वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • यहेज्केल ९
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

यहेज्केल रूपरेषा

      • शिक्षा करणारे सहा जण आणि कमरेला दौत अडकवलेला माणूस (१-११)

        • न्यायदंडाची सुरुवात मंदिरापासून (६)

यहेज्केल ९:१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    शुद्ध उपासना, पृ. १७२-१७३

यहेज्केल ९:२

तळटीपा

  • *

    किंवा “शास्त्र्याची.”

समासातील संदर्भ

  • +यिर्म २०:२; यहे ८:३
  • +२इत ४:१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    शुद्ध उपासना, पृ. १७३, १७५, २३८

    ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका,

    ६/२०१७, पृ. ६

    टेहळणी बुरूज,

    ११/१/१९८८, पृ. १४

यहेज्केल ९:३

समासातील संदर्भ

  • +यहे ३:२३; ८:३, ४; ११:२२
  • +यहे १०:४

यहेज्केल ९:४

समासातील संदर्भ

  • +यहे ५:११
  • +स्तो ११९:५३; २पेत्र २:७, ८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    शुद्ध उपासना, पृ. १७३-१७५, १७६-१८०

    ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका,

    ६/२०१७, पृ. ६

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ६/२०१६, पृ. १६-१७

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२००८, पृ. ५-६

    ११/१/१९८८, पृ. १४

    ज्ञान, पृ. १८०

यहेज्केल ९:५

समासातील संदर्भ

  • +निर्ग ३२:२६, २७; यहे ७:४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    शुद्ध उपासना, पृ. १७४-१७५, १८०

यहेज्केल ९:६

समासातील संदर्भ

  • +२इत ३६:१७
  • +निर्ग १२:२३; यहो २:१७-१९; प्रक ९:४
  • +२रा २५:१८, २१; यिर्म २५:२९
  • +यहे ८:११

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    शुद्ध उपासना, पृ. १७४-१७५, १७९-१८०

    टेहळणी बुरूज,

    ८/१/१९८७, पृ. १७-१९

यहेज्केल ९:७

समासातील संदर्भ

  • +विल २:२१

यहेज्केल ९:८

समासातील संदर्भ

  • +उत्प १८:२३; यहे ११:१३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    शुद्ध उपासना, पृ. १७६

यहेज्केल ९:९

समासातील संदर्भ

  • +२इत ३६:१४; यश १:४
  • +२रा २१:१६; यिर्म २:३४; मत्त २३:३०
  • +यहे २२:२९
  • +यश २९:१५; यहे ८:१२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    शुद्ध उपासना, पृ. १७६

यहेज्केल ९:१०

समासातील संदर्भ

  • +यहे ५:११; ७:४

यहेज्केल ९:११

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ३/१/१९८८, पृ. ३०-३१

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

यहे. ९:२यिर्म २०:२; यहे ८:३
यहे. ९:२२इत ४:१
यहे. ९:३यहे ३:२३; ८:३, ४; ११:२२
यहे. ९:३यहे १०:४
यहे. ९:४यहे ५:११
यहे. ९:४स्तो ११९:५३; २पेत्र २:७, ८
यहे. ९:५निर्ग ३२:२६, २७; यहे ७:४
यहे. ९:६२इत ३६:१७
यहे. ९:६निर्ग १२:२३; यहो २:१७-१९; प्रक ९:४
यहे. ९:६२रा २५:१८, २१; यिर्म २५:२९
यहे. ९:६यहे ८:११
यहे. ९:७विल २:२१
यहे. ९:८उत्प १८:२३; यहे ११:१३
यहे. ९:९२इत ३६:१४; यश १:४
यहे. ९:९२रा २१:१६; यिर्म २:३४; मत्त २३:३०
यहे. ९:९यहे २२:२९
यहे. ९:९यश २९:१५; यहे ८:१२
यहे. ९:१०यहे ५:११; ७:४
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
यहेज्केल ९:१-११

यहेज्केल

९ मग तो मोठ्या आवाजात म्हणाला: “शहराला शिक्षा करणाऱ्‍यांना बोलावून घ्या; प्रत्येकाला आपल्या हातात नाशाचं हत्यार घेऊन यायला सांगा!”

२ तेव्हा पाहा! मला उत्तरेकडे तोंड असलेल्या वरच्या दरवाजाच्या दिशेने सहा माणसं येताना दिसली.+ त्या प्रत्येकाच्या हातात चुराडा करण्यासाठी शस्त्र होतं. त्यांच्यामध्ये मलमलीचे कपडे घातलेला एक माणूसही होता. आणि त्याच्या कमरेला सचिवाची* दौत अडकवलेली होती. ते सगळे येऊन तांब्याच्या वेदीजवळ+ उभे राहिले.

३ नंतर, करुबांच्या वर असलेलं इस्राएलच्या देवाचं तेज+ तिथून निघून मंदिराच्या दरवाजाच्या उंबरठ्यावर आलं.+ मग, मलमलीचे कपडे घातलेल्या आणि कमरेला सचिवाची दौत अडकवलेल्या माणसाला तो हाक मारू लागला. ४ यहोवा त्याला म्हणाला: “संपूर्ण यरुशलेम शहरात फिर, आणि शहरात होत असलेल्या घृणास्पद गोष्टींमुळे+ जी माणसं रडत आहेत आणि शोक करत आहेत+ त्यांच्या कपाळावर खूण कर.”

५ आणि त्याच्यासोबत असलेल्या इतरांना तो मोठ्या आवाजात म्हणाला: “त्याच्यामागे शहरात जा आणि लोकांची कत्तल करा. कोणाचीही गय करू नका आणि कोणालाही दयामाया दाखवू नका.+ ६ म्हातारे-कोतारे, तरुण-तरुणी, लहान मुलं आणि स्त्रिया अशा सगळ्यांना मारून टाका.+ पण, ज्यांच्या कपाळावर खूण आहे त्यांच्याजवळ जाऊ नका.+ माझ्या मंदिरापासूनच सुरुवात करा.”+ तेव्हा त्यांनी मंदिराच्या समोर असलेल्या वडीलजनांपासून सुरुवात केली.+ ७ मग तो त्यांना म्हणाला: “जा! मंदिर अपवित्र करा आणि मंदिराची सगळी अंगणं कत्तल झालेल्या लोकांच्या प्रेतांनी भरून टाका.”+ तेव्हा ते गेले आणि शहरातल्या लोकांना त्यांनी मारून टाकलं.

८ ते लोकांची कत्तल करत होते, त्या वेळी मी एकटाच उरलो. तेव्हा मी जमिनीवर पालथा पडलो आणि मोठ्याने म्हणालो: “हे सर्वोच्च प्रभू यहोवा! तू यरुशलेमवर आपल्या क्रोधाचा वर्षाव करून इस्राएलच्या उरलेल्या सगळ्या लोकांचा नाश करणार आहेस का?”+

९ त्यावर तो मला म्हणाला: “इस्राएलच्या आणि यहूदाच्या घराण्याचा अपराध अतिशय मोठा आहे.+ सगळा देश रक्‍तपाताने भरलाय+ आणि शहरात सगळीकडे भ्रष्टाचार माजलाय.+ कारण ते म्हणत आहेत, ‘यहोवा हा देश सोडून गेलाय. यहोवा काही आपल्याला बघत नाही.’+ १० पण, मला मात्र त्यांच्याबद्दल अजिबात वाईट वाटणार नाही आणि मी त्यांना जरासुद्धा दयामाया दाखवणार नाही.+ त्यांच्या दुष्ट कामांचे परिणाम मी त्यांना भोगायलाच लावीन.”

११ मग मी पाहिलं, की मलमलीचे कपडे घातलेला आणि कमरेला दौत अडकवलेला तो माणूस परत आला आणि म्हणाला: “तू आज्ञा दिली होतीस, तसंच मी केलं.”

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा