मीखा
तो सर्व टेकड्यांहून उंच केला जाईल,
आणि देशोदेशीचे लोक प्रवाहासारखे त्याच्याकडे येतील.+
२ आणि बऱ्याच राष्ट्रांचे लोक येतील आणि म्हणतील:
“चला, आपण यहोवाच्या पर्वतावर
आणि याकोबच्या देवाच्या मंदिराकडे जाऊ.+
तो आपल्याला त्याचे मार्ग शिकवेल,
आणि त्याने दाखवलेल्या वाटेने आपण चालू.”
कारण सीयोनमधून नियम,*
आणि यरुशलेममधून यहोवाचा शब्द निघेल.
यापुढे एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्राविरुद्ध तलवार उचलणार नाही,
आणि ते युद्ध करायलाही शिकणार नाहीत.+
४ त्यांच्यातला प्रत्येक जण आपल्या द्राक्षवेलाखाली आणि आपल्या अंजिराच्या झाडाखाली बसेल,*+
कोणीही त्यांना घाबरवणार नाही,+
कारण सैन्यांचा देव यहोवा हे बोलला आहे.
५ सर्व राष्ट्रांचे लोक आपापल्या देवाच्या नावाने चालतील,
पण आम्ही तर सदासर्वकाळ आमच्या देवाच्या, यहोवाच्या नावाने चालू.+
६ यहोवा म्हणतो, “जे* लंगडत होते,
त्यांना मी त्या दिवशी गोळा करीन,
आणि ज्यांची पांगापांग झाली होती,
तसंच, ज्यांच्याशी मी कठोरपणे वागलो होतो, त्यांनाही मी एकत्र करीन.+
७ जे* लंगडत होते त्यांच्यातल्या उरलेल्यांना मी वाचवीन,+
आणि ज्यांना दूर पाठवण्यात आलं होतं, त्यांचं मी एक मोठं राष्ट्र बनवीन;+
आतापासून सदासर्वकाळ,
यहोवा सीयोन पर्वतावर राजा म्हणून त्यांच्यावर राज्य करेल.
८ हे कळपाच्या बुरुजा,
सीयोनच्या मुलीच्या डोंगरा,+
पहिली* सत्ता येईल, हो, ती पुन्हा तुझ्याकडे येईल,+
यरुशलेमच्या मुलीचं राज्य पुन्हा तिला मिळेल.+
९ तू अशी मोठमोठ्याने का ओरडत आहेस?
तुला राजा नाही का?
की तुला सल्ला देणारा मेलाय?
म्हणूनच तुला जन्म देणाऱ्या स्त्रीसारख्या कळा येत आहेत का?+
१० हे सीयोनच्या मुली, जन्म देणाऱ्या स्त्रीसारखी,
तू अशीच तळमळत आणि कण्हत राहा,
कारण आतापासून तू शहरात नाही, तर रानात राहशील.
तू पार बाबेलपर्यंत जाशील,+
आणि तिथून तुला वाचवलं जाईल;+
तिथे यहोवा तुला तुझ्या शत्रूंच्या हातून परत विकत घेईल.+
११ बरीच राष्ट्रं तुझ्याविरुद्ध एकत्र येतील;
ती म्हणतील, ‘तिला दूषित होऊ दे,
आमच्या डोळ्यांदेखत सीयोनसोबत असं घडू दे.’
१२ पण यहोवाचे विचार त्यांना माहीत नाहीत,
त्याचा उद्देश त्यांना कळत नाही;
कारण तो त्यांना नुकत्याच कापलेल्या धान्याच्या पेंढ्यांसारखा खळ्यात* गोळा करेल.
तू पुष्कळ राष्ट्रांचा चुराडा करशील.+
त्यांची बेइमानीची कमाई तू यहोवाला अर्पण करशील;
आणि त्यांची संपत्ती तू संपूर्ण पृथ्वीच्या खऱ्या प्रभूला अर्पण करशील.”+