यशया
९ पण देशात पूर्वी होता तसा तो काळोख नसेल; पूर्वीच्या काळात जबुलून आणि नफताली प्रदेशांना अपमानित करण्यात आलं,+ तेव्हा जसा काळोख होता तसा तो काळोख नसेल. पण नंतर देव गालीलला, म्हणजे समुद्राकडे जाणाऱ्या मार्गावर यार्देनच्या प्रदेशातल्या विदेश्यांच्या गालीलला सन्मानित करेल.
२ अंधारात चालणाऱ्या लोकांनी
तेजस्वी प्रकाश पाहिला आहे.
दाट काळोखाच्या देशात राहणाऱ्या लोकांवर प्रकाश पडला आहे.+
३ तू राष्ट्रातल्या लोकांची संख्या वाढवली आहेस;
तू त्यांच्या आनंदात आणखी भर घातली आहेस.
कापणीच्या वेळी लोक जसा हर्ष करतात,
आणि लूट वाटून घेताना लोकांना जसा आनंद होतो,
तसा ते तुझ्यासमोर आनंद करत आहेत.
४ त्यांच्यावर लादलेलं जू* मोडून तू त्याचे तुकडे-तुकडे केले आहेस,
त्यांच्या खांद्यावरच्या लाकडाचे आणि जुलूम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या दांड्याचे,
तू तुकडे-तुकडे केले आहेस.
मिद्यानी लोक हरले त्या दिवसाप्रमाणेच तू केलं आहेस.+
त्याला अद्भुत सल्लागार,+ शक्तिशाली देव,+ सर्वकाळचा पिता आणि शांतीचा राजकुमार म्हटलं जाईल.
आणि शांतीचा कधीही अंत होणार नाही.+
दावीदच्या राजासनावर+ आणि त्याच्या राज्यावर
ते कायमचं स्थापित होईल.+
न्यायाने+ आणि नीतिमत्त्वाने+ ते आतापासून कायमसाठी टिकून राहील.
सैन्यांचा देव यहोवा याच्या आवेशामुळे हे घडून येईल.
८ यहोवाने याकोबविरुद्ध संदेश पाठवला आहे,
इस्राएलविरुद्ध तो संदेश आला आहे.+
९ आणि एफ्राईममधल्या व शोमरोनमधल्या सर्वांना तो कळेल.
ते गर्विष्ठपणे आणि उद्धटपणे म्हणतात:
१० “विटांची घरं पडली आहेत,
पण आम्ही ती घडवलेल्या दगडांनी बांधू.+
उंबराची झाडं कापून टाकण्यात आली आहेत,
पण आम्ही त्यांच्या जागी देवदाराचे वृक्ष लावू.”
११ यहोवा रसीनच्या शत्रूंना त्याच्या विरोधात उभं करेल,
आणि त्याच्या वैऱ्यांना तो हल्ला करायला प्रवृत्त करेल.
लोकांच्या बंडखोर वृत्तीमुळे देवाचा राग शांत झालेला नाही,
त्यांना शिक्षा द्यायला त्याचा हात अजूनही उगारलेलाच आहे.+
१३ कारण लोक, त्यांना शिक्षा करणाऱ्याकडे परत आले नाहीत;
सैन्यांचा देव यहोवा याला त्यांनी शोधलं नाही.+
१५ डोकं म्हणजे वडीलजन व प्रतिष्ठित माणसं,
आणि शेपूट म्हणजे खोटं शिक्षण देणारे संदेष्टे.+
१६ या लोकांचं नेतृत्व करणारे त्यांना भटकायला लावतात,
आणि त्यांच्या मागे चालणारे हे लोक गोंधळात पडले आहेत.
१७ म्हणून त्यांच्या तरुण मुलांमुळे यहोवाला आनंद होणार नाही,
त्यांच्या अनाथ मुलांची* आणि विधवांची त्याला दया येणार नाही.
कारण ते सगळे देवाला सोडून गेले आहेत आणि वाईट कामं करत आहेत,+
प्रत्येक जण मूर्खपणाच्या गोष्टी बोलत आहे.
यामुळे देवाचा राग शांत झालेला नाही,
त्यांना शिक्षा द्यायला त्याचा हात अजूनही उगारलेलाच आहे.+
१८ कारण दुष्टपणा आगीसारखा पेट घेतो,
तो काटेरी झुडपं आणि जंगली गवत भस्म करतो.
तो दाट जंगलांनाही आग लावेल,
आणि त्यांच्या धुराचे लोट वर जातील.
१९ सैन्यांचा देव यहोवा याच्या जळजळीत क्रोधामुळे,
देशाला आग लागली आहे.
लोक आगीसाठी सरपणासारखे होतील,
कोणी आपल्या भावाचीही गय करणार नाही.
२० ते आपल्या उजवीकडे मांस कापून खातील,
पण तरी उपाशीच राहतील;
ते आपल्या डावीकडे मांस खातील,
पण तरीही त्यांचं पोट भरणार नाही.
प्रत्येक जण आपल्याच हाताचं मांस कापून खाईल.
२१ मनश्शे एफ्राईमला खाईल,
आणि एफ्राईम मनश्शेला.
ते दोघं मिळून यहूदाच्या विरुद्ध उठतील.+
त्यांच्या बंडखोर वृत्तीमुळे देवाचा राग शांत झालेला नाही,
त्यांना शिक्षा द्यायला त्याचा हात अजूनही उगारलेलाच आहे.+