योहानला झालेलं प्रकटीकरण
७ यानंतर, मला चार स्वर्गदूत पृथ्वीच्या चार कोपऱ्यांत उभे असलेले दिसले. पृथ्वीवर, समुद्रावर किंवा कोणत्याही झाडावर वारा वाहू नये म्हणून त्यांनी पृथ्वीचे चार वारे अडवून धरले होते. २ मग, सूर्य उगवण्याच्या दिशेने* एक स्वर्गदूत वर येताना मला दिसला. त्याच्याकडे जिवंत देवाचा शिक्का होता. आणि ज्या चार स्वर्गदूतांना पृथ्वीला आणि समुद्राला नुकसान पोहोचवण्याचा अधिकार देण्यात आला होता, त्यांना तो मोठ्या आवाजात हाक मारून म्हणाला: ३ “आपल्या देवाच्या दासांच्या कपाळांवर आम्ही शिक्का मारेपर्यंत+ पृथ्वीला, समुद्राला किंवा झाडांना नुकसान पोहोचवू नका.”+
४ मग, ज्यांच्यावर शिक्का मारण्यात आला त्यांची संख्या मी ऐकली. ते इस्राएलच्या मुलांच्या प्रत्येक वंशातून+ घेतलेले १,४४,०००+ इतके होते:
५ यहूदा वंशातले १२,०००;
रऊबेन वंशातले १२,०००;
गाद वंशातले १२,०००;
६ आशेर वंशातले १२,०००;
नफताली वंशातले १२,०००;
मनश्शे+ वंशातले १२,०००;
७ शिमोन वंशातले १२,०००;
लेवी वंशातले १२,०००;
इस्साखार वंशातले १२,०००;
८ जबुलून वंशातले १२,०००;
योसेफ वंशातले १२,०००;
आणि बन्यामीन वंशातले १२,०००, यांच्यावर शिक्का मारण्यात आला.
९ यानंतर पाहा! सर्व राष्ट्रं, वंश, लोक आणि भाषा यांतून आलेला आणि कोणत्याही माणसाला मोजता आला नाही असा एक मोठा लोकसमुदाय,+ शुभ्र झगे घालून+ आणि हातांत खजुराच्या फांद्या घेऊन राजासनासमोर आणि कोकऱ्यासमोर उभा असलेला मला दिसला.+ १० ते लोक मोठ्याने अशी घोषणा करत होते: “तारण हे राजासनावर बसलेल्या आमच्या देवाकडून+ आणि कोकऱ्याकडून मिळतं.”+
११ सर्व स्वर्गदूत राजासनाच्या, वडिलांच्या+ आणि चार जिवंत प्राण्यांच्या सभोवती उभे होते. त्यांनी राजासनापुढे गुडघे टेकले आणि असं म्हणून देवाला नमन केलं: १२ “आमेन! प्रशंसा, गौरव, बुद्धी, उपकारस्तुती, सन्मान, सामर्थ्य आणि शक्ती सदासर्वकाळ आमच्या देवाला मिळो.+ आमेन.”
१३ तेव्हा, वडिलांपैकी एकाने मला म्हटलं: “शुभ्र झगे घातलेले+ हे कोण आहेत आणि ते कुठून आले आहेत?” १४ त्यावर मी लगेच त्याला म्हणालो: “माझ्या प्रभू, हे तूच सांगू शकतोस.” तेव्हा तो मला म्हणाला: “जे मोठ्या संकटातून+ बाहेर येतात ते हेच आहेत. त्यांनी आपले झगे कोकऱ्याच्या रक्तात धुऊन शुभ्र केले आहेत.+ १५ म्हणूनच ते देवाच्या राजासनासमोर आहेत आणि त्याच्या मंदिरात रात्रंदिवस त्याची पवित्र सेवा करत आहेत. राजासनावर जो बसला आहे+ तो त्यांच्यावर आपला तंबू पसरवेल.+ १६ यापुढे ते कधी भुकेले किंवा तहानलेले असणार नाहीत. तसंच, सूर्याची किंवा उष्णतेची झळ त्यांना लागणार नाही.+ १७ कारण, राजासनाच्या मधोमध* असलेला कोकरा+ त्यांना मेंढपाळाप्रमाणे+ जीवनाच्या पाण्याच्या झऱ्यांकडे घेऊन जाईल.+ आणि देव त्यांच्या डोळ्यांतून प्रत्येक अश्रू पुसून टाकेल.”+