चढणीचं गीत. दावीदचं स्तुतिगीत.
१३३ पाहा! भावांनी सोबत मिळून ऐक्याने राहणं,
किती चांगलं आणि आनंददायक आहे!+
२ ते डोक्यावर ओतलेल्या त्या उत्तम तेलासारखं आहे,+
जे दाढीवरून खाली ओघळतं;
जे अहरोनच्या दाढीवरून,+
त्याच्या वस्त्रांपर्यंत ओघळतं.
३ ते हर्मोन पर्वतावरच्या+ त्या दवासारखं आहे,
जे सीयोनच्या डोंगरांवर+ उतरतं.
तिथेच यहोवाने त्याचा आशीर्वाद, म्हणजे सर्वकाळाचं जीवन मिळेल,
असा आदेश दिला आहे.