वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • योहान २१
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

योहान रूपरेषा

      • येशू आपल्या शिष्यांसमोर प्रकट होतो (१-१४)

      • पेत्र येशूवर असलेल्या प्रेमाची खातरी देतो (१५-१९)

        • “माझ्या लहान मेढरांना चार” (१७)

      • येशूच्या प्रिय शिष्याचं भविष्य (२०-२३)

      • समाप्ती (२४, २५)

योहान २१:१

तळटीपा

  • *

    किंवा “शिष्यांना दिसला.”

योहान २१:२

समासातील संदर्भ

  • +योह ११:१६; २०:२४
  • +योह १:४५
  • +मत्त ४:२१

योहान २१:३

समासातील संदर्भ

  • +लूक ५:४, ५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अनुकरण, पृ. २३४

    टेहळणी बुरूज,

    ४/१/२०१०, पृ. २५

योहान २१:४

समासातील संदर्भ

  • +लूक २४:१५, १६; योह २०:११, १४

योहान २१:५

तळटीपा

  • *

    किंवा “मासे आहेत का?”

योहान २१:६

समासातील संदर्भ

  • +लूक ५:४, ६

योहान २१:७

तळटीपा

  • *

    किंवा “आपला झगा घालून कंबरेला खोचला.”

  • *

    किंवा “कमी कपड्यांत होता.”

समासातील संदर्भ

  • +योह १३:२३; १९:२६; २०:२

योहान २१:८

तळटीपा

  • *

    सुमारे ९० मी. शब्दशः “सुमारे २०० हात.” अति. ख१४ पाहा.

योहान २१:१४

समासातील संदर्भ

  • +योह २०:१९, २६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. १३०

योहान २१:१५

समासातील संदर्भ

  • +लूक २२:३२; प्रेका २०:२८; १पेत्र ५:२, ३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १२/२०१७, पृ. १३

    ५/२०१७, पृ. २२-२३, २६

    बायबलमधून शिकू या!, पृ. २१५

    अनुकरण, पृ. २३५-२३६

    टेहळणी बुरूज,

    ४/१/२०१०, पृ. २५-२६

    ७/१/२००८, पृ. ३२

    ४/१५/२००८, पृ. ३२

    ५/१/२००७, पृ. १३

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. ३०

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. १३०

योहान २१:१६

समासातील संदर्भ

  • +प्रेका १:१५; इब्री १३:२०; १पेत्र २:२५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अनुकरण, पृ. २३५-२३६

    टेहळणी बुरूज,

    ४/१/२०१०, पृ. २५-२६

    ७/१/२००८, पृ. ३२

    ५/१/२००७, पृ. १३

योहान २१:१७

समासातील संदर्भ

  • +योह १०:१४, १५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२०१३, पृ. १६

    ४/१/२०१०, पृ. २५-२६

    ७/१/२००८, पृ. ३२

    ५/१/२००७, पृ. १३

    अनुकरण, पृ. २३५-२३६

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. १३०

योहान २१:१८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. १३०

योहान २१:१९

समासातील संदर्भ

  • +मत्त १९:२८; योह १२:२६; प्रक १४:४

योहान २१:२०

समासातील संदर्भ

  • +योह १३:२३; २०:२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१/२०१५, पृ. १३

योहान २१:२२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२००५, पृ. १३

योहान २१:२४

समासातील संदर्भ

  • +योह १३:२३; १९:२६; २०:२; २१:७

योहान २१:२५

समासातील संदर्भ

  • +योह २०:३०, ३१

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

योहा. २१:२योह ११:१६; २०:२४
योहा. २१:२योह १:४५
योहा. २१:२मत्त ४:२१
योहा. २१:३लूक ५:४, ५
योहा. २१:४लूक २४:१५, १६; योह २०:११, १४
योहा. २१:६लूक ५:४, ६
योहा. २१:७योह १३:२३; १९:२६; २०:२
योहा. २१:१४योह २०:१९, २६
योहा. २१:१५लूक २२:३२; प्रेका २०:२८; १पेत्र ५:२, ३
योहा. २१:१६प्रेका १:१५; इब्री १३:२०; १पेत्र २:२५
योहा. २१:१७योह १०:१४, १५
योहा. २१:१९मत्त १९:२८; योह १२:२६; प्रक १४:४
योहा. २१:२०योह १३:२३; २०:२
योहा. २१:२४योह १३:२३; १९:२६; २०:२; २१:७
योहा. २१:२५योह २०:३०, ३१
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र यात वाचा
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
योहान २१:१-२५

योहानने सांगितलेला संदेश

२१ यानंतर, येशू पुन्हा तिबिर्या समुद्राजवळ आपल्या शिष्यांसमोर प्रकट झाला.* तो अशा प्रकारे प्रकट झाला: २ शिमोन पेत्र, थोमा (ज्याला ‘जुळा’ असं म्हटलं जायचं),+ गालीलमधल्या काना या ठिकाणी राहणारा नथनेल,+ जब्दीची मुलं+ आणि त्याचे आणखी दोन शिष्य हे एकत्र जमले होते. ३ शिमोन पेत्र त्यांना म्हणाला: “मी मासे धरायला जातोय.” ते त्याला म्हणाले: “आम्हीही तुझ्यासोबत येतो.” तेव्हा ते नावेत बसून निघाले. पण त्या रात्री त्यांच्या हाती काहीच लागलं नाही.+

४ मग पहाट होऊ लागली, तेव्हा येशू किनाऱ्‍यावर येऊन उभा राहिला. पण तो येशू आहे हे शिष्यांना समजलं नाही.+ ५ तेव्हा येशू त्यांना म्हणाला: “मुलांनो, तुमच्याजवळ खायला काही आहे का?”* ते म्हणाले: “नाही!” ६ तो त्यांना म्हणाला: “नावेच्या उजवीकडे जाळं टाका म्हणजे तुम्हाला मासे मिळतील.” त्यांनी जाळं टाकलं तेव्हा जाळ्यात इतके मासे आले, की त्यांना ते ओढता येत नव्हतं.+ ७ मग ज्याच्यावर येशूचं प्रेम होतं+ तो शिष्य पेत्रला म्हणाला: “हा तर प्रभू आहे!” हे ऐकताच शिमोन पेत्रने आपले कपडे घातले,* कारण तो उघडाच होता.* आणि त्याने समुद्रात उडी टाकली. ८ पण इतर शिष्य जाळं ओढतओढत छोट्या नावेतून आले. कारण ते किनाऱ्‍यापासून फार दूर नव्हते, तर फक्‍त ३०० फुटांच्या* अंतरावर होते.

९ ते किनाऱ्‍यावर आले तेव्हा त्यांना कोळशांचा विस्तव आणि त्यावर भाकरी आणि मासे ठेवलेले दिसले. १० येशू त्यांना म्हणाला: “तुम्ही आताच पकडलेले काही मासे आणा.” ११ तेव्हा शिमोन पेत्र नावेत चढला आणि त्याने मोठ्या माशांनी भरलेलं जाळं ओढून किनाऱ्‍यावर आणलं. त्यात १५३ मासे होते. जाळं माशांनी भरलेलं असलं, तरी ते फाटलं नाही. १२ येशू त्यांना म्हणाला: “या, नाश्‍ता करा.” पण त्यांच्यापैकी एकाही शिष्याला, “तू कोण आहेस?” असं त्याला विचारायचं धाडस झालं नाही. कारण तो प्रभूच आहे हे त्यांना माहीत होतं. १३ येशूने येऊन भाकर घेतली आणि त्यांना दिली. मग त्याने त्यांना मासेही दिले. १४ मेलेल्यांतून उठल्यानंतर शिष्यांसमोर प्रकट होण्याची ही येशूची तिसरी वेळ होती.+

१५ त्यांनी नाश्‍ता केल्यावर, येशू शिमोन पेत्रला म्हणाला: “योहानच्या मुला शिमोन, तू यांच्यापेक्षा माझ्यावर जास्त प्रेम करतोस का?” त्याने उत्तर दिलं: “हो प्रभू, माझं तुझ्यावर प्रेम आहे हे तुला माहीत आहे.” येशू त्याला म्हणाला: “माझ्या कोकरांना चार.”+ १६ येशू दुसऱ्‍यांदा त्याला म्हणाला: “योहानच्या मुला शिमोन, तू माझ्यावर प्रेम करतोस का?” त्याने उत्तर दिलं: “हो प्रभू, माझं तुझ्यावर प्रेम आहे हे तुला माहीत आहे.” येशू त्याला म्हणाला: “माझ्या लहान मेढरांची काळजी घे.”+ १७ मग येशू तिसऱ्‍यांदा त्याला म्हणाला: “योहानच्या मुला शिमोन, तू माझ्यावर प्रेम करतोस का?” येशूने तिसऱ्‍यांदा, “तू माझ्यावर प्रेम करतोस का?” असं विचारलं म्हणून पेत्रला वाईट वाटलं. त्याने उत्तर दिलं: “प्रभू, तुला तर सगळं माहीत आहे. तुला माहीत आहे, की माझं तुझ्यावर प्रेम आहे.” येशू त्याला म्हणाला: “माझ्या लहान मेंढरांना चार.+ १८ मी तुला अगदी खरं सांगतो, तरुणपणी तू स्वतः कपडे घालायचास आणि तुला वाटेल तिथे जायचास. पण जेव्हा तू म्हातारा होशील तेव्हा तू आपले हात पुढे करशील आणि दुसरा माणूस तुला कपडे घालेल आणि तुझी इच्छा नसेल तिथे तुला घेऊन जाईल.” १९ पेत्र कशा प्रकारच्या मरणाला सामोरं जाऊन देवाचा गौरव करेल, हे सूचित करण्यासाठी येशू असं म्हणाला. मग त्याने पेत्रला म्हटलं: “माझ्यामागे चालत राहा.”+

२० पेत्रने वळून पाहिलं तेव्हा, ज्याच्यावर येशूचं प्रेम होतं+ तो शिष्य त्याला मागून येताना दिसला. हा तोच शिष्य होता ज्याने संध्याकाळच्या जेवणाच्या वेळी येशूकडे वळून असं विचारलं होतं: “प्रभू, तुला पकडून देणारा कोण आहे?” २१ त्याला पाहून पेत्र येशूला म्हणाला: “प्रभू, या माणसाचं काय होईल?” २२ येशू त्याला म्हणाला: “मी येईपर्यंत याने राहावं, अशी माझी इच्छा असेल तर तुला त्याचं काय? तू माझ्यामागे चालत राहा.” २३ यावरून बांधवांमध्ये अशी गोष्ट पसरली, की हा शिष्य मरणारच नाही. पण तो मरणार नाही असं येशू त्याला म्हणाला नाही, तर तो असं म्हणाला: “मी येईपर्यंत याने राहावं अशी माझी इच्छा असेल, तर तुला त्याचं काय?”

२४ हा तोच शिष्य आहे,+ ज्याने या सगळ्या गोष्टींबद्दल ही साक्ष दिली आणि त्यानेच या गोष्टी लिहिल्या आहेत. आणि त्याची साक्ष खरी आहे हे आपल्याला माहीत आहे.

२५ खरंतर येशूने केलेल्या अजून कितीतरी गोष्टी आहेत. त्या सगळ्या सविस्तर लिहिल्या असत्या, तर मला वाटतं त्या गुंडाळ्या या जगात मावल्या नसत्या.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा