गीतरत्न
७ “हे चारित्र्यवान मुली,
जोड्यांमध्ये तुझे पाय किती सुंदर दिसतात!
तुझ्या सुडौल मांड्या दागिन्यांसारख्या;
कारागिराने घडवलेल्या अलंकारांसारख्या सुरेख आहेत.
२ तुझी नाभी गोल प्याल्यासारखी आहे,
ती नेहमी द्राक्षारसाने भरलेली राहो.
तुझं पोट म्हणजे गव्हाची रास,
त्याच्या सभोवती भुईकमळं आहेत.
४ तुझी मान+ हस्तिदंताच्या बुरुजासारखी आहे.+
तुझे डोळे+ बाथ-रब्बीमच्या फाटकाजवळ असलेल्या
हेशबोनमधल्या+ तळ्यांसारखे आहेत.
तुझं नाक दिमिष्कसमोर असलेल्या
लबानोनच्या बुरुजासारखं आहे.
५ तुझं मस्तक कर्मेलच्या+ शिखरासारखं आहे.
तुझे केस*+ जांभळ्या लोकरीसारखे+ आहेत.
तुझ्या लांब केसांनी राजाला भुरळ पाडली* आहे.
६ प्रिये, तू किती सुंदर, किती रूपवान आहेस;
मनाला सुख देणाऱ्या सगळ्या गोष्टींपेक्षा तू श्रेष्ठ आहेस!
७ तुझा बांधा खजुराच्या झाडासारखा आहे
आणि तुझे स्तन खजुरांच्या गुच्छांसारखे आहेत.+
८ मी म्हणालो, ‘मी फळं तोडायला
खजुराच्या झाडावर चढीन.’
तुझे स्तन द्राक्षांच्या गुच्छांसारखे राहोत,
तुझ्या श्वासातून सफरचंदांचा सुगंध दरवळत राहो.
९ तुझ्या ओठांतून* उत्तम द्राक्षारस पाझरत राहो.”
“हा द्राक्षारस माझ्या सख्याच्या ओठांतून अलगद उतरो,
त्यामुळे गोड झोप लागते.
१० मी माझ्या सख्याची आहे,+
त्याला माझीच ओढ लागली आहे.
११ माझ्या सख्या, चल
आपण रानात जाऊ;
मेंदीच्या झाडांमध्ये विसावा घेऊ.+
१२ पहाटेच उठून आपण द्राक्षमळ्यांत जाऊन
तिथे मी तुझ्यावर आपल्या प्रेमाचा वर्षाव करीन.+
माझ्या सख्या, मी ती तुझ्यासाठी ठेवली आहेत.