स्तोत्र
चढणीचं गीत.
२ तू आपल्या कष्टाचं फळ खाशील.
तू आनंदी होशील आणि तुझी भरभराट होईल.+
३ तुझ्या घरात तुझी बायको, भरपूर फळ देणाऱ्या द्राक्षवेलीसारखी असेल;+
तुझ्या मेजाभोवती तुझी मुलं, जैतुनाच्या रोपांसारखी असतील.
४ पाहा! यहोवाची भीती बाळगणाऱ्या माणसाला
असा आशीर्वाद मिळेल.+
५ यहोवा तुला सीयोनमधून आशीर्वाद देईल.
तुला आयुष्यभर यरुशलेमची भरभराट पाहायला मिळो.+
६ तुला तुझ्या मुलांची मुलं पाहायला मिळोत!
इस्राएलवर शांती असो!