वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • निर्गम १२
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

निर्गम रूपरेषा

      • वल्हांडणाची सुरुवात (१-२८)

        • दाराच्या चौकटींवर रक्‍त लावण्याची आज्ञा (७)

      • दहावी पीडा: प्रथमपुत्राला ठार मारलं जातं (२९-३२)

      • इस्राएली लोक इजिप्तमधून बाहेर निघतात (३३-४२)

        • ४३० वर्षं संपतात (४०, ४१)

      • वल्हांडणात भाग घेण्यासाठी सूचना (४३-५१)

निर्गम १२:२

समासातील संदर्भ

  • +निर्ग १३:४; २३:१५; गण २८:१६; अनु १६:१

निर्गम १२:३

तळटीपा

  • *

    म्हणजे, दरवर्षी या महिन्याच्या दहाव्या दिवशी.

समासातील संदर्भ

  • +योह १:२९; १कर ५:७; प्रक ५:६

निर्गम १२:४

तळटीपा

  • *

    किंवा “जिवांना.”

निर्गम १२:५

समासातील संदर्भ

  • +लेवी २२:१८-२०; अनु १७:१; १पेत्र १:१९

निर्गम १२:६

तळटीपा

  • *

    किंवा “संधिप्रकाशाच्या वेळी.” शब्दशः “दोन संध्याकाळींच्या मधे.”

समासातील संदर्भ

  • +गण २८:१६
  • +निर्ग १२:१८; लेवी २३:५; अनु १६:६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१५/२०१४, पृ. २२

    १२/१५/२०१३, पृ. १८-१९

    २/१/१९९१, पृ. २४

निर्गम १२:७

समासातील संदर्भ

  • +१कर ५:७; इब्री ११:२८

निर्गम १२:८

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +निर्ग १३:३; ३४:२५; अनु १६:३; १कर ५:८
  • +गण ९:११; अनु १६:६, ७

निर्गम १२:९

तळटीपा

  • *

    यामध्ये आतड्या, हृदय, यकृत, गुरदे आणि शरीरातल्या इतर भागांचा समावेश होता.

निर्गम १२:१०

समासातील संदर्भ

  • +लेवी ७:१५; २२:२९, ३०; अनु १६:४

निर्गम १२:११

तळटीपा

  • *

    शब्दशः “कंबर कसून.”

  • *

    या शब्दाचा अर्थ “ओलांडणं” असा होतो. शब्दार्थसूची पाहा.

निर्गम १२:१२

समासातील संदर्भ

  • +निर्ग ११:४, ५; १२:२९
  • +गण ३३:४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सभा पुस्तिकेसाठी संदर्भ, ७/२०२०, पृ. ४-५

निर्गम १२:१३

समासातील संदर्भ

  • +निर्ग ८:२२; ९:४, २६; १०:२३; ११:७

निर्गम १२:१४

तळटीपा

  • *

    किंवा “स्मारक.”

निर्गम १२:१५

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

  • *

    किंवा “जीव.”

  • *

    किंवा “ठार मारलं जावं.”

समासातील संदर्भ

  • +निर्ग २३:१५; लेवी २३:६

निर्गम १२:१६

तळटीपा

  • *

    किंवा “प्रत्येक जिवाला.”

समासातील संदर्भ

  • +लेवी २३:८

निर्गम १२:१७

तळटीपा

  • *

    शब्दशः “सैन्यं.”

समासातील संदर्भ

  • +लेवी २३:६; लूक २२:१; १कर ५:८

निर्गम १२:१८

समासातील संदर्भ

  • +लेवी २३:५, ६

निर्गम १२:१९

तळटीपा

  • *

    किंवा “त्या जिवाचा.”

  • *

    किंवा “ठार मारलं जावं.”

समासातील संदर्भ

  • +गण ९:१४
  • +अनु १६:३; १कर ५:७

निर्गम १२:२१

तळटीपा

  • *

    म्हणजे, मेंढीची किंवा बकरीची पिल्लं.

समासातील संदर्भ

  • +निर्ग ३:१६; गण ११:१६

निर्गम १२:२२

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

निर्गम १२:२३

तळटीपा

  • *

    शब्दशः “नाश.”

समासातील संदर्भ

  • +इब्री ११:२८

निर्गम १२:२४

समासातील संदर्भ

  • +अनु १६:३

निर्गम १२:२५

समासातील संदर्भ

  • +यहो ५:१०

निर्गम १२:२६

समासातील संदर्भ

  • +निर्ग १३:३, ८; अनु ६:६, ७

निर्गम १२:२८

समासातील संदर्भ

  • +इब्री ११:२८

निर्गम १२:२९

तळटीपा

  • *

    शब्दशः “कुंडाचं घर.”

समासातील संदर्भ

  • +उत्प १५:१४; निर्ग ११:४, ५; गण ३:१३; ३३:४; स्तो ७८:५१; १०५:३६; १३५:८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ३/१५/२००४, पृ. २५-२६

निर्गम १२:३०

समासातील संदर्भ

  • +निर्ग ११:६

निर्गम १२:३१

समासातील संदर्भ

  • +निर्ग १०:२८, २९
  • +निर्ग ३:१९, २०; ६:१; १०:८-११; स्तो १०५:३८

निर्गम १२:३२

समासातील संदर्भ

  • +निर्ग १०:२६

निर्गम १२:३३

समासातील संदर्भ

  • +निर्ग १२:११
  • +निर्ग १०:७

निर्गम १२:३४

तळटीपा

  • *

    किंवा “भांड्यांसोबत.”

निर्गम १२:३५

समासातील संदर्भ

  • +उत्प १५:१४; निर्ग ३:२१; ११:२; स्तो १०५:३७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१/१९९९, पृ. ३०

निर्गम १२:३६

समासातील संदर्भ

  • +निर्ग ३:२२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ३/१५/२००४, पृ. २६

    ११/१/१९९९, पृ. ३०

    १२/१/१९९४, पृ. १३

निर्गम १२:३७

समासातील संदर्भ

  • +उत्प ४७:११; निर्ग १:११
  • +गण ३३:५
  • +उत्प १२:१, २; १५:१, ५; ४६:२, ३; निर्ग १:७; गण २:३२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१/१९९०, पृ. १३

निर्गम १२:३८

तळटीपा

  • *

    म्हणजे, मुळात इस्राएली नसलेल्या विदेश्‍यांचा समूह, ज्यात इजिप्तचे लोकही होते.

समासातील संदर्भ

  • +गण ११:४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१५/२०१४, पृ. २०

    ७/१/१९९२, पृ. २२

    ५/१/१९९०, पृ. १३

    ८/१/१९८६, पृ. २२, २४

निर्गम १२:३९

समासातील संदर्भ

  • +निर्ग १२:३१

निर्गम १२:४०

समासातील संदर्भ

  • +उत्प ४६:२, ३; ४७:२७; प्रेका १३:१७; गल ३:१७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ३/१५/२००४, पृ. २६

निर्गम १२:४१

तळटीपा

  • *

    शब्दशः “सैन्यं.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ७/२०१६, पृ. १४

निर्गम १२:४२

समासातील संदर्भ

  • +अनु १६:१

निर्गम १२:४३

समासातील संदर्भ

  • +लेवी २२:१०

निर्गम १२:४४

समासातील संदर्भ

  • +उत्प १७:१२, २३

निर्गम १२:४६

समासातील संदर्भ

  • +गण ९:१२; स्तो ३४:१९, २०; योह १९:३३, ३६

निर्गम १२:४८

समासातील संदर्भ

  • +गण ९:१४

निर्गम १२:४९

समासातील संदर्भ

  • +लेवी २४:२२; गण १५:१६

निर्गम १२:५१

तळटीपा

  • *

    शब्दशः “सैन्यं.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१/१९९०, पृ. १३

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

निर्ग. १२:२निर्ग १३:४; २३:१५; गण २८:१६; अनु १६:१
निर्ग. १२:३योह १:२९; १कर ५:७; प्रक ५:६
निर्ग. १२:५लेवी २२:१८-२०; अनु १७:१; १पेत्र १:१९
निर्ग. १२:६गण २८:१६
निर्ग. १२:६निर्ग १२:१८; लेवी २३:५; अनु १६:६
निर्ग. १२:७१कर ५:७; इब्री ११:२८
निर्ग. १२:८निर्ग १३:३; ३४:२५; अनु १६:३; १कर ५:८
निर्ग. १२:८गण ९:११; अनु १६:६, ७
निर्ग. १२:१०लेवी ७:१५; २२:२९, ३०; अनु १६:४
निर्ग. १२:१२निर्ग ११:४, ५; १२:२९
निर्ग. १२:१२गण ३३:४
निर्ग. १२:१३निर्ग ८:२२; ९:४, २६; १०:२३; ११:७
निर्ग. १२:१५निर्ग २३:१५; लेवी २३:६
निर्ग. १२:१६लेवी २३:८
निर्ग. १२:१७लेवी २३:६; लूक २२:१; १कर ५:८
निर्ग. १२:१८लेवी २३:५, ६
निर्ग. १२:१९गण ९:१४
निर्ग. १२:१९अनु १६:३; १कर ५:७
निर्ग. १२:२१निर्ग ३:१६; गण ११:१६
निर्ग. १२:२३इब्री ११:२८
निर्ग. १२:२४अनु १६:३
निर्ग. १२:२५यहो ५:१०
निर्ग. १२:२६निर्ग १३:३, ८; अनु ६:६, ७
निर्ग. १२:२८इब्री ११:२८
निर्ग. १२:२९उत्प १५:१४; निर्ग ११:४, ५; गण ३:१३; ३३:४; स्तो ७८:५१; १०५:३६; १३५:८
निर्ग. १२:३०निर्ग ११:६
निर्ग. १२:३१निर्ग १०:२८, २९
निर्ग. १२:३१निर्ग ३:१९, २०; ६:१; १०:८-११; स्तो १०५:३८
निर्ग. १२:३२निर्ग १०:२६
निर्ग. १२:३३निर्ग १२:११
निर्ग. १२:३३निर्ग १०:७
निर्ग. १२:३५उत्प १५:१४; निर्ग ३:२१; ११:२; स्तो १०५:३७
निर्ग. १२:३६निर्ग ३:२२
निर्ग. १२:३७उत्प ४७:११; निर्ग १:११
निर्ग. १२:३७गण ३३:५
निर्ग. १२:३७उत्प १२:१, २; १५:१, ५; ४६:२, ३; निर्ग १:७; गण २:३२
निर्ग. १२:३८गण ११:४
निर्ग. १२:३९निर्ग १२:३१
निर्ग. १२:४०उत्प ४६:२, ३; ४७:२७; प्रेका १३:१७; गल ३:१७
निर्ग. १२:४२अनु १६:१
निर्ग. १२:४३लेवी २२:१०
निर्ग. १२:४४उत्प १७:१२, २३
निर्ग. १२:४६गण ९:१२; स्तो ३४:१९, २०; योह १९:३३, ३६
निर्ग. १२:४८गण ९:१४
निर्ग. १२:४९लेवी २४:२२; गण १५:१६
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
  • २७
  • २८
  • २९
  • ३०
  • ३१
  • ३२
  • ३३
  • ३४
  • ३५
  • ३६
  • ३७
  • ३८
  • ३९
  • ४०
  • ४१
  • ४२
  • ४३
  • ४४
  • ४५
  • ४६
  • ४७
  • ४८
  • ४९
  • ५०
  • ५१
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
निर्गम १२:१-५१

निर्गम

१२ मग यहोवा इजिप्त देशात मोशे आणि अहरोन यांना म्हणाला: २ “हा महिना तुमच्यासाठी पहिला महिना असेल. तुमचं वर्ष या महिन्याने सुरू होईल.+ ३ इस्राएलच्या सर्व लोकांना सांगा, ‘या महिन्याच्या दहाव्या दिवशी,* त्यांच्यापैकी प्रत्येकाने आपापल्या वडिलांच्या घराण्याप्रमाणे, एका घरासाठी एक मेंढरू घ्यावं.+ ४ पण पूर्ण मेंढरू खाता येईल इतके लोक घराण्यात नसले, तर त्याने आणि त्याच्या शेजाऱ्‍याने त्यांच्या घरातल्या लोकांच्या हिशोबाने ते आपसात वाटावं. एक मेंढरू किती लोकांना* पुरेल याचा हिशोब त्यांनी करावा. ५ तुमचं मेंढरू एक वर्षाचा नर असावा आणि त्यात कोणताही दोष नसावा.+ तुम्ही मेंढरांपैकी किंवा बकऱ्‍यांपैकी एखादं पिल्लू निवडू शकता. ६ या महिन्याच्या १४ व्या दिवसापर्यंत+ त्याचा सांभाळ करा. मग संध्याकाळी* इस्राएलच्या मंडळीतल्या सर्व लोकांनी त्याला कापावं.+ ७ ज्या घरात ते जेवणार आहेत त्या घराच्या दाराच्या चौकटीवर डाव्या, उजव्या आणि वरच्या बाजूला त्यांनी त्याचं थोडं रक्‍त लावावं.+

८ त्यांनी त्याच रात्री त्याचं मांस आगीवर भाजून, बेखमीर* भाकरी+ आणि कडू हिरव्या भाज्यांसोबत खावं.+ ९ त्याचं मांस कच्चं किंवा उकळून खाऊ नका, तर त्याला डोकं, पाय आणि आतड्यांसोबत* आगीवर भाजावं. १० त्यातलं काहीही सकाळपर्यंत ठेवू नका, पण काही उरलंच तर ते आगीत जाळून टाका.+ ११ ते खाताना तुमचे कमरबंद बांधलेले असावेत,* पायात जोडे आणि हातात काठी असावी. तुम्ही ते घाईघाईने खावं. हे यहोवाचं वल्हांडण* आहे. १२ कारण त्या रात्री मी इजिप्तमधून जाईन आणि माणसांतल्या व जनावरांतल्या प्रथम जन्मलेल्यांना ठार मारीन.+ मी इजिप्तच्या सर्व देवांवर न्यायदंड आणीन.+ मी यहोवा आहे. १३ तुम्ही राहत असलेल्या घरांवर लावलेलं रक्‍त तुमच्यासाठी चिन्ह ठरेल. मी इजिप्तचा नाश करायला येईन, तेव्हा ते रक्‍त पाहून मी तुमचं घर ओलांडून जाईन आणि त्या पीडेने तुमचा नाश होणार नाही.+

१४ हा दिवस तुमच्यासाठी एक आठवण* असेल आणि तुम्ही पिढ्या न्‌ पिढ्या यहोवासाठी हा सण साजरा करा. हा सण साजरा करण्याचा नियम तुम्ही कायम पाळला पाहिजे. १५ सात दिवस तुम्ही बेखमीर भाकरी खाव्यात.+ पहिल्या दिवशी तुम्ही तुमच्या घरांतून खमीर* काढून टाकावं. पहिल्या दिवसापासून सातव्या दिवसापर्यंत जो कोणी* खमीर असलेलं काही खाईल, त्याचा इस्राएलमधून नाश केला जावा.* १६ पहिल्या आणि सातव्या दिवशी पवित्र मेळावा ठेवा. या दोन्ही दिवशी कोणतंही काम करू नका.+ फक्‍त प्रत्येकाला* जितकं खायला लागेल तितकंच बनवा.

१७ तुम्ही बेखमीर भाकरींचा सण साजरा केला पाहिजे,+ कारण याच दिवशी मी तुमच्या समूहांना* इजिप्त देशातून बाहेर आणीन. तुम्ही हा दिवस पिढ्या न्‌ पिढ्या कायमचा नियम म्हणून पाळा. १८ पहिल्या महिन्याच्या १४ व्या दिवसाच्या संध्याकाळपासून ते २१ व्या दिवसाच्या संध्याकाळपर्यंत तुम्ही बेखमीर भाकरी खाव्यात.+ १९ त्या सात दिवसांपर्यंत तुमच्या घरांमध्ये खमीर नसावं. कारण जो कोणी खमीर असलेलं काही खाईल, मग तो देशाचा रहिवासी असो किंवा विदेशी,+ त्याचा* इस्राएलच्या लोकांमधून नाश केला जावा.*+ २० खमीर असलेलं काहीही खाऊ नका. तुम्ही सर्वांनी आपल्या घरांमध्ये बेखमीर भाकरी खाव्यात.’”

२१ तेव्हा मोशेने लगेच इस्राएलच्या सर्व वडीलजनांना+ बोलावलं आणि तो त्यांना म्हणाला: “जा आणि आपापल्या कुटुंबासाठी कळपातली पिल्लं* निवडा, आणि ती वल्हांडणाच्या बलिदानासाठी कापा. २२ त्यानंतर तुम्ही एजोबच्या* फांद्या रक्‍तात बुडवून, ते रक्‍त दाराच्या चौकटीवर डाव्या, उजव्या आणि वरच्या बाजूला लावा. तुमच्यापैकी कोणीही सकाळपर्यंत आपल्या घराबाहेर जाऊ नका. २३ मग जेव्हा इजिप्तच्या लोकांवर पीडा आणण्यासाठी यहोवा तिथून जाईल आणि तो दारांच्या चौकटीवर डाव्या, उजव्या आणि वरच्या बाजूला लावलेलं रक्‍त पाहील, तेव्हा यहोवा ते दार ओलांडून जाईल आणि तो मृत्यूची पीडा* तुमच्या घरांमध्ये येऊ देणार नाही.+

२४ हा विधी तुम्ही तुमच्यासाठी आणि तुमच्या मुलांसाठी कायमचा नियम म्हणून पाळा.+ २५ यहोवाने वचन दिलेल्या देशात तुम्ही जाल, तेव्हा तुम्ही हा विधी पाळला पाहिजे.+ २६ आणि, ‘हा विधी तुम्ही का करता?’ असं जेव्हा तुमची मुलं तुम्हाला विचारतील,+ २७ तेव्हा तुम्ही असं म्हणा, ‘हे यहोवासाठी वल्हांडणाचं बलिदान आहे. जेव्हा त्याने इजिप्तच्या लोकांवर पीडा आणली, तेव्हा तो इजिप्तमध्ये असलेल्या इस्राएली लोकांची घरं ओलांडून गेला आणि ती सुरक्षित राहिली.’”

तेव्हा लोक खाली वाकले आणि त्यांनी जमिनीवर डोकं टेकवून नमन केलं. २८ मग इस्राएली लोकांनी जाऊन, यहोवाने मोशे आणि अहरोन यांना आज्ञा दिल्याप्रमाणे केलं.+ त्यांनी अगदी तसंच केलं.

२९ नंतर, मध्यरात्री यहोवाने इजिप्त देशातल्या सगळ्या प्रथम जन्मलेल्यांना, म्हणजे राजासनावर बसलेल्या फारोपासून ते तुरुंगातल्या* कैद्याच्या; तसंच प्राण्यांच्या सर्व प्रथम जन्मलेल्यांना ठार मारलं.+ ३० त्या रात्री फारो, त्याचे सर्व सेवक आणि इजिप्तचे सगळे लोक उठले, तेव्हा त्यांच्यात भयंकर हाहाकार माजला. कारण असं एकही घर उरलं नव्हतं, ज्यात कोणाचा मृत्यू झाला नव्हता.+ ३१ त्याच रात्री फारोने ताबडतोब मोशे आणि अहरोन यांना बोलावलं+ आणि तो म्हणाला: “उठा, तुम्ही आणि बाकीचे सर्व इस्राएली लोक माझ्या लोकांमधून निघून जा. चालते व्हा! तुम्ही म्हणाला होता तशी यहोवाची उपासना करा+ ३२ आणि तुमची मेंढरं आणि गुरंढोरंही घेऊन जा.+ पण तुमच्या देवाला मला आशीर्वाद द्यायला सांगा.”

३३ तेव्हा इस्राएली लोकांनी लवकरात लवकर देश सोडून जावा, अशी इजिप्तचे लोक त्यांना विनवणी करू लागले.+ ते म्हणाले, “तुम्ही गेला नाहीत, तर आम्ही सगळे मरून जाऊ!”+ ३४ मग इस्राएली लोकांनी मळलेलं पीठ, खमीर घालण्याआधीच परातींसोबत* कपड्यांमध्ये बांधून खांद्यावर घेतलं. ३५ मोशेने सांगितल्याप्रमाणे, इस्राएली लोकांनी इजिप्तच्या लोकांकडून सोन्याचांदीचे दागदागिने आणि कपडे मागून घेतले.+ ३६ यहोवाने इजिप्तच्या लोकांना इस्राएली लोकांवर कृपा करायला लावली. म्हणून त्यांनी त्यांच्याकडून जे काही मागितलं, ते सर्व त्यांनी दिलं. अशा रितीने त्यांनी इजिप्तच्या लोकांना लुटलं.+

३७ मग इस्राएली लोक रामसेस+ इथून सुक्कोथला+ जायला निघाले. एकूण ६,००,००० पुरुष पायी निघाले. शिवाय त्यांच्यासोबत मुलंही होती.+ ३८ त्यांच्यासोबत विदेश्‍यांचा एक मोठा समूहसुद्धा*+ निघाला. तसंच मेंढरं, गुरंढोरं अशी बरीच जनावरंही त्यांच्यासोबत होती. ३९ मग ते इजिप्तमधून सोबत आणलेल्या पिठापासून बेखमीर भाकरी बनवू लागले. ते पीठ फुगलं नव्हतं कारण इजिप्तमधून त्यांना अचानक घालवून देण्यात आल्यामुळे, त्यांना काहीच तयारी करता आली नाही.+

४० इस्राएली लोक इजिप्तमध्ये ४३० वर्षं राहिले होते.+ ४१ ही ४३० वर्षं संपली त्याच दिवशी यहोवाच्या लोकांचे सगळे समूह* इजिप्त देशातून बाहेर निघाले. ४२ यहोवाने त्यांना इजिप्तमधून बाहेर आणलं म्हणून त्यांनी या रात्री हा सण साजरा करावा. पिढ्या न्‌ पिढ्या त्यांनी यहोवासाठी या रात्री हा विधी पाळावा.+

४३ मग यहोवाने मोशे आणि अहरोन यांना म्हटलं: “हा वल्हांडणाचा नियम आहे: कोणीही विदेशी वल्हांडणाचं जेवण जेवू शकत नाही.+ ४४ जर एखाद्याकडे पैशाने विकत घेतलेला दास असेल, तर त्याने आधी त्याची सुंता करावी.+ त्यानंतरच तो दास ते जेवण जेवू शकतो. ४५ तुमच्यामध्ये राहायला आलेला परका माणूस आणि मजूर ते जेवू शकत नाही. ४६ तुम्ही एकाच घरात ते जेवलं पाहिजे. मांस घरातून बाहेर घेऊन जाऊ नका आणि त्यातलं एकही हाड मोडू नका.+ ४७ इस्राएलच्या सर्व लोकांनी हा सण साजरा करावा. ४८ जर तुमच्यात राहणाऱ्‍या एखाद्या विदेश्‍याला यहोवासाठी वल्हांडणाचा सण साजरा करायचा असेल, तर त्याच्या घरातल्या प्रत्येक पुरुषाची सुंता झाली पाहिजे. त्यानंतरच तो देशातल्या रहिवाशासारखा होऊन हा सण साजरा करू शकतो. पण सुंता न झालेला कोणीही पुरुष ते जेवण जेवू शकत नाही.+ ४९ देशातला रहिवासी आणि तुमच्यामध्ये राहणारा विदेशी, या दोघांसाठी एकच नियम असेल.”+

५० मग सगळ्या इस्राएली लोकांनी, यहोवाने मोशे आणि अहरोन यांना आज्ञा दिल्याप्रमाणे केलं. त्यांनी अगदी तसंच केलं. ५१ याच दिवशी यहोवाने इस्राएली लोकांना आणि त्यांच्या समूहांना* इजिप्त देशातून बाहेर आणलं.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा