वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • योहान १८
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

योहान रूपरेषा

      • यहूदा येशूला पकडून देतो (१-९)

      • पेत्र तलवार चालवतो (१०, ११)

      • येशूला हन्‍नाकडे नेलं जातं (१२-१४)

      • पेत्र येशूला पहिल्यांदा नाकारतो (१५-१८)

      • हन्‍नासमोर येशू (१९-२४)

      • पेत्र दुसऱ्‍यांदा आणि तिसऱ्‍यांदा येशूला नाकारतो (२५-२७)

      • पिलातसमोर येशू (२८-४०)

        • “माझं राज्य या जगाचं नाही” (३६)

योहान १८:१

तळटीपा

  • *

    किंवा “हिवाळ्यात वाहणाऱ्‍या किद्रोन झऱ्‍याच्या.”

समासातील संदर्भ

  • +२शमु १५:२३
  • +मत्त २६:३६; मार्क १४:३२; लूक २२:३९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ११७

योहान १८:३

समासातील संदर्भ

  • +मत्त २६:४७; मार्क १४:४३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ११८

योहान १८:४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ११८

योहान १८:५

समासातील संदर्भ

  • +मत्त २:२३
  • +लूक २२:४७

योहान १८:६

समासातील संदर्भ

  • +योह ७:४६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ११८

योहान १८:८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ११८

योहान १८:९

समासातील संदर्भ

  • +योह ६:३९; १७:१२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ११८

योहान १८:१०

समासातील संदर्भ

  • +मत्त २६:५१; मार्क १४:४७; लूक २२:५०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ४/१/१९९८, पृ. १४-१५

    सर्व लोकांसाठी पुस्तक, पृ. १६-१७

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ११८

योहान १८:११

समासातील संदर्भ

  • +मत्त २६:५२; लूक २२:५१; योह १८:३६
  • +मत्त २०:२२; २६:४२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ९/१/२००२, पृ. १०

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ११८

योहान १८:१२

तळटीपा

  • *

    किंवा “अटक केली.”

योहान १८:१३

समासातील संदर्भ

  • +मत्त २६:५७; योह १८:२४
  • +लूक ३:२; प्रेका ४:५, ६

योहान १८:१४

समासातील संदर्भ

  • +योह ११:४९, ५०

योहान १८:१५

समासातील संदर्भ

  • +मत्त २६:५८; मार्क १४:५४; लूक २२:५४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्व लोकांसाठी पुस्तक, पृ. १६-१७

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. १२०

योहान १८:१६

तळटीपा

  • *

    किंवा “प्रवेशद्वाराजवळच.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्व लोकांसाठी पुस्तक, पृ. १६-१७

योहान १८:१७

समासातील संदर्भ

  • +मत्त २६:६९, ७०; मार्क १४:६६-६८; लूक २२:५५-५७; योह १८:२५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. १२०

योहान १८:१८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सभा पुस्तिकेसाठी संदर्भ, ५/२०१८, पृ. ७

योहान १८:२०

समासातील संदर्भ

  • +मत्त २६:५५; लूक ४:१५; १९:४७; योह ७:१४

योहान १८:२२

समासातील संदर्भ

  • +यश ५०:६

योहान १८:२३

तळटीपा

  • *

    शब्दशः “साक्ष दे.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२०११, पृ. ५

योहान १८:२४

समासातील संदर्भ

  • +मत्त २६:५७

योहान १८:२५

समासातील संदर्भ

  • +मत्त २६:६९, ७०; मार्क १४:६९, ७०; लूक २२:५८

योहान १८:२६

समासातील संदर्भ

  • +योह १८:१०

योहान १८:२७

समासातील संदर्भ

  • +मत्त २६:७४; मार्क १४:७२; लूक २२:६०; योह १३:३८

योहान १८:२८

समासातील संदर्भ

  • +मत्त २७:२; मार्क १५:१; लूक २३:१
  • +प्रेका १०:२८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. १२१

योहान १८:३०

तळटीपा

  • *

    किंवा “गुन्हेगार.”

योहान १८:३१

समासातील संदर्भ

  • +योह १९:६
  • +योह १९:१०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. १२१

योहान १८:३२

समासातील संदर्भ

  • +मत्त २०:१८, १९; योह ३:१४; १२:३२

योहान १८:३३

समासातील संदर्भ

  • +मत्त २७:११; योह १२:१३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. १२१

योहान १८:३४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. १२१

योहान १८:३५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. १२१

योहान १८:३६

समासातील संदर्भ

  • +१ती ६:१३
  • +यश ९:६; दान २:४४; ७:१४
  • +मत्त २६:५२, ५३; योह १८:११

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ३१

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ६/२०१८, पृ. ४-५

    टेहळणी बुरूज,

    ११/१/२००२, पृ. १५-१६

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. १२२

    अनंतकाल जगू शकाल, पृ. ११५-११६

योहान १८:३७

समासातील संदर्भ

  • +मत्त २७:११
  • +योह १:१४, १७; १४:६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ १८

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ३/२०२०, पृ. १८-१९

    ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका,

    १०/२०१८, पृ. ७

    टेहळणी बुरूज,

    १/१/२००५, पृ. १४-१६

    १०/१/२००३, पृ. ९-१०

    ८/१/२००३, पृ. १२

    ७/१५/२००२, पृ. १६

    ३/१/२००२, पृ. १३

    ८/१/१९९०, पृ. २०

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. १२२

    अनंतकाल जगू शकाल, पृ. ६०, ११५-११६

योहान १८:३८

समासातील संदर्भ

  • +मत्त २७:२४; लूक २३:४; योह १५:२५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१५/२०१०, पृ. ५

    ८/१/२००३, पृ. १२

    ३/१/२००२, पृ. १३

    ७/१/१९९५, पृ. ३

    १२/१/१९९२, पृ. २६-२७

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. १२२

योहान १८:३९

समासातील संदर्भ

  • +मत्त २७:१५; मार्क १५:६

योहान १८:४०

समासातील संदर्भ

  • +गण ३५:३१; लूक २३:१८, १९; प्रेका ३:१४

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

योहा. १८:१२शमु १५:२३
योहा. १८:१मत्त २६:३६; मार्क १४:३२; लूक २२:३९
योहा. १८:३मत्त २६:४७; मार्क १४:४३
योहा. १८:५मत्त २:२३
योहा. १८:५लूक २२:४७
योहा. १८:६योह ७:४६
योहा. १८:९योह ६:३९; १७:१२
योहा. १८:१०मत्त २६:५१; मार्क १४:४७; लूक २२:५०
योहा. १८:११मत्त २६:५२; लूक २२:५१; योह १८:३६
योहा. १८:११मत्त २०:२२; २६:४२
योहा. १८:१३मत्त २६:५७; योह १८:२४
योहा. १८:१३लूक ३:२; प्रेका ४:५, ६
योहा. १८:१४योह ११:४९, ५०
योहा. १८:१५मत्त २६:५८; मार्क १४:५४; लूक २२:५४
योहा. १८:१७मत्त २६:६९, ७०; मार्क १४:६६-६८; लूक २२:५५-५७; योह १८:२५
योहा. १८:२०मत्त २६:५५; लूक ४:१५; १९:४७; योह ७:१४
योहा. १८:२२यश ५०:६
योहा. १८:२४मत्त २६:५७
योहा. १८:२५मत्त २६:६९, ७०; मार्क १४:६९, ७०; लूक २२:५८
योहा. १८:२६योह १८:१०
योहा. १८:२७मत्त २६:७४; मार्क १४:७२; लूक २२:६०; योह १३:३८
योहा. १८:२८मत्त २७:२; मार्क १५:१; लूक २३:१
योहा. १८:२८प्रेका १०:२८
योहा. १८:३१योह १९:६
योहा. १८:३१योह १९:१०
योहा. १८:३२मत्त २०:१८, १९; योह ३:१४; १२:३२
योहा. १८:३३मत्त २७:११; योह १२:१३
योहा. १८:३६१ती ६:१३
योहा. १८:३६यश ९:६; दान २:४४; ७:१४
योहा. १८:३६मत्त २६:५२, ५३; योह १८:११
योहा. १८:३७मत्त २७:११
योहा. १८:३७योह १:१४, १७; १४:६
योहा. १८:३८मत्त २७:२४; लूक २३:४; योह १५:२५
योहा. १८:३९मत्त २७:१५; मार्क १५:६
योहा. १८:४०गण ३५:३१; लूक २३:१८, १९; प्रेका ३:१४
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र यात वाचा
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
  • २७
  • २८
  • २९
  • ३०
  • ३१
  • ३२
  • ३३
  • ३४
  • ३५
  • ३६
  • ३७
  • ३८
  • ३९
  • ४०
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
योहान १८:१-४०

योहानने सांगितलेला संदेश

१८ या गोष्टी सांगितल्यावर, येशू आपल्या शिष्यांसोबत किद्रोन खोऱ्‍याच्या*+ पलीकडे गेला. तिथे एक बाग होती आणि तो आपल्या शिष्यांसोबत त्या बागेत गेला.+ २ येशू सहसा आपल्या शिष्यांसोबत इथे यायचा. त्यामुळे, त्याला पकडून देणाऱ्‍या यहूदालाही हे ठिकाण माहीत होतं. ३ तो सैनिकांना, तसंच मुख्य याजकांनी आणि परूश्‍यांनी पाठवलेल्या रक्षकांना सोबत घेऊन तिथे आला. त्यांच्या हातात मशाली, कंदील आणि शस्त्रं होती.+ ४ आपल्यासोबत कायकाय घडणार आहे, हे येशूला माहीत असल्यामुळे तो पुढे येऊन त्यांना म्हणाला: “तुम्ही कोणाला शोधताय?” ५ ते त्याला म्हणाले: “नासरेथकर येशूला.”+ तेव्हा तो म्हणाला: “तो मीच आहे.” त्या वेळी, त्याला पकडून देणारा यहूदासुद्धा त्यांच्यासोबत उभा होता.+

६ पण “तो मीच आहे,” असं येशू त्यांना म्हणाला तेव्हा ते मागे हटून जमिनीवर पडले.+ ७ म्हणून त्याने पुन्हा त्यांना विचारलं: “तुम्ही कोणाला शोधताय?” ते म्हणाले: “नासरेथकर येशूला.” ८ त्यावर येशू त्यांना म्हणाला: “मी तुम्हाला सांगितलं, तो मीच आहे. तुम्ही जर मला शोधत असाल, तर या माणसांना जाऊ द्या.” ९ हे यामुळे घडलं, की त्याने म्हटलेले हे शब्द पूर्ण व्हावेत: “तू मला जे दिले आहेत, त्यांच्यापैकी एकालाही मी गमावलं नाही.”+

१० तेव्हा शिमोन पेत्र, ज्याच्याजवळ तलवार होती, त्याने ती काढली आणि महायाजकाच्या दासावर हल्ला करून त्याचा उजवा कान कापून टाकला.+ त्या दासाचं नाव मल्ख होतं. ११ पण येशू पेत्रला म्हणाला: “तलवार म्यानात ठेव.+ पित्याने मला जो प्याला दिलाय तो मी प्यायला नको का?”+

१२ मग सैनिक, सेनापती आणि यहुद्यांनी पाठवलेले रक्षक यांनी येशूला पकडलं* आणि त्याचे हात बांधले. १३ त्यांनी आधी त्याला हन्‍नाकडे नेलं, कारण त्या वर्षी महायाजक असलेल्या+ कयफाचा+ तो सासरा होता. १४ खरंतर, कयफानेच यहुद्यांना असा सल्ला दिला होता, की एका माणसाने सगळ्यांसाठी मरावं यातच त्यांचं भलं आहे.+

१५ त्या वेळी, शिमोन पेत्र आणि आणखी एक शिष्य येशूच्या मागेमागे चालत होते.+ तो शिष्य महायाजकाच्या ओळखीचा होता. त्यामुळे येशूसोबत तोही महायाजकाच्या अंगणात गेला. १६ पण पेत्र बाहेर दाराजवळच* उभा होता. त्यामुळे महायाजकाच्या ओळखीचा तो दुसरा शिष्य बाहेर गेला आणि दाराची राखण करणाऱ्‍या दासीशी बोलून त्याने पेत्रला आत आणलं. १७ तेव्हा ती दासी पेत्रला म्हणाली: “तूसुद्धा या माणसाचा शिष्य आहेस ना?” तो म्हणाला: “नाही.”+ १८ थंडी असल्यामुळे दास आणि रक्षक कोळशाची शेकोटी पेटवून तिच्याभोवती शेकत उभे होते. पेत्रसुद्धा त्यांच्यासोबत शेकत उभा होता.

१९ मुख्य याजकाने येशूला त्याच्या शिष्यांबद्दल आणि त्याच्या शिकवणींबद्दल काही प्रश्‍न विचारले. २० तेव्हा येशूने त्याला उत्तर दिलं: “मी उघडपणे जगासमोर बोललो. मी सभास्थानात आणि मंदिरात, जिथे सगळे यहुदी येतात, तिथे नेहमी शिकवायचो.+ आणि मी गुप्तपणे काहीच बोललो नाही. २१ मग तुम्ही मला प्रश्‍न का विचारता? मी सांगितलेल्या गोष्टी ज्यांनी ऐकल्या आहेत त्यांना विचारा. मी काय बोललो हे या लोकांना माहीत आहे.” २२ तो असं बोलला तेव्हा जवळच उभ्या असलेल्या एका रक्षकाने येशूच्या थोबाडीत मारून+ म्हटलं: “ही काय पद्धत झाली मुख्य याजकाशी बोलायची?” २३ येशूने त्याला उत्तर दिलं: “मी काही चुकीचं बोललो असेन, तर मला सांग.* पण मी खरं बोललो असेन, तर तू मला का मारतोस?” २४ मग हन्‍नाने त्याला महायाजक कयफा याच्याकडे बांधलेल्या अवस्थेतच पाठवलं.+

२५ शिमोन पेत्र शेकोटीजवळच उभा होता. तेव्हा ते त्याला म्हणाले: “तूसुद्धा त्याच्या शिष्यांपैकीच एक आहेस ना?” पण तो नाकारून म्हणाला: “नाही.”+ २६ पेत्रने ज्याचा कान कापला होता, त्या माणसाचा एक नातेवाईक महायाजकाचा दास होता.+ तो म्हणाला: “मी तुला त्याच्याबरोबर बागेत पाहिलं नव्हतं का?” २७ पण पुन्हा एकदा पेत्रने ही गोष्ट नाकारली आणि तेवढ्यात एक कोंबडा आरवला.+

२८ नंतर ते येशूला, कयफाकडून राज्यपालाच्या घरी घेऊन गेले.+ तोपर्यंत दिवस उजाडला होता. पण वल्हांडणाचं भोजन करायचं असल्यामुळे त्यांना दूषित व्हायचं नव्हतं.+ म्हणून ते स्वतः राज्यपालाच्या घरात गेले नाहीत. २९ त्यामुळे पिलात त्यांच्याशी बोलायला बाहेर आला आणि म्हणाला: “याने काय गुन्हा केलाय?” ३० ते म्हणाले: “हा अपराधी* नसता, तर आम्ही त्याला तुमच्याकडे आणलंच नसतं.” ३१ तेव्हा पिलात त्यांना म्हणाला: “तुम्हीच याला घेऊन जा आणि तुमच्या नियमशास्त्राप्रमाणे याचा न्याय करा.”+ त्यावर यहुदी त्याला म्हणाले: “नियमशास्त्राप्रमाणे आम्हाला कोणालाही ठार मारायचा अधिकार नाही.”+ ३२ आपल्याला कशा प्रकारचं मरण येईल हे सूचित करायला येशूने जे म्हटलं होतं, ते पूर्ण व्हावं म्हणून हे घडलं.+

३३ तेव्हा पिलात पुन्हा राज्यपालाच्या घरात गेला आणि येशूला बोलावून तो त्याला म्हणाला: “तू यहुद्यांचा राजा आहेस का?”+ ३४ येशू म्हणाला: “तुम्ही हे स्वतःहून विचारत आहात, की इतरांच्या सांगण्यावरून?” ३५ पिलातने उत्तर दिलं: “मी यहुदी आहे का? तुझ्या स्वतःच्या लोकांनी आणि मुख्य याजकांनीच तुला माझ्या हवाली केलंय. सांग, काय केलंस तू?” ३६ येशूने उत्तर दिलं:+ “माझं राज्य या जगाचं नाही.+ जर माझं राज्य या जगाचं असतं, तर मला यहुद्यांच्या हवाली केलं जाऊ नये म्हणून माझे सेवक लढले असते.+ पण मुळातच माझं राज्य या जगाचं नाही.” ३७ पिलात त्याला म्हणाला: “म्हणजे तू राजा आहेस का?” येशूने उत्तर दिलं: “मी राजा आहे असं तुम्ही स्वतःच म्हणताय.+ खरंतर, सत्याबद्दल साक्ष देण्यासाठीच माझा जन्म झालाय आणि त्यासाठीच मी जगात आलोय.+ जो सत्याच्या बाजूने आहे, तो माझं ऐकतो.” ३८ पिलातने त्याला विचारलं: “काय आहे सत्य?”

असं म्हटल्यावर तो पुन्हा बाहेर यहुद्यांकडे गेला आणि त्यांना म्हणाला: “मला याच्यात काहीच दोष दिसत नाही.+ ३९ शिवाय, वल्हांडणाच्या सणात मी एका कैद्याची सुटका करावी अशी तुमच्यामध्ये प्रथा आहे.+ तर मग, मी यहुद्यांच्या राजाची सुटका करावी अशी तुमची इच्छा आहे का?” ४० तेव्हा ते मोठ्याने ओरडून म्हणाले: “याची नाही, बरब्बाची सुटका करा!” बरब्बा हा एक लुटारू होता.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा