स्तोत्र
एज्राही एथान+ याचं गीत. मस्कील.*
८९ मी यहोवाच्या एकनिष्ठ प्रेमाचं सदासर्वकाळ गुणगान करीन.
तुझ्या विश्वासूपणाबद्दल मी सर्व पिढ्यांना सांगीन.
२ कारण मी म्हणालो: “एकनिष्ठ प्रेम सर्वकाळ स्थिर* राहील;+
तू स्वर्गात तुझा विश्वासूपणा स्थापित केला आहेस.”
५ हे यहोवा, स्वर्ग तुझ्या अद्भुत कार्यांची स्तुती करतो;
पवित्र जनांच्या मंडळीत तुझ्या विश्वासूपणाची प्रशंसा केली जाते.
६ कारण आकाशात यहोवासारखा दुसरा कोण आहे?+
देवाच्या मुलांमध्ये+ यहोवासारखा कोण आहे?
७ पवित्र जनांच्या सभेत देवाकडे विस्मयाने पाहिलं जातं;+
त्याच्या सभोवती असलेल्यांमध्ये तो सर्वात महान आणि विस्मयकारक आहे.+
८ हे यहोवा, सैन्यांच्या देवा,
हे याह, तुझ्यासारखा शक्तिशाली कोण आहे?+
तुझा विश्वासूपणा तुझ्या सभोवती आहे.+
१० तू राहाबचा* पूर्णपणे पराभव करून+ त्याला ठार मारलंस.+
तू आपल्या शक्तिशाली बाहूने आपल्या शत्रूंची पांगापांग केलीस.+
१२ उत्तर आणि दक्षिण दिशा तूच निर्माण केल्यास;
१४ नीतिमत्त्व आणि न्याय तुझ्या राजासनाचा पाया आहेत;+
एकनिष्ठ प्रेम आणि विश्वासूपणा तुझ्यापुढे उभे राहतात.+
१५ आनंदाने तुझा जयजयकार करणारे सुखी आहेत!+
हे यहोवा, ते तुझ्या चेहऱ्याच्या प्रकाशात चालतात.
१६ ते दिवसभर तुझ्या नावामुळे आनंदी असतात,
तुझ्या नीतिमत्त्वाने त्यांचा सन्मान होतो.
१७ कारण त्यांचा गौरव आणि त्यांचं बळ तूच आहेस.+
तुझ्या कृपेमुळे आमची ताकद* वाढत जाते.+
१८ कारण आमची ढाल यहोवाकडून आहे.
आमचा राजा आम्हाला इस्राएलच्या पवित्र देवाने दिला आहे.+
१९ त्या वेळी तू दृष्टान्तातून आपल्या एकनिष्ठ सेवकांशी बोललास आणि म्हणालास:
२१ मी आपल्या हाताने त्याला आधार देईन+
आणि आपल्या सामर्थ्याने त्याला बळ देईन.
२२ कोणताही शत्रू त्याच्यावर जुलूम करणार नाही
आणि कोणताही दुष्ट माणूस त्याला छळणार नाही.+
२५ मी त्याला समुद्रावर अधिकार देईन
आणि मी त्याला नद्यांवर अधिकार देईन.+
२६ तो मला हाक मारून म्हणेल: ‘तू माझा पिता आहेस,
माझा देव आणि माझ्या तारणाचा खडक आहेस.’+
३० जर त्याच्या वंशजांनी माझे नियम मोडले
आणि जर ते माझ्या आदेशांप्रमाणे* चालले नाहीत,
३१ जर त्यांनी माझे कायदे पाळले नाहीत
आणि माझ्या आज्ञा मानल्या नाहीत,
३२ तर मी छडीने त्यांच्या या बंडाची;
आणि फटके मारून त्यांच्या या अपराधाची शिक्षा देईन.+
३३ पण त्याच्यावरचं माझं एकनिष्ठ प्रेम कधीही आटणार नाही+
आणि दिलेल्या वचनापासून मी कधीही मागे फिरणार नाही.*
३५ पवित्र देव या नात्याने मी एकदाच सर्वकाळासाठी शपथ घेतली;
मी दावीदशी खोटं बोलणार नाही.+
३७ चंद्रासारखं, आकाशातल्या विश्वसनीय साक्षीदारासारखं
त्याचं राजासन कायम स्थिर राहील.” (सेला )
३८ पण तू स्वतःच त्याचा त्याग करून त्याला झिडकारलं आहेस;+
तुझ्या अभिषिक्तावर तू संतापला आहेस.
३९ तू आपल्या सेवकासोबत केलेला करार तुच्छ लेखला आहेस;
तू त्याचा मुकुट जमिनीवर टाकून त्याचा तिरस्कार केला आहेस.
४० तू त्याच्या सगळ्या भिंती* पाडून टाकल्या आहेत;
तू त्याच्या तटबंद्या जमीनदोस्त केल्या आहेत.
४१ येणाऱ्या जाणाऱ्या सर्वांनी त्याला लुबाडलंय;
त्याचे शेजारी त्याची निंदा करतात.+
४३ तू त्याची तलवार निकामी केली आहेस
आणि लढाईत तू त्याला जिंकू दिलं नाहीस.
४४ तू त्याचं वैभव नाहीसं केलं आहेस
आणि त्याचं राजासन तू खाली पाडलं आहेस.
४५ त्याच्या तारुण्याचे दिवस तू कमी केले आहेत;
त्याच्यावर तू अपमानाचं वस्त्र पांघरलं आहेस. (सेला )
४६ हे यहोवा, तू कधीपर्यंत तोंड फिरवशील? सर्वकाळ?+
तुझा क्रोध कधीपर्यंत आगीसारखा जळत राहील?
४७ माझं जीवन किती कमी काळाचं आहे याची आठवण कर!+
तू सर्व मानवांना विनाकारण* निर्माण केलं होतंस का?
४८ असा कोण माणूस आहे, जो कधीही मरणार नाही?+
कबरेच्या* तावडीतून तो स्वतःला* सोडवू शकतो का? (सेला )
४९ हे यहोवा, तू पूर्वीच्या काळात दाखवलेलं एकनिष्ठ प्रेम आता कुठे आहे?
तू आपल्या विश्वासूपणामुळे दावीदला या प्रेमाबद्दल वचन दिलं होतंस.+
५० हे यहोवा, तुझ्या सेवकांना मारले जाणारे टोमणे आठव;
मला सर्व लोकांचे टोमणे ऐकावे लागतात.*
५१ हे यहोवा, तुझे शत्रू तुझ्या लोकांची निंदा करतात;
पावलापावलावर त्यांनी तुझ्या अभिषिक्ताचा अपमान केलाय.
५२ यहोवाची सदासर्वकाळ स्तुती असो. आमेन, आमेन.+