वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • मार्क १४
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

मार्क रूपरेषा

      • याजक येशूला मारून टाकायचा कट रचतात (१, २)

      • येशूवर सुगंधी तेल ओतलं जातं (३-९)

      • यहूदा येशूचा विश्‍वासघात करतो (१०, ११)

      • शेवटचा वल्हांडण (१२-२१)

      • प्रभूच्या सांजभोजनाची सुरुवात (२२-२६)

      • पेत्र नाकारेल याबद्दल भविष्यवाणी (२७-३१)

      • येशू गेथशेमाने इथे प्रार्थना करतो (३२-४२)

      • येशूला अटक (४३-५२)

      • न्यायसभेपुढे चौकशी (५३-६५)

      • पेत्र येशूला नाकारतो (६६-७२)

मार्क १४:१

तळटीपा

  • *

    किंवा “कुयुक्‍तीने.”

  • *

    किंवा “पकडून.”

समासातील संदर्भ

  • +निर्ग १२:३, ६; लेवी २३:५
  • +लेवी २३:६
  • +योह १३:१
  • +मत्त २६:२-५; लूक २२:१, २

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ११२

मार्क १४:३

तळटीपा

  • *

    एका सुगंधी वनस्पतीचं नाव. शब्दार्थसूची पाहा.

  • *

    म्हणजे, अलाबास्त्र नावाच्या दगडापासून बनवलेली बाटली. शब्दार्थसूचीत “अलाबास्त्र” पाहा.

  • *

    किंवा “तेलाच्या बाटलीचं तोंड फोडून ती उघडली.”

समासातील संदर्भ

  • +मत्त २६:६-९; योह १२:२-५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    ४/१५/२०००, पृ. ३१

    ४/१/१९८७, पृ. ३०-३१

    नवे जग भाषांतर, पृ. २५१०, २५१९

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. १०१

मार्क १४:४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ४/१५/२०००, पृ. ३१

मार्क १४:५

तळटीपा

  • *

    अति. ख१४ पाहा.

  • *

    किंवा “तिच्याशी रागाने बोलू लागले; तिला दटावू लागले.”

मार्क १४:६

समासातील संदर्भ

  • +मत्त २६:१०; योह १२:७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ४/१५/१९९९, पृ. १६

मार्क १४:७

समासातील संदर्भ

  • +अनु १५:११
  • +मत्त २६:११; योह १२:८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ९/१५/१९९९, पृ. ५

मार्क १४:८

समासातील संदर्भ

  • +मत्त २६:१२; योह १२:७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१५/१९९७, पृ. १६

मार्क १४:९

समासातील संदर्भ

  • +मत्त २४:१४
  • +मत्त २६:१३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ४/१५/१९९९, पृ. १६

मार्क १४:१०

समासातील संदर्भ

  • +मत्त २६:१४-१६; लूक २२:३-६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ११२

मार्क १४:११

समासातील संदर्भ

  • +जख ११:१२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ११२

मार्क १४:१२

समासातील संदर्भ

  • +निर्ग १२:१५, १८; २३:१५
  • +लूक २२:१, ७
  • +गण ९:२; मत्त २६:१७-१९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ११२

मार्क १४:१३

समासातील संदर्भ

  • +लूक २२:१०-१३

मार्क १४:१४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ११२

मार्क १४:१५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ११२

मार्क १४:१७

समासातील संदर्भ

  • +मत्त २६:२०; लूक २२:१४

मार्क १४:१८

समासातील संदर्भ

  • +स्तो ४१:९; मत्त २६:२१, २२; लूक २२:२१, २३; योह १३:२१, २२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ११४

मार्क १४:२०

समासातील संदर्भ

  • +मत्त २६:२३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ११४

मार्क १४:२१

समासातील संदर्भ

  • +लूक २२:२२
  • +मत्त २६:२४

मार्क १४:२२

समासातील संदर्भ

  • +मत्त २६:२६; लूक २२:१९; १कर ११:२३, २४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१/१९९१, पृ. २६-२७

मार्क १४:२३

समासातील संदर्भ

  • +मत्त २६:२७; १कर १०:१६; ११:२५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ११४

मार्क १४:२४

समासातील संदर्भ

  • +यिर्म ३१:३१; इब्री ७:२२; ९:१५
  • +निर्ग २४:८; लेवी १७:११; इब्री ९:२२
  • +यश ५३:१२; मत्त २६:२८; लूक २२:२०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१५/२०१३, पृ. २५

    २/१५/२००३, पृ. १५

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ११४

मार्क १४:२५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२००८, पृ. ३०

    २/१५/२००३, पृ. १३-१४

मार्क १४:२६

तळटीपा

  • *

    किंवा “स्तोत्रं.”

समासातील संदर्भ

  • +मत्त २६:३०; लूक २२:३९; योह १८:१

मार्क १४:२७

तळटीपा

  • *

    शब्दशः “सगळे अडखळाल.”

समासातील संदर्भ

  • +यश ५३:५; दान ९:२६
  • +जख १३:७; मत्त २६:३१-३३, ५६; मार्क १४:५०; योह १६:३२

मार्क १४:२८

समासातील संदर्भ

  • +मार्क १६:७

मार्क १४:२९

तळटीपा

  • *

    शब्दशः “सगळे अडखळले तरी मी अडखळणार नाही.”

समासातील संदर्भ

  • +लूक २२:३१-३३; योह १३:३७

मार्क १४:३०

समासातील संदर्भ

  • +मत्त २६:३४; लूक २२:३४; योह १३:३८

मार्क १४:३१

समासातील संदर्भ

  • +मत्त २६:३५

मार्क १४:३२

समासातील संदर्भ

  • +मत्त २६:३६, ३७; लूक २२:३९-४१; योह १८:१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ११७

मार्क १४:३३

तळटीपा

  • *

    किंवा “तो अगदी सुन्‍न.”

समासातील संदर्भ

  • +मार्क ९:२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ११७

मार्क १४:३४

तळटीपा

  • *

    किंवा “माझा जीव.”

समासातील संदर्भ

  • +योह १२:२७
  • +मत्त २६:३८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ११७

मार्क १४:३५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ११७

मार्क १४:३६

तळटीपा

  • *

    हा ‘वडील’ या अर्थाचा हिब्रू किंवा ॲरामेईक (अरामी) भाषेतला शब्द आहे. सहसा मुलं आपल्या वडिलांना संबोधण्यासाठी हा शब्द वापरतात.

समासातील संदर्भ

  • +रोम ८:१५; गल ४:६
  • +मत्त २६:३९; लूक २२:४२; योह ६:३८; इब्री ५:७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१/२००९, पृ. १३

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ११७

मार्क १४:३७

समासातील संदर्भ

  • +मत्त २६:४०; लूक २२:४५

मार्क १४:३८

तळटीपा

  • *

    किंवा “तयार.”

समासातील संदर्भ

  • +मत्त ६:१३; लूक ११:४; २२:४६
  • +मत्त २६:४१; रोम ७:२३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ११७

मार्क १४:३९

समासातील संदर्भ

  • +मत्त २६:४२-४६

मार्क १४:४१

समासातील संदर्भ

  • +योह १३:१

मार्क १४:४२

समासातील संदर्भ

  • +योह १८:२

मार्क १४:४३

समासातील संदर्भ

  • +मत्त २६:४७-५१; लूक २२:४७-५१; योह १८:३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ११८

मार्क १४:४४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ११८

मार्क १४:४५

तळटीपा

  • *

    किंवा “गुरू.”

मार्क १४:४७

समासातील संदर्भ

  • +मत्त २६:५१; लूक २२:५०; योह १८:१०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ११८

मार्क १४:४८

समासातील संदर्भ

  • +मत्त २६:५५, ५६; लूक २२:५२, ५३

मार्क १४:४९

समासातील संदर्भ

  • +लूक १९:४७; योह १८:२०
  • +स्तो २२:६; यश ५३:७; दान ९:२६; लूक २२:३७

मार्क १४:५०

समासातील संदर्भ

  • +जख १३:७; मत्त २६:३१; योह १६:३२

मार्क १४:५१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. ११८

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२००८, पृ. ३०

    ११/१/१९८९, पृ. ३१

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ११८

मार्क १४:५२

तळटीपा

  • *

    किंवा “कमी कपड्यांत; फक्‍त आतल्या कपड्यांवर.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. ११८

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२००८, पृ. ३०

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ११८

मार्क १४:५३

समासातील संदर्भ

  • +योह १८:१३
  • +मत्त २६:५७; लूक २२:५४, ५५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ११९-१२०

मार्क १४:५४

समासातील संदर्भ

  • +मत्त २६:५८; योह १८:१५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अनुकरण, पृ. २३१

    टेहळणी बुरूज,

    ४/१/२०१०, पृ. २२-२३

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. १२०

मार्क १४:५५

तळटीपा

  • *

    म्हणजे, यहुदी उच्च न्यायालय. शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +मत्त २६:५९, ६०

मार्क १४:५६

समासातील संदर्भ

  • +स्तो ३५:११

मार्क १४:५८

समासातील संदर्भ

  • +मत्त २६:६१; मार्क १५:२९; योह २:१९

मार्क १४:६०

समासातील संदर्भ

  • +मत्त २६:६२, ६३

मार्क १४:६१

समासातील संदर्भ

  • +यश ५३:७; १पेत्र २:२३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सभा पुस्तिकेसाठी संदर्भ, ५/२०१८, पृ. ८

मार्क १४:६२

समासातील संदर्भ

  • +दान ७:१३
  • +स्तो ११०:१; इफि १:२०; कल ३:१
  • +मत्त २४:३०; २६:६४; लूक २१:२७; प्रक १:७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सभा पुस्तिकेसाठी संदर्भ, ५/२०१८, पृ. ८

मार्क १४:६३

समासातील संदर्भ

  • +मत्त २६:६५, ६६

मार्क १४:६४

तळटीपा

  • *

    किंवा “तुमचं म्हणणं.”

समासातील संदर्भ

  • +लेवी २४:१६; योह १९:७

मार्क १४:६५

समासातील संदर्भ

  • +यश ५०:६; ५३:३; मत्त २६:६७, ६८
  • +लूक २२:६३-६५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ८/१५/२०११, पृ. १४

मार्क १४:६६

समासातील संदर्भ

  • +मत्त २६:६९-७५; लूक २२:५५-६२; योह १८:२५, २६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. १२०

मार्क १४:६७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सभा पुस्तिकेसाठी संदर्भ, ५/२०१८, पृ. ७

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. १२०

मार्क १४:६९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. १२०

मार्क १४:७०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. १२०

मार्क १४:७१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. १२०

मार्क १४:७२

समासातील संदर्भ

  • +योह १८:२७
  • +मत्त २६:३४; मार्क १४:३०; लूक २२:३४; योह १३:३८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. १२०

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

मार्क १४:१निर्ग १२:३, ६; लेवी २३:५
मार्क १४:१लेवी २३:६
मार्क १४:१योह १३:१
मार्क १४:१मत्त २६:२-५; लूक २२:१, २
मार्क १४:३मत्त २६:६-९; योह १२:२-५
मार्क १४:६मत्त २६:१०; योह १२:७
मार्क १४:७अनु १५:११
मार्क १४:७मत्त २६:११; योह १२:८
मार्क १४:८मत्त २६:१२; योह १२:७
मार्क १४:९मत्त २४:१४
मार्क १४:९मत्त २६:१३
मार्क १४:१०मत्त २६:१४-१६; लूक २२:३-६
मार्क १४:११जख ११:१२
मार्क १४:१२निर्ग १२:१५, १८; २३:१५
मार्क १४:१२लूक २२:१, ७
मार्क १४:१२गण ९:२; मत्त २६:१७-१९
मार्क १४:१३लूक २२:१०-१३
मार्क १४:१७मत्त २६:२०; लूक २२:१४
मार्क १४:१८स्तो ४१:९; मत्त २६:२१, २२; लूक २२:२१, २३; योह १३:२१, २२
मार्क १४:२०मत्त २६:२३
मार्क १४:२१लूक २२:२२
मार्क १४:२१मत्त २६:२४
मार्क १४:२२मत्त २६:२६; लूक २२:१९; १कर ११:२३, २४
मार्क १४:२३मत्त २६:२७; १कर १०:१६; ११:२५
मार्क १४:२४यिर्म ३१:३१; इब्री ७:२२; ९:१५
मार्क १४:२४निर्ग २४:८; लेवी १७:११; इब्री ९:२२
मार्क १४:२४यश ५३:१२; मत्त २६:२८; लूक २२:२०
मार्क १४:२६मत्त २६:३०; लूक २२:३९; योह १८:१
मार्क १४:२७यश ५३:५; दान ९:२६
मार्क १४:२७जख १३:७; मत्त २६:३१-३३, ५६; मार्क १४:५०; योह १६:३२
मार्क १४:२८मार्क १६:७
मार्क १४:२९लूक २२:३१-३३; योह १३:३७
मार्क १४:३०मत्त २६:३४; लूक २२:३४; योह १३:३८
मार्क १४:३१मत्त २६:३५
मार्क १४:३२मत्त २६:३६, ३७; लूक २२:३९-४१; योह १८:१
मार्क १४:३३मार्क ९:२
मार्क १४:३४योह १२:२७
मार्क १४:३४मत्त २६:३८
मार्क १४:३६रोम ८:१५; गल ४:६
मार्क १४:३६मत्त २६:३९; लूक २२:४२; योह ६:३८; इब्री ५:७
मार्क १४:३७मत्त २६:४०; लूक २२:४५
मार्क १४:३८मत्त ६:१३; लूक ११:४; २२:४६
मार्क १४:३८मत्त २६:४१; रोम ७:२३
मार्क १४:३९मत्त २६:४२-४६
मार्क १४:४१योह १३:१
मार्क १४:४२योह १८:२
मार्क १४:४३मत्त २६:४७-५१; लूक २२:४७-५१; योह १८:३
मार्क १४:४७मत्त २६:५१; लूक २२:५०; योह १८:१०
मार्क १४:४८मत्त २६:५५, ५६; लूक २२:५२, ५३
मार्क १४:४९लूक १९:४७; योह १८:२०
मार्क १४:४९स्तो २२:६; यश ५३:७; दान ९:२६; लूक २२:३७
मार्क १४:५०जख १३:७; मत्त २६:३१; योह १६:३२
मार्क १४:५३योह १८:१३
मार्क १४:५३मत्त २६:५७; लूक २२:५४, ५५
मार्क १४:५४मत्त २६:५८; योह १८:१५
मार्क १४:५५मत्त २६:५९, ६०
मार्क १४:५६स्तो ३५:११
मार्क १४:५८मत्त २६:६१; मार्क १५:२९; योह २:१९
मार्क १४:६०मत्त २६:६२, ६३
मार्क १४:६१यश ५३:७; १पेत्र २:२३
मार्क १४:६२दान ७:१३
मार्क १४:६२स्तो ११०:१; इफि १:२०; कल ३:१
मार्क १४:६२मत्त २४:३०; २६:६४; लूक २१:२७; प्रक १:७
मार्क १४:६३मत्त २६:६५, ६६
मार्क १४:६४लेवी २४:१६; योह १९:७
मार्क १४:६५यश ५०:६; ५३:३; मत्त २६:६७, ६८
मार्क १४:६५लूक २२:६३-६५
मार्क १४:६६मत्त २६:६९-७५; लूक २२:५५-६२; योह १८:२५, २६
मार्क १४:७२योह १८:२७
मार्क १४:७२मत्त २६:३४; मार्क १४:३०; लूक २२:३४; योह १३:३८
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र यात वाचा
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
  • २७
  • २८
  • २९
  • ३०
  • ३१
  • ३२
  • ३३
  • ३४
  • ३५
  • ३६
  • ३७
  • ३८
  • ३९
  • ४०
  • ४१
  • ४२
  • ४३
  • ४४
  • ४५
  • ४६
  • ४७
  • ४८
  • ४९
  • ५०
  • ५१
  • ५२
  • ५३
  • ५४
  • ५५
  • ५६
  • ५७
  • ५८
  • ५९
  • ६०
  • ६१
  • ६२
  • ६३
  • ६४
  • ६५
  • ६६
  • ६७
  • ६८
  • ६९
  • ७०
  • ७१
  • ७२
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
मार्क १४:१-७२

मार्कने सांगितलेला संदेश

१४ वल्हांडण+ आणि बेखमीर भाकरींच्या सणाला+ आता दोन दिवस उरले होते.+ मुख्य याजक आणि शास्त्री येशूला धूर्तपणे* अटक करून* ठार कसं मारता येईल यावर विचार करत होते.+ २ पण ते म्हणाले: “सणाच्या वेळी नको, नाहीतर कदाचित लोक गोंधळ माजवतील.”

३ मग, येशू बेथानी इथे कुष्ठरोगी शिमोन याच्या घरी जेवत होता, तेव्हा एक स्त्री शुद्ध जटामांसीच्या* सुगंधी तेलाची बाटली घेऊन त्याच्याजवळ आली. ते तेल खूप मौल्यवान होतं. तिने बाटली* उघडली* आणि ती त्याच्या डोक्यावर तेल ओतू लागली.+ ४ हे पाहून काही लोक संतापले आणि एकमेकांना म्हणाले: “ही बाई सुगंधी तेल वाया का घालवत आहे? ५ हेच तेल विकलं असतं तर ३०० दिनारांपेक्षा* जास्त पैसे मिळाले असते आणि ते गरिबांना देता आले असते!” ते तिच्यावर खूप चिडले.* ६ पण येशू त्यांना म्हणाला: “तिला रागावू नका. तिला त्रास का देता? तिने माझ्यासाठी एक चांगलं काम केलंय.+ ७ कारण गरीब तर नेहमीच तुमच्यासोबत असतील+ आणि तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही त्यांना मदत करू शकता. पण मी नेहमी तुमच्यासोबत असणार नाही.+ ८ तिला जे करता आलं ते तिने केलं. तिने माझ्या दफनविधीच्या तयारीसाठी आधीच माझ्या शरीराला सुगंधी तेल लावलंय.+ ९ मी तुम्हाला खरं सांगतो, जगात जिथे जिथे आनंदाच्या संदेशाची घोषणा केली जाईल,+ तिथे तिथे या स्त्रीची आठवण करून, तिने जे काही केलं तेही सांगितलं जाईल.”+

१० मग १२ शिष्यांपैकी यहूदा इस्कर्योत नावाचा एक जण येशूला विश्‍वासघाताने पकडून द्यायला मुख्य याजकांकडे गेला.+ ११ हे ऐकून याजकांना फार आनंद झाला आणि त्यांनी त्याला चांदीची नाणी+ द्यायचं कबूल केलं. त्यामुळे तो त्याला पकडून द्यायची संधी शोधू लागला.

१२ बेखमीर भाकरींच्या सणाच्या+ पहिल्या दिवशी वल्हांडणाचा पशू अर्पण करायची प्रथा होती.+ त्या दिवशी शिष्य येशूजवळ येऊन म्हणाले: “आम्ही तुझ्यासाठी वल्हांडणाच्या भोजनाची तयारी कुठे करू?”+ १३ तेव्हा त्याने आपल्या दोन शिष्यांना पाठवलं आणि त्यांना सांगितलं: “शहरात जा आणि तिथे तुम्हाला पाण्याचं मडकं घेतलेला एक माणूस भेटेल. त्याच्यामागे जा+ १४ आणि ज्या घरात तो जाईल तिथे जाऊन घरमालकाला असं म्हणा, ‘गुरू विचारतात: “मी आपल्या शिष्यांसोबत वल्हांडणाचं भोजन करू शकेन, अशी खोली कुठे आहे?”’ १५ मग तो सामानसुमान लावून तयार केलेली माडीवरची एक मोठी खोली तुम्हाला दाखवेल. तिथे आपल्यासाठी तयारी करा.” १६ तेव्हा शिष्य गेले आणि शहरात गेल्यावर त्याने सांगितल्याप्रमाणेच सगळं घडलं. मग त्यांनी वल्हांडणाची तयारी केली.

१७ संध्याकाळ झाल्यावर येशू १२ शिष्यांसोबत आला.+ १८ मग ते मेजाभोवती बसून जेवत असताना तो म्हणाला: “मी तुम्हाला खरं सांगतो, माझ्यासोबत जेवायला बसलेला तुमच्यापैकीच एक जण मला पकडून देईल.”+ १९ हे ऐकून त्यांना फार दुःख झालं आणि एकापाठोपाठ एक प्रत्येक जण त्याला विचारू लागला: “तो मी तर नाही ना?” २० तो त्यांना म्हणाला: “तुम्हा १२ जणांपैकी जो माझ्याबरोबर ताटात हात घालतोय, तोच तो आहे.+ २१ कारण मनुष्याच्या मुलाबद्दल लिहिण्यात आल्याप्रमाणे तो तर जाणारच आहे; पण जो मनुष्याच्या मुलाचा विश्‍वासघात करून त्याला पकडून देईल त्या माणसाची किती दुर्दशा होईल!+ तो जन्मालाच आला नसता तर बरं झालं असतं!”+

२२ नंतर, ते जेवत असताना येशूने भाकर घेतली आणि धन्यवाद देऊन ती मोडली. मग त्याने असं म्हणून ती त्यांना दिली: “ही भाकर घ्या. ही माझ्या शरीराला सूचित करते.”+ २३ मग एक प्याला घेऊन त्याने देवाचे उपकार मानले आणि तो त्यांना दिला आणि ते सगळे त्यातून प्यायले.+ २४ तो त्यांना म्हणाला: “द्राक्षारसाचा हा प्याला माझ्या ‘कराराच्या+ रक्‍ताला’+ सूचित करतो. ते पुष्कळ लोकांच्या पापांच्या क्षमेसाठी ओतलं जाणार आहे.+ २५ मी तुम्हाला खरं सांगतो, की जोपर्यंत मी देवाच्या राज्यात नवा द्राक्षारस पीत नाही, तोपर्यंत मी पुन्हा कधीही द्राक्षारस पिणार नाही.” २६ शेवटी, स्तुतिगीतं* गायल्यानंतर ते तिथून निघून जैतुनांच्या डोंगरावर गेले.+

२७ मग येशू त्यांना म्हणाला: “तुम्ही सगळे मला सोडून जाल,* कारण असं लिहिलंय: ‘मी मेंढपाळाला मारीन+ आणि कळपातल्या मेंढरांची पांगापांग होईल.’+ २८ पण मला उठवण्यात आल्यावर मी तुमच्यापुढे गालीलमध्ये जाईन.”+ २९ तेव्हा पेत्र त्याला म्हणाला: “बाकीचे सगळे तुला सोडून गेले, तरी मी तुला कधीच सोडून जाणार नाही!”*+ ३० यावर येशू त्याला म्हणाला: “मी तुला खरं सांगतो की आज, हो, आज रात्रीच, कोंबडा दोन वेळा आरवण्याआधी तू तीनदा मला नाकारशील.”+ ३१ पण तरी तो पुन्हापुन्हा असंच म्हणत राहिला: “मला तुझ्यासोबत मरावं लागलं तरी मी तुला मुळीच नाकारणार नाही.” बाकीचे सगळे शिष्यही तसंच म्हणू लागले.+

३२ मग ते गेथशेमाने या ठिकाणी आले आणि येशू त्याच्या शिष्यांना म्हणाला: “मी प्रार्थना करेपर्यंत इथेच बसा.”+ ३३ आणि त्याने पेत्र, याकोब आणि योहान यांना आपल्यासोबत घेतलं.+ मग तो खूप बेचैन* झाला आणि त्याचं मन दुःखाने व्याकूळ झालं. ३४ तो त्यांना म्हणाला: “मी* फार दुःखी आहे,+ माझ्या मनाला मरणासारख्या यातना होत आहेत. तुम्ही इथेच थांबा आणि जागे राहा.”+ ३५ तो तिथून जरासा पुढे गेला आणि जमिनीवर पडून अशी प्रार्थना करू लागला, की शक्य असलं, तर ही वेळ माझ्यापासून टळून जावी. ३६ मग तो म्हणाला: “अब्बा, * बापा,+ तुला सगळं काही शक्य आहे. म्हणून हा प्याला माझ्यापासून दूर कर. तरी माझ्या इच्छेप्रमाणे नाही, तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे.”+ ३७ तो परत आला तेव्हा शिष्यांना झोपलेलं पाहून तो पेत्रला म्हणाला: “शिमोन, तू झोपत आहेस? तुला थोडा वेळसुद्धा जागं राहायला जमलं नाही का?+ ३८ तुम्ही मोहात पडू नये म्हणून जागे राहा आणि प्रार्थना करत राहा.+ कारण मन तर उत्सुक* आहे, पण शरीर दुर्बळ आहे.”+ ३९ मग तो पुन्हा गेला आणि त्याने तशीच प्रार्थना केली.+ ४० नंतर त्याने पुन्हा येऊन त्यांना झोपलेलं पाहिलं, कारण त्यांचे डोळे जड झाले होते. त्यामुळे काय उत्तर द्यावं हे त्यांना कळत नव्हतं. ४१ मग तो तिसऱ्‍यांदा शिष्यांकडे परत येऊन त्यांना म्हणाला: “अशा वेळी तुम्ही झोपत आहात आणि विश्रांती घेत आहात! आता पुरे झालं! वेळ आली आहे!+ पाहा! मनुष्याच्या मुलाला विश्‍वासघाताने पापी लोकांच्या हाती पकडून दिलं जातंय. ४२ उठा, आपण जाऊ या. पाहा! माझा विश्‍वासघात करणारा जवळ आलाय!”+

४३ तो अजून बोलतच होता, इतक्यात यहूदा, जो १२ शिष्यांपैकी एक होता, तो आला आणि त्याच्यासोबत तलवारी आणि काठ्या घेतलेल्या लोकांचा जमाव होता. त्यांना मुख्य याजकांनी, शास्त्र्यांनी आणि वडीलजनांनी पाठवलं होतं.+ ४४ त्याचा विश्‍वासघात करणाऱ्‍याने त्यांना अशी खूण द्यायचं कबूल केलं होतं, की “मी ज्याचं चुंबन घेईन, तोच येशू आहे. त्याला अटक करा आणि शिपायांच्या बंदोबस्तात घेऊन जा.” ४५ मग थेट येशूजवळ जाऊन तो म्हणाला: “रब्बी!”* आणि त्याने प्रेमाने त्याचं चुंबन घेतलं. ४६ तेव्हा त्यांनी येशूला पकडून अटक केली. ४७ पण, येशूसोबत असलेल्यांपैकी एकाने आपली तलवार काढली आणि महायाजकाच्या दासावर हल्ला करून त्याचा कान कापून टाकला.+ ४८ येशू त्यांना म्हणाला: “मी काय चोर आहे, की तुम्ही मला तलवारी आणि काठ्या घेऊन पकडायला आलात?+ ४९ दररोज मी तुमच्यासोबत मंदिरात शिकवत होतो,+ तेव्हा तुम्ही मला पकडलं नाही. पण शास्त्रात जे लिहिलं होतं ते पूर्ण व्हावं म्हणून+ या सगळ्या गोष्टी घडल्या आहेत.”

५० तेव्हा सगळे शिष्य त्याला सोडून पळून गेले.+ ५१ पण एक तरुण, अंगावर फक्‍त एक उत्तम प्रतीचं मलमलीचं वस्त्र पांघरून त्याच्यामागून चालत होता आणि त्यांनी त्याला पकडायचा प्रयत्न केला. ५२ पण तो आपलं मलमलीचं वस्त्र टाकून उघडाच* पळून गेला.

५३ मग त्यांनी येशूला महायाजकाकडे नेलं.+ तिथे सगळे मुख्य याजक, वडीलजन आणि शास्त्री जमले होते.+ ५४ पण, पेत्र बरंच अंतर ठेवून त्याच्या मागेमागे चालत महायाजकाच्या अंगणापर्यंत गेला. तिथे तो घराच्या नोकरचाकरांसोबत शेकोटीजवळ बसला.+ ५५ आता मुख्य याजक आणि संपूर्ण न्यायसभा,* येशूला मृत्युदंड देता यावा म्हणून त्याच्याविरुद्ध पुरावा शोधत होती. पण त्यांना तो सापडत नव्हता.+ ५६ खरंतर, बरेच जण त्याच्याविरुद्ध खोटी साक्ष देत होते.+ पण त्यांच्या साक्षीत मेळ बसत नव्हता. ५७ तसंच, काही जण उभे राहून त्याच्याविरुद्ध अशी खोटी साक्ष देत होते: ५८ “आम्ही याला असं म्हणताना ऐकलं, की ‘हातांनी बांधलेलं हे मंदिर मी पाडीन आणि तीन दिवसांत असं एक मंदिर उभं करीन, जे हातांनी बांधलेलं नाही.’”+ ५९ पण या बाबतीतही त्यांच्या साक्षीत मेळ बसत नव्हता.

६० मग महायाजक त्यांच्यामध्ये उभा राहिला आणि त्याने येशूला विचारलं: “तू काहीच कसं बोलत नाहीस? ही माणसं तुझ्याविरुद्ध काय आरोप लावत आहेत हे तू ऐकलं नाहीस का?”+ ६१ पण तरीही येशू शांतच राहिला. त्याने काहीच उत्तर दिलं नाही.+ मग पुन्हा महायाजकाने त्याला विचारलं: “तू पवित्र देवाचा मुलगा, ख्रिस्त आहेस का?” ६२ येशू त्याला म्हणाला: “हो, मी आहे. आणि तुम्ही मनुष्याच्या मुलाला+ सामर्थ्यशाली देवाच्या उजव्या हाताला बसलेला+ आणि आकाशातल्या ढगांवर स्वार होऊन येताना पाहाल.”+ ६३ तेव्हा महायाजक आपला अंगरखा फाडून म्हणाला: “आता आणखी साक्षीदारांची काय गरज?+ ६४ त्याने देवाची केलेली निंदा तुम्ही स्वतः ऐकली आहे. तुमचा निर्णय* काय आहे?” त्या सगळ्यांनी त्याला मृत्युदंडासाठी पात्र ठरवलं.+ ६५ तेव्हा काही जण त्याच्या तोंडावर थुंकू लागले+ आणि त्याचा चेहरा झाकून त्याला बुक्क्या मारू लागले. ते त्याला म्हणाले: “भविष्यवाणी कर!” मग, त्याच्या थोबाडीत मारून शिपाई त्याला तिथून घेऊन गेले.+

६६ मग, पेत्र खाली अंगणात बसलेला असताना महायाजकाची एक दासी तिथे आली.+ ६७ पेत्रला शेकोटीजवळ बसलेला पाहून ती सरळ त्याच्याकडे बघून म्हणाली: “तूपण त्या नासरेथच्या येशूसोबत होतास!” ६८ पण तो ते नाकारून म्हणाला: “मी त्याला ओळखत नाही आणि तू काय बोलत आहेस, मला काहीच कळत नाही.” मग तो बाहेरच्या फाटकाजवळ गेला. ६९ तिथे ती दासी त्याला पाहून जवळ उभे असलेल्यांना पुन्हा म्हणू लागली: “हा त्यांच्याचपैकी एक आहे.” ७० पण त्याने पुन्हा ते नाकारलं. मग थोड्या वेळाने तिथे उभे असलेले लोक पुन्हा पेत्रला म्हणाले: “नक्कीच तूपण त्यांच्यातलाच एक आहेस, कारण तू गालीलचा आहेस.” ७१ तेव्हा, आपण खोटं बोलत असलो, तर आपल्याला शाप लागावा असं म्हणून तो शपथ घेऊन म्हणाला: “तुम्ही ज्या माणसाबद्दल बोलत आहात त्याला मी ओळखत नाही!” ७२ आणि तेवढ्यात कोंबडा दुसऱ्‍यांदा आरवला.+ तेव्हा पेत्रला येशूचे हे शब्द आठवले: “कोंबडा दोन वेळा आरवण्याआधी तू मला तीनदा नाकारशील.”+ तेव्हा, भावना अनावर होऊन तो ढसाढसा रडू लागला.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा