलला घडवणारा पवित्र देव यहोवा+ असं म्हणतो:
“पुढे होणाऱ्या गोष्टींबद्दल तुम्ही मला प्रश्न विचारावा का?
माझ्या मुलांच्या+ आणि माझ्या कामांच्या बाबतीत मी काय करावं, याची आज्ञा तुम्ही मला द्यावी का?
१२ मी पृथ्वी बनवली+ आणि त्यावर माणसाला घडवलं.+
१३ सैन्यांचा देव यहोवा म्हणतो:
“माझ्या नीतिमत्त्वामुळे मी एका माणसाला प्रवृत्त केलंय.+
मी त्याचे सगळे मार्ग सरळ करीन.
१४ यहोवा म्हणतो: “इजिप्तचा नफा* आणि इथियोपियाचा व्यापार;* तसंच सबाची सगळी धिप्पाड माणसं,
तुझ्याकडे येतील आणि ते तुझे होतील.
ते बेड्या घातलेल्या स्थितीत तुझ्या मागे चालतील.
ते तुझ्याकडे येतील आणि तुला नमन करून म्हणतील,+
‘खरंच, देव तुझ्यासोबत आहे+ आणि त्याला सोडून दुसरा देव नाही; कोणीच नाही.’”
१५ हे तारणकर्त्या,+ इस्राएलच्या देवा,
खरंच तू स्वतःला गुप्त ठेवणारा देव आहेस.
१६ त्या सर्वांना लज्जित आणि अपमानित केलं जाईल;
मूर्ती बनवणारे बदनाम होऊन निघून जातील.+
१७ पण हे इस्राएल, यहोवा तुला वाचवेल आणि तुझा सर्वकाळासाठी उद्धार करेल.+
तू कायमसाठी लज्जित आणि बदनाम होणार नाहीस.+
१८ कारण, ज्या खऱ्या देवाने आकाश निर्माण केलं,+
ज्याने पृथ्वी घडवली, तिला बनवलं आणि तिला स्थिर केलं,+
ज्याने पृथ्वी विनाकारण* बनवली नाही, तर तिच्यावर लोकांनी राहावं म्हणून तिला घडवलं,+ तो यहोवा असं म्हणतो:
“मी यहोवा आहे, आणि माझ्याशिवाय दुसरा कोणी देव नाही.
१९ मी जे काही बोललो ते गुप्त ठिकाणी,+ अंधाराच्या प्रदेशात बोललो नाही;
‘तुम्ही मला शोधा, पण तुमची मेहनत व्यर्थ जाईल,’ असं मी याकोबच्या संततीला* कधीच म्हणालो नाही.
मी यहोवा आहे. मी नेहमी योग्य तेच* बोलतो आणि खरं तेच जाहीर करतो.+
२० राष्ट्रांतून पळून आलेल्या लोकांनो, एकत्र जमा आणि या;+
तुम्ही सर्व मिळून माझ्याकडे या.
जे कोरीव मूर्ती घेऊन फिरतात,
आणि वाचवू न शकणाऱ्या दैवतांना प्रार्थना करतात, त्यांना काहीएक समजत नाही.+
२१ तुमचा खटला पुढे आणा, तुमची बाजू मांडा.
एकत्र येऊन सल्लामसलत करा.
पूर्वीपासून हे कोणी सांगितलं?
आणि प्राचीन काळापासून हे कोणी जाहीर केलं?
मी यहोवानेच हे केलं नाही का?
माझ्याशिवाय दुसरा कोणी देव नाही;
माझ्याशिवाय दुसरा कोणी नीतिमान देव आणि तारणकर्ता नाही.+
२२ पृथ्वीवर राहणाऱ्या सर्वांनो,
माझ्याकडे वळा आणि आपला जीव वाचवा.+
कारण मी देव आहे, मला सोडून दुसरा कोणी नाही.+
माझ्यापुढे प्रत्येक जण गुडघा टेकेल,
आणि प्रत्येक जीभ मला एकनिष्ठ राहण्याची शपथ वाहून+
२४ असं म्हणेल, ‘यहोवाच फक्त नीतिमान आणि शक्तिशाली देव आहे.
त्याच्यावर संतापलेले सर्व जण लज्जित होऊन त्याच्यासमोर येतील.