वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • निर्गम ५
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

निर्गम रूपरेषा

      • मोशे आणि अहरोन फारोसमोर (१-५)

      • छळ वाढतो (६-१८)

      • इस्राएली लोक मोशे आणि अहरोन यांना दोष देतात (१९-२३)

निर्गम ५:२

समासातील संदर्भ

  • +निर्ग ७:५; ९:१५, १६
  • +२रा १८:२८, ३५
  • +निर्ग ३:१९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सभा पुस्तिकेसाठी संदर्भ, ६/२०२०, पृ. ३-४

    टेहळणी बुरूज,

    ७/१/१९९३, पृ. ३-५

    ३/१/१९८९, पृ. २९

निर्गम ५:३

समासातील संदर्भ

  • +निर्ग ३:१८

निर्गम ५:४

तळटीपा

  • *

    किंवा “मजुरीकामाला.”

समासातील संदर्भ

  • +निर्ग १:११

निर्गम ५:६

तळटीपा

  • *

    किंवा “जुलूम करणाऱ्‍यांना; लोकांकडून बळजबरीने काम करून घेणाऱ्‍यांना.”

  • *

    यांना इस्राएली लोकांमधून निवडलं जायचं.

निर्गम ५:७

समासातील संदर्भ

  • +निर्ग १:१४

निर्गम ५:१०

समासातील संदर्भ

  • +निर्ग १:११

निर्गम ५:१२

तळटीपा

  • *

    शब्दशः “गवताऐवजी पेंढा.”

निर्गम ५:१४

समासातील संदर्भ

  • +निर्ग २:११

निर्गम ५:१७

समासातील संदर्भ

  • +निर्ग ५:७, ८
  • +निर्ग ५:३

निर्गम ५:२१

समासातील संदर्भ

  • +निर्ग ६:९

निर्गम ५:२३

समासातील संदर्भ

  • +निर्ग ५:१
  • +निर्ग ५:६, ९
  • +निर्ग ३:८

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

निर्ग. ५:२निर्ग ७:५; ९:१५, १६
निर्ग. ५:२२रा १८:२८, ३५
निर्ग. ५:२निर्ग ३:१९
निर्ग. ५:३निर्ग ३:१८
निर्ग. ५:४निर्ग १:११
निर्ग. ५:७निर्ग १:१४
निर्ग. ५:१०निर्ग १:११
निर्ग. ५:१४निर्ग २:११
निर्ग. ५:१७निर्ग ५:७, ८
निर्ग. ५:१७निर्ग ५:३
निर्ग. ५:२१निर्ग ६:९
निर्ग. ५:२३निर्ग ५:१
निर्ग. ५:२३निर्ग ५:६, ९
निर्ग. ५:२३निर्ग ३:८
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
निर्गम ५:१-२३

निर्गम

५ मग मोशे आणि अहरोन फारोकडे जाऊन त्याला म्हणाले: “इस्राएलचा देव यहोवा म्हणतो, ‘माझ्या लोकांनी ओसाड रानात माझ्यासाठी सण साजरा करावा, म्हणून त्यांना जाऊ दे.’” २ पण फारो म्हणाला: “हा यहोवा कोण आहे,+ की त्याचं ऐकून मी इस्राएलला जाऊ द्यावं?+ मी यहोवाला अजिबात ओळखत नाही, आणि मी इस्राएलला मुळीच जाऊ देणार नाही.”+ ३ पण ते म्हणाले: “इब्री लोकांचा देव आमच्याशी बोललाय. म्हणून, कृपा करा आणि आम्हाला तीन दिवसांचा प्रवास करून ओसाड रानात आमचा देव यहोवा याला बलिदान अर्पण करायला जाऊ द्या.+ नाहीतर, तो रोगराईने किंवा तलवारीने आम्हाला शिक्षा देईल.” ४ यावर इजिप्तचा राजा त्यांना म्हणाला: “मोशे आणि अहरोन, तुम्ही या लोकांना त्यांचं काम सोडून जायला का लावताय? जा, सर्व जण आपापल्या कामाला* लागा!”+ ५ तो पुढे म्हणाला: “देशातल्या इतक्या सगळ्या लोकांना तुमच्यामुळे काम थांबवावं लागेल!”

६ त्याच दिवशी फारोने अधिकाऱ्‍यांना* आणि त्यांच्या सहायकांना* अशी आज्ञा दिली: ७ “आजपासून या लोकांना विटा बनवण्यासाठी गवत देऊ नका.+ त्यांना स्वतः जाऊन ते गोळा करू द्या. ८ पण आधी ते बनवत होते, तितक्याच विटा त्यांना बनवायला लावा, त्यांत काही कमी करू नका. हे लोक आळशी झाले आहेत. म्हणूनच, ‘आम्हाला आमच्या देवाला बलिदान अर्पण करायला जायचंय,’ असा हट्ट ते करत आहेत. ९ त्यांच्याकडून आणखी मेहनत करून घ्या आणि त्यांना इतकं काम द्या, की असल्या खोट्या गोष्टींकडे ते लक्ष देणार नाहीत.”

१० तेव्हा, अधिकारी+ आणि सहायक लोकांकडे जाऊन त्यांना म्हणाले: “फारोने सांगितलंय, की ‘यापुढे मी तुम्हाला गवत देणार नाही. ११ तुम्ही स्वतः जाऊन, मिळेल तिथून गवत शोधून आणा. पण तुमचं काम अजिबात कमी होणार नाही.’” १२ तेव्हा ते लोक शेतांतून गवत* गोळा करायला इजिप्तच्या कानाकोपऱ्‍यांत गेले. १३ अधिकारी असं म्हणून त्यांच्या मागे लागायचे: “तुम्हाला गवत मिळायचं तेव्हा तुम्ही जितकं काम करायचा, तितकंच काम प्रत्येकाने रोज केलं पाहिजे.” १४ तसंच, इस्राएली लोकांमधून ज्या सहायकांना फारोच्या अधिकाऱ्‍यांनी त्यांच्यावर नेमलं होतं, त्यांनाही त्यांनी चोपून काढलं.+ अधिकाऱ्‍यांनी त्यांना विचारलं: “तुम्ही आधी बनवत होता, तितक्या विटा का बनवल्या नाहीत? कालही कमी विटा तयार झाल्या आणि आजही.”

१५ तेव्हा इस्राएली सहायकांनी फारोकडे जाऊन अशी तक्रार केली: “तुम्ही आपल्या सेवकांशी असं का वागताय? १६ तुमच्या सेवकांना गवत दिलं जात नाही आणि तरी ते आम्हाला म्हणतात, ‘विटा बनवा!’ ते तुमच्या सेवकांना मारतात, पण खरंतर चूक तुमच्याच लोकांची आहे.” १७ पण तो त्यांना म्हणाला: “तुम्ही आळशी आहात, आळशी!+ म्हणून तुम्ही म्हणता, ‘आम्हाला यहोवाला बलिदान अर्पण करायला जायचंय.’+ १८ निघा इथून, आणि कामाला लागा! तुम्हाला गवत मिळणार नाही, पण विटा तितक्याच बनवाव्या लागतील!”

१९ “तुम्हाला रोज तितक्याच विटा बनवाव्या लागतील,” या आदेशामुळे आता आपण मोठ्या संकटात सापडलो आहोत, हे इस्राएली सहायकांना कळलं. २० फारोला भेटून बाहेर आल्यावर, त्यांना मोशे आणि अहरोन भेटले. मोशे आणि अहरोन त्यांनाच भेटण्यासाठी तिथे वाट पाहत उभे होते. २१ तेव्हा ते मोशे आणि अहरोन यांना म्हणाले: “यहोवा तुम्हाला पाहून घेईल आणि तुम्हाला शिक्षा देईल, कारण तुमच्यामुळेच फारो आणि त्याचे सेवक आमचा द्वेष करू लागले आहेत. आम्हाला मारून टाकण्यासाठी तुम्ही त्यांच्या हातात तलवार दिली आहे.”+ २२ तेव्हा मोशे यहोवाकडे वळून म्हणाला: “यहोवा, तू या लोकांवर संकट का आणलंस? तू मला यांच्याकडे का पाठवलंस? २३ जेव्हापासून मी तुझ्या नावाने फारोशी बोलायला त्याच्यासमोर गेलो,+ तेव्हापासून तो या लोकांचा आणखीनच छळ करू लागला आहे.+ तूही आपल्या लोकांना सोडवण्यासाठी काहीच केलं नाहीस.”+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा